गृहशोभिकेचा सल्ला

*  प्रतिनिधी

मी २४ वर्षांचा आहे आणि माझी मैत्रीण २५ वर्षांची आहे. मागील काही दिवसांत मी कंडोम न लावता मैत्रिणीसोबत २-३ वेळा सेक्स केला होता. मैत्रिणीने इमर्जन्सी गर्भनिरोधक गोळी ७२ तासांच्या वैद्यकीय मर्यादेत घेतली असली तरी आता आम्हा दोघांचे टेन्शन वाढले आहे. मैत्रिणीला २० ते २७ दिवसांच्या दरम्यान मासिक पाळी येते, जी यावेळी आली नाही. ती गर्भवती आहे का?

कंडोमप्रमाणेच आपत्कालीन गोळया या गर्भधारणा रोखण्याचे साधन आहेत. परंतु त्या सहसा तेव्हाच घेतल्या जातात जेव्हा लैंगिक संबंध उत्स्फूर्त झाला असेल आणि त्या काळात गर्भनिरोधक पद्धतीचा अवलंब केला गेला नसेल,

आपत्कालीन गर्भनिरोधक गोळी समागमानंतर ७२ तासांच्या आत घ्यावी लागते. ७२ तासांपूर्वी घेतल्यास गर्भधारणेची शक्यता बऱ्याच प्रमाणात टाळता येते.

तुमच्या मैत्रिणीने इमर्जन्सी गोळी घेतल्याने तिच्या रक्तातील हार्मोन्सचे संतुलन बिघडले असण्याची शक्यता आहे. तिची मासिक पाळी उशिरा येण्याचीही शक्यता आहे.

तुम्ही तुमच्या मैत्रिणीला युरिन प्रेग्नेंसी टेस्ट करायला सांगितल्यास बरे होईल. हे घरीदेखील सहज करता येते.

सेक्समध्ये उतावळेपणा करणे किंवा घाई करणे योग्य नसते आणि कंडोमशिवाय सेक्स केल्याने नवीन समस्या उद्भवते. त्यामुळे भविष्यात जेव्हाही तुम्ही लैंगिक संबंध बनवाल तेव्हा कंडोम अवश्य वापरा जेणेकरून तुम्हा दोघांनाही कोणत्याही भीतीशिवाय सेक्सचा आनंद घेता येईल आणि नंतर कोणतेही टेन्शन येणार नाही.

मी २६ वर्षांची विवाहित आहे. लग्नाला ३ वर्षे झाली आहेत पण अजूनही मला गर्भधारणा होऊ शकलेली नाही. यासाठी मी आता सेक्स करताना उशी खाली ही ठेवते आणि पतीला वीर्यस्खलनानंतर बराच वेळ त्या अवस्थेत राहण्यास सांगते. माझी मासिक पाळी नियमित आहे आणि आम्ही नियमितपणे सेक्सदेखील करतो. तरीही मी गर्भधारणा करू शकत नाही. मला सांगा मी काय करू?

संभोगाच्या दरम्यान वीर्यपतनाच्या वेळी पुरुषाच्या अवयवातून शुक्राणू अतिशय वेगाने बाहेर पडतात आणि खोलवर पोहोचतात. जे शुक्राणू स्ट्राँग नसतात ते योनीतून बाहेर ही पडतात, पण त्यामुळे गर्भधारणेच्या प्रक्रियेत काही फरक पडत नाही. ही एक सामान्य प्रक्रिया आहे आणि यामुळे घाबरण्याची ही गरज नाही.

जर तुमच्या पतीची शुक्राणूंची संख्या बरोबर असेल, तुमची मासिक पाळी ही नियमित होत असेल, तर तुमच्या गर्भधारणा न होण्यामागे दुसरे काही वैद्यकीय कारण असू शकते. हे कारण तुमच्यामध्ये किंवा तुमच्या पतीमध्ये दोघांपैकी कोणामध्ये ही असू शकते.

स्त्रीरोगतज्ज्ञाचा सल्ला घेऊन प्रजननक्षमतेबद्दल बोलले तर बरे होईल. तरच तुम्ही लवकर गर्भधारणा करू शकाल.

मी ३१ वर्षांची विवाहित महिला आहे. आम्हाला २ मुले आहेत आणि आम्ही सासू-सासरे, जेठ-जेठानी आणि त्यांच्या मुलांसह एकाच छताखाली राहतो. माझ्या जेठानी माझ्याशी बऱ्याच वेळा भांडतात आणि सासूचे कान भरत राहतात. मी एक खुल्या विचाराची स्त्री आहे तर जेठानी परंपरावादी आणि कमी शिकलेली आहे. त्या रोज माझ्याशी भांडत असतात. घरात जेठानीशी वारंवार भांडण होत असल्याने आम्हाला वेगळया घरात राहायला हवे का? यासाठी सासूबाई मला मनाई करतात, पण त्याचवेळी जेठानीचे बोलणे सहन करायला ही सांगतात. मला माझ्या पतीशी याबद्दल बोलायचे आहे पण मी ते कधी करू शकले नाही कारण, त्याला आई-वडिलांना सोडून वेगळे राहायचे नाही. मला सांगा मी काय करू?

जर सलोख्याचे सर्व मार्ग बंद असतील आणि कौटुंबिक कलह रोज होत असतील तर वेगळे राहण्यात काही नुकसान नाही. पण त्यापूर्वी तुम्ही जर सार्थक पुढाकार घेतलात तर घरात शांतता आणि सलोख्याचे वातावरण निर्माण होऊ शकते.

सर्व प्रथम, तुम्हाला हे जाणून घेणे आवश्यक आहे की परस्पर भांडणाचे खरे कारण काय आहे? सामान्यत: घरगुती भांडण हे बजेटमधील भागीदारी, स्वयंपाकघरात कोण किती काम करते, घरातील कामांचे वितरण इत्यादीशी संबंधित असते. कधी-कधी एकमेकांचा मत्सर केल्यानेही परस्परांमध्ये दुराव्याचे वातावरण निर्माण होते.

भांडणाचे खरे कारण जाणून घेतल्यानंतर समेट करण्याचा प्रयत्न करणे चांगले होईल, सासू आणि पती यांच्याकडून जेठानीच्या भांडणाचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानेही परस्पर संबंध सुधारू शकतात. जेठानी कमी साक्षर आहेत, त्यामुळे हेही एक कारण असण्याची शक्यता आहे. त्यांच्यात तुमच्याबद्दल न्यूनगंड असू शकतो. योग्य वेळ पाहून जेठानीशी बोलणे हेसुद्धा तुमच्यासाठी चांगले असेल.

जर सासू तुम्हाला वेगळे घर घेण्यास नकार देत असतील तर साहजिकच त्या तुम्हाला आणि जेठानीला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात, त्यामुळे फक्त तुमची सासूच योग्य निर्णय घेऊ शकतात.

एक-दोन गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर संयुक्त कुटुंब ही आजच्या काळाची गरज आहे, जिथे राहून प्रत्येकजण आपल्या स्वप्नांच्या पंखांना उड्डाण देऊ शकेन.

आरोग्य परामर्श

* डॉक्टर सागरिका अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली

प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित महिला आहे. माझी काही स्वप्ने आहेत, त्यामुळे मला सध्या आई व्हायचे नाही. जर मला वयाच्या ३५-३६ व्या वर्षी आई व्हायचे असेल तर यात काही अडचण येऊ शकते का? काही लोक म्हणतात की या वयात आई होणे शक्य नाही. ते खरे आहे का?

उत्तर : वाढत्या वयानुसार अंडयांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात, त्यामुळे या वयात गर्भधारणा होणे कठीण होते. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला असेल तर यात काही अडचण नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या वयातही गर्भधारणा करता येते. यासाठी तुम्ही आयव्हीएफची मदत घेऊ शकता.

तुम्ही अजून तरुण आहात, त्यामुळे तुमच्या अंडयांचा दर्जा चांगला असेल. तुम्ही तुमची निरोगी अंडी गोठवू शकता जे तुमच्यासाठी भविष्यात आई होण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आयव्हीएफ उपचारदेखील सहज पूर्ण होतील. गोठवलेले अंडे तुमच्या पतीच्या शुक्राणूमध्ये मिसळले जाईल आणि प्रथम गर्भ तयार केला जाईल आणि नंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात रोपण केला जाईल. काही दिवसात तुम्हाला गर्भधारणेची चांगली बातमी मिळेल.

प्रश्न : मी ३५ वर्षांची आहे, माझ्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत, पण अजूनही गर्भधारणा होऊ शकलेली नाही. मला धूम्रपानाची ही सवय आहे. मी आई होऊ शकेन, असा काही मार्ग आहे का?

उत्तर : या वयात गर्भधारणा होण्यात समस्या येणे सामान्य आहे, परंतु याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्हाला आई व्हायचे असेल तर तुम्हाला धूम्रपान पूर्णपणे सोडून द्यावे लागेल. जर तुमचा पतीदेखील धूम्रपान करत असेल तर त्याला ही सवय सोडण्यास सांगा. तुमचे वय मोठे आहे, त्यामुळे लवकर गर्भधारणा होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या वयाबरोबर समस्या अजून वाढू शकते. यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर उपचाराने फायदा होत नसेल तर तुम्ही आयव्हीएफ उपचाराची मदत घेऊ शकता.

प्रश्न : मी ४० वर्षांची आहे. मी एकदा आयव्हीएफ उपचार केले, पण ते अयशस्वी झाले. मला पुन्हा आयव्हीएफचा प्रयत्न करायचा आहे. यात काही धोका आहे का?

उत्तर : आपण आयव्हीएफ उपचार अयशस्वी होण्याचे कारण स्पष्ट केले नाही. बरं, आयव्हीएफ उपचारांना कोणतीही मर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कोणताही संकोच न करता ते पुन्हा करू शकता. होय, हे वारंवार केल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. यशस्वी आयव्हीएफसाठी तणावापासून दूर राहा आणि वजन संतुलित ठेवा.

आजकाल आयव्हीएफ क्षेत्रात अनेक नवनवीन तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. डॉक्टरांच्या सल्याने आवश्यकतेनुसार तंत्र निवडल्यास गर्भधारणा होण्यास मदत होते.

प्रश्न : मी ३५ वर्षांची विवाहित महिला आहे. मला आयव्हीएफ तंत्राच्या मदतीने आई व्हायचे आहे आणि आशा आहे की हे तंत्रज्ञान यशस्वी होईल. म्हणूनच मला हे जाणून घ्यायचे आहे की गर्भाची संख्या गर्भधारणेच्या शक्यतांवर परिणाम करते काय?

उत्तर : गर्भधारणा होण्यासाठी, एका गर्भासह यशस्वी होण्याची शक्यता २८ टक्के असते, तर २ भ्रुणांसह यशस्वी होण्याची शक्यता ४८ टक्के आहे. पण यासोबत जुळी मुले होण्याची शक्यताही वाढते. जर तुम्हाला जुळया मुलांचा धोका पत्करायचा नसेल, तर तुम्ही एकच भ्रुण रोपण करून घेऊ शकता. यासाठी तुमच्या निरोगी अंडयाचा भ्रूण तयार केला जाईल आणि त्यानंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जाईल. यामुळे तुमची गर्भधारणा होण्याची शक्यतादेखील वाढेल आणि तुम्हाला जास्त समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.

प्रश्न : मी ३१ वर्षांची वर्किंग वुमन आहे. मला हे जाणून घ्यायचे की आयव्हीएफमध्ये जुळी मुले किंवा अनेक मुले होण्याची शक्यता आहे का?

उत्तर : पूर्वीचे तज्ञ चांगल्या गर्भधारणेसाठी अनेक भ्रुण हस्तांतरणाची शिफारस करत असत, कारण तेव्हा हस्तांतरित केलेला गर्भ कमकुवत आहे की नाही हे जाणून घेणे कठीण असे. यामुळे कधी-कधी जुळी किंवा अनेक मुले एकत्र जन्माला येत होती, पण आता काळ बदलला आहे आणि तंत्रज्ञानही बदलले आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानामुळे गर्भ कमकुवत आहे की नाही हे कळते. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही १ किंवा जुळया मुलांची आई होऊ शकता.

प्रश्न : मी ३४ वर्षांची आहे, मी २ वर्षांपासून गर्भवती होण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आता मी आशा गमावत आहे. माझ्या मित्राने मला आयव्हीएफ तंत्राबद्दल सांगितले. मला जाणून घ्यायचे आहे की आयव्हीएफ तंत्रात काही धोका आहे का? या तंत्रामुळे माझ्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही का?

उत्तर : होय, आयव्हीएफ तंत्र हे आई होण्यासाठी वरदान ठरू शकते, परंतु त्याचे काही दुष्परिणामदेखील होऊ शकतात. पण आयव्हीएफ घेणाऱ्या प्रत्येक रुग्णाला या दुष्परिणामातून जावेच लागेल असे नाही.

आयव्हीएफ उपचारात मुदतपूर्व बाळाचा जन्म होऊ शकतो, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गर्भधारणेदरम्यान विशेष काळजी घेण्यास सांगितले जाते. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या आरोग्याची प्रत्येक गोष्ट कळावी म्हणून वारंवार तपासण्या केल्या जातात.

याशिवाय वागण्यात बदल, थकवा, झोप लागणे, डोकेदुखी, खालच्या ओटीपोटात दुखणे, चक्कर येणे इत्यादी समस्यांचाही समावेश आहे. तुम्हाला यापैकी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वत:ची विशेष काळजी घेतल्यास तुम्ही या समस्या टाळू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें