चॉकलेट खा, खुश व्हा

* दीपा पांडेय द्य

चॉकलेट खायला सगळयांनाच आवडते. अनेकदा कुणालातरी चॉकलेट खाताना पाहून आपल्यालाही ते खाण्याचा मोह होतो, पण दात किडण्यापासून वाचवण्यासाठी आणि वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण स्वत:ला आवरले पाहिजे. तरीही डार्क चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. कोको या पदार्थापासून बनवलेल्या चॉकलेटमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.

कोकोची वैशिष्टये

अँटिऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम, लोह, पोटॅशियम, झिंक याशिवाय कोकोच्या झाडात इतर अनेक पोषक घटक असतात ज्यापासून डार्क म्हणजेच गडद चॉकलेट बनवले जाते. याशिवाय यामध्ये कॅफिनचे प्रमाणही कमी असते. म्हणूनच जरी आपण हे चॉकलेट कमी प्रमाणात खाल्ले तरी ते आपल्याला भरपूर ऊर्जा देते.

शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला अँटिऑक्सिडंट्सचा डोस हवा असतो. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, कोकोमध्ये ब्ल्यूबेरीपेक्षा चांगले अँटिऑक्सिडंट असतात.

डार्क आणि साखर नसलेले चॉकलेट मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर असते. ते पित्त आणि इन्सुलिनच्या स्त्रावावर परिणामकारक ठरते, ज्यामुळे मधुमेहाचे प्रमाण कमी करण्यास मदत होते.

ते नैराश्य आणि तणाव कमी करण्यासाठीही खूप फायदेशीर असते. आपण सर्वच आपल्या स्वभावातील चढ-उतारांमुळे त्रस्त असतो. कधी मन खूपच उदास किंवा चिडचिडे होते. अशा स्थितीत डार्क चॉकलेट खूपच लाभदायक ठरते. त्यात असलेल्या कोको पॉलिफेनॉल्सच्या सेवनामुळे चांगल्या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होते.

लीन बार

हरियानाचे टॉपर असलेल्या देवांश जैन यांनी २०१८ मध्ये प्रदीर्घ संशोधनानंतर एक असे चॉकलेट बनवले जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. त्यांनी चोको, सिपिरुलिना, बदाम, मनुका आणि मुसलीचा (ओट्स आणि इतर तृणधान्ये, सुकामेवा आणि काजू यांचे मिश्रण) वापर करून हे चॉकलेट तयार केले. त्याला नंतर स्टार्टअपचे स्वरूप दिले. आज ऑनलाइन ‘द हेल्थी’च्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक ग्राहकांनी या चॉकलेटची खरेदी केली आहे.

चॉकलेटचे तोटे

डार्क चॉकलेटमध्ये कॅफिनचे प्रमाण अधिक असते. म्हणूनच ते मर्यादित प्रमाणातच खायला हवे. ते जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे झोप न येणे, डिहायड्रेशन, डोकं गरगरणे, उलटी, वजन वाढणे असे आजार उद्भवतात.

कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. हेच चॉकलेटसाठीही लागू होते. दररोज डार्क चॉकलेटचे १ किंवा २ तुकडेच खायला हवेत. ते किती खावे यासाठी तुम्ही डॉक्टरचा सल्लाही घेऊ शकता.

सर्वसामान्यपणे चॉकलेटमध्ये साखरेचे प्रमाण जास्तच असते, जे दात आणि शरीरासाठी नुकसानकारक ठरते. विचारपूर्वक मर्यादित प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्यास त्याच्यातील गुणांचा फायदा करून घेता येतो.

मधुमेह : नियंत्रण शक्य आहे

* डॉ. मीना छाबडा

असा अंदाज वर्तवला जात आहे की २०३० पर्यंत डायबिटीज मॅलिटस भारताच्या ७.९४ कोटी लोकांना प्रभावित करू शकतं, तर चीनमधील ४.२३ कोटी लोक आणि अमेरिकेतील ३.०३ कोटी लोक या रोगांच्या कचाट्यात सापडतील. अशी अनेक कारणे आहेत जे देशभरातील लोकांध्ये या रोगासाठी जबाबदार आहेत.

मधुमेहग्रस्त लोक मनामध्ये हा संशय घेऊन जगू लागतात की पुढे त्यांचे डोळे जातील किंवा त्यांचा पाय कापावा लागू शकतो वा किडनी फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

तरुणांमध्ये वाढतं प्रकरण

भारतात २२ ते ३० वयोमर्यादा असलेल्या तरुणांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. ज्यांच्यामध्ये भरपूर उर्जा आणि रचना करण्याची क्षमता आहे. पण तरुण ज्या जीवनपद्धतींचा अवलंब करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर अनेक रोगांचा वाईट प्रभाव पडू लागला आहे.

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जाऊ लागलं आहे. खरंतर अलीकडचे तरुण आरोग्यवर्धक नसलेल्या आहाराच्या सवयीमुळे लठ्ठपणाला बळी पडू लागले आहेत. जे डायबिटीज आणि इतर कार्डियोवॅस्क्युलर समस्यांचं मुख्य कारण आहे. पूर्वी हा रोग ४० ते ४५ वयोमर्यादा असलेल्या लोकांना व्हायचा, पण आता तर हा रोग २२ ते २५ वर्षांच्या तरुणांनाही होऊ लागला आहे.

संसर्गाचा धोका

जरासं कापल्यानेदखील त्वचेमध्ये होणाऱ्या भयंकर संसर्गाला सॅल्युलायटिस म्हटलं जातं. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या त्वचेच्या बाबतीत तुम्ही अधिक सावधगिरी बाळगा, कारण ब्लड ग्लूकोज लेव्हल जास्त असल्यास संसर्गाची अधिक असते.

सॅल्यूलायटिस एक गंभीर संसर्ग आहे, जो त्वचेच्या आतमध्ये पसरतो आणि त्वचा व त्याच्या अंतर्गत चरबीला प्रभावित करतो. लोक बऱ्याचदा सॅल्यूलायटिसला सॅल्यूलाइट समजतात. पण खरंतर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सॅल्यूलायटिज चरबीच्या आतला थर डर्मीज आणि त्वचेच्या आतल्या टिश्यूचा एक जंतूसंसर्ग असतो तर सॅल्यूलाइट त्वचेच्या आतमध्ये चरबी साचल्यामुळे होतो, जे दिसायला संत्र्यांच्या सालीसारखं दिसतं. सॅल्यूलायटिसचा सर्वात मोठा अपाय म्हणजे हा योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यास फार वेगाने पसरतो.

सॅल्यूलायटिसपासून संरक्षण

* त्वचेला अपाय करणारं कठिण आणि अधिक कार्य करणं टाळा. असं काम निवडा ज्याने तुम्हाला जास्त थकवा येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड शुगरचा योग्य स्तर टिकवून ठेवा. ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा हा अर्थ आहे की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच कमी असेल आणि अशावेळी जखम भरण्यास अडथळा येईल.

* कमी कार्बोहायडे्रट असलेल्या आहाराचं सेवन करा आणि फायबरयुक्त फळांचं भरपूर सेवन करा. तुम्ही आपल्यासोबत ग्लूकोज टेस्ट मीटर ठेवल्यानेदेखील तुम्हाला त्याच्या वृद्धिवर नजर ठेवण्यास मदत होईल.

*  तुम्ही जर सॅल्यूलायटिसच्या ज्ञात असलेल्या लहानात लहान रिस्क फॅक्टरच्या कचाट्यात असाल, तर दररोज आपल्या पायांवर नजर ठेवा. जखमेवरही पूर्ण लक्ष द्या. त्चचेची सूज, लालसरपण यासारख्या लक्षणांवरही लक्ष ठेवा.

* जखम नीट करण्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्या. लक्षात ठेवा नियंत्रित तपासणीच्या अभावात लहानशी जखमही सॅल्यूलायटिसच कारण ठरू शकते. जखम असलेला भाग चांगल्याप्रकारे स्वच्छ ठेवा जेणेकरून तिथे पाणी लागू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जखमेवर ड्रेसिंग करा आणि प्रत्येक वेळेस स्वच्छ ड्रेसिंगचाच वापर करा.

असं केल्यास तुम्ही मधुमेह असूनसुद्धा सुदृढ व्यक्तिसारखं जीवन जगू शकता. जीवनपद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही तुमची ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रित ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हालाच स्वस्थ वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें