गृहशोभिकेचा सल्ला

*प्रतिनिधी

  • आम्ही तिघी बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाहीए. माझं आणि माझ्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आहे. माझ्या बहिणीच्या सासरचे लोक तिला खूपच त्रास देतात. आईबाबांच्या घरी जाणं तर दूर, ते तिला त्यांना फोनही करू देत नाहीत. पोलिसांत तक्रार केली पण ते तिथे माझ्या बहिणीवर आणि माझ्या पतीच्या चारित्र्यावर दोष लावून साफ बचावले. तुम्हीच सांगा, मी माझ्या बहिणीला तिच्या सासरच्या लोकांच्या त्रासापासून कसं वाचवू?

तुम्ही हे स्पष्ट सांगितलं नाहीए की तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांनी तिला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला बंधन का घातलं आहे? पण कारण काही असो, अशाप्रकारे कोणाला बंधक बनवून ठेवणं अयोग्य आहे. कोणत्याही प्रकारचा अत्याचार आणि घरगुती अत्याचाराच्या विरुद्ध सरकारही सक्त आहे. तुमच्या बहिणीची जर पोलिसांनी मदत केली नसेल तर तुम्ही वुमन सेल, महिला कल्याण समिती किंवा अशाच एखाद्या समाजसेवी संस्थेची मदत घेऊ शकता. ते लोक तुमच्या बहिणीच्या सासरच्या लोकांशी भेटून चर्चा करतील आणि तुमच्या बहिणीला न्याय मिळवू देतील.

  • मी २७ वर्षांची तरुणी आहे. मला आईवडील नाहीत. धाकटा भाऊ आहे आणि एक विवाहित बहीण आहे. माझ्या भावोजींनी माझ्या भावाजवळ माझ्यासाठी एक स्थळ आणलं. मुलगा सरकारी नोकरी करतो. कुटुंबही समृद्ध आहे. बाहेरून तर सगळं काही व्यवस्थित वाटलं. भाऊ आणि भावोजींनी जाऊन लग्नासाठी होकारही दिला आणि दोन महिन्यांनी साखरपुड्याची तारीख ठरवली. तत्पूर्वी भावाने मुलाच्या कुटुंबियांबद्दल माहिती काढली तेव्हा कळलं की मुलाच्या मोठ्या भावाचा अपराधिक भूतकाळ होता. त्याने तुरुंगवासही भोगला आहे. माझ्या भावाने भावोजींना सांगितलं की त्यांनी या लग्नाला नकार द्यावा. तेव्हा ते माझ्या भावाला खूप बडबडले. आम्हाला भीती वाटत आहे की या गोष्टीवरून माझ्या भावोजींनी बहिणीला त्रास देऊ नये. हा विचार करून करून मी खूपच चिंतित आहे. तुम्हीच सांगा. मी काय करू?

लग्नसंबंधामुळे फक्त दोन माणसांचं नव्हे, तर २ कुटुंबांचं नातं जुळतं. म्हणूनच नातं ठरवताना कुटुंबाकडेही पाहिलं जातं. तुमच्या भावाने जर अशा कुटुंबात तुमचं लग्न करून द्यायला नकार दिला आहे, जिथला एक सदस्य गुन्हेगारी जगताशी जोडलेला आहे, तर यात तुमच्या भावोजींनी नाराज व्हायला नकोए. त्यांनी या गोष्टीला विनाकारण आपल्या अहंकाराशी जोडलं आहे. तुमची बहीण त्यांना प्रेमाने समजावू शकते की तिच्या बहिणीला आईवडिलांचा आधार नाहीए. भविष्यात काही अघटित घडू नये म्हणून जास्त काळजीची गरज आहे. म्हणून त्यांनी विनाकारण नाराज होऊ नये.

  • मी २२ वर्षांची तरुणी आहे. एका मुलावर मी प्रेम करायचे. त्याने मला लग्नाचं वचन दिलं होतं. म्हणून आम्ही प्रेमाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. आमच्यामध्ये शारीरिकसंबंधही होते, पण वर्षभरापूर्वी तो माझी फसवणूक करून निघून गेला. आता माझे कुटुंबीय माझ्या लग्नासाठी स्थळ शोधत आहेत. मी फारच द्विधावस्थेत आहे. कसलाच निर्णय घेऊ शकत नाहीए. कृपया मला सांगा की, लग्न ठरवण्यापूर्वी मी मुलाला हे सांगू का, की माझे एका मुलाबरोबर शारीरिकसंबंध होते. कारण मी त्याला हे सांगितलं नाही, तरी ही गोष्ट लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला कळेलच. जर लग्नानंतर त्याला ही गोष्ट कळली आणि त्याने मला अपमानित करून सोडलं तर परिस्थिती आणखीनच वाईट होईल. यापेक्षा चांगलं तर हे आहे की मी आधीच ही गोष्ट सांगून टाकू. त्यानंतर त्याला नातं ठेवायचं आहे की नाही हे त्याच्यावर अवलंबून राहील. विनाकारण मला घाबरून तर राहावं लागणार नाही?

कोणत्याही मुलाला हे कळलं की लग्नाआधी मुलीचे कोणाबरोबर तरी शारीरिकसंबंध होते तर तो तिच्याशी कधीच लग्न करणार नाही. लोक कितीही आधुनिक आणि मॉडर्न व स्वतंत्र विचारांचे असल्याचा दावा करत असले तरी पत्नी म्हणून त्यांना सतीसावित्रीच हवी असते. म्हणून तुम्हाला जर लग्न करायचं असेल तर ही गोष्ट कोणालाही सांगू नका. लग्नाच्या आधीही नाही आणि लग्नानंतरही. जोपर्यंत तुम्ही स्वत: सांगणार नाही तोपर्यंत हे कोणीच जाणू शकणार नाही की तुमचे लग्नापूर्वी कोणाशी शारीरिकसंबंध होते.

  • मी ३० वर्षांची विवाहित स्त्री आहे. मी माझ्या एका वैयक्तिक समस्येने खूप त्रस्त आहे. कोणालाही ती समस्या सांगू शकत नाही. खरंतर माझी गुप्तांग खूपच सैल झालं आहे, ज्यामुळे माझ्या पतींना सहवास करताना आनंदाचा अनुभव घेता येत नाही. यामुळे ते चिडतात आणि मग अनेक दिवस माझ्यापासून तुटक वागतात. सहवासही करत नाहीत. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्याने माझ्या गुप्तांगाला पूर्वीसारखा घट्टपणा येईल आणि पतींनाही सहवास करताना आनंद वाटेल?

तुमची समस्या काही वेगळी नाहीए. प्रत्येक विवाहित स्त्रीच्या गुप्तांगाला लग्नाच्या काही वर्षांनी सैलपणा येतो त्यामुळे पूर्वीसारखा घट्टपणा कायम राहाणं शक्य नाही. असं असूनदेखील दाम्पत्य सहवासाचा पूर्ण आनंद घेतात. तुमच्या पतीनेही कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह न बाळता परिस्थितीचा स्वीकार केला पाहिजे. पण तरीदेखील जर ते संतुष्ट होत नसतील तर तुम्ही एखाद्या स्त्रीरोग तज्ज्ञाची भेट घेऊन आपल्या गुप्तांगाला २-३ टाके घालून ते आकुंचित करण्याची छोटीशी शस्त्रक्रिया करवून घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें