आरोग्य परामर्श

* डॉक्टर स्तुती मोदी, स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच आयवीएफ एक्स्पर्ट, श्री मूलचंद हॉस्पिटल करणाल, हरियाणा

प्रश्न : माझ्या ओवरीत वारंवार सिस्ट बनतं. याचं कारण काय आहे आणि यामध्ये कॅन्सरचादेखील धोका संभवू शकतो का?

उत्तर : ओवरीमध्ये सिस्ट विविध कारणांनी बनू शकतो. मोनोपॉज याचं सर्वात प्रमुख कारण आहे. या व्यतिरिक्त पॉलिसीस्टिक ओवरी सिंड्रोम, एन्डो मॅट्रियोसिस, हार्मोन असंतुलन, क्रोनिक पेल्विक इन फ्लॅमेशन, ट्यूमर इत्यादीदेखील कारणं असू शकतात. सामान्य सिस्ट ज्याचा आकार ४ सेंटीमीटरपेक्षा कमी असतो, ते अनेकदा आपोआप कमी होतात. मोठया आणि गुंतागुंतीच्या सिस्टवर उपचाराची गरज असते. तसंही ओवेरियन सीस्ट कॅन्सरहित असतात, परंतु काही बाबतीत हे कॅन्सरयुक्तदेखील असू शकतात. खासकरून वाढत्या वयासोबत मेनोपॉजनंतर ज्या महिलांमध्ये ओवेरियन सीस्ट बनतं त्यामध्ये ओवेरियन कॅन्सरची शक्यता वाढू शकते.

प्रश्न : माझ्या वडिलांना लिव्हर आणि आईला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. मी असं ऐकलंय की हे पुढेदेखील कुटुंबात होऊ शकतं. माझं वय ३२ वर्षें आहे. यापासून वाचण्यासाठी मला कोणती काळजी घ्यायला हवी?

उत्तर : हे खरं आहे की अनुवंशिकता कॅन्सरचं प्रमुख रिस्पेक्टर मानलं जातं. जर तुमच्या आईला ब्रेस्ट कॅन्सर असेल तर तुमच्यासाठी हा धोका १२ ते १४ टक्के अधिक असतो. अशाच प्रकारे लिव्हर कॅन्सरमध्येदेखील अनुवंशिकता  महत्त्वाची भूमिका साकारते. यापासून वाचण्यासाठी तुम्ही काही गरजेची पावलं उचलू शकता जसं की शारीरिकरित्या सक्रिय रहा, स्वत:चे वजन वाढू देऊ नका, दारूचे सेवन करू नका, मुलांना स्तनपान करा, गर्भ निरोधक गोळयांचे सेवन करू नका. खासकरून ३५ वर्षांनंतर मोनोपोज नंतर हार्मोन थेरपी घेऊ नका.

प्रश्न : फायब्रॉइड्सच्या सर्जरीनंतर हे पुन्हा होऊ शकतं का?

उत्तर : फायब्रॉइड्स गर्भाशयात विकसित होणाऱ्या कॅन्सर रहित पिंड आहेत जे याच्या भिंतीच्या मासपेशी आणि संयोजि टिशूपासून बनतात. यांना सर्जरीद्वारे काढले जाते. ज्याला मायोमेकटोमी म्हणतात. सर्जरीनंतरदेखील हे फायब्रॉईड्स पुन्हा विकसित होण्याची शक्यता २५ ते ३० टक्के असते. यापासून वाचण्यासाठी मीठ कमी खा, रक्तदाब नियंत्रणात ठेवा, व्यायाम करा, कमरेच्या आजूबाजूची चरबी वाढू देऊ नका, पोटॅशियमचे सेवन वाढवा.

प्रश्न : माझ्या लग्नाला ५ वर्षे झाली आहेत. या दरम्यान माझा ३ वेळा गर्भपात झाला आहे. मी कधीच आई होऊ शकत नाही का?

उत्तर : वारंवार गर्भपात होण्याचा अर्थ वांझपणा नाही. तुम्ही आई बनू शकता. गर्भपात होण्याची अनेक कारणं असतात जसं की अनुवंशिक समस्या, हार्मोनल असंतुलन, संक्रमण, भ्रुण निर्माणमध्ये विकृती आणि इम्युनोलॉजिकल व पर्यावरणीय कारक. कारणांचा योग्य शोध घेऊन योग्य जीवन शैली स्वीकारून तसंच योग्य उपचारद्वारे तुम्ही आई बनू शकता.

प्रश्न : माझ्या कुटुंबात अर्ली मेनोपॉजची समस्या आहे. माझी आजी आणि आईला मेनोपॉज ४०व्या वर्षीच आला होता. मी करिअरमुळे आता फॅमिली प्लॅनिंग करत नाहीए. मी काय करू?

उत्तर : अर्ली मेनोपॉजमध्ये अनुवंशिकतेचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. मेनोपॉजच्या स्थितीत आल्यानंतर स्त्रियांना स्त्री बीज होऊ शकत नाही. यामुळे गर्भधारणा करणं असंभव होऊन जातं. अशावेळी तुम्ही असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह तंत्रज्ञानचा(एआरटी)आधार घेऊ शकता वा मग आपलं बीज फ्रीज करू शकता, जे आयव्हीएफ करताना वापरलं  जातं.

प्रश्न : मला २ वर्षांची एक मुलगी आहे. मला आता ४-५ वर्षांत दुसरं मूल नको आहे. मुलांमध्ये अंतर राखण्याची सर्वात सुरक्षित पद्धत कोणती आहे?

उत्तर : मुलांमध्ये अंतर राखण्यासाठी अनेक गर्भनिरोधक गोळयांचं सेवन दररोज करावं लागतं. जेव्हा तुम्हाला गर्भधारणा करायची असेल तेव्हा याचं सेवन बंद करा. व्हेजाइनल रींगचा वापरदेखील करता येतो. हे दर महिन्याला बदलावं लागतं. इंजेक्शन गर्भावस्था रोखण्यासाठी ९०-९५ टक्के सिद्ध आहे. हे इंजेक्शन दर तिसऱ्या महिन्यात घ्यावं लागतं. इंट्रा युटेराइन डिव्हायसेस (आययुडीएस)देखील येतं, जे दीर्घकाळपर्यंत काम करतं आणि त्याची खात्री ९९ टक्के आहे.

प्रश्न : मला वाटतं की माझी मासिकपाळी बंद होणार आहे. यामध्ये मला कशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल?

उत्तर : मासिक पाळी बंद होणं म्हणजे मेनोपॉजनंतर तुम्हाला हॉट फ्लॅशेज आणि व्हेजाइनल ड्रायनेससारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हॉट फ्लॅशेजमुळे रात्री खूप घाम येण्याने तुमची झोपमोड होऊ शकते. व्हेजाइनल ड्रायनेसपासून वाचण्यासाठी तुम्ही वॉटर बेस्ड लुब्रिकंट्स वा व्हेजाइनल एस्ट्रोजन क्रीमचा वापर करू शकता. काही स्त्रियांमध्ये मूड स्विंग आणि वजन वाढण्यासारखी समस्यादेखील पाहायला मिळते. यापासून वाचण्यासाठी समतोल आणि पोषक आहाराचं सेवन करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें