आयुष्यातील लक्ष्य विवाह नाही

– पारुल

‘‘रमा घरातील काही कामे करणे शिकून घे, नाहीतर दुसऱ्या घरी जाशील तेव्हा सासरचे हेच म्हणतील की आईने काही शिकवले नाही.’’

‘‘शिल्पा बेटा, अजून किती शिकशील. कुठून शोधू आम्ही एवढा शिकलेला नवरा मुलगा, शिवाय जेवढा शिकलेला मुलगा तेवढाच अधिक हुंडा.’’

‘‘बघ श्रेया अजून दहा वर्षाची आहे. किती चांगल्याप्रकारे घर स्वच्छ करते. खूप चांगली गृहिणी बनेल. सासरी जाऊन आमचे नाव उज्ज्वल करेल.’’

‘‘शिल्पा आता तू बारा वर्षाची झाली आहे. प्रत्येक वेळी खीखी करत जाऊ नकोस. थोडा अभ्यासही कर नाहीतर कोण लग्न करेल तुझ्यासारख्या मूर्ख मुलीशी.’’

ही सर्व विधाने प्रत्येक मुलगी आपल्या जीवनात आई-वडिलांच्या घरी लहानपणापासून तारुण्यापर्यंत न जाणे किती वेळा ऐकते. हेच ऐकत-ऐकत त्या मोठया होतात. मुलगी सावळी आहे तर तिला डबल एमए शिकवा, जेणेकरून चेहरा नाही तर नोकरी बघून तरी मुलगा लग्नासाठी होकार देईल. कुठली शारीरिक कमी असेल तर हुंडयात जास्त पैसे देऊन सासरच्यांचे तोंड बंद करायचे.

लहानपणापासून त्यांना पुन्हा-पुन्हा अशाप्रकारच्या गोष्टी सांगून आई-वडील ना केवळ त्यांचा आत्मविश्वास कमी करतात, तर असा व्यवहार करतात की जसा त्यांचा जन्मच बस लग्नासाठी झाला आहे. विवाह नव्हे अलादिनचा दीवा असावा. मुली आई-वडिलांच्या गोष्टी ऐकून-ऐकून स्वप्नांचे असे सोनेरी महाल सजवू लागतात की जणू विवाहच त्यांचे शेवटचे लक्ष्य आहे. विवाहासाठी त्या सर्वकाही करू इच्छितात. जगभरातले कोर्सेस, शिक्षण सर्वकाही आणि विवाहानंतर?

हरवून जाते ओळख

लग्नानंतर त्या पूर्णपणे आपले पती, कुटुंब आणि मुलांसाठी समर्पित होतात. कारण त्यांना नेहमी हेच शिकवले गेले आहे. आपल्या आईला त्यांनी नेहमी असच करताना पाहिलं आहे. मग एक वेळ येते जेव्हा त्या एका वळणावर चालता-चालता विचार करण्यास विवश होऊन जातात की शेवटी त्या कुठे स्टॅन्ड करतात? त्या का जगत आहेत? त्यांची ओळख काय आहे?

शिखा सुंदर, शिकली-सवरलेली, चांगल्या कुटुंबातील खूप गुणी मुलगी आहे. खूप चांगल्या कुटुंबात लग्न झाले. पतिही चांगले आहेत. पण घरवाल्यांनी हे सांगून नोकरी करण्यास मनाई केली की तुला कुठल्या वस्तूची कमतरता आहे. नोकरी करशील तर समाज काय म्हणेल…आम्हाला हे सर्व पसंत नाही. पतिनेही आईवडिलांचीच री ओढली. शिखाने आपल्या इच्छा अपेक्षांचा गळा दाबला. कॉलेजमध्ये तिला सर्व लोक किती विचारायचे आणि आज ती बस गृहिणी बनून राहीली आहे.

महिलांना ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की काम केवळ कुठल्या वस्तूच्या कमतरतेच्या पूर्तीसाठीच नाही केले जात, तर आपल्या समाधानासाठीही केले जाते. शिखासारख्या मुली प्रत्येक घरात सापडतील. काही तर हेही विसरून गेलेल्या असतात की त्यांच्यातही काही गुण आहेत. कोणा दुसऱ्याला काम करताना पाहून उलट या अजून म्हणतात की नाही बाबा, ही माझ्या आवाक्यातील गोष्ट नाही. मी तर माझ्या पती आणि मुलांमध्येच खूष आहे. ही स्थिती सर्वांच्या जीवनात येते. काहींच्या जीवनात खूप लवकर, तर काहींच्या खूप उशिरा.

मीराचे लग्न ८ वर्षांपूर्वी झाले होते. पतिशी तिचे विचार अजिबात जुळले नाहीत. काही विशेष कारण नसल्यामुळे आई-वडिलांनीही डिवोर्स होऊ दिला नाही. आपल्या मनाला त्या कोंदट वातावरणापासून वेगळे ठेवण्यासाठी तिने काम करण्याचे ठरवले. पण त्यासाठीसुद्धा पती आणि सासरच्यांनी मनाई केली. पण मीरा आपली हिंमत हरली नाही. आपल्या एका मैत्रिणीच्या मदतीने तिने तिच्याच घरी मुलींना शिकवायला सुरूवात केली. आज ती तीस हजार रुपये महिना आरामात कमावते. विरोध खूप झाला, पण तिने पक्का निश्चय केला होता. म्हणून हळू-हळू सर्वांची तोंडं बंद झाली.

मीराची आता पूर्ण शहरात चांगली ओळख बनली आहे. लोक सन्मान करतात. आर्थिक स्तरावर स्ट्राँग झाल्यामुळेसुद्धा तिच्यात आत्मविश्वास खूप आला आहे.

अस्तित्वाला ओळखा

आपले अस्तित्व ओळखणे खूप आवश्यक आहे. निसर्गाने प्रत्येकाला कुठला न कुठला विशेष गुण दिला आहे. बस गरज आहे त्याला ओळखण्याची आणि त्या दिशेने चालण्याची. महिलांसाठी रस्ता एवढा सोपा नसतो. पण रस्ता बनत असतो दृढ निश्चयाने.

बऱ्याच महिलांना वाटतं की त्यांना काही येत नाही. असा विचार कधीही करू नये. आपण एक घर सांभाळत आहात, एका घराचा केयरटेकर असणे याचा अर्थ कमीत कमी १०-२० कामांमध्ये तुम्हाला कोणी टक्कर देऊ शकत नाही. फक्त आवश्यकता आहे त्या सर्व कामामध्ये ते ओळखणे जे आपली ओळख बनवून देईल.

उदाहरणासाठी आपण सफाईच्या बाबतीत काटेकोर आहात, तर आपल्या या काटेकोरपणाचा उपयोग पैसे कमवण्यासाठी करा. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोक आपल्या घराच्या साफ-सफाईसाठी वेळ काढू शकत नाहीत आणि मग कंपनीला हायर करतात. आपण ५-१० सफाईवाल्या स्त्रियांना घेऊन हे काम करवून देऊ शकता. बाजारापेक्षा कमी मूल्यात आपण जेव्हाही काम कराल तेव्हा आपल्याला फायदाही चांगला होईल.

कुकिंगचा छंद असेल तर वेगवेगळे व्यंजन बनवून लोकांच्या पार्टीत आपण डिलिव्हरी देऊ शकता. आजकाल लोकांमध्ये खाण्याची खूप क्रेझ आहे. आपण आपल्या कुकिंगचे कोचिंग सेंटरही खोलू शकता, जेथे मुलींना कुकिंग शिकवाल.

जर आपल्याला लिहायचा छंद असेल तर आपण लेखनाच्या क्षेत्रातसुद्धा आपली ओळख बनवू शकता. यासाठी आपल्याला बाहेर जाण्याचीसुद्धा गरज नाही. आजकाल बरेच ऑनलाइन कामही आहे. जे आपण घरी बसून करू शकता. कधीही यश एकाचवेळेस मिळत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कठोर परिश्रम, एकाग्रता आणि सर्व अडथळ्यांना पार करूनच आपण आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचू शकता.

बस आपले कौशल्य ओळखा. मग त्यासाठी वेळ काढा आणि त्यात नैपुण्य मिळवा. त्यावर अजून काम करा. नाव आणि ओळख हळू-हळू मिळत जाईल. विश्वास ठेवा ज्यादिवशी लोक आपणास आपल्या नावाने बोलावतील आणि आपल्या त्या नावाची एक ओळख निर्माण होईल, त्यादिवशी खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ मिळून जाईल.

सगळयात महत्वाची गोष्ट ही आहे की आपल्या मनाला सांगा की विवाह शेवटचा आयुष्यातील एकमेव लक्ष्य आहे. विवाह यशस्वी असो किंवा नसो तो फक्त एक भाग आहे. त्याला पलटून बघा. एक नवीन लक्ष्य आपली वाट बघत आहे. एका नवीन आशेच्या किरणाबरोबर.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें