तुम्ही डेमीसेक्शुअल तर नाही ना?

* पूनम अहमद

तुम्ही आतापर्यंत सेक्शुआलिटी संबंधी अनेक शब्द ऐकले असतील जसे बायसेक्शुअल, पॅनसेक्शुअल, पॉलिसेक्शुअल, असेक्शुअल, सेपोसेक्शुअल आणि इतर अनेक शब्द. पण आता सेक्शुआलिटी संबंधी एक नवा शब्द नव्या रूपात समोर आला आहे, तो म्हणजे डेमीसेक्शुअल. असे लोक जे असेक्शुआलिटीच्या सीमारेषेवर असू शकतात, पण पूर्णत: अलैंगिक नाही. जर तुम्ही कोणाकडे सेक्शुअली आकर्षित होण्यापूर्वी चांगले मित्र बनू इच्छिता तर तुम्ही निश्चितपणे डेमीसेक्शुअल आहात.

सेक्शुआलिटीची ओळख

तुम्ही डेमीसेक्शुअल आहात की नाही हे अनेक प्रकारांनी ओळखता येते. सर्वात मुख्य म्हणजे, जोपर्यंत तुम्ही कोणाशी भावनात्मक पातळीवर एकरूप होत नाही तुम्हाला सेक्शुअल फिलिंग्स जाणवत नाहीत. तुमच्यासाठी भावना महत्त्वाच्या आहेत.

तुम्ही सेक्शुअल व्यक्ती नाही यात काही वाईट मुळीच नाही. सेक्सच्या मागे लागण्यापेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष, वास्तविक बातचीत करणे अधिक रुचते. जर तुम्ही कोणासोबत रिलेशनशिपमध्ये आहात आणि त्याच्याशी इमोशनली जोडले गेले आहात तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराकडे सेक्शुअली आकर्षित होता.

ज्याला तुम्ही पसंत करता त्याला भेटल्यावर तुम्ही त्याच्या लुक्सवर प्रभावित न होता त्याच्या व्यक्तित्वावर प्रभावित होता. त्यामुळे दुसऱ्या कोणत्याही गोष्टीआधी तुमची त्याच्याशी मैत्री होईल. तुम्हाला कोणालाही भेटल्यावर सेक्शुअल होणे किंवा फ्लर्टींग करणे पसंत नसते. जर एखाद्या व्यक्तिने आपल्या व्यक्तित्वाने तुम्हाला प्रभावित केले असेल तर तुम्ही प्रथम मैत्रीचा हात पुढे कराल. काही तास, आठवडे, महिन्यातच डेटिंग करायचा विचारही तुम्ही करू शकत नाही.

आकर्षणाचे प्रकार

आकर्षण २ प्रकारचे असते – प्रायमरी आणि सेकंडरी. प्रायमरी आकर्षणात तुम्ही एखाद्याच्या लुक्सवर प्रभावित होता आणि सेकंडरी आकर्षणात तुम्ही एखाद्याच्या व्यक्तित्वावर प्रभावित होता. जर तुम्ही डेमीसेक्शुअल असाल तर निश्चितच तुम्ही सेंकडरी पर्सनॅलिटी टाइपमध्ये फिट बसता. पण याचा अर्थ असाही नाही की तुम्हाला कोणाचे आकर्षणच वाटत नाही.

जेव्हा तुमच्या मनात कोणाविषयीतरी फिलिंग्स निर्माण होत असतील, खासकरून सेक्शुअल फिलिंग्स, तेव्हा तुम्ही द्विधा मन:स्थितीत सापडता, कारण तुम्ही तितके सेक्शुअल नसता. तुम्हाला समजत नाही की या फिलिंग्सवर कसे रिअक्ट व्हावे किंवा त्या व्यक्तिशी कशाप्रकारे शारीरिक संबंध प्रस्थापित करावे. एकदा का तुम्ही भीती आणि द्विधा मन:स्थितीतून बाहेर पडलात की तुम्ही फक्त आपल्या जोडीदारासोबतच सेक्स करण्याची इच्छा बाळगाल आणखी कुणासोबतही नाही. तुम्ही फार भावुक असल्याने मनमोकळया सेक्ससाठी त्या व्यक्तिला सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, यामुळे तुम्हा दोघांसाठी सेक्स खूप कंफर्टेबल होईल.

लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन

तुम्ही सेक्स या विषयावर जास्त विचार करत नसल्याने लोकांना वाटते की तुम्ही लग्नासाठी थांबले आहात. ते तुम्हाला घमेंडी आणि बुरसटलेल्या विचारांचेही समजू शकतात. पण यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. जसे आहात तसेच राहा. तुम्ही कुठलाही स्विच जसा ऑन आणि ऑफ करता येतो तसे कोणाशीही सेक्स करू शकत नाही. लोकांना तुमच्या मनोभावाचे स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही. तुम्हाला तुमच्या अवतीभोवती असलेल्या हायली सेक्शुअल लोकांसोबतही काहीच प्रॉब्लेम नसतो. फक्त तुम्ही स्वत: यापासून दूर राहू इच्छिता, कारण तुम्ही तसे नाही आहात.

डेमीसेक्शुअल असण्याचा असा अर्थ नाही की तुम्हाला सेक्स आवडत नाही. तुम्हाला सेक्स आवडते, सर्वांना सेक्स आवडते. फक्त तुम्ही त्याच व्यक्तिसोबत सेक्स करू इच्छिता, ज्याच्याशी तुम्ही भावनात्मकरित्या जोडले गेले आहात. जेव्हा तुमच्या आयुष्यात ती योग्य व्यक्ती येते, तुम्ही सेक्शुअली त्या व्यक्तिशी जोडले जाता. बातचीत आणि बॉण्डिंग दोन्ही तुमच्यासाठी अधिक महत्त्वाचे असते.

तुम्ही डेमीसेक्शुअल असाल तर त्यात काही चुकीचे आहे असा विचार करू नका. तुम्ही भावुक आहात. मन जुळल्याशिवाय तनाचे मिलन जर शक्य नसेल तर त्यात वावगे काय आहे. आणि एकदा मन जुळल्यावर तर तुम्ही मोकळेपणाने जगताच. हे चांगलेच आहे. तेव्हा आपल्या पसंतीची व्यक्ती भेटल्यावर जीवनाचा आनंद घ्या, प्रसन्न राहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें