जेव्हा असते अनियमित मासिक पाळी

– डॉ. राधिका बाजपेयी, गायनोकोलॉजिस्ट, इंदिरा आयव्हिएफ हॉस्पिटल, लखनौ

पीरियड्सच्या वेळी दुखणे ही एक साधारण बाब आहे. याला डिसमेनोरिया असे म्हणतात. बोलीभाषेत यास मेनस्ट्रुअल पेन असेही म्हणतात. काहीवेळा हे दुखणे जास्त त्रासदायकही ठरू शकते. रक्तस्त्राव जसजसा कमी होत जातो तसतशी ही समस्यादेखील कमी होत जाते. जेव्हा हे दुखणे कुठल्यातरी आजाराचे कारण बनते, तेव्हा याला सेकण्डरी डिसमेनोरिया असे म्हणतात.

सेकण्डरी डिसमेनोरियाची अनेक कारणे असू शकतात, जसे इन्डोमिट्रिओसिस युटरिन फायब्रॉइड्स आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज (सेक्सच्या दरम्यान पसरणारा रोग) इन्डोमिट्रिओसिसची समस्या आनुवंशिक असल्याचे पाहायला मिळते. आईला हा रोग झाला असेल तर मुलीला तो होण्याची शक्यता ८ टक्के असते. बहिणींना होण्याचा धोका हा ६ टक्के असतो. ७ टक्के चुलत भावंडांमुळे होऊ शकतो. याचे वैशिष्टय हे आहे की जवळजवळ ३०-४० टक्के रुग्ण ज्यांना एन्डोमेट्रिओसिस आहे, त्यांना वंध्यत्वाची समस्याही आढळून येते.

अनियमित पीरियड्स हे अनेक शारीरिक समस्यांमुळे होतात. सामान्य स्थितीत पाळीचे चक्र ३ ते ७ दिवसांचे असते. अनेक वर्षांच्या कालावधीत हे चक्र स्थिरस्थावर होते. एवढेच नाही तर काही स्त्रिया मासिक पाळी कधी येणार याचा अचूक अंदाजही बांधतात. काही स्त्रियांना अति रक्तस्त्राव होतो तर काहींना नसल्यातच जमा असतो. टीनएज मुलींमध्ये अशा प्रकारची समस्या ही हार्मोन्सच्या असंतुलनामुळे उद्भवू शकते. परंतु एका ठराविक वयात मात्र या बदलाची काही वेगळी कारणे असू शकतात.

अनियमित मासिक पाळीमुळे केस गळणे, डोके दुखणे, शरीर आखडल्यासारखे वाटणे असे त्रास होऊ शकतात. एवढेच नाही तर रोजच्या वागणुकीत चिडचिडेपणाही दिसून येऊ शकतो. त्यामुळे अनियमित मासिक पाळीच्या समस्येकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

असे का होते

असाधारण रक्तस्त्राव हा अनेक कारणांनी होऊ शकतो. ज्यात हार्मोनमधील बदलही अंतर्भूत आहेत. हे हार्मोनल बदल कधीकधी तारुण्य, गर्भावस्था, रजोनिवृत्ती यांमुळेही होऊ शकतात. वास्तविक हे बदल अनेकदा स्त्रियांच्या सामान्य प्रजनन काळात होतात.

हार्मोनल बदल २ कारणांमुळे होऊ शकतात – महिला प्रजनन किंवा इतर कोणत्यातरी हार्मोनमुळे उदा. थायरॉइड वगैरे.

लिव्हर हे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन यांना मेटाबोलाइज करून महिलांमध्ये मासिकपाळी नियमित करते. अशात अल्कोहोलचे सेवन लिव्हरला हानी पोहोचवते, ज्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.

उशिरा येणाऱ्या किंवा अजिबात न येणाऱ्या मासिक पाळीचे एक कारण आहारदेखील आहे. वजनाचाही यावर खूप मोठा परिणाम होतो. जर तुम्ही चुकीचा आहार घेत आहात किंवा तुमचे वजन जास्त असेल तर यादरम्यान काही हार्मोन्सच्या स्रावांचे प्रमाण बदलते, ज्याचा मासिक पाळीवर परिणाम होतो.

याशिवाय थायरॉइड हार्मोन्स कमी वा जास्त झाल्यासही मासिक पाळी नियमित येत नाही. तणाव हेदेखील अनियिमिततेचे एक मुख्य कारण आहे. जर तुमच्या रक्तप्रवाहात कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात असेल तर तुमच्या मासिक पाळीची वेळ बदलू शकते. अनेकदा मेनोपॉज सुरू होण्याच्या १० दिवस अगोदरच अनियमित मासिकपाळी सुरू होते.

लक्षणे

इन्डोमिट्रिओसिसची लक्षणे काही रुग्णांमध्ये जास्त प्रमाणात तर काहींमध्ये कमी आढळून येतात. याचे सामान्य लक्षण म्हणजे ओटीपोटात दुखणे आणि वंध्यत्वाची समस्या उद्भवणे. मासिक पाळी दरम्यान पोटाच्या खालच्या भागात दुखते. याशिवाय कधीकधी मासिकपाळी आधी किंवा नंतरही दुखू शकते. काही महिलांना शारीरिक संबंधांच्या वेळेस, युरिन रिलीज करताना, किंवा स्टूल करतानासुद्धा या वेदनेचा अनुभव येतो.

वय

इन्डोमिट्रिओसिसची समस्या युवावस्थेत दिसून येते. जेव्हा महिलांमध्ये मासिक पाळी येण्यास सुरुवात होते. ही स्थिती मेनोपॉजपर्यंत किंवा पोस्टमेनोपॉजपर्यंत राहू शकते. इन्डोमिट्रिओसिसचा प्रॉब्लेम बहुतांश महिलांमध्ये २५ ते ३५ वयात कळून येतो.  मात्र हे प्रॉब्लेम त्या मुलीमध्ये वयाच्या ११ व्या वर्षीपासूनही असू शकतात. इन्डोमिट्रिओसिसचा प्रॉब्लेम पोस्टमेनोपॉजल महिलांमध्ये कमी आढळून येतो.

काय करावे

या समस्येपासून दूर राहण्याकरता आपल्या खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. जास्तच त्रास होत असेल खासकरून  टीनएज मुलींमध्ये अशी समस्या आढळली तर त्यांना स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवले पाहिजे नाहीतर पुढे त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.

कोणते गंभीर परिणाम होऊ शकतात

दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याव्यतिरिक्त, रक्ताच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकतो. भारतीय महिला या अॅनिमियाच्या अधिक शिकार आहेत. असामान्य आणि अनियमित रक्तस्रावासोबत होणारे हार्मोनल बदल हे वाढलेले वजन आणि गर्भधारणा होण्यात येणाऱ्या अडचणींशी निगडित आहेत.

अशावेळी काय केले पाहिजे

तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. हार्मोनल बदल हे औषधांनी ठीक करता येतात. असामान्य रक्तस्त्राव हा हार्मोनल बदलांव्यतिरिक्त इतर कारणांमुळेही होऊ शकतो, जसे फायब्रॉइड, संसर्ग इ. एवढेच नाहीतर कॅन्सरमुळेदेखील असे होऊ शकते.

उपचार

इन्डोमिट्रिओसिसवर औषधे आणि शस्त्रक्त्रिया हे दोन्ही उपचार संभव आहेत. मेडिकल ट्रीटमेंटमध्ये वेदनाशामक औषधे दिली जातात. सर्जरी ट्रीटमेंटमध्ये लॅप्रोस्कोपी केली जाते. ज्यात अॅनेस्थेशिया देऊन एक छोटा टेलिस्कोप पोटाच्या आत पोहोचवून सर्जरी करून इन्डोमिट्रिओसिसची समस्या नष्ट केली जाते.

एन्डोमेट्रिओसिसच्या ट्रीटमेंटचा उद्देश हा वेदनेपासून सुटकारा देण्याव्यतिरिक्त वंध्यत्वाची समस्या दूर करणे हादेखील असतो.

आशा

इन विट्रो फर्टिलायझेशन(आयवीएफ) प्रोसीजर याबाबतीत खूप महत्त्वाची भूमिका बजावतो, खासकरून इन्डोमिट्रिओसिसने पीडित महिलांमध्ये जेव्हा वंध्यत्वाची     समस्या आढळून येते, आयव्हिएफ तंत्राद्वारे लॅबमध्ये स्पर्म आणि एग यांचे फलन केले जाते. मग याद्वारे तयार झालेले भ्रुण महिलेच्या गर्भाशयात ठेवले जाते. या प्रक्रियेद्वारे प्रेग्नन्सी रेट हा ५० ते ६० टक्यांनी वाढवता येऊ  शकतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें