सौंदर्य समस्या

* डॉ. भारती तनेजा, एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर

माझे केस खूपच जास्त कर्ली आणि रफ आहेत. यांची देखभाल कशी करू म्हणजे ते अधिक सुंदर दिसतील?

जास्त कर्ली हेअर साधारणपणे रफ असतात. यांची देखभाल करण्यासाठी कंडिशनर युक्त शॅम्पूचा वापर करायला हवा. शाम्पूदेखील कमी प्रमाणात वापरावा. थोडासा शाम्पू घेऊन त्यामध्ये पाणी मिसळून घ्या आणि त्याने केस स्वच्छ धुवा. त्यानंतर एखादं क्रिमी कंडीशनर वा हेअर मास्क लावून ५ मिनिट वाट पहा. मास्क लावून हेअर कोम्ब करून घ्या. नंतर केस स्वच्छ धुवा. यामुळे केस खूपच मुलायम राहतील आणि कर्लदेखील कायम राहील. हवं असल्यास मास्क घरच्या घरीदेखील बनवू शकता. १ चमचा मेयोनीजमध्ये १ चमचा व्हिनेगर, १ चमचा ऑलिव्ह ऑइल टाका. नंतर विटामिन ई ऑइलची कॅप्सूल कापून त्यामध्ये टाका.

आता हा मास्क केसांमध्ये लावून अर्धा तास तसाच राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा. यामुळे केस खूपच सुंदर होऊन जातील. हा मास्क केसांना चमकदेखील आणतो. केस धुतेवेळी जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. धुतल्यानंतर ब्रशचा वापर न करता वाइड टूथ कोम्बचा वापर करा.

मला पुढच्या महिन्यात लग्नाला जायचं आहे. त्यासाठी मला खूप सुंदर नखं हवी आहेत. नेल एक्सटेन्शन करणं सुरक्षित असेल का? नखं खराब तर नाही ना होणार? हे किती दिवस चालतं आणि हे कसं काढलं जातं?

नेल एक्सटेन्शन करणं खूपच सुरक्षित प्रक्रिया आहे. यामध्ये १ तासात तुमची नखं लांब व सुंदर होतील. हे करणं अगदीच सेफ आहे. तुमची नखंदेखील स्ट्राँग होतील. यावर तुम्ही चांगलं नेल आर्ट करून लग्नामध्ये जाऊ शकता आणि तुमच्या नखांना प्लॉन्ट करू शकता. यामुळे तुमच्या हाताचं सौंदर्य वाढेल. तुम्ही बिनधास्तपणे नेल आर्ट नेल एक्सटेन्शन करून घ्या. हे साधारणपणे एक महिन्यापर्यंत टिकतं. त्यानंतर याच्या मागे फिलिंग करावं लागतं आणि मग तुमची नखं लांबच राहतील.

पावसाळयात मी जेव्हा देखील वॅक्स करायला जाते तेव्हा, हात सतत चिकटत राहतात. केसदेखील पूर्णपणे रिमूव्ह होत नाहीत. एखादा उपाय सांगा?

चांगल्या पार्लरमध्ये वॅक्स करण्यापूर्वी आर्म्स आणि लेग्ज स्वच्छ करून प्री वॅक्स जेल लावलं जातं. ज्यामुळे ते चिकचिकित होत नाही आणि आरामात वॅक्सिंग होतं. प्री वॅक्स जेलमध्ये अँटीसेप्टिक तत्व असतात. ज्यामुळे कधीही कोणत्याही प्रकारची एलर्जी होत नाही. वॅक्स करतेवेळी जर पार्लरमध्ये एसी सुरू असेल तर अजिबात चिकटतदेखील नाही.

वॅक्स करण्याची पद्धत जर योग्य असेल तर केस तुटत नाहीत आणि राहतदेखील नाहीत. वॅक्स केल्यानंतर आफ्टर वॅक्स जेल लावलं जातं. जे अँटीसेप्टिक असण्याबरोबरच एलोवेरा टाकून बनवलं जातं. ज्यामुळे त्वचा मुलायम बनते. यामुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी होत नाही आणि ना ही जळजळ तसंच त्वचादेखील गोरी होते.

मला काजळ लावायला खूप आवडतं, परंतु जेव्हादेखील मी काजळ लावते ते पूर्णपणे पसरतं, मी काय करू?

काजळ डोळयांचं सौंदर्य वाढवतं, परंतु काजळ खरेदी करतेवेळी खास लक्ष देण्याची गरज असते. तुम्ही वॉटरप्रुफ स्मज प्रुफ काजळ विकत घ्या. काजळ नेहमी चांगल्या क्वालिटीचं विकत घ्या, कारण कमी क्वालिटीच्या काजळमुळे डोळयांमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं म्हणून नेहमी चांगल्या क्वालिटीचं काजळच विकत घ्या.

जेव्हादेखील काजळ लावाल तेव्हा त्याच्या खाली एक लाईन वॉटरप्रुफ लाइनर लावा. त्यामुळे काजळ लवकर स्मज होणार नाही वा एका पातळ ब्रशने काजळाच्या खाली कोणतही आयशाडो जसं की ब्राऊन ब्लू ग्रीन घेऊन एक लाईन काजळाच्या खाली लावा आणि ते स्मज करून घ्या. यामुळेदेखील काजळ बराच वेळ टिकून राहतं वा मग पर्मनंट काजळ लावून घ्या. हे १० ते १५ वर्षापर्यंत टिकतं.

यासाठी लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे जिथून परमनंट काजळ करून घ्याल तो एक्सपर्ट असायला हवा. कारण एकदा लावलेलं काजळ १५ वर्षापर्यंत राहील. तिथे हायजिनकडे लक्ष दिलं जाईल. प्रोडक्ट चांगल्या क्वालिटीचे वापरले जातील. याचे कोणतेही दुष्परिणाम नसतील. हवं असल्यास कानाच्या मागे एक डॉट लावून पॅच टेस्टदेखील करू शकता.

मी खूपच लठ्ठ होती आणि आता मी वजन कमी केलं आहे. जे छान दिसतंय, परंतु माझ्या पोटावर स्ट्रेच मार्क्स झाले आहेत ते खूपच वाईट दिसत आहेत. ते काढण्याचा एखादा उपाय सांगा?

जास्त वजन कमी केल्यावर स्ट्रेच मार्क्स येतातच. जर त्यावर नारळ तेल वा विटामिन ई ऑइल लावलं गेलं वा एखादी चांगली स्ट्रेच मार्क्स क्रीम लावली तर स्ट्रेच मार्क्स कमी होण्याची शक्यता निर्माण होते. तुम्ही ते काढण्यासाठी घरगुती उपायदेखील करू शकता. खरंतर ते काही पूर्णपणे जाणार नाहीत परंतु तुम्ही प्रयत्न नक्की करा.

तुम्ही नारळाचं तेल सतत तुमच्या स्ट्रेच मार्क्सवर लावा आणि विटामिन ई चे कॅप्सूल मार्केटमधून विकत घ्या. ते कापून स्ट्रेच मार्क्सवर लावा, फरक पडू शकतो. जर फरक पडत नसेल तर तुम्ही एखाद्या क्लिनिकमध्ये जाऊन लेझर ट्रीटमेंट करून घेऊ शकता. ते नक्कीच फायदेशीर राहील.

सौंदर्य समस्या

* डॉ. भारती तनेजा, ऐल्प्स ब्युटी क्लीनिक फाऊंडर, डायरेक्टर

माझे केस खूपच कोरडे आहेत. मला त्यामध्ये चमक आणायची आहे. चमक आणण्यासाठी एखादा उपाय सांगा?

जर केस कोरडे असतील तर त्यांना पोषणची गरज असते. खाण्यात प्रोटीनचे प्रमाण वाढवा ज्यामुळे केसांना न्यूट्रिशन मिळेल आणि त्यांचा रफनेच कमी होईल. कोरड्या केसांसाठी खास शॅम्पू मिळतात ज्यांच्या वापरामुळे तुम्ही केसांचा रफनेस कमी करू शकता. त्यानंतर यामध्ये कंडीशन लावणं गरजेचं आहे. केस धुतल्यानंतर त्यांच्या लेंथमध्ये कंडिशन लावून ३ ते ५ मिनिटे राहू द्या आणि त्याचवेळी कोंब करा म्हणजे कंडीशनर पूर्ण केसांवरती योग्य प्रकारे पसरेल. त्यानंतर कंडिशनर धुवून घ्या. तुमच्या केसांची शायनिंग वाढेल. तरीदेखील जर तुम्हाला वाटतंय की केसांचा रफनेस जात नाहीये, तर त्यामध्ये ‘लिव इन’ कंडिशनर लावा, ज्यामुळे केसांमध्ये शायनिंग येते. केसांना सेट केल्यानंतर मॉइश्चरायझिंग स्प्रे व शायनिंग स्प्रे लावल्यास केसांमध्ये शाईन येते.

मी ४७ वर्षांची आहे आणि माझी मासिकपाळी बंद झालीये. माझा चेहरा आणि हनुवटीवर खूप केस येताहेत, ते रोखण्यासाठी व परमनंटली काढण्यासाठी उपाय सांगा?

मासिक पाळी बंद झाल्यावर शरीरावर केस येणं हे शरीरात हार्मोन्सच्या स्तराच्या बदलामुळे होतं. सर्वप्रथम तुम्ही एखाद्या चांगल्या स्त्रीरोग तज्ञाचा सल्ला घ्या आणि रक्ताची हार्मोनल तपासणीदेखील करून घ्या. हे बॅलन्स करण्यासाठी काही औषधे घ्या. ही प्रोसिजर मोठी आहे परंतु औषध घेतल्यानंतर तुम्ही बराच महिने बॅलन्स करू शकता. यासोबतच जर तुमच्या केसांचा रंग काळा आहे आणि यापासून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर लेझर वा पल्स लाईट तंत्रज्ञानाचा वापर करा. नको असलेल्या केसांपासून लवकरच परमनंट सुटका मिळते. हे तंत्रज्ञान सुरक्षित, पेनलेस आणि क्विक आहे. २-३ सेटिंग्स घेतल्यानंतर केसांची ग्रोथ खूपच कमी होते. वॅक्सिंग, थ्रेडिंग इत्यादींच्या त्रासापासून सुटका मिळते. ४ ते ६ आठवड्याच्या अंतरामध्ये याची सेटिंग घेणं गरजेचं असतं. जर तुमचे काही केस पांढरे झाले असतील तर त्यासाठी तुम्ही थर्मालीसीस करून घेऊ शकता. कारण पांढऱ्या केसांवर लेझर वा पल्स लाईट काम करत नाही.

माझं वय २१ वर्षे आहे. अनेक वर्षांपासून चष्मा लावल्यामुळे माझ्या डोळ्याच्या भोवती काळी वर्तुळं बनली आहेत. ही वर्तुळं खूप वाईट दिसतात. यामुळे मला खूप त्रास होतो. घराबाहेर पडावसं वाटत नाही. कृपया एखादा उपाय सांगा?

जर तुम्ही चष्म्याचा वापर गरजेपेक्षा कमी करत असाल तर तुमच्या डोळ्याच्या मास पेशींवरती जोर टाकल्यामुळे त्या कमजोर होतात. यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन कमी होऊ लागतं, ज्यामुळे तुमची काळी वर्तुळं वाढतात. तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या की डोळ्यांवरती जास्त जोर पाडू नका. चष्मा लावून देखील तुमच्या डोळ्यांवरती दबाव पडला तर तज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी पुन्हा करून घ्या. अन्यथा चष्म्याचा सतत वापर करत रहा. चष्म्याच्या जागी तुम्ही लेन्स लावू शकता. अलीकडे लेन्स नॅचरलच नाही तर अनेक विविध रंगांमध्ये मिळतात आणि तुमचं सौंदर्य अधिक उजळतं. या व्यतिरिक्त तुमच्या डोळ्यांवर बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांवरती रिंग फिंगरने हलकं हलकं बाहेरून आतल्या बाजूने गोल गोल मसाज करा. काकडी किसून तुमच्या डोळ्यांवरती १० ते १५ मिनिटे ठेवा. यामुळेदेखील तुमचे काळे डाग बरेचसे कमी होतील. एलोवेराचे पानांना घेऊन धुऊन त्याच्या आतील पल्प काढून घ्या.

पल्पमध्ये काही थेंब विटामिन ए तेल टाका आणि काहीच थेंब मधाचे थेंब टाका. त्यानंतर या तिघांना एकत्रित करून तुमच्या डोळ्याच्या चहुबाजूनी थोडावेळ मसाज करा आणि सकाळी डोळे स्वच्छ धुऊन घ्या. असं सतत केल्यामुळे तुमच्या डोळ्याची काळी वर्तुळं बरीचशी कमी होतील.

माझं वय २२ वर्षं आहे. माझं लग्न होणार आहे. मी दिसायला छान आहे परंतु माझी अडचण ही आहे की माझ्या ब्रेसचा आकार खूप लहान आहे. यामुळे मला खूप संकोच वाटतो. मला मदत करा?

सर्वप्रथम तुम्ही एखाद्या गायनाकॉलॉजिस्टकडून तुमच्या शरीराची चांगली तपासणी करून घ्या आणि हार्मोन्सची तपासणी करा. जर यामध्ये काही अडचण असेल तर त्याचं औषध घ्या, ज्यामुळे तुमच्या स्तनांचा आकार वाढू शकतो या व्यतिरिक्त तुम्ही असा काही खास व्यायाम करा ज्यामुळे ब्रेस्टची वाढ होण्यास मदत मिळते. जसं की तुम्ही स्विमिंग बॅक स्ट्रोक करू शकता. दोरीने मागे उड्या मारण्याचा व्यायाम करू शकता. एखाद्या चांगल्या ब्रेस्ट डेव्हलपमेंट तेलाने ब्रेस्ट खालून वरच्या दिशेने मालिश करायला सुरुवात करा. यामुळे देखील काही फरक पडू शकतो. यामुळे रक्तसंचारत वाढ होईल आणि ब्रेस्टच्या विकासात मदत मिळेल. आहारात दूध, पनीर, फळं आणि अंड्यांचा वापर करा. यामुळे तुम्हाला चांगलं न्यूट्रिशन मिळेल आणि ब्रेस्टमध्ये वाढ होईल. एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन ब्रेस्टच्या वाढीसाठी खास सेटिंग्स घेऊ शकता. कोबीची मोठमोठी पान घेऊन बर्फाच्या थंड पाण्यामध्ये टाका आणि थंड झाल्यावरती तुमच्या ब्रेस्टवरती लावून थोडावेळ ठेवा. यामुळे देखील स्तनांचा आकार वाढण्यात मदत मिळते. जर हे सर्व उपाय यशस्वी झाले नाही तर तुम्ही सर्जरीदेखील करू शकता. यामध्ये जो कट येतो तो अगदी ब्रेस्टच्या खाली असतो, जो साधारणपणे दिसत नाही आणि ही सर्जरी बरीच वर्षापर्यंत चालते. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमचं आयुष्य तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे जगू शकाल.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर,
डायरेक्टर डॉ. भारती तनेजा द्वारा

माझ्या आयब्रोज खूपच दाट आहेत. मला थ्रेडिंग करतेवेळी खूप वेदना होतात. सांगा मी काय करू?

तुम्ही जिथेदेखील आयब्रोज करायला जाता त्यांना सांगा की त्या आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोज वरती थोडासा बर्फ लावा. यामुळे आयब्रोज थोडया सुन्न होतील आणि वेदना होणार नाहीत. त्या हवं असल्यास थ्रेडदेखील ओला करू शकता. ज्यामुळे ट्रेडिंग करतेवेळी वेदना होणार नाहीत. थ्रेडिंग करतेवेळी तुम्ही तुमच्या त्वचेला व्यवस्थित स्ट्रेच करून ठेवलंत तर वेदनादेखील कमी होतील. आयब्रोज करण्यासाठी कोणा दुसऱ्याची मदत घेऊ शकता. ज्यामुळे आयब्रो जास्त स्ट्रेच होतील आणि वेदना कमी होतील. हवं असल्यास लेजरनेदेखील आयब्रोज नेहमीसाठी शेप देऊ शकता.

अलीकडे अॅडमध्ये बीबी ग्लोबद्दल सांगितलं जातं. हे खरोखरच त्वचेसाठी आहे का?

बीबी ग्लो एक अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेमध्ये एका मशीनद्वारे अकॉर्डिंग टू योर स्किन न्यूट्रीएन्ट्स टाकते जातात. हे स्किनमध्ये जाऊन त्वचेला स्ट्रेच करतात. रिंकल फ्री करतात आणि ग्लो देतात. यासोबत बीबी ग्लोमध्ये तुमच्या त्वचेनुसार एक फाउंडेशन त्वचेच्या आतमध्ये टाकलं जातं. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या वरती एक हलकासा मेकअप येतो. जो साधारणपणे २० ते ३० दिवस राहतो. सोबतच तुमच्या फेसला शेप देण्यासाठी कंटूरिंग आणि ब्लशरदेखील टाकलं जातं. ज्यामुळे त्वचेला सुंदरसा शेप येतो. ही एक खूपच चांगली ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे तुमची त्वचा ग्लोदेखील करते आणि सोबत शेपदेखील येतो आणि २० ते ३० दिवसासाठी मेकअप देखील येतो.

हिवाळयात माझ्या टाचा फाटू लागतात आणि रक्तदेखील वाहू लागतं. सांगा मी काय करू?

हिवाळयात त्वचा खूपच ड्राय होते. हिल्सची त्वचा खूप जाड होते आणि कोरडीदेखील होते. अशावेळी जर त्यांची स्वच्छता व्यवस्थित केली नाही आणि सोबतच एखाद्या चांगल्या क्रीमने मसाज केला नाही तर त्या फाटू लागतात. सर्वात जास्त गरजेचं आहे की तुम्ही अंघोळ करतेवेळी एखाद्या स्क्रबरने हलकसं रगडा आणि त्याच्यावरती ऑइल लावून मसाज करा. यामुळे टाचा फोटो फुटणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की सकाळी कमी वेळ असेल तर रात्री रोज हलक्या गरम पाण्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ स्क्रबरने हलकं रगडा. त्यानंतर एखादा क्रीम वा हलक्या गरम तेलाने मसाज करा. शक्य असल्यास सुती मोजे घालून झोपा. यामुळे तुमचे तुमच्या टाचा फाटणार नाहीत आणि जर त्या फाटल्या तर घरच्या घरी यावर उपाय करू शकता. पाय स्वच्छ करून तुम्ही एका वाटीत थोडसं मोहरीचं(सरसो)तेल आणि मेणबत्ती टाकू शकता. याला  हलकं गरम करा आणि फाटलेल्या टाचांमध्ये भरा. वरून मोजे घालून झोपी जा. टाचा लवकर व्यवस्थित होतील.

उन्हाळयात घराबाहेर पडण्यापूर्वी आम्ही लोक नेहमी सनस्क्रीन लावून बाहेर पडतो. हिवाळयातदेखील असं करणं गरजेचं आहे  का?

उन्हाळयाप्रमाणे हिवाळयातदेखील बाहेरून कडक ऊन असतं, परंतु आपल्याला ते जाणवत नाही. कारण हवा थंड असते. सूर्यकिरणं तशीच काम करतात जशी उन्हाळयात देखील. म्हणून उन्हाळयाप्रमाणेच हिवाळयातदेखील सनस्क्रीन लावणं गरजेच आहे. हिवाळयात सनस्क्रीन जेदेखील लावाल ते जास्त मॉईश्चरायझिंग व नरिशिंग असायला हवं. घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन नक्की लावा आणि त्याच्यावरती हलकी पावडर वा मेकअप करा.

माझं वय ३० वर्ष आहे आणि माझे केस खूप गळतात. गळलेले केस मला पुन्हा कसे मिळतील?

३०शीनंतर हेअर लॉसची अनेक कारणं आहेत ज्यामध्ये मेन फॅक्टर तुमच्या डायटशी संबंधित आहे. तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केसांसाठी सर्वात जास्त गरजेचं आहे प्रोटीन. जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर त्याचा परिणाम केसांवरती देखील पाहायला मिळतो. म्हणून तुमच्या डायटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी डेरी प्रॉडक्ट्स आणि डाळींचा समावेश करा. हेल्दी केसांसाठी बदाम, फ्लॉवर, मशरूम, अंडयापासून मिळणारं बायोटीन एक गरजेच विटामिन आहे. केस गळती रोखण्यासाठी विटामिन्सचा डायटमध्ये समावेश करणं फायद्याचं असू शकतं. या गोष्टींचा तुमच्या डायटमध्ये समावेश करून तुम्ही विटामिन्सची उणीव पूर्ण करू शकता. भाजलेले चणे, मटर, राजमा, छोले आणि काजूचा डाएटमध्ये समावेश करून तुमच्या केसांसाठीदेखील गरजेचं आयरन मिळवू शकता.

या आयरनच्या कमतरतेमुळे केस गळती व निस्तेज होण्याची समस्या वाढू शकते. विटामिन ए आणि सी असे विटामिन आहेत, जे केसांची वाढ आणि शायनिंगसाठी खूपच परिणामकारक असतात. म्हणूनच तुम्ही विटामिन ए साठी गाजर, रताळं, काजू, पालक, दूध व दह्याचा डाएटमध्ये समावेश करण्याची गरज आहे. तर विटामिन सीसाठी आवळा, लिंबू, पेरू व स्ट्रॉबेरीचा समावेश करा.

केस गळण्याच्या दुसऱ्या फॅक्टर्समध्ये टेन्शनदेखील एक फॅक्टर आहे. ज्यामुळे तुमचे केस गळू लागतात म्हणून टेन्शन कमी करण्यासाठी नियमित मेडिटेशन करा. या वयात तुम्ही स्टायलिश हेअर स्टाईल करण्यासाठी अनेक प्रयोग करता. जे केसांना कमजोर बनवू शकतात. म्हणून केसांवर जास्त एक्सपेरिमेंट करू नका. जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठी एक्स्पर्टचा सल्ला घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें