एकमेकांना समान आदर द्या

* प्रतिनिधी

जेव्हा सामान्य लोकांमध्ये लग्ने तुटतात तेव्हा प्रकरण लोकलपर्यंत राहते, पण जेव्हा सिमरचे नाते तुटते तेव्हा कळते की पती-पत्नीचे नाते कसे नाजूक आणि वालुकामय जमिनीवर आहे की थोडासा गैरसमज त्यांना वेगळे करू शकतो.

धरम चोप्रा आणि राजीव सेन यांच्या लग्नानंतर. मुलीच्या जन्मानंतर होणारी फाटाफूट ही दोषी ठरत आहे की, लग्नानंतर आयुष्य रुळावर ठेवायचे असेल तर रेल्वेप्रमाणेच इंजिनाचीही काळजी घ्यावी लागते. ट्रॅक वेगळा झाला, सुंदर डिझायनर कपड्यांमध्ये 200-300 लोक एकमेकांभोवती फिरणे पुरेसे नाही.

‘क्यों दिल छोड़ आये’ या मालिकेतील नायिका म्हणते की तिला राजीवच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल शंका आहे आणि ती ‘एक मौका दो, दो एक धोस दो और मग कुठेतरी चेहरा मारते’ म्हणत राहते. राजीव सांगतात की चारूचे आधी बिकानेरमध्ये लग्न झाले होते पण त्याने ती गोष्ट राजीवला सांगितली नाही. पहिल्या लग्नाची गोष्ट नवऱ्यापासून लपवणे पतीला मान्य नाही. लग्नानंतर पती-पत्नीचा एकमेकांवर प्रचंड विश्वास असतो आणि हे प्रेमच दोन यशस्वी लोकांना एकाच छताखाली राहण्यास तयार ठेवते.

जेव्हापासून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली आहे, तेव्हापासून वकील आणले गेले आहेत, दोघांनीही एकमेकांविरुद्ध खोटे बोलणे पूर्णपणे बंद करावे लागेल, समेटाचे सर्व मार्ग बंद करावे लागतील. अशा परिस्थितीत घटस्फोट होतो, मुलीला आई किंवा वडील दोन्ही गमावावे लागतात. आता राजीव सेन यांना मुलगी पाहण्यासाठी भीक मागावी लागली आहे.

एखाद्या यशस्वी अभिनेत्रीला काम करण्यापासून रोखणे किंवा तिच्या मुलीला सोशल मीडियावर मित्र आणि चाहत्यांसह फोटो शेअर करण्यापासून रोखणे यासारख्या छोट्या गोष्टी कधी कधी अॅसिडमध्ये बदलतात ज्यामुळे लग्नाआधीच्या प्रेमाचा गोंद धुऊन जातो.

प्रत्येक वैवाहिक जीवनात पती-पत्नीने एकमेकांना समान आदर द्यावा, जागा द्यावी, त्यांना ठरवू द्या, काय करणे आवश्यक आहे. कामाची विभागणी तराजूने न करता प्रेमाने करावी. पती-पत्नी एकमेकांना दिलासा देण्याचा खूप प्रयत्न करतात. किचनपासून ते टॅक्सपर्यंत दोघांनीही एकमेकांसोबत राहावे आणि एकमेकांच्या चुकीच्या निर्णयाचा आदरही करू नये, हा निर्णय आपलाच आहे असे समजून सहन करण्याची सवय लावावी.

दुसऱ्यासोबत झोपणे ही शो व्यवसायातील आपत्ती असू नये. तो उद्योग संस्कृतीचा भाग आहे. ज्याप्रमाणे पंजाबचा शासक रणजित सिंगला 5 बायका होत्या आणि रणजित सिंग तेव्हाही यशस्वी ठरला, त्याचप्रमाणे विवाहित जोडीदाराचे दुसरे नाते आरामात घेणे शो बिझनेस योग्य आहे. यावर आक्षेप घेणाऱ्यांनी एकत्र राहू नये.

चारू असोपा आणि रोहित सेन यांचे लग्न तुटले किंवा तुटले नाही, पण अशा घटनांमधून सर्वसामान्यांना अनेक धडे मिळतात.

नात्यात जेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात

* सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही. गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

घरून काम करून त्रासलेल्या बायका

* शैलेंद्र सिंग

‘‘अगं ऐकतेस का,’’ सारखा थोडया-थोडया वेळाने पतीचा हा आवाज ऐकून पत्नीचा संयम सुटू लागतो.

‘‘ऐकतेय, मी बहिरी नाही, बोला.’’ बायकोने रागाने उत्तर दिले.

बायकोला अस्वस्थ पाहून नवरा मंद स्वरात म्हणाला, ‘‘थोडे पापड तळून दिले असते… कधीतरी पकोडे बनवत जा.’’

असेच काहीसे आवाज आता बायकांच्या नित्यक्रमात सामील झाले आहेत. आता एवढं सगळं बनवून घरची सगळी कामंही करा, कारण लॉकडाऊन आहे, मदतीला कुणी नाही. इतक्या मसालेदार नाष्टयांनंतर जेवणात ही कोणती कसर राहू नये. दररोज चटणी, रायता, कोशिंबीर अदलून-बदलून हवी. वरून ही स्थिती की किचनमध्ये येऊन बोलतील की अगं, हे का बनवलं? हे तर मी उद्या बनवून घेण्याचा विचार केला होता.

रेणू अग्रवाल म्हणते, ‘‘कोरोनामध्ये काय-काय रडायचे, काही नाही बोलायचे आणि सर्व काही सहन करायचे. कुणाला सांगू मी माझ्या मनाची दशा. दशा झालीय माझी दुर्दशा. पतीसाठी घरून काम आणि पत्नींसाठी? दिवसभर काम करा. पूर्वी नवरेमंडळी फक्त रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशीच घरी असायचे. आता सकाळपासून रात्रीपर्यंत स्वत:च लहान मोठया सासूबाईंपेक्षा कमी वाटत नाहीत. आता तर चोवीस तास बनियान घालून इंग्रजीभाषेच्या पांडित्याचे प्रदर्शन करत राहतात. कधी चहा, कधी कॉफीच्या भानगडीत मेंदूचे दही होत चालले आहे. ३ वेळा जेवण, ४ वेळा नाश्ता. कधी कधी तर वाटते की मलाच कोरोना व्हावा, कमीत कमी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये विश्रांती तर मिळेल.

घरून काम करण्याच्या बाबतीत बायकांना ना स्वातंत्र्य राहिले, ना कुठले टाइम टेबल. नवरा खाण्यापिण्यापासून जेव्हा मोकळा होईल, तेव्हाच तर इतर कामे होतील. तसे बनियानमध्ये आरामात बसून घरून काम करताना त्यांना आरामदायक वाटते, परंतु जेव्हा ऑनलाइन कॉन्फरन्स असते तेव्हा ते पँट-शर्ट आणि सकाळपासून रात्रीपर्यंत स्वत:च लहान मोठया सासूबाईंपेक्षा कमी वाटत नाहीत. आता तर चोवीस तास बनियान घालून इंग्रजीभाषेच्या पांडित्याचे प्रदर्शन करत राहतात. कधी चहा, कधी कॉफीच्या भानगडीत मेंदूचे दही होत चालले आहे. ३ वेळा जेवण, ४ वेळा नाश्ता. कधी कधी तर वाटते की मलाच कोरोना व्हावा, कमीत कमी १४ दिवस क्वारंटाईनमध्ये विश्रांती तर मिळेल.

घरून काम करण्याच्या बाबतीत बायकांना ना स्वातंत्र्य राहिले, ना कुठले टाइम टेबल. नवरा खाण्यापिण्यापासून जेव्हा मोकळा होईल, तेव्हाच तर इतर कामे होतील. तसे बनियानमध्ये आरामात बसून घरून काम करताना त्यांना आरामदायक वाटते, परंतु जेव्हा ऑनलाइन कॉन्फरन्स असते तेव्हा ते पँट-शर्ट आणि टाय घालून व्यवस्थितपणे सजून-सवरून बसतात.

घरातून कामामुळे तणाव वाढला

घरातून कामामुळे हैराण झालेल्या बायकांची कहाणी मोठी आहे. दुखत्या नाडीवर फक्त हात लागायचे निमित्त असते. बायकांच्या वेदना उतू येऊ लागतात.

क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आकांक्षा जैन सांगतात, ‘‘लॉकडाऊनच्या काळात नवरा-बायकोच्या नात्यात वारंवार संघर्ष होताना दिसतोय. आधी असं वाटत होतं की प्रकरण १५-२० दिवसांचे आहे, तर सगळं काही अगदी उत्साहात चाललं. कधी नवरा स्वयंपाक करत असे, तर कधी बायको. नवरा घराची साफसफाई करायचा, मुलांची काळजी घ्यायचा, झाडांची देखभाल करायचा. पती-पत्नीला असं वाटत होतं जणू त्यांना बऱ्याच दिवसांपासून एकत्र काम करण्याची आणि वेळ घालवण्याची संधी मिळत नव्हती ती आता त्यांना मिळाली आहे. परंतु जसजसे लॉकडाऊनचे दिवस वाढू लागले आणि लॉकडाऊननंतरही घरून काम सुरूच राहिले, पती-पत्नीतील भांडणाच्या घटना वाढू लागल्या. कधी कधी या गोष्टी गंभीर होऊन पोलिसांपर्यंतही पोहोचू लागल्या.’’

आकांक्षा पुढे सांगते की, ‘‘लॉकडाऊनच्या सुरुवातीला घरातून कामाबरोबरच घरचा आनंदही लुटता येत होता, पण नंतर हळूहळू हा उत्साह ओसरू लागला.

लॉकडाऊन संपल्यानंतरही सर्व कार्यालये वर्क फ्रॉम होमद्वारे चालत राहिली. हे प्रकरण दीर्घकाळ चालणार हे आता स्पष्ट झाले आहे.

आई ऑनलाइन क्लासमध्ये अडकली

मानसशास्त्रज्ञ सुप्रीती बाली सांगतात, ‘‘गोष्ट फक्त घरून काम करण्यापुरतीच नाही. नवऱ्याचं ऑफिसच नाही, तर मुलांची शाळाही बंद असल्याने बायकांची जबाबदारी वाढत आहे. पूर्वी नवरा ऑफिसला आणि मुलं शाळेत गेल्यावर महिलांना स्वत:साठी वेळ मिळायचा. आता बायकोला दिवसभर घरची कामेही करावी लागतात आणि शिवाय गप्पदेखील बसावे लागते, कारण एकीकडे घरून काम चालू असते आणि दुसरीकडे ऑनलाइन क्लास असतो. मुलाला वेळेवर उठवणे, त्याची तयारी करून देऊन ऑनलाइन क्लाससाठी बसवावे लागते. ऑफिस आणि क्लास दोन्हीची वेळ बरोबर असते. पण मुलांची लवकर तयारी करावी लागते. त्याच वेळी त्यांना मदतही करावी लागते. घरात पूर्ण शांततादेखील ठेवावी लागते.’’

नोकरदार महिलांचे वेगळे दुखणे आहे

चंद्रप्रभा नर्सिंग सेवेत आहेत. कोरोनाच्यावेळी त्यांच्या ड्युटीच्या वेळाही बदलल्या आणि कामाचे तासही बदलले. त्यांचे पतीही नोकरीला आहेत. चंद्रप्रभा सकाळी लवकर उठतात. जेवण, नाश्ता एकाच वेळेस बनवितात. पती आणि मुलांना नाश्ता देऊन तयार करतात. मुलांना मदत करण्यासाठी त्यांची आई घरीच असते. मग त्या आपले कर्तव्य बजवायला जातात. जेव्हा त्या वेळेवर परत येऊ शकत नाहीत तेव्हा त्यांची आईच मदत करते. त्या कामावरून थकूनभागून घरी येतात तेव्हा त्यांची आईही थकलेली असते. जे काही ठेवलेले असते ते खाऊन त्या परत रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागतात. पुन्हा दुसऱ्या दिवसाची चिंता सुरू होते.

आकांक्षा जैन सांगतात, ‘‘गृहिणीपेक्षा नोकरदार महिलांना जास्त त्रास होतो. पूर्वी नवरा ऑफिसला जायचा आणि मुलं शाळेत, मग तेवढा वेळ घराची चिंता नसायची. आता नवरा आणि मुलं घरी आहेत, त्यामुळे तिला ऑफिसमध्ये राहूनही घराची काळजी करावी लागते. ज्या घरात आजी-आजोबा किंवा कोणी नातेवाईक मदतीला असतील तेथे ठीक आहे, पण जिथे एकल पालक आहेत तिथे समस्या जास्त आहेत. नोकरदार महिलांसाठी ऑनलाइन क्लास आणि घरून काम करणे हे जात्यासारखे आहे, ज्यामध्ये स्त्रिया पीसल्या जात आहेत.’’

गेला गप्पांचा काळ

कोरोनापूर्वी महिला पतीला ऑफिस आणि मुलांना शाळेत पाठवल्यानंतर स्वत:साठी वेळ काढून घराबाहेर पडायच्या. कधी किटी पार्टी, कधी फिल्म तर कधी आऊटिंगमध्ये वेळ घालवत असायच्या. फक्त रविवार आणि सुट्टीच्या दिवशीच नवरा आणि मुलांसोबत घरी वेळ घालविला जाई. आता बाहेर पडणे बंद झाले आहे. फोनवरच्या गप्पांमध्ये एक भीती असते की कदाचित समोरची व्यक्ती आपले बोलणे रेकॉर्ड तर करणार नाही ना. अशा परिस्थितीत सासू आणि मैत्रिणींबद्दल उघडपणे बोलणे गॉसिपमध्ये केले जात नाही. कुठेतरी बाहेर जातानाही सर्व प्रकारच्या उपाययोजना कराव्या लागतात. खाण्या-पिण्यापासून ते मास्क लावण्यापर्यंत गोंधळाला सामोरे जावे लागते.

संतोष कुमारी सांगतात, ‘‘४ महिन्यांनंतर मी घरातून बाहेर पडले तेव्हा एखाद्या मोकळया जागेवर आल्यासारखं वाटत होतं. माझंच शहर मला बदलल्यासारखं वाटत होतं, कारण मी खूप दिवसांनी पाहत होते. मास्क घालायची सवय नाही म्हणून गाडी चालवताना मास्क काढला. चौकात पोलिसांनी मास्क न लावलेले बघितल्यावर दंडाची पावती फाडली. गाडीत असताना मास्क घालायची काय गरज? हे समजत नाही. कोरोनापूर्वी आम्ही बिनधास्त हिंडायचो आणि मजा करायचो, आता जणू एका बांधणीत जगतोय असं वाटतंय. गॉसिपच नाही तर मेकअप करण्याची मजाही निघून गेली. जर चेहराच दाखवायचा नाही तर मग मेक-अप काय करणार, स्त्री मेकअपशिवाय अपूर्ण असते.’’

लॉकडाऊन संपल्यानंतरही घरून काम आणि ऑनलाइन क्लासेस चालण्याने बायकांचा त्रास संपलेला नाही. त्यांचा बराचसा वेळ पती आणि मुलांच्या मागण्या पूर्ण करण्यातच जातो. नवरा आणि मुलांसोबत राहायचे आहे आणि त्यांच्या सुखसोयींची काळजी घ्यायची आहे, पण त्यांच्याशी बोलण्याची संधी मिळणार नाही, त्यामुळे तणाव आणखी वाढतो. कोरोनाचा सर्वाधिक फटका पत्नींना बसला आहे. काम वाढले पण मजामस्ती कमी झाली.

दाम्पत्य जीवनात याला असावी नो एंट्री

* ललिता गोयल

संशयाच्या रोगाला इलाज नाही. जर का याच्या फेऱ्यात खासकरून पतीपत्नीपैकी कुणी एक अडकले तर तो त्यांना हैवान बनवू शकतो. अशीच एक घटना अलीकडेच हैदराबादमध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेने आपल्या पतीला अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयामुळे अशी शिक्षा दिली ज्याची वेदना तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या ३० वर्षीय महिलेने पतीशी झालेल्या वादात चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पतीला गंभीर जखमा झाल्या.

असेच एक प्रकरण दिल्लीच्या निहाल विहार परिसरातसुद्धा घडले, जिथे पतिनेच आपल्या पत्नीची मर्डर केली. पकडले गेल्यावर त्या पतिने पोलिसांना सर्व काही सांगितले. त्याने स्पष्ट केले की त्याचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दोघांचे लव्ह मॅरेज होते, पण पतिला सतत वाटायचे की आपल्या पत्नीची अनेक मुलांसोबत मैत्री आहे आणि याच गोष्टीवरून त्यांच्यात सतत वादविवाद होत आले.

तुटणारी कुटुंबं आणि विखुरणारी नाती

संशयामुळे न जाणो कित्येक हसती खेळती कुटुंबं बरबाद झाली आहेत. दाम्पत्य जीवन जे विश्वासाच्या आधारावर टिकलेले असते, त्यात संशयाची चाहूल विष कालवते. हल्ली अनैतिक संबंधांच्या संशयावरून लाइफपार्टनरवर हल्ला, हत्या करण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. एकत्र कुटुंब पध्दती विखुरणे हे याचे कारण आहे असे मानसशास्त्रज्ञ मत मांडतात.

खरंतर एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा पती आणि पत्नीत भांडणे होत, तेव्हा घरातील मोठी माणसे सामोपचाराने बातचीत करून ती भांडणे सोडवत असत किंवा मग मोठयांच्या उपस्थितित त्यांचे भांडण उग्र रूप धारण करू शकत नसे. मात्र आज पती पत्नी एकटे राहतात, त्यामुळे भांडण झाल्यावर ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. इथे त्यांच्यामध्ये उभी राहिलेली संशयाची भिंत तोडायला कुणीही नसते.

अशात संशय अधिकच बळावल्यामुळे पतीपत्नीचे नाते शेवटच्या घटका मोजू लागते. वर्तमान लाइफस्टाइलमध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरदार असतात. ते दिवसातले ८ ते १० तास घराबाहेर असतात आणि ते विरुद्ध लिंगीय व्यक्तींसोबत कामाच्या निमित्ताने सहवासात असतात. हाच सहवास हे दोघांमधील संशयाचे कारण बनते. अशावेळी पतीपत्नी दोघांनी विश्वास ठेवायला हवा.

बिझी लाइफस्टाइल

लग्नानंतर जिथे वैवाहिक नाते टिकवून ठेवणे ही जशी पतीपत्नीची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे हे नाते संपुष्टात आणण्यासही ही दोघचं कारणीभूत असतात. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा दोघेही आपल्या रुटीन लाइफमध्ये बोअर होतात आणि आपल्या जबाबदाऱ्या झटकण्यासाठी तिसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होतात, म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात, तेव्हा वैवाहिक नात्याचा अंत हा संशयापासून सुरू होऊन एकमेकांना शारीरिक नुकसान पोहोचवणे ते हत्येपर्यंत पोहोचतो.

अनेकदा तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे जेव्हा पतिपत्नी जीवनातील समस्या सोडवण्यास अक्षम ठरतात, तेव्हा त्यांच्यात खटके उडू लागतात. आणि यासाठी ते बाहेरच्या संबंधांना जबाबदार धरतात. त्यांच्या डोक्यात संशय उत्पन्न होऊ लागतो. हळूहळू हा संशय बळावू लागतो आणि भांडण वाढत जाते.

जर का त्यांना कोणी समजावले तर संशय आणि सगळया समस्या संपुष्टात येऊ शकतात, परंतु एकल परिवारात त्यांना समजावणारे कोणी नसते. यामुळे परिस्थिती मारझोडीपासून हत्येपर्यंत जाऊन पोहोचते.

तू फक्त माझा/माझी आहेस असा विचार

लाइफपार्टनरविषयी जास्तच पझेसिव्ह राहणे हेसुद्धा संशयाचे मोठे कारण असते. आजच्या काळात जिथे स्त्री आणि पुरुष हे ऑफिसमध्ये मोठमोठया जबाबदाऱ्या सांभाळत असतात, अशीवेळी त्यांच्यात सलगी होणे स्वाभाविक असते. मग पती किंवा पत्नी हे जेव्हा एकमेकांना दुसऱ्या व्यक्तिसोबत सलगी करताना पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात संशय उत्पन्न होतो. त्यांना हे सहनच होत नाही की त्यांचा लाइफपार्टनर ज्याच्यावर ते मनापासून प्रेम करतात, तो कुणा बाहेरच्या व्यक्तिसोबत सलगी करत आहेत. कारण ते त्यांच्यावर फक्त आपला अधिकार आहे असे समजत असतात.

अशाप्रकारची विचारसरणी नात्यांमध्ये कटुता आणते. पती किंवा पत्नी जेव्हा फोनवर कुणा दुसऱ्या महिलेचा किंवा पुरुषाचा मेसेज किंवा कॉल पाहतात, तेव्हा त्यांना संशय येऊ लागतो. भले वास्तव वेगळेच असो. पण संशयाचे बीज दोघांच्या संबंधात फूट पाडते, ज्याचा अंत हा मारहाण किंवा मग हत्या अशा घटनांत होतो.

हेरगिरीची माध्यमे बनणारे अॅप्स

पती पत्नीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी स्मार्टफोनही काही कमी जबाबदार नाही. सोशल मिडियाने जिथे वैवाहिक जोडीदारांच्या विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घातले आहे तिथे या स्मार्टफोनमध्ये असेही अॅप्स आहेत, जे पती आणि पत्नी यांना एकमेकांवर हेरगिरी करण्याची पूर्ण संधी देतात.

या अॅप्सद्वारे पती किंवा पत्नी हे आपला लाइफपार्टनर त्यांच्याव्यतिरिक्त सर्वाधिक कोणाशी बोलतात. म्हणजेच हल्ली कोणत्या व्यक्तिशी त्याची जवळीक वाढत आहे. त्यांच्यात काय गप्पा होतात, ते कोणत्या प्रकारच्या इमेज किंवा व्हिडिओ शेअर करतात. थोडक्यात लाइफपार्टनरच्या फोनवर कंट्रोल करण्याचीही पूर्ण व्यवस्था आहे. हे अॅप्स लाइफपार्टनरच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवण्याची पूर्ण संधी देतात. या अॅप्सच्या मदतीने लाइफपार्टनरचा फोन पूर्णपणे तुमच्या ताब्यात येऊ शकतो.

आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की या टेक्निकचा सदुपयोग तुम्ही आपसातल्या नात्यात जवळीक आणण्यासाठी की दुरावा वाढवण्यासाठी?

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें