* डॉ.निराद वेंगसरकर
सांधेदुखी ही साधारणदेखील असते आणि गंभीर देखील. साधारण दुखण्यामध्ये तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैली यामध्ये बदल करून ते बरं करू शकता. परंतु गंभीर दुखण्यामध्ये उपचारांची अधिक गरज असते. एका अनुमानानुसार ४ व्यक्तीमागे एकाला तरी सांधेदुखीचा त्रास असतोच. ही समस्या पुरुषांच्या तुलनेत महिलांना अधिक असते.
का होते सांधेदुखी
सांधेदुखीची अनेक कारणं असू शकतात जसं बोन फ्लूइड (हाड द्रव) वा मॅम्ब्रेनमध्ये बदल घडणं, मार लागणं वा आतमध्ये एखादी दुखापत होणं, हाडांचा कॅन्सर, आर्थ्रायटिस, लठ्ठपणा, ब्लड कॅन्सर, वाढत्या वयाबरोबरच सांध्यामध्ये कार्टिलेज कुशनला लवचिक आणि ओलसर ठेवणारं लुब्रिकेंट कमी होणं, लिगामेंट्सची लांबी आणि लवचिकपणा कमी होणं.
सांध्यांना कसं ठेवाल निरोगी
सांधेदुखी खास करून आर्थ्रायटिसवर कोणताही उपाय नाही, परंतु काही उपाय आहेत, जे करून तुम्ही यापासून बचाव करू शकता वा याचा त्रास झाल्यास किमान लक्षणं नियंत्रित करू शकता.
* सांध्यांमधील कार्टिलेजला आर्थ्रायटिसमुळे नुकसान पोहोचतं. हे ७० टक्के पाण्याने बनलेलं असतं, म्हणून भरपूर पाणी प्या.
* कॅल्शियमयुक्त खाद्यपदार्थ जसं की दूध, दूधापासून बनलेले पदार्थ, ब्रोकोली, सालमन, पालक, राजमा, शेंगा, बदाम, टोफू, इत्यादींचं सेवन करा.
* व्हिटामिन सी आणि डी स्वस्थ सांध्यांसाठी खूपच उपयुक्त आहे. म्हणूनच यांपासून विपुल खाद्यपदार्थ जसं की स्ट्रॉबेरी, संत्र, किवी, पायनेप्पल, कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर, दूध, दही, मासे इत्यादींचं पुरेशा प्रमाणात सेवन करा.
* सूर्यप्रकाशात थोडावेळ राहा. यामुळे व्हिटामिन डी मिळेल.
* वजन नियंत्रणात ठेवा, वजन अधिक असेल तर सांध्यांवर दबाव वाढतो.
* नियमितपणे व्यायाम करा, ज्यामुळे सांधे धरणं कमी होण्यांस मदत मिळते. मात्र यामुळे सांध्यांवर दबाव पडेल असे व्यायाम शक्यतो करू नका.
* दारु आणि धुम्रपानामुळे सांध्यांचं नुकसान होतं. आर्थ्रायटिसने पीडीत असणाऱ्यांनी जर याचं सेवन बंद केलं तर त्यांच्या सांधे आणि मांसपेशींमध्ये सुधारणा होईल आणि वेदनादेखील कमी होतील.
* निरोगी लोकांनीदेखील धुम्रपान करू नये, कारण यामुळे तुम्ही रूमैटॉइड आर्थ्रायटिसचे बळी ठरू शकाल.
* फळं आणि भाज्यांचं सेवन अधिक प्रमाणात करा. यामुळे ऑस्टियोआर्थ्रायटिसपासून बचाव होईल.
* आलं आणि हळदीचं सेवन करा. यामुळे सांध्यांची सूज कमी होते.
* अति आळशीपणा करू नका.
* सूज वाढवणारे पदार्थ उदाहरणार्थ मीठ, साखर, अल्कोहोल, कॅफिन, तेल, ट्राँस फॅट आणि लाल मांसाचं सेवन कमी करा.
* पायी चालणं, जॉगिंग करणं, डांस करणं, जिम जाणं, पायऱ्या चढणं वा हलकाफुलका व्यायाम करूनदेखील हाडे मजबूत करू शकता.
थंडीत विशेष काळजी घ्या
हिवाळ्यात सांधेदुखी अधिक सतावते, कारण या ऋतुमध्ये लोक अधिक व्यायाम करतात. यामुळे शारीरिक सक्रियता कमी होते. दिवस लहान आणि रात्र मोठी झाल्याने जीवनशैली बदलते. आहाराच्या सवयीसुद्धा बदलतात. लोक व्यायाम करायला कंटाळतात, ज्यामुळे ही समस्या अधिक गंभीर होऊन बसते. यासाठी खालील गोष्टी लक्षात घ्या :
* नियमितपणे व्यायाम करा. शारीरिकरित्या सक्रीय राहा.
* जेव्हा बाहेर तापमान खूपच कमी असेल, तेव्हा बाहेर फिरायला वा इतर गोष्टी करू नका.
* शरीर नेहमी गरम कपड्यांनी झाकून ठेवा.
* भरपूर पाणी प्या. दररोज ८ ते १० ग्लास पाणी आवर्जून प्या.
* थंडीपासून स्वत:चं संरक्षण करा. ज्या भागात वेदना होत असतील तिथे गरम कपड्याने लपेटून ठेवा.
* थंड पदार्थ खाण्याऐवजी गरम पदार्थांचं सेवन अधिक करा. लसूण, कांदा, सालमन मासा, गुळ, बदाम, काजू इत्यादींचं अधिक सेवन करा.
* नियमित व्यायाम करा. यामुळे मांसपेशी मोकळ्या व्हायला मदत मिळेल आणि सांधे धरण्यापासून सुटका होईल. मात्र व्यायाम खूप घाईघाईत करू नका.
* कोंडायुक्त पीठाची पोळी आणि मुगाच्या डाळीचं सेवन करा. हिरव्या भाज्या, भोपळा, दूधी भोपळा, काकडी, फ्लॉवर, कोबी, गाजर इत्यादींचं सेवन करा. ब्रोकोलीचा वापर अधिकाधिक करा. हा आर्थ्रायटिस वाढू देत नाही.
* औषधं घेत असाल तर नियमित वेळेनुसार घेत राहा.
सांधेदुखीबरोबरच जर खालील समस्या असतील तर त्वरीत डॉक्टरांना दाखवा : सूज, लालसरपणा, सांध्याचा वापर करताना अडचण, अधिक वेदना इत्यादी.
घरगुती उपाय
* पेन रिलीवरचा वापर करा.* ज्या सांध्याच्या वापरामुळे वेदना होत असतील त्याचा वापर कमी करा.
* दररोज थोडावेळ तरी १५-२० मिनिटं तरी आइसपैक लावा.
* स्वत:ला उबदार ठेवा. तुमचं शरीर गरम असेल तर तुमचे सांधे कडक होणार नाहीत.
* पुरेशा प्रमाणात पाण्याचं सेवन करा.
* गरम पेय पदार्थांचं सेवन करा.द्य नियमित व्यायाम करा.
* सतत एकाच स्थितीत बसू नका. आपलं पोश्चर बदलत राहा. थोड्या थोड्या वेळाने पाय मोकळे करा.
* सूर्यप्रकाश सांधेदुखीच्या वेदनेत आराम देतो. म्हणून दररोज थोडा वेळ उन्हात राहा.
* तेलाने मसाज करा म्हणजे सांधेदुखी दूर होईल.
* गरम पाण्यात थोडंसं मीठ टाकून त्यामध्ये पाय बुडवा. यामुळे सांध्यामध्ये रक्तसंचार सुरळीत होईल.