गृहशोभिकेचा सल्ला

प्रश्न. मी २४ वर्षीय महिला आहे आणि ३ वर्षांच्या मुलीची आई आहे. मला पुढील २-३ वर्षांपर्यंत मूल नकोय. मी महिला कंडोमबाबत ऐकले आहे, पण त्याचा कधी वापर केला नाही. कृपया सांगा की महिला कंडोम काय आहे आणि किती सुरक्षित आहे?

उत्तर. सेक्सला रोमांचक आणि आनंददायी बनवण्यासाठी आजकाल बाजारात पुरुष कंडोमच नव्हे, तर महिला कंडोमही उपलब्ध आहेत. सुरक्षित सेक्ससाठी पुरुषच नव्हे, महिलाही याचा वापर करू शकतात.

महिला कंडोम गर्भनिरोधक म्हणून केवळ उत्तम पर्यायच नव्हे, तर सेक्सला सोपे आणि चिंतामुक्तही बनवतो. याबरोबरच लैंगिक संपर्कामुळे होणाऱ्या अनेक रोगांपासून संरक्षणासाठीसुध्दा सहायक असतो.

महिला कंडोम लांबट पॉलियुथेनची एक पिशवी असते, जी संबंध ठेवताना लावली जाते. याचा वापर करणे सहजसोपे असते. ही दोन्ही काठांनी लवचिक असते आणि यात सिलिकॉनवर आधारित चिकट स्त्राव लावलेला असतो. जेणेकरून सेक्स संबंधाच्या वेळी जास्त आनंद मिळेल.

पिशवीच्या कडेला लवचिक रिंग असते, जी वेजाइनाच्या आत टाकली जाते आणि पिशवीची मोकळ्या काठाची रिंग वेजाइनाच्या बाहेर असते. सामान्यपणे याचा काही साइड इफेक्ट नसतो. महिला कंडोमचा वापर सोपा आहे आणि हा पूर्णपणे सुरक्षितही आहे.

 प्रश्न. मी ३५ वर्षीय अविवाहित तरुणी आहे आणि एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे लग्न करू शकले नाही किंवा असं म्हणा की माझी छोटी बहीण आणि छोट्या भावालाही शिकवून लायक बनवलं आणि बहिणीचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. अचानक वडील वारल्यानंतर जबाबदाऱ्या पार पाडत वेळ कधी निघून गेली कळलंच नाही. कुटुंबातील लोक स्वार्थी नाहीत. त्यांनी अनेकदा लग्न करण्यासाठी माझ्यावर दबावही टाकला, पण प्रत्येक वेळी मी नकार दिला. इकडे १-२ वर्षांपासून मी एका मुलाच्या संपर्कात आहे. तो चांगल्या नोकरीला आहे, पण माझ्यापेक्षा २-३ वर्षे छोटा आहे. तो खूप चांगला आणि केयरिंग आहे. त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझ्याशी लग्न करायची इच्छा आहे, पण मला या नातेसंबंधांबाबत भीती वाटते की घरातील लोक नाराज झाले तर. खरं आम्ही उच्च जातीचे आहोत आणि मुलगा मागास जातीतील. आई, भाऊ-बहिणीच्या नजरेत मी आदर्श आहे. अशा वेळी माझ्या लग्नाचा निर्णय योग्य राहील का? याबाबत मी घरात बोलू शकते का?

उत्तर. आजच्या मुली कोणापेक्षाही कमी नाहीत, हे आपण सिध्द केलं आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर ज्याप्रकारे आपण कुशलतेने घराची जबाबदारी पार पाडली आहे, ती कौतुकास्पद आहे, पण तुम्ही स्वत:बाबत काहीच विचार केला नाही, हे दुर्दैव.

अजून वेळ जाण्यापूर्वी आपण लग्न केलं पाहिजे. मुलगा आपल्याला पसंत आहे आणि त्याला आपल्याशी लग्न करायची इच्छा आहे, तर ही चांगली गोष्ट आहे.

राहिला प्रश्न त्याच्या जातीचा तर आपण शिकलेल्या व जागरूक आहात. उच्च-नीच जाती, अस्पृश्यतासारख्या जुनाट परंपरांपासून स्वत:ला बाहेर काढा.

पत्रात आपण असं म्हटलेय की आपल्या कुटुंबातील लोक स्वार्थी नाहीएत आणि आपल्यावर लग्नासाठी दबावही टाकत आहेत, तर सरळ आहे, आपल्या आनंदासाठी त्यांची या लग्नाला काही हरकत असणार नाही. जर कुटुंबातील लोक तयार झालेच नाहीत, तर आपण कोर्टमॅरेज करू शकता.

 प्रश्न.  मी ३२ वर्षीय घटस्फोटित महिला आहे. मी सुरुवातीपासूनच मुक्त विचारांची राहिले आहे आणि स्वत:चं आयुष्य मोकळेपणाने जगण्यावर विश्वास ठेवते. इकडे १-२ वर्षांपासून मी अनेक पुरुषांच्या संपर्कात राहिले. त्यांच्यासोबत शारीरिक संबंधही बनले. गेल्या काही दिवसांपासून मला वेजाइनामध्ये खाज येते आणि नंतर तिथे लाल रॅशेसही होतात. १-२ वेळा मेडिकल स्टोरमधून औषध घेऊनही लावलं, पण काही फायदा झाला नाही. कृपया मी काय करू सांगा?

उत्तर. प्रत्येक महिलेला आपले आयुष्य आपल्या पध्दतीने जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. नोकरी, पेहराव, खाणे-पिणे, एवढेच नव्हे, तर सेक्स संबंधांबाबतही महिला पहिल्यापेक्षा अधिक मोकळ्या झाल्या आहेत. आपला मुक्तपणे जगण्यावर विश्वास आहे, ही चांगली गोष्ट आहे, पण यावेळी काळजी घेणेही आवश्यक आहे.

आपण आपल्या पत्रात हे सांगितलं नाहीए की, ज्या पुरुषांशी आपले सेक्स संबंध आले, त्यांनी आवश्यक सुरक्षा म्हणजेच कंडोमचा वापर केला होता की नाही? सेक्स संबंध तेव्हाच आनंददायक बनू शकतात, जेव्हा त्यासाठी आवश्यक काळजी घेतली जाईल. एकापेक्षा जास्त पुरुषांसोबत संबंध ठेवताना कंडोमचा वापर फुकटात अनेक रोगांचा संसर्ग होण्यापासून वाचण्याची सोपी पध्दत आहे.

जर वेजाइनामध्ये खाज अथवा जळजळ होत असेल, तर शक्य आहे की हे इन्फेक्शनमुळे होत आहे. त्यामुळे तपासणी केल्याशिवाय एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचणे सध्या योग्य होणार नाही. आपण एखाद्या विशेषज्ञ डॉक्टरांना भेटणे उत्तम होईल, जेणेकरून इन्फेक्शन अजून पसरणार नाही.

लक्षात ठेवा, एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर्ससोबत संबंध ठेवणे अनेक लैंगिक रोगांना आमंत्रण देण्यासारखं आहे.

गृहशोभिकेचा सल्ला

 प्रश्न.  मी २४ वर्षीय तरुणी आहे. गेल्या ४ वर्षांपासून माझं एका मुलावर प्रेम   आहे. काही काळापूर्वी सर्व काही ठीक होतं. त्याचंही माझ्यावर खूप प्रेम होतं. आम्ही आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्नं पाहिली होती. आम्ही रोज भेटायचो. फोनवर खूप गप्पा मारायचो पण काही महिन्यांपासून त्याचं वागणं खूप बदललं आहे. भेटण्यासाठी दिवस-दिवस वाट पाहावी लागते आणि भेटला की त्याला परतण्याची घाई असते. एवढंच नाही, आता तो पूर्वीसारखा स्वत:हून फोनही करत नाही. विचारल्यावर निरर्थक कारणं देतो. त्याचं दुसऱ्या कुणावर प्रेम तर नाही ना? असं असेल तर काय? मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. मी काय करू?

उत्तर. ४ वर्षं म्हणजे खूप मोठा काळ आहे. तुम्हाला जर वाटतं की तुमचा बॉयफ्रेंड तुमच्या बाबतीत जास्तच निष्काळजीपणा दाखवत आहे. तुम्हाला भेटू इच्छित नाही, फोन करत नाही, तर तुम्ही त्याच्याशी मोकळेपणाने बोललं पाहिजे आणि त्याच्या उदासीनतेचं कारण जाणून घेतलं पाहिजे. कदाचित तो घाबरला असेल किंवा त्याच्या घरच्यांना हे नातं मंजूर नसेल. तुम्ही बसून बोललं पाहिजे. काही वाद असेल तर तो सोडवला पाहिजे. कारण कळलं की उपायही कळेल. त्याला तुम्हाला सोडायचं असेल तर तयार राहिलं पाहिजे.

प्रश्न. मी २६ वर्षांची तरुणी आहे. हल्लीच माझा साखरपुडा मोठ्या धुमधडाक्यात पार पडला. लग्नाची तारीखही ठरली होती. पण लग्नाच्या २ महिने आधी मुलाकडच्यांनी लग्न मोडलं. माझं कुटुंबं यामुळे निराश आहे. आता त्यांची इच्छा आहे की लवकरात लवकर दुसरा एखादा मुलगा मिळू दे आणि लग्न ठरल्या तारखेलाच पार पडू दे. त्यांना वाटतं की ही गोष्ट लोकांना कळली तर माझ्यासाठी दुसरा मुलगा मिळणं कठिण होईल. घाईगडबडीत ते माझं अशा मुलाशी तर लग्न लावणार नाहीत ना जो माझ्यासाठी योग्य नाही याची मला भीती वाटते. मी काय करु?

उत्तर. तुमच्या कुटुंबाची निराशा अयोग्य आहे. त्यांनी तर खूश असलं पाहिजे की तुम्ही अशा लोकांच्या जाळ्यात अडकता-अडकता वाचलात. लग्नानंतर त्यांचा खरा चेहरा समोर आला असता तर गोष्टी अधिक किचकट झाल्या असत्या. दुसरा मुलगा शोधून ठरल्या तारखेला लग्न करण्याचा अट्टहास करू नका. घाईत आणि निराशेत कोणंतही काम चांगलं होत नाही. तुम्हाला एकदा धक्का बसला आहे आणि आता आणखी काळजीपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. संपूर्ण चौकशी करूनच लग्न ठरवा. याबाबत तुम्ही कुटुंबीयांशी चर्चा करू शकता. कारण हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे.

प्रश्न. मी २७ वर्षांची आहे. माझी अडचण ही आहे की मला सतत हात-पाय धुण्याची सवय आहे. टॉयलेटला गेल्यावर मी गुडघ्यापर्यंत पाय धुते. अंघोळीला मला एक तास लागतो. माझ्या या सवयीमुळे मी कुठेही जाऊ शकत नाही. घरातले याला माझा वेडेपणा म्हणतात. मी काय करु?

उत्तर. तुम्ही एखाद्या मनोविकार तज्ज्ञाकडून सल्ला घ्या. ते तुम्हाला तुमच्या या विचित्र सवयी बदलण्यास मदत करतील.

प्रश्न. मी २२ वर्षांची आहे. माझं एका अशा मुलावर प्रेम आहे जो कधीही बाप बनू शकत नाही. माझं त्याच्यावर इतकं प्रेम आहे की मी त्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नाही. मला त्याच्याशी लग्न करायचंय. पण माझ्या घरातले याविरोधात आहेत. ते आम्हाला या लग्नासाठी परवानगी देणार नाहीत. आम्ही कोर्ट मॅरेजही करू शकत नाही. कारण त्याचे सर्व कागदपत्रं मुलीच्या नावे बनले आहेत. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर. लग्नासारखे महत्त्वाचे निर्णय घेण्याइतकी तू मोठी झालेली नाही. म्हणून तू असं म्हणते आहेस. आयुष्य भावनेच्या आधाराने चालत नाही हे तुला समजलं पाहिजे. सत्य स्वीकारायला शिक. आईवडिलांच्या अनुभवी डोळ्यांना जे दिसतंय त्याकडे तु पाठ फिरवत आहेस. आईवडिल तुझ्या भल्याचाच विचार करत आहेत. त्यांच्या विरोधात जाऊ नकोस.

प्रश्न. माझ्या लग्नाला एक वर्षं झालं आहे. तसे तर नवरा आणि सासरचे सगळे चांगले आहेत. पण माझ्या नवऱ्याला माझं माहेरी जाणं आवडत नाही. खरंतर माझा कोणी भाऊ नाही. त्यामुळे माझी मोठी बहिण सहकुटुंब आईबाबांकडे राहाते. माझी बहीण माझ्यापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे. माझे भावोजी माझ्यावर मोठ्या भावासारखं प्रेम करतात. पण ते माझ्या नवऱ्याला आवडत नाही. तसं तो काही बोलत नाही. पण त्याचा चेहरा सगळं सांगून जातो. नवऱ्याला कसं समजावू?

उत्तर. तुमच्या लग्नाचा कालावधी कमी आहे. तुम्ही तुमच्या नवऱ्याला वेळ दिला पाहिजे. तुमचं माहेरी जाणं किंवा बहिणीच्या नवऱ्याशी मोकळं वागणं त्याला आवड् नसेल तर तुम्ही त्याला तक्रार करण्याची संधी देऊ नका. कदाचित वेळेनुसार त्याचं वागणं बदलेल आणि त्याला नात्यांचं महत्त्व कळू शकेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें