सौंदर्य समस्या

– समस्यांचं समाधान, एअरब्रश मेकअप एक्सपर्ट इशिका तनेजा

माझ्या चेहऱ्यावर केस उगवत आहेत, त्यामुळे कुठे येण्या-जाण्यास मला लाज वाटते. कृपया असा एखादा उपाय सांगा, ज्यामुळे ते हटवता येतील?

हार्मोनलच्या बदलामुळे चेहऱ्यावर केस उगवण्याची समस्या येऊ शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करा. केस हाताने प्लक करण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. तुम्ही जेवढे केसांना प्लक करणार, त्याच्या दुप्पट वेगाने ते उगवणार. वाटल्यास आपण ब्युटी पार्लरमधून यासाठी कटोरी व्हॅक्सिंग करू शकता. जर चेहऱ्याच्या केसांवर कायमस्वरूपी उपचार करायचा असेल, तर एक्सपर्टकडून लेझर ट्रीटमेंट करून घ्या.

क्रीमचा वापर केल्याने चेहरा काळा पडतोय, काय करू?

सर्वप्रथम केमिकलयुक्त क्रीम चेहऱ्याला प्रमाणापेक्षा जास्त लावणे बंद करा. त्यानंतर घरी बनवलेल्या फेसपॅक आणि स्क्रबच्या मदतीने चेहरा रोज स्वच्छ करा. आपला काळवंडलेला चेहरा पूर्ववत होईल.

माझ्या लिप्सवर व्हाइट स्पॉट होत आहेत, ते कसे बरे करता येतील?

लिंबू, संत्रे यासारख्या आंबट फळांचा रस पाण्यात मिसळून ओठांना लावल्यास डाग कमी करण्यास मदत होऊ शकते. हा रस आपण कापसाच्या बोळ्याने डागांवर लावू शकता. या सोप्या घरगुती उपायाने काही दिवसांतच डाग गायब होऊ लागतात. आपल्या आहारात लसणीचे सेवन वाढवल्याने आपल्याला सफेद डाग कमी करण्यास मदत मिळेल.

प्रेग्नंसीनंतर केस खूप गळत आहेत, असे का?

गर्भावस्थेत महिलांच्या शरीरातील एस्ट्रोजन नावाच्या हार्मोनचे संतुलन बिघडते. त्यामुळे केस वेगाने गळतात. गर्भावस्थेत आहाराकडे लक्ष दिल्याने हे काही प्रमाणात कमी करता येते.

माझ्या चेहऱ्यावर तीळ आहेत आणि माझी त्वचा कोरडी आहे. मी काय करू, जेणेकरून माझी त्वचा उजळ होईल आणि डागांपासून माझी सुटका होईल?

चेहऱ्याच्या डाग असलेल्या भागावर लिंबाचा रस लावा. तो ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. लिंबाचा रस चेहऱ्यावरील डाग कमी करतो. २ महिने ही प्रक्रिया केल्यानंतर आपल्याला फरक दिसेल.

संवेदनशील त्वचेच्या देखभालीसाठी काही घरगुती उपाय सांगा?

जर आपली त्वचा संवेदनशील असेल, तर आपण त्वचारोग तज्ज्ञाला दाखवून तपासून घ्या. आपल्याला आपल्या त्वचेबाबत माहीत असले पाहिजे की कोणत्या कारणाने आपली त्वचा एवढी संवेदनशील होतेय. त्वचारोग तज्ज्ञाला दाखवल्यानंतर आपल्याकडे त्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी उत्तम मार्ग व साधने असतील.

आपली त्वचा संवेदनशील असेल, तर तिची विशेष काळजी घेण्याची गरज असते. उन्हात जाण्यापूर्वी त्वचेला सनस्क्रीन लावा. खूप पाणी प्या आणि प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन करा.

माझे केस कर्ली आहेत आणि जेव्हा ओले असतात, तेव्हा केवळ त्यावेळीच व्यवस्थित असतात. सुकल्यानंतर ते खूप हार्ड होतात. मी कशाप्रकारे माझ्या केसांना मृदू आणि सॉफ्ट करू शकते, एखादा उपाय सांगा?

केसांना मऊ बनवण्यासाठी आणि त्यांच्यात चमक आणण्यासाठी अंड्यापेक्षा उत्तम दुसरे काहीच नाही. हे एवढे प्रभावी आहे की एकदा वापरल्यानंतर आपल्याला फरक जाणवेल. यामध्ये पुरेशा प्रमाणात प्रोटीन, फॅटी अॅसिड आणि लॅक्टिन असते. ते केसांना निरोगी बनवते. त्यात ऑलिव्ह ऑइल मिसळून लावल्याने फायदा होईल.

दातांचा पिवळेपणा कसा दूर करता येईल?

तुळस तोंड आणि दातांच्या आजारांपासून आपले रक्षण करते. याची पाने उन्हात वाळवून पावडर बनवून मग टूथपेस्टमध्ये मिसळून रोज ब्रश करा. पिवळेपणा दूर होईल. मिठामध्ये सोडियम आणि क्लोराइड दोन्हीचे मिश्रण असते. ते दातांचा पिवळेपणा कमी करण्यास मदत करते. परंतु याचा जास्त वापर दातांच्या इनॅमलचे नुकसान करू शकते. तसेही मीठ आणि राईच्या तेलाने दातांना चमक आणण्याचा उपाय प्रचलित आहे. चिमूटभर मिठात २-३ थेंब तेल मिसळून दात स्वच्छ करा.

माझे वय २८ वर्षे आहे. मी खूप बारीक आहे. माझी मानही खूप बारीक आहे. त्यामुळे कोणताही नेकपीस मला शोभून दिसत नाही. मी कशा प्रकारचे नेकपीस व एक्सेसरीजचा वापर करू, कृपया मला सांगा?

तुम्ही ज्याप्रकारे आपल्या शरीराच्या ठेवणीबाबत माहिती दिलीय, त्यावरून वाटते की तुमची मान लांब असावी. उंच मान असणाऱ्या महिलांना कुठल्याही लांबीची चेन शोभून दिसते. उंच व बारीक असणाऱ्या महिलांना मध्यम आकाराचे दागिने जास्त चांगले दिसतात. सामान्यपणे दागिने कपड्यांच्या हिशोबाने घातले जातात. इथे लक्ष देण्याची गोष्ट म्हणजे आपले टॉप, कुर्ती किंवा ब्लाउजच्या गळ्याच्या डिझाइनवरही आपल्या नेकपीसचा लुक अवलंबून असतो. ड्रेसच्या गळ्याच्या आकाराची माळ असू नये. उदा. गोल गळ्याच्या ड्रेसवर गोल आकाराची माळ घालू नये. मोठ्या गोल गळ्याच्या ड्रेसवर छोटी चेन आणि व्ही नेकवाल्या ड्रेसवर छोटी गोल किंवा अंडाकार माळेचा वापर करावा.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर    डॉ. भारती तनेजा द्वारा

माझे केस काही महिन्यांपासून वेगाने गळत आहेत. त्यामध्ये कोंडादेखील आहे. यासाठी कोणती अशी ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे माझी केसगळती बंद होईल आणि नवीन केस येतील?

केस गळण्यामागे अनेक कारणं असतात, ज्यामध्ये कोंडादेखील एक आहे. अशामध्ये कोंडा ठिक करणं गरजेचं आहे. तुमच्या केसांमध्ये याचं इन्फेक्शन पसरलं आहे, म्हणून आता हे नैसर्गिक पद्धतीने करणं कठीण आहे. कोंडयापासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमधून बायोप्ट्रान घेऊ शकता. या दोन्हीमुळे डिसइन्फेकशन होतं. ज्यामुळे कोंडादेखील जातो आणि केस गळतीदेखील बंद होते. यासोबतच लेझरने केसांचं नूतनीकरण होतं.

माझं वय ४० आहे.वाढत्या वयाचा परिणाम चेहऱ्यावर दिसू लागला आहे. या वयात मला कशा प्रकारचा मेकअप आणि स्किन केअर करायला हवी? कृपया सांगा?

चाळीशीनंतर त्वचा कोरडी होते. अशावेळी त्वचेला नरिश करण्यासाठी सिटीएमपी अर्थातच क्लींजिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग आणि प्रोटेक्शनची गरज आहे. क्लींजिंगसाठी तुम्ही नरिशिंग क्लिंजींग मिल्कचा वापर करायला हवा. हे त्वचेला डीप क्लीन करण्याबरोबरच कोरडेपणादेखील दूर करतं. त्वचेवर एजिंग दिसण्याचं प्रमुख कारण ओपन पोर्स आहे. हे पोर्स कमी करण्यासाठी क्लींजिंगनंतर टोनिंग करणे गरजेचे आहे. लक्षात ठेवा की तुमचा टोनर अल्कोहोल युक्त नसावा. सोबत चेहऱ्याचा ओलावा  कायम राखण्यासाठी मॉइश्चरायझर नक्की लावा. चेहऱ्याची केअर करणंही तेवढंच गरजेचं आहे, जेवढं त्याचा संरक्षण. सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे त्वचा करपली जाते. यामुळे सुरकुत्या, ब्राऊन स्पॉट्स इत्यादी एजिंगची लक्षणें दिसून येतात. म्हणूनच यापासून वाचण्यासाठी उन्हात निघण्यापूर्वी सन स्क्रीन आवर्जून लावा.

खूप काळापासून केसांना घरातच स्ट्रेट करते. परंतु त्याचा रिल्ट पार्लरसारखा मिळत नाही. मला केस स्ट्रेट करण्याची योग्य पद्धत सांगा?

जेव्हा तुम्ही पार्लर वा क्लिनिकमध्ये केस स्ट्रेटनिंग करता तेव्हा ते करणारी लोकं नॉर्मली एक्सपर्टस असतात. जे केसांच्या पातळ पातळ लेयर्सना स्ट्रेटनिंग करतात, त्यांच्याद्वारे स्ट्रेटनिंग करण्यामध्ये वापरण्यात आलेलं स्ट्रेटनिंग उत्तम क्वालिटीचेदेखील असतातं, जे घरी तेवढया चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकत नाही. म्हणूनच तुम्ही दररोज घरच्या घरी स्ट्रेटनिंग करण्याच्या बदल्यात परमनंट स्ट्रेटनिंग करून घ्या. ज्यामुळे तुम्हाला पार्लरसारखे सरळ केस कायमचे मिळतील. स्ट्रेट केस ठेवण्यासाठी तुम्ही केसांना परमनंट हेअर एक्सटेन्शनदेखील करू शकता. जर परमनंट हेअर एक्सटेन्शन करायचं असेल, तर जेव्हादेखील बाहेर जाल तेव्हा बाहेर एक्सटेंशन लावूनदेखील केसांना सेट करू शकता. यामुळे केस खूपच सुंदर दिसतात.

माझ्या डोळयाच्या आजूबाजूला सूज दिसून येते. असं का होतं आणि ते दूर करण्यासाठी मला काय करायला हवं?

अशा प्रकारची समस्या डोळयांच्या आजूबाजूला लिंफ एकत्रित झाल्यामुळे उत्पन्न होतं. याचं प्रमुख कारण हेल्थ प्रॉब्लेम वा मग औषधांचे साईड इफेक्टस आहेत. जर तुम्ही दीर्घकाळासाठी एखाद्या आजाराने ग्रस्त असाल तर सर्वप्रथम तुमची इंटरनल तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यावर उपचार करा. या व्यतिरिक्त ही सूज कमी करण्यासाठी एखाद्या चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिक मध्ये जा. तिथे लिंफला व्याक्युम मशीनच्या माध्यमातून ड्रेन केलं जातं आणि लेझरद्वारे त्वचेला री जनरेट केलं जातं. ही ट्रीटमेंट खूपच मोठी आहे, परंतु यामुळे फायदा नक्की होईल.

माझं वय ३० वर्षं आहे. माझी त्वचा तेलकट आहे. मला क्रीम वा कोलाजन सिरममध्ये कशाचा दररोज वापर करायला हवा?

सिरममध्ये त्वचेला रिपेअर करणारी तत्व कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असतात. ज्यामुळे हे खूपच कमी प्रमाणात लागतं आणि अधिक परिणामकारक असतं. जर क्रीम माईंल्ड असेल तर यामुळे सिरम क्रीमपेक्षा अधिक योग्य आहे. तुमची त्वचा डीपली नरिश करण्यासाठी दररोज सकाळी फेस क्लीन वा शक्य असेल  तर लाईट स्क्रब केल्यानंतर कोलाजन सिरमचा वापर करा. याच्या दररोजच्या वापरामुळे तुमची त्वचा रिपेअर करून त्याला प्रोटेक्ट व हायड्रेट करेल. सोबतच एजिंग साइन्सदेखील दूर होईल.

रात्री झोपण्यापूर्वी ए. एच. ए. म्हणजेचं अल्फा हाय ड्रॉक्सी अॅसिड सिरम लावा. यामध्ये १४ फ्रूट अॅसीडस असतात, जे त्वचेत कोलाजन वेगाने बनवून त्यावर सुरकुत्या पडण्यापासून वाचवतात आणि डोळया खालचा काळेपणा दूर करण्यातदेखील मदत करतात. या सीरमच्या दररोजच्या वापरामुळे साईन ऑफ एजिंग कमी होईल, सोबतच त्वचा उजळेल व तरुण दिसून येईल. सिरम तेलकट त्वचेसाठी अधिक योग्य आहे, कारण कोरडया त्वचेवर सिरम लावल्यामुळे थोडा घट्टपणा येतो आणि कोरडया त्वचेसाठी क्रीमचा वापर योग्य आहे.

सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर, डायरेक्टर

डॉ. भारती तनेजा द्वारा

माझं वय ५० वर्षे आहे. माझे केस गळत आहेत. मी माझ्या केसांना निरोगी ठेवण्यासाठी एखादा उपाय सांगा?

केसांना निरोगी ठेवण्यासाठी नियमित मसाज करणं गरजेचं आहे. मसाजसाठी हेअर टॉनिक व हेअर ऑइलचा वापर केला जाऊ शकतो. तेल केसांना नरिष करण्याबरोबरच मजबूत आणि शायनीदेखील बनवतं. केस प्रोटीनने बनलेले असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण योग्य ठेवणे गरजेचे आहे. अंद्मद्दरित डाळी, दूध, अंडी, मासे, सोयाबीन, चिकन इत्यादी प्रोटिन्सचे उत्तम स्त्रोत आहेत. त्यांचा तुमच्या खाण्यात समावेश करा. आठवडयातून एकदा घरगुती पॅकचा वापर करणे योग्य आहे. यासाठी रिठा, आवळा, शिकेकाई व मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते उकळवा. जेव्हा पाणी सुकून जाईल तेव्हा ते वाटून घ्या आणि त्यामध्ये एलोवेरा जेल व अंड एकत्रित करा. नंतर ते पॅकप्रमाणे लावा.

माझं वय २५ वर्षे आहे. माझ्या डोळयाखाली खूपच काळी वर्तुळे आहेत. ती कमी करण्याचा एखादा सोपा उपाय सांगा?

काळी वर्तुळे घालविण्यासाठी संत्र व बटाटयाच्या रसामध्ये कॉटन बुडवून नंतर डोळे बंद करून पापण्यांवर थोडा वेळ ठेवा. असं नियमित केल्यामुळे डोळयांना आरामदेखील मिळेल. या व्यतिरिक्त आराम व पुरेशी झोप घ्या. अंधारात टीव्ही पाहू नका वा फोनवर अधिक काम करू नका. शक्य असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन यलो लेझर घ्या. यामुळे काळी वर्तुळं लवकरच निघून जातील. दररोज बदामाच्या तेलामध्ये काही थेंब ऑरेंज ऑइल एकत्रित करून करंगळीने हलकसं डोळयांभोवती मसाज करा.

काजळशिवाय माझे डोळे खूपच सुने दिसतात. लाइनर शिवाय बाहेर जायला छान वाटत नाही. काजळ लावल्यामुळे स्मज होतात. एखादा उपाय सांगा ज्यामुळे मी सुंदर दिसेन?

काजळ विकत घेतेवेळी नेहमी लक्षात ठेवा की ते लाँग लास्टिंग आणि स्मज प्रुफ असावं. तुम्हाला हवं असल्यास पर्मनंट काजळ लावू शकता. जे १५ तास टिकतं. कधी पसरत नाही. लक्षात ठेवा जिथून लाइनर काजळ लावत असाल तिथे हायजिनची खास काळजी घ्या.

माझी नखे खूपच लवकर तुटतात आणि हात सुंदर दिसत नाहीत. नखं मजबूत करण्यासाठी काय करू?

नखे प्रोटीनने बनलेली असतात म्हणून खाण्यात प्रोटीनचे प्रमाण अधिक असायला हवं. नखांना मजबूत करण्यासाठी तुमच्या आहारात विटामिन, फायबर व प्रोटीन अधिक प्रमाणात असायला हवं. दररोज हिरव्या भाज्या आवर्जून खा. फळं आणि डाळीदेखील नखांना चांगलं करण्यासाठी मदत करतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळेदेखील नखे तुटू लागतात. म्हणून कॅल्शियमयुक्त खाणं जसे की दूध, दही, अंड्याचा वापर करा. नखांना शेपमध्ये ठेवा म्हणजे ती तुटणार नाहीत. दररोज काही वेळासाठी कोमट ऑलिव ऑइलमध्ये थोडावेळ त्यांना भिजवून ठेवा आणि हलका हलका मसाज करा. यामुळे नखे मजबूत होतात आणि नखांवर नेल पॉलिश लावल्यामुळेदेखील नखे लवकर तुटत नाहीत.

कपाळावर सतत टिकली लावल्यामुळे त्याजागी डाग पडू लागले आहेत. ते काढण्यासाठी व कमी करण्यासाठी काय करू?

तुमचा टिकलीचा ग्लू उत्तम क्वालिटीचा नसेल तर डाग पडण्याचे चान्सेस राहतात. त्यामुळे नेहमी उत्तम क्वालिटीच्या टिकली विकत घ्या. रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवा आणि चेहरा स्वच्छ करून घ्या. डाग पडले आहे ते कमी करण्यासाठी एलोवेरा जेलमध्ये काही लिंबाचे थेंब टाकून डागाच्या जागी दररोज अर्धा मिनिट मसाज करा आणि नंतर खोबरेल तेल लावून थोडा वेळ सोडून द्या. असं केल्यामुळे फरक पडण्याचे चान्सेस असतात. तुम्ही हवं असल्यास एखाद्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये जाऊन लेझर ट्रीटमेंट व यंग स्किन मास्क लावू शकता. यामुळे डाग खूपच कमी होतील. केमिकल पिलदेखील करू शकता. ज्यामुळे त्वचेचा एक लेयर निघून जाईल आणि डागदेखील कमी होतील.

मला आयब्रोज करतेवेळी थ्रेडिंग केल्यामुळे खूप त्रास होतो. कधी कधी हा त्रास सहन करण्यापलीकडचा असतो. अश्रूदेखील येतात. प्लीज सांगा मी काय करू?

आयब्रोज करणं खूपच गरजेचे आहे. कारण योग्य आकाराच्या आयब्रोज आपल्या चेहऱ्याला योग्य शेप देतात. वेदनेपासून सुटका मिळवण्यासाठी आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोजवर बर्फाने मसाज करा. ज्यामुळे आयब्रोज मुलायम होतील आणि वेदनादेखील कमी होतील. थ्रेडिंगच्या वेदनेपासून वाचण्यासाठी त्यावेळी चुइंगम खा. वेदना कमी होतील.

जी मुलगी तुमच्या आयेब्रोज करणार आहे तिला थ्रेडला वेट करुन घ्यायला सांगा. यामुळे तुम्हाला कमी वेदना होतील. थ्रेडिंग करतेवेळी व्यवस्थित स्ट्रेच करा यामुळेदेखील वेदना कमी होतील. थ्रेडिंगनंतर मॉइस्चरायझरने व्यवस्थित मसाज करा. आयब्रोजवर एलोवेरा जेल लावा, यामुळे वेदना व जळजळ शांत होईल आणि रेडनेसदेखील कमी होतो.

सौंदर्य समस्या

* प्रतिनिधी

  • मी १९ वर्षांची आहे. माझ्या चेहऱ्यावर ४-५ वर्षांपासून मुरुमांचा त्रास आहे. मी त्यांना फोडते, म्हणून माझ्या चेहऱ्यावर त्यांच्या खुणा आहेत. कृपया मला सांगा की मी या स्पॉट्सपासून कसे मुक्त होऊ?

आपल्याला ही समस्या आहे कारण आपल्या त्वचेचे छिद्र बंद झालेले आहेत आणि त्यात धूळ आणि घाण भरली आहे. तुम्ही रोज आपला चेहरा स्वच्छ करा. यासाठी क्लीनिंग, टोनिंग व मॉइश्चरायझिंग करा. मुरुमे फोडू नका. डाग काढून टाकण्यासाठी कडुनिंब पॅक लावा. तसेच तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि दिवसाला ८-१० ग्लास पाणी अवश्य प्या.

  • मी ६ महिन्यांपूर्वी रीबॉन्डिंग केले होते. आता माझे केस मुळातून बाहेर येत आहेत. ते परत यावेत म्हणून मी काय करावे? मला एखादा शॅम्पू किंवा तेल सांगा, ज्याच्या मदतीने केस परत येतील?

रीबॉन्डिंग करताना रासायनिक उत्पादने वापरली जातात. म्हणून, रीबॉन्डिंगनंतर केसांची काळजी घेणे आवश्यक असते. आपण एखादा गुळगुळीत शॅम्पू वापरा आणि आठवडयातून एकदा हेअरमास्कदेखील लागू करा. त्याचबरोबर केसांना स्टीमही द्या. नक्कीच फायदा होईल.

  • मी १८ वर्षांची आहे. उन्हात गेल्यावर माझ्या सर्व चेहऱ्यावर लहान-लहान मुरुमे येतात. कृपया या समस्येपासून मुक्त होण्यासाठी कुठलाही घरगुती उपाय सुचवा?

कडुलिंब आणि तुळशीचा फेसपॅक लावा. यामुळे त्वचेत असणारी घाण साफ होईल. आठवडयातून एकदा जेल स्क्रब अवश्य लावा. अन्नामध्ये कमी तेल वापरा आणि बाहेर जाण्यापूर्वी आपले तोंड झाकून घ्या.

  • सनबर्नमुळे गळयाचा मागील भाग काळा झाला आहे. उत्कृष्ट ब्लीच आणि वॅक्स वापरुन प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही. मला असे कोणतेही घरगुती उपचार सांगा ज्याद्वारे माझी समस्या सोडविली जाऊ शकेल?

जर उन्हामुळे होणाऱ्या त्रासाने मानेच्या मागील भागावर काळेपणा आला असेल तर आपण टोमॅटो, काकडी आणि बटाटा यांचा पॅक बनवून घ्या आणि लावा. नंतर २० मिनिटांनंतर हलके हातांनी चोळा आणि त्यातून मुक्त व्हा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा. हे दिवसातून ३ वेळा करा. काळेपणा दूर होईल.

  • माझा रंग सावळा आहे आणि चेहऱ्यावर चमक नाही. कृपया एखादा घरगुती उपाय सुचवा?

चेहऱ्यावर चमक आणण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे दिवसाला  १०-१५ ग्लास पाणी पिणे. तसेच कोरफड जेलने दररोज चेहऱ्यावर मालिश करा. जेव्हापण आपण उन्हात बाहेर पडाल तेव्हा नेहमीच आपला चेहरा झाकून ठेवा.

  • माझ्याकडे असलेले बहुतेक कपडे शॉर्ट स्लीव्हचे आहेत. परंतु माझ्या हातांच्या रंगामुळे मी ते घालू शकत नाही. वास्तविक माझे अर्धे हात गोरे आणि अर्धे हात टॅनिंगमुळे काळे झाले आहेत. कृपया मला एखादा असा उपाय सांगा, ज्याद्वारे माझ्या हातांचा रंग एकसारखा होऊ शकेल?

जर हातांना टॅनिंग झाले असेल तर बेसन पीठ, हळद आणि दुधाची पेस्ट बनवून घ्या आणि लावा. थोडया वेळाने त्यातून मुक्त होण्यासाठी हलके हाताने चोळा. रंग हळूहळू साफ होईल. तसेच उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा आणि कॉटनचे हातमोजे अवश्य घाला.

  • माझे केस लांब आणि दाट तर आहेत, परंतु ते खूप विभाजित होत आहेत. बरेच ब्रँडेड शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. कृपया काही उपचार सांगा?

जर केस विभाजित होत असतील तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये प्रथिनांचा अभाव आहे. प्रथिने समृद्ध शॅम्पू आपल्या केसांना लावा आणि त्यानंतर केसांना प्रथिने क्रीम लावून १५ मिनिटांनी केस धुवा. दोन महिन्यांच्या अंतराने आपल्या केसांना ट्रिमिंगदेखील करत राहा.

  • मी ४० वर्षांची श्रमिक महिला आहे. प्रत्येक हंगामात माझ्या टाचा क्रॅक होतात. बरेच उपचार केलेत पण काही उपयोग झाला नाही? कृपया समस्या सोडवा?

आपल्या पायांची त्वचा कोरडी आहे. म्हणूनच रात्री झोपायच्या आधी आपले पाय कोमट पाण्यामध्ये काही काळ बुडवून ठेवा आणि नंतर मोहरीच्या तेलाने चांगले मसाज करा आणि काही काळ मोजे घाला. ऑफिसला जातानादेखील सॉक्स घाला. आपण आपले पाय जितके अधिक कव्हर कराल ते तितकेच नरम होतील.

  • मी ३५ वर्षांची श्रमिक महिला आहे. माझ्या केसांमध्ये वारंवार कोंडा होतो, ज्यामुळे ते खूप कोरडे होतात आणि डण्यास सुरवात करतात. मी नियमितपणे तेलदेखील लावते, तरीही असं होतं. कृपया घरगुती उपाय सुचवा?

तेल लावणे हा डोक्यातील कोंडयावर उपचार नाही. आपण कोरफड, नारळ आणि तुळशीच्या पानांची पेस्ट बनवून ती केसांवर लावा किंवा मध आणि ग्लिसरीन मिसळा आणि डोक्यातील कोंडा निघत नाही तोपर्यंत केसांना लावा. नियमितपणे हे केल्याने निश्चितच फायदा होईल आणि केस चमकतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें