ओल्ड इज गोल्डचा फॅशन ट्रेंड

* ललिता गोयल

तुम्हाला हे माहीत आहे का की करीना कपूर म्हणजेच बेबोने आपल्या लग्नात शर्मिला टागोर यांचा तोच शरारा घातला होता, जो शर्मिला टागोर यांनी त्यांच्या लग्नात घातला होता आणि पटौदी कुटुंबाच्या परंपरेचे पालन केले होते. बॉलिवूडमधील या ट्रेंडमुळे हल्लीच्या तरूणीसुद्धा जुन्या साड्या, लहेंग्यांना रिसायकल करून नवे रूप देतात आणि ते घालून मिरवायला त्यांना खूपच आवडते. यामुळे भावनिक नाती तर जोडली जातात तसेच जुनी फॅशनही पारंपरिक ठेव्याच्या स्वरूपात आपल्यासोबत रहाते. फॅशन डिझायनरच्या म्हणण्याप्रमाणे हल्ली आई, आजी किंवा सासू यांचे शरारा, लहेंगे स्वत:च्या लग्नात घालण्याची फॅशन सध्या जोरात आहे.

लहानपणापासूनच तुम्हाला तुमची आई किंवा आजीची बनारसी साडी किंवा लहेंगा आवडत होता. मग तुमच्या लग्नात तुम्ही त्या साडीला नवीन लुक देऊन परिधान केल्यास नात्यांतील संबंधही दृढ करता येतील.

लहेंग्यांचे रीडिजाइनिंग

फॅशन डिझायनर, मीनाक्षी सभरवाल यांचं म्हणणं आहे की, हल्ली स्त्रिया जुन्या लहेंग्यांनाच नवीन पद्धतीने तयार करवून घेत आहेत. जर फॅब्रिकबद्दल बोलाल तर ब्रोकेड साड्या, टिशू, चंदेरी, शिफॉन व जॉर्जेटच्या लहेंग्यावर उत्तम वर्क करून त्यांना सुंदर बनवले जाते. यावर गोटा लेस, सोने, चांदी व कलर्ड स्टोन्स लाऊन सुंदर लुक दिला जातो.

खालील टीप्स अंमलात आणून तुम्ही तुमच्या आईच्या वा आजीच्या जुन्या साडी किंवा लहेंग्याला नवे रूप देऊ शकता.

* लहेंग्याची बॉर्डर चेंजकरून त्याला नवा लुक देऊ शकता जसं की मॅचिंग चोळीऐवजी पोंचू, शर्ट किंवा कॉन्ट्रॅस्ट कलर ट्राय करू शकता. यामुळे इजी लुक मिळेल.

* कांजीवरम किंवा बनारसी साडीपासून अनारकली बनवू शकता. यामुळे तुमच्या साडीला नवीन लुक मिळेल आणि हे वापरण्यासही सोपे आहे.

* तुम्ही तुमच्या आईच्या किंवा आजीच्या एखाद्या प्लेन सिल्कच्या साडीचा गाऊनही बनवू शकता आणि रिसेप्शन संगीत कार्यक्रमासाठी घालू शकता.

* जर साडीची बॉर्डर घासली गेली आहे किंवा फाटली असेल तर त्यावर नवीन बॉर्डर लावता येऊ शकते. मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केटमध्ये तुम्हाला स्टायलिश बॉर्डरसाठी अनेक दुकानं उपलब्ध आहेत. बॉर्डर चेंज करून साडीचे रूपच पालटून जाईल. म्हणजेच साडी एकदम नव्यासारखी होऊन जाईल अशी साडी तुम्हाला बाजारात कुठेही मिळणार नाही. जर साडीचा मधला भाग फाटला असेल किंवा कापला गेला असेल तर त्याजागी कॉन्ट्रास्ट कलरचे जॉर्जेट किंवा शिफॉनचे फॅब्रिक लावू शकता.

प्रयोग करून पहा : लग्नाच्यावेळी तुमच्या आईच्या लहेंग्यासोबत तुम्ही क्रॉप टॉप किंवा कोर्सेट बरोबर परिधान करून इंडोवेस्टर्न लुक मिळवू शकता. तसेच तुम्हाला आवडले तर लहेंग्यासोबत शीयर जॅकेटही घालू शकता. यामुळे लहेंग्याला नवीन लुक मिळेल.

लहेंग्याला बनवा अनारकली : तुमच्या आईच्या लहेंगा वा चोलीपासून अनारकलीसुद्धा बनवू शकता. यासाठी तुमच्या आवडीचे फॅब्रिक लहेंग्याच्या घेराबरोबर शिवून घ्या. अशाचप्रकारे जर तुमच्याकडे एखादी जुनी चोली असेल तर त्यासोबत आवडीचे फॅब्रिक जोडून अनारकली बनवू शकता.

बनारसी साडीचा हेवी दुपट्टा : आईच्या बनारसी साडीचा हेवी दुपट्टासुद्धा बनवू शकता आणि प्लेन स्कर्ट व सलवार सूटसोबत पेयर करू शकता. असे केल्याने तुमचे पैसेही वाचतील आणि नवीन एक्सक्लुजिव लुक मिळेल. असा दुपट्टा स्टे्रट फिटवाले सूट, अनारकली, पटियाला सलवार कमीजबरोबरही शोभून दिसतील.

्रेंडमधील लेटेस्ट कलर : लाल रंग आता आउट ऑफ ट्रेंन्ड झाला आहे. म्हणजे रंग कोणी घालतही नाही. आता मुली नवनवे रंग वापरून बघत आहेत. हल्लीच्या नववधू पेस्टल रंग जसे फिकट गुलाबी. सी ग्रीन, क्रीम रंग किंवा गडद केशरी रंगही कॉन्फिडंटली वापरत आहेत.

लाइटवेट नेटचे लहेंगे : वजनदार लहेंग्याची जागा आता लाईटवेट आणि नेटच्या आणि वेलवेटच्या लहेंग्यांनी घेतली आहे. हे लाइट वेट असल्याने खूप पसंत केले जात आहेत. लाइट पिंक, पर्पल, क्रीम यासोबत पिवळा, निळा, हिरवा, लाल इ. रंगांच्या कॉम्बीनेशनचे लहेंगे सध्या तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र आहेत. हे स्टायलिश लुक आणि डिझायनर असल्यामुळे ते खूपच सुंदर व अनोखी अनुभूती देतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें