मासिकपाळी कुप्रथांवर प्रश्नचिन्ह

* प्रेम बजाज

मासिकपाळी प्रजनन क्रियेचा एक नैसर्गिक भाग आहे, ज्यामध्ये गर्भाशयातून रक्त योनीतून बाहेर पडतं. ही प्रक्रिया मुलींमध्ये जवळजवळ ११ ते १४ वर्षे वयापासून सुरू होते. ही नैसर्गिक प्रक्रिया तिला समाजात स्त्रीचा दर्जा देते.

मासिकपाळी मुलींसाठी एक अद्वितीय घटना आहे, जी जुन्या दंतकथांनी घेरलेली आहे आणि समाजाचे ठेकेदार मासिकपाळीतून जाणाऱ्या स्त्रिया व मुलींच्या आयुष्याचे सामाजिक व सांस्कृतिक पैलूतून बाहेर करतात, खरंतर याचवेळी त्यांना देखभालीची अधिक गरज असते. इजिप्त आणि ग्रीकच्या तत्त्वज्ञानाचं म्हणणं आहे की दर महिन्याला स्त्रीमध्ये सेक्षू अल डिझायरचं वादळ निर्माण होतं.

जेव्हा हे डिझायर पूर्ण होत नाही तेव्हा शरीरातून रक्त वाहतं आणि यालाच मासिकपाळी म्हटलं जातं. मासिकपाळीपूर्वी स्त्रीच्या मूडमध्ये बदल होतो. कधी कधी चिडचिडेपणा आणि शरीरातील कोणत्याही भागात असंख्य वेदना होतात. हे गरजेचं नाही की सर्व स्त्रियांसोबत असंच होतं. काही सामान्य तर काहींना असहनीय वेदना होतात. काहींचं म्हणणं आहे की हे सेक्सच्या वंचणेमुळे होतं. यामुळे आजदेखील काही लोकं मुलींना सांगतात की लग्नानंतर सर्व वेदना ठीक होतील.

विचित्र तर्क

भारतामध्ये याचा उल्लेख वर्जीत राहिला कारण हिंदू संस्कृतीनुसार याच्या मागे एक कथा प्रचलित आहे, ज्यामध्ये इंद्रदेवताकडून एका ब्राह्मणाची हत्या झाली होती. ज्याच्या पापाचा चौथा भाग स्त्रियांना देण्यात आला.

तर यामुळे त्यांना मासिकपाळी येते आणि यामध्ये त्यांना अपवित्र समजलं जातं म्हणून त्यांना कोणत्याही धार्मिक कार्यात सहभागी होण्याची मनाई केली जाते. तसंच दुसरं कारण हे मानलं जातं की हिंदू देवी देवतांचे मंत्र संस्कृतमध्ये आहेत. जे वाचण्यासाठी एकाग्रतेची गरज असते आणि मासिकपाळीमध्ये असहनीय वेदना झाल्यामुळे एकाग्रता होत नाही.

खरंतर हे ढोंग प्रत्येकवेळी स्त्रियांना याची जाणीव देण्यासाठी केलं जातं की त्या पापी आहेत आणि जोपर्यंत दानपुण्य धनाबरोबरच शरीराने देखील करतील तेव्हाच त्यांचा उद्धार होईल. या ढोंगीनी शारीरिक नैसर्गिक प्रक्रियेचा वापर स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर केला आहे.

मासिकपाळीशी संबंधित जवळजवळ प्रत्येक जुनी गोष्ट बिनबुडाची आहे. मासिकपाळीमध्ये शहरी भागात मंदिर वा प्रामुख्याने गावामध्ये स्वयंपाक घरात जाण्यासदेखील मनाई आहे. त्याचं मुख्य कारण हे सांगितलं जातं की मासिकपाळीच्यावेळी शरीरातून खास गंध निघतो. ज्यामुळे अन्न खराब होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना लोणचं इत्यादीला हात लावण्यासदेखील मनाई केली जाते. तर वैज्ञानिक परीक्षणमध्ये असं काहीच आढळलं नाही. यावेळी मंदिरामध्ये प्रवेश आणि यौन संबंध ठेवण्यास मनाई केली जाते.

बिनबुडाच्या गोष्टी

स्वामीनारायण संप्रदायने त्यांच्या पुस्तकांमध्ये उल्लेख केला आहे की स्त्रियांनी या दिवसात या नियमांचे पालन का करायला हवं. त्यानुसार स्त्रिया अत्याधिक शारीरिक श्रम करतात ज्यामुळे त्या थकतात आणि या दिवसात त्यांच्या स्वभावामध्ये चिडचिडेपणा येतो. त्यांना आराम मिळावा या हेतूने त्यांना वेगळं ठेवलं जातं. परंतु याचा अर्थ असा झाला की त्या घरातील सर्वात घाणेरडया खोलीत पडून राहाव्यात. मासिकपाळी एक शारीरिक प्रक्रिया आहे, जर हेच रक्त शरीराच्या आतमध्ये वाहिल्यास ती स्त्री पवित्र असते तर ते रक्त बाहेर आल्यास अपवित्र कशी? या सर्व गोष्टी बिनबुडाच्या आहेत.

मासिकपाळीच्या दरम्यान स्त्रियांची अवस्था ना रुग्णांसारखी होते, ना आपण त्यांच्यावर दया दाखवायला हवी. हे असं आहे जसं की प्रत्येक व्यक्ती रात्रीपर्यंत थकून झोपू इच्छिते. मासिकपाळी स्त्रियांच्या परीपूर्णतेची ओळख आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें