११ अँटी एजिंग फूड

* नसीम

वयाच्या चाळीशीनंतर चेहरा आणि हातापायांवर पडणाऱ्या सुरकुत्या, डोळयांखालची काळी वर्तुळे, पांढरे केस, ढिले पडलेले शरीर, कामवासना कमी होणे, सांधेदुखी, अशक्तपणा, थकवा, तणाव तुम्हाला वेगाने वृद्धापकाळाकडे घेऊन जातात. अशावेळी वाढते वय रोखण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे लोशन आणि क्रीम वापरू लागता. एनर्जी ड्रिंक पिऊ लागता. व्हिटॅमिनच्या गोळया खाऊ लागता. तरीही वाढणारे वय थांबत नाही आणि त्याच्या खुणाही लपत नाहीत.

पण आता नवीन वर्ष…नवी सकाळ…नवा विचार… आणि स्वत:च स्वत:शी केलेला 2021चा नवा पहिला संकल्प की यावर्षी आपण वाढत्या वयाचा वेग नक्की थांबवू. होय, आम्ही मस्करी करीत नाही तर हे शक्य आहे. फक्त तुम्ही संकल्प करण्याची गरज आहे. वाढत्या वयाला रोखता येईल, पण कुठल्याही महाग क्रीम, लोशन किंवा एनर्जी टॉनिकने नाही तर, त्या गोष्टींनी ज्या तुमच्या किचनमध्ये नेहमीच असतात. या त्याच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपले ऋषीमुनी निरोगी, आनंदी आणि १०० वर्षांहूनही अधिक दीर्घायुष्य जगत होते. होय, आम्ही अँटी एजिंग फूडबद्दलच बोलत आहोत.

आरोग्यासाठी खाण्याच्या निरोगी सवयींचा अवलंब करून त्याचा परिणाम यावर्षी तुम्ही तुमची त्वचा, शरीर आणि चेहऱ्यावर पाहू शकाल. नवीन वर्षात जर तुम्ही अँटी एजिंग फूडला आपलेसे केले तर आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही जास्त वय होऊनही सुंदर आणि तरुण दिसाल, शिवाय म्हातारपणातले रोग म्हणून समजल्या जाणाऱ्या अनेक आजारांपासूनही दूर राहाल.

1. अंडे : अंडयात व्हिटॅमिन ए, बी आणि ई असते, जे वाढत्या वयाचा वेग कमी करते. नियमित दोन अंडी खाल्ल्याने शरीरातील हानी पोहोचलेल्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी पुरेशी चरबी आणि प्रथिने मिळतात. म्हणून, आजपासून नाश्ता करताना दोन अंडी नक्की खा.

2. सोया : सोयाबीन, सोया पीठ, सोया दूध आणि टोफूमध्ये कमी फॅट आणि कॅल्शियम असते. सोया उत्पादनांमुळे शरीर सुदृढ आणि निरोगी होते. शिवाय याच्या वापरामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो.

3. डाळिंब : डाळिंब वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करून शरीराच्या डीएनएमध्ये ऑक्सिडेशन कमी करते. हे खाल्ल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होते. दररोज एक डाळिंब खाल्ल्यास तुमच्या सौंदर्यात भर पडेल.

4. ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात. ही तुमची पाचक प्रणालीही निरोगी ठेवते, म्हणून जर तुम्हाला वयापेक्षा लहान दिसायचे असेल तर दिवसभरातून दोन कप ग्रीन टी नक्की प्या.

5. आंबट आणि पिवळी फळे : संत्री, मोसंबी, द्राक्षे, लिंबू ही अशी फळे आहेत, ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यातून बायोफ्लेव्होनॉइड्स आणि लायमोनीनही मिळते. हे दोन्ही घटक कर्करोगास कारणीभूत कार्सिनोजन्स उत्सर्जित करतात. सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात, म्हणून आजपासून यांचा आहारात समावेश करा. सकाळी लिंबूपाणी आणि दुपारच्या जेवणानंतर एक संत्र किंवा मोसंबी नक्की खा.

6. ब्लूबेरी : हे काहीसे महागडे फळ आहे, परंतु त्यात बरीच महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि पॉलिफेनॉल आढळून येतात. ज्यामुळे वाढत्या वयाचा वेग मंदावतो, शिवाय कॅन्सर आणि मधुमेहासारखे आजारही होऊ शकत नाहीत. म्हणूनच दिवसभराच्या आहारात ब्लूबेरीचा अवश्य समावेश करा.

7. दही : दह्यात लाइव्ह बॅक्टेरिया असतात, जे पचनास मदत करतात. कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याने दही ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांना कमकुवत आणि पोकळ होण्यापासून रक्षण करते. सोबतच हे त्वचेला चमकदार आणि तरूण बनविण्यास मदत करते.

8. मोड आलेली कडधान्ये : ही खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. यात आढळणारे बीटा कॅरोटीन, आइसोथियोसायनेट्ससारखे घटक कॅन्सरपासून दूर ठेवतात. हे नियमित खाल्ल्याने माणूस आयुष्यभर तरूण आणि उत्साही दिसतो.

9. स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीत फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते. यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वाढत्या वयाला थोपवून ठेवतात.

10. टोमॅटो आणि टरबूज : टोमॅटो आणि कलिंगड हे लाइकोपेनचे समृद्ध स्रोत आहेत. लाइकोपेन कॅन्सर होण्याची शक्यता कमी करते. टोमॅटोचा रस आणि कच्चे टोमॅटोदेखील प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

11. सुकामेवा : सुकामेवा किंवा नट्समध्ये आरोग्यवर्धक फॅट्स असतात. यामुळे इलास्टिन आणि कोलेजनचे फायदे मिळतात, जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात. मूठभर सुकामेवा रोज खाल्ल्याने शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडंट्स मिळतात. यात भरपूर कॅलरी असते, त्यामुळेच सुकामेवा कमी खा असा सल्ला दिला जातो. दोन पिस्ता, चार बदाम, दोन काजू आणि एक अक्रोड हा दिवसाची सुरुवात करण्यासाठी उत्तम नाश्ता आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें