कसे आहे तुमचे ऑफिस ड्रेसिंग

* नसीम अंसारी कोचर

कोणत्याही ऑफिसात तुम्ही जाऊन पहाल, तर ज्या महिला चांगल्याप्रकारे ड्रेसअप करतात, त्यांचा उत्साह व चार्म वेगळाच दिसून येतो. त्या बऱ्यापैकी आत्मविश्वासूदेखील दिसतात. अशा महिला रोखठोकपणे बोलतात. मागेपुढे पाहत नाहीत.

उलट त्या महिलांना पहा, ज्या साधारण वेशभूषेत असतात. अशा महिला तुम्हाला एखाद्या कोपऱ्यात बसून मान खाली घालून घाईघाईने आपलं काम करताना दिसतील. त्या जास्त कोणात मिसळतदेखील नाहीत वा जास्त कोणाशी बोलत नाहीत. इथेपर्यंत की लंचब्रेकवेळी आपला टिफिनदेखील एकटया कोपऱ्यात बसून खाऊन घेतात. अशा महिला भलेही आपल्या कामात हुशार असोत, परंतु सगळयांपासून अलिप्त राहतात.

वास्तविक भारतात वयाची तिशी-पस्तीशी गाठेपर्यंत महिला आपल्या वेशभूषेबाबत निष्काळजी होऊन जातात, जे चुकीचे आहे. साधारणपणे ६० वर्षांची महिलादेखील उत्साहाने भरलेली, फॅशनने परिपूर्ण दिसून येते. फक्त ओठांवर लिपस्टिक, हाय हील, सुंदर पर्स, केसांना रंग व चेहऱ्यावर मेकअप त्यांच्या रुटीनमध्ये समाविष्ट असला पाहिजे.

जर तुम्ही नोकरदार महिला असाल, तर कामासोबतच तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाविषयीदेखील जागरूक राहिले पाहिजे. ऑफिस हे फक्त काम उरकण्याची जागा नाही. इथे तुम्ही इतर लोकांसोबत दिवसातील आठ-दहा तास व्यतीत करता. जर तुम्ही नीटनेटक्या तयार होऊन ऑफिसला येत आहात, तर तुम्हाला केवळ कौतुकाच्या नजरेनेच पाहिले जाणार नाही, तर तुम्हाला स्वत:लाही उत्साही जाणवेल.

फक्त कामाचे ठिकाण नव्हे ऑफिस

काही लोक ऑफिसला फक्त काम करण्याचे ठिकाण मानतात. त्यांना वाटते की फक्त कामच तर करायचे आहे. त्यामुळे काहीही घालून जा, काय फरक पडतो? जर तुम्हीदेखील हाच विचार करता, तर हे चुकीचे आहे. ऑफिसमध्ये रोज तुमचे आठ-दहा तास जातात. अशात ऑफिसला फक्त काम करण्याची जागाच मानणे योग्य नव्हे. इथे तुमचा ड्रेस, स्टाईल, उठण्या बसण्याची व बोलण्याची पद्धत अतिशय महत्त्वाची ठरते.

स्वत:ला द्या थोडा वेळ

मानले की नोकरदार महिला घर व ऑफिस दोन्ही जबाबदाऱ्या निभावतात. सकाळी उठून सर्वांसाठी खाण्यापिण्याची सोय, मुले व पतीच्या तयारीत व्यग्रता, मोलकरणींना जरुरी सूचना व त्यानंतर स्वत:च्या तयारीत वेळ कसा वेगाने जातो कळतदेखील नाही. असे असूनही तुम्ही ऑफिसला जाण्यापूर्वी स्वत:च्या तयारीसाठी कमीत कमी ४५ मिनिटांचा वेळ स्वत:ला दिला पाहिजे.

सकाळचा वेळ वाचावा यासाठी रात्रीच सकाळी ऑफिसला घालण्यासाठीच्या कपडयांची निवड करावी व त्याच्याशी संबंधित ज्वेलरीदेखील सिलेक्ट करावी. यामुळे सकाळचा वेळ हा विचार करण्यात जाणार नाही की आज काय घालू?

काही महिला आठवडयातून एक-दोन वेळाच केसांना शाम्पू करतात. हे चुकीचे आहे. तुम्ही एक दिवसाआड शाम्पू करा, कंडिशनर लावा व जेलने केसांना योग्यप्रकारे सेट करा. रूक्ष व गळणारे केस व्यक्तिमत्त्वात निरूत्साह उत्पन्न करतात. रूक्ष केसांमुळे चेहऱ्यावर खाज व पुरळदेखील येऊ शकतात.

यानंतर तुम्ही तुमचा ड्रेस, मेकअप व चपलांवर लक्ष द्या. हलका मेकअप, हलकीशी ज्वेलरी व सोबत मॅचिंग हँडबॅग व चपला तुमच्या व्यक्तिमत्त्वाला शोभा आणतील.

व्यक्तिमत्व उजळवा

ऑफिससाठी तयार झाल्यानंतर एकदा स्वत:ला आरशात वरून खालपर्यंत पहा. स्वत:ला विचारा की ऑफिसमध्ये हा ड्रेस तुमच्या व्यक्तिमत्वाला योग्य रीतीने प्रेझेंट करत आहे का? तयार होतेवेळी ही गोष्ट अजिबात विसरू नका की तुमचा ड्रेस तुमच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहे. तुम्ही जे घालाल, तिच तुमची प्रतिमा बनेल.

ड्रेस कोड फॉलो करा

जर ऑफिसमध्ये ड्रेस कोड असेल, तर तो १०० टक्के फॉलो करा. ड्रेस कोड असूनही जर तुम्ही काहीही घालून ऑफिसला गेला तर तुमची चुकीची प्रतिमा दर्शवेल. तुम्ही या ड्रेसचे कमीत कमी चार जोड बाळगणे उत्तम ठरेल, जेणेकरून रोज स्वच्छ व इस्त्री केलेले कपडे घालू शकाल.

प्रदर्शनाची जागा नाही

ऑफिस तुमच्या कपडे वा ज्वेलरीच्या प्रदर्शनाची जागा नाही. ऑफिसमध्ये जे काही घालाल, ते सोबर असावे. बाकी इतर ड्रेसेस तुम्ही इतर ठिकाणी वापरू शकता. कपडे तुमच्या वयानुरूप असावेत. असे नाही की तुम्ही वीस-बावीस वर्षांच्या आहात तर रोज साडी नेसून जात आहात व चाळीस वर्षांच्या आहात, तर स्कर्ट मिडीमध्ये ऑफिसमध्ये पोहोचाल. कपडे तुमच्या वयानुसार असतील, तर तुमचे व्यक्तिमत्व लोकांना आकर्षित करेल व तुम्हाला स्वत:लादेखील आरामदायी वाटेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें