गर्भधारणेस अडचण येऊ नये म्हणून

* डॉ. कावेरी बॅनर्जी

काही वर्षांपूर्वी माझ्याजवळ एक जोडपं आलेलं. ३४ वर्षांच्या प्रतिभाचं ३६ वर्षांच्या अशोकबरोबर लग्न झालेलं. ते दोघेही आयटी प्रोफेशनल होते आणि आमच्या क्लीनिकमध्ये प्राथमिक इन्फर्टिलिटीची तक्रार घेऊन आलेले. ज्याची त्यांना गेल्या ५ वर्षांपासून समस्या होती. त्यांच्याशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की लग्नानंतर आपल्या व्यस्ततेमुळे त्यांनी कधीच चांगल्याप्रकारे शारीरिकसंबंध ठेवले नाही. त्या जोडप्याची काउन्सिलिंग केली गेली. त्यांना योनीमार्गातून कृत्रिम बीजरोपण प्रक्रियेबद्दल समजावलं गेलं. ते जोडपं यासाठी तयारही झालं आणि या प्रक्रियेच्या तिसऱ्या टप्प्यात प्रतिभा गर्भवतीही झाली. आता ती एका वर्षांच्या स्वस्थ मुलाची आई आहे.

प्रतिभाचं प्रकरण काही अशा प्रकारचं एकमेव प्रकरण नाहीए. अलीकडे प्रजननाचं वय असलेल्या प्रत्येक १० पैकी एका जोडप्याला गर्भधारणेस अडचण येते. शहरांमध्ये याचं प्रमाण वेगाने वाढत आहे, जिथे अशी जोडपी जास्त आहेत आणि दोघेही नोकरदार आहेत.

  • वेगवेगळी कारणं

यासाठी कारणंही वेगवेगळी आहेत. अलीकडे अनेक स्त्रिया आपल्या करिअरच्या बाबतीत गंभीर असतात आणि स्वत:ला पूर्णपणे स्थिर केल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे त्यांच्या लग्नालाही उशीर होतो. अनेक प्रकरणांमध्ये लग्न होता होता मुली तीशी ओलांडतात. मात्र स्त्रियांच्या शरीराची निर्मिती अशाप्रकारे असते की वयाच्या तिशीनंतर तिच्या शरीरातील प्रजननयोग्य अंड्यांची उत्पादन क्षमता कमी होऊ लागते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या सुरुवातीला तीन ते पाच लक्ष अंडी असतात. वयाच्या तिशीनंतर तिच्या शरीरातील प्रजननयोग्य अंड्यांची उत्पादनक्षमता कमी होऊ लागते. यामागचं कारण म्हणजे प्रत्येक स्त्रीच्या शरीरात मासिक पाळीच्या सुरुवातीला तीन ते पाच लक्ष अंडी असतात. मासिक पाळी संपण्याच्या वयापर्यंत पोहोचता पोहोचता तिच्या शरीरातील संपूर्ण अंडी नष्ट झालेली असतात.

पुरुषांच्या विपरीत स्त्रियांमध्ये दर महिन्याला अंडयांची उत्पत्ती होत नाही. वयाच्या पस्तीशीनंतर प्रजननक्षमतेत वेगाने घट होऊ लागते. अशात अंड्यांची गुणवत्ता खराब होऊ लागल्याने अनेक स्त्रियांना गर्भधारणेत समस्या येऊ लागते.

या वर्गात येणारी अनेक जोडपी ए व्यक्तिमत्त्वांतर्गत येतात, ज्यांच्यात विशिष्ट प्रकारच्या गोष्टी आढळतात. जसं की ते खूप महत्त्वांकाक्षी असतात आणि खूप लवकर चिंतित होतात आणि एखाद्या गोष्टीचा तणावही त्यांना फार लवकर येतो. मात्र यशस्वी गर्भधारणेसाठी जोडप्यांनी तणावमुक्त राहाणं आणि नियमित शारीरिकसंबंध ठेवण्याची गरज असते. आपल्या कामाची जबाबदारी आणि अधिक तणावामुळे हे शक्य होत नाही. एक तणावपूर्ण जीवनपद्धतीमुळे अनेक लोक धूम्रपान आणि अल्कोहलसारख्या गोष्टींच्या आहारी जातात. त्यामुळे त्यांच्या शुक्राणू आणि अंड्यांच्या गुणवत्तेत कमी येते आणि त्यांची प्रजननक्षमता अवघड होऊन बसते.

  • कामाचा ताण

कामाचा ताण आणि आयुष्यातील इतरही जबाबदाऱ्यांबरोबर समतोलपणा राखण्याबरोबरच अलीकडच्या जोडप्यांच्या आहाराच्या सवयीही बदलल्या आहेत. ते जास्तीत जास्त स्नॅक्सवर अवलंबून असतात, ज्यात फास्टफूडचं प्रमाण जास्त असतं. ते इतकं व्यस्त आयुष्य जगत आहेत की त्यात त्यांना व्यायामासाठीही वेळ नसतो. अशा अस्वस्थ जीवनपद्धतीमुळे ते लठ्ठपणा आणि मधुमेहासारख्या आजारांच्या कचाट्यात सापडत आहेत. यामुळे गर्भधारणेस समस्या येऊ लागली आहे. त्यातल्या त्यात गर्भधारणा झाली जरी, तरी अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यताही जास्त असते. यापासून बचावल्यानंतर जन्मजात उणिवांची शक्यताही खूप जास्त असते.

या सर्व समस्याचं एक समाधान म्हणजे २३-२४व्या वर्षी लग्न करणं. कारण या वयांत स्त्रीच्या शारीरिक रचनेची पूर्णपणे वाढ झालेली असते. म्हणूनच कुटुंब बनवण्याची सुरूवात वयाच्या २३-२४व्या वर्षी करावी. जास्त वेळ लागत असेल तरी वयाच्या तिशीच्या आत तरी हे झालंच पाहिजे. अनेक स्त्रियांनी असंच केलं आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी कुटुंब आणि करिअरमध्ये  एक उत्तम ताळमेळ राखण्याचं उदाहरण सादर केलं आहे.

कसलीच अडचण न येता लवकर गर्भधारणेसाठी जोडप्यांना एका चांगल्या वातावरणाची गरज असते. रिलॅक्सेशन थेरेपी अशा जोडप्यांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकते. कारण यामुळे तणाव कमी होतो. जास्त धूम्रपान आणि अल्कोहलचं सेवन वर्ज्य करा. अशा लोकांनी समतोल आहार घ्यायला पाहिजे ज्यामध्ये साखर, मीठ आणि स्निग्ध पदार्थ कमी असावेत. भरपूर प्रमाणात फळं आणि भाज्या खाव्यात, दररोज कमीत कमी २ लीटर पाणी प्यावं, दररोज फेरफटका मारावा, व्यायामाला आपल्या दररोजच्या जीवनाचा एक भाग बनवावं. शांत तणावरहित आणि स्वस्थ जीवनपद्धतीचा अवलंब करून विवाहित जोडपी एका स्वस्थ बाळाचे पालक बनण्याचं आपलं स्वप्न सहज पूर्ण करू शकतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें