आईचं दूध एक सुरक्षा कवच

* पारुल भटनागर

आईचं दूध सुरुवातीपासूनच इम्युनिटीला बूस्ट करणाऱ्या अँटीबॉडीजने पुरेपूर असतं. कोलोस्ट्रम, ज्याला ब्रेस्ट मिल्क म्हणजेच अंगावरच्या दुधाची पहिली पायरी म्हटलं जातं, हे अँटीबॉडीजने पुरेपूर असतं. हे घट्ट व पिवळया रंगाचं असण्याबरोबरच प्रोटीन, फॅट सोलुबल विटामिन्स, मिनरल्स व इमिनोग्लोबुलीसने रिच असतं. हे मुलांचं नाक, गळा व डायजेशन सिस्टीमवर संरक्षित थर  बनविण्याचं काम करतं. जे आपल्या बाळाची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी नक्कीच द्यायला हवं.

फार्म्युला मिल्क म्हणजेच वरच्या दुधामध्ये ब्रेस्ट मिल्कप्रमाणे पर्यावरण विशिष्ट अँटीबॉडीज नसतात आणि ना ही यामध्ये शिशूचं नाक, गळा व आतडयांचे मार्ग झाकण्यासाठी अँटीबॉडीज म्हणजेच फॉर्म्युला मिल्क बेबीला कोणतेही खास संरक्षण देण्याचं काम करत नाही. म्हणून शिशुसाठी आईच दूध हेच सर्वात उत्तम आणि आरोग्यदायी आहे.

वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक

वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक जगभरात १ ते ७ ऑगस्टपर्यंत साजरा केला जातो. याचा उद्देश बेस्ट फ्युडिंगबाबत आई व कुटुंबामध्ये जागरूकता निर्माण करणे असतं. सोबतच आईच्या पहिल्या घट्ट दुधाबाबत गैरसमज दूर करणं असतं. यामध्ये सांगितलं जातं की जन्माच्या एका तासातच शिशुला आईचं दूध द्यायला हवं. कारण हे बाळासाठी परिपूर्ण आहार असतं.

आईला दूध पाजण्यामध्ये तिचे कुटुंबीय, डॉक्टर, नर्स यांनी देखील महत्त्वाचं योगदान द्यायला हवं, कारण ब्रेस्ट फीडिंग हे फक्त बाळच नाही तर आईलादेखील आजारांपासून वाचविण्यात मदत करतं. रिसर्चनुसार आता ब्रेस्ट फिडिंगबाबत स्त्रियादेखील याचं महत्त्व समजत जागरूक होत आहेत.

ब्रेस्ट मिल्कचे अजूनदेखील फायदे

वजन वाढविण्यात मदतनीस ब्रेस्ट मिल्क हेल्दी वेटला प्रमोट करण्याबरोबरच लठ्ठपणाच्या भीतीलादेखील कमी करतं. अनेक संशोधनात हे सिद्ध झालं आहे की फॉर्म्युला मिल्क पिणाऱ्या शिशूंच्या तुलनेत ब्रेस्ट फीड करणाऱ्या शिशूंना लठ्ठपणाची भीती १५ ते ३० टक्के कमी असते. हे वेगवेगळे गट बॅक्टेरियाच्या विकासाचं कारण असतं.

स्तनपान करणाऱ्या शिशुंमध्ये मोठया प्रमाणात गट बॅक्टेरिया पाहिले जातात. जे फॅट स्टोरेजला प्रभावित करण्याचं काम करतात. सोबतच ब्रेस्ट फीड करणाऱ्या शिशुंमध्ये लॅपटिनचं प्रमाण अधिक असतं. हे एक असं प्रमुख हार्मोन आहे जे भूक व चरबीच्या भंडाराला नियंत्रित करण्याचं काम करतं.

अधिक स्मार्ट

आपण जेवढं हेल्दी व न्यूट्रिशियन्सने पुरेपूर डाइट घेतो, त्यामुळे आपल्या संपूर्ण विकासात मदत मिळण्याबरोबरच आपला मेंदूदेखील अधिक वेगवान व अॅक्टिव्ह बनतो. अगदी तशीच गोष्ट ब्रेस्ट मिल्क संदर्भातदेखील लागू होते. ज्या शिशूंना सुरुवातीचे सहा महिने भरपूर स्तनपान केलं जातं, त्या मुलांच्या मेंदूची वाढ अधिक वेगाने होते. वयाबरोबरच त्यांची विचार करण्याची क्षमतादेखील वेगाने विकसित होते. कारण ब्रेस्ट मिल्कमध्ये आढळणारे न्यूट्रियन्स जसं डोकोसा इनोस अॅसिड, आराछिडोनिक अॅसिड, ओमेगा ३ व ६ फॅटी अॅसिड शिशुच्या मेंदूच्या विकासात मदत करतं. यामुळे बाळाच्या शिकण्याच्या क्षमतेमध्येदेखील सुधारणा होते. अशा मुलांचा आयक्यू लेवलदेखील खूप चांगलं असल्याचं पाहण्यात आलंय.

आजारांपासून संरक्षण

जेव्हा बाळ या जगतात येतं तेव्हा पालक त्याला प्रत्येक प्रकारे सुरक्षा देण्याचे काम करतात कारण त्यांचं बाळ आजारांपासून दूर असावं. शिशुसाठी आईच्या दुधापेक्षा सर्वात महत्त्वाचं काहीच असू शकत नाही. जर सुरुवातीचे सहा महिने तुमच्या शिशुने ब्रेस्ट फीड केलं असेल तर तुम्हाला वारंवार त्याच्यासाठी डॉक्टरकडे जावं लागणार नाही कारण आईचं परीपक्व  इम्युन सिस्टम रोगजंतूबाबत अँटीबॉडीज बनवतं, जे ब्रेस्ट मिल्कच्या माध्यमातून शिशुच्या शरीरात प्रवेश करून आजारांपासून वाचवतं.

इमिनोग्लोब्युलिन ए, जे अँटीबॉडी रक्त प्रोटीन असतं. बाळाच्या अपरिपक्व आतडयांच्या थराला कव्हर करतं. ज्यामुळे रोगजंतू व जर्म्सला बाहेर पडण्यास मदत मिळते. यामुळे ते रेस्पिरेटरी इन्फेक्शन, कानातील इन्फेक्शन, एलर्जी, आतडयातील इन्फेक्शन, पोटातील इन्फेक्शनपासून वाचतं.

आईसाठीदेखील मदतनीस

बाळालाच नाही तर ब्रेस्ट फीडिंगने आयांनादेखील अनेक फायदे मिळतात. यामुळे एक्स्ट्रा कॅलरीज बर्न झाल्यामुळे आईला आपल्या वाढलेल्या वजनाला कमी करण्यात मदत होते. हे ऑक्सिटॉक्सिन हार्मोनला रिलीज करतं, जे युटरसला आपल्या साईजमध्ये आणण्यात व ब्लीडिंगला कमीत करण्यात मदतनीस ठरतं. सोबतच हे ब्रेस्ट ओवेरियन कॅन्सर, डायबिटीज, हृदयाशी संबंधित आजाराची भीती कमी करण्याचं काम करतं. म्हणूनच ब्रेस्टफीडिंगने बाळाबरोबर स्वत:च्या आरोग्याचीदेखील काळजी घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें