कामसूत्र निषिद्ध नाही

* डॉ. प्रेमपाल सिंह वाल्यान

अलीकडेच मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या एका गटाने सेक्स आणि त्याबद्दलच्या महिलांच्या इच्छेबाबत मनमोकळेपणाने बोलता यावे यासाठी मुलींना प्रोत्साहित करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर एक उपक्रम सुरू केला. काही महिन्यांतच त्यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखांच्या घरात पोहोचली आणि या विषयाने इंस्टाग्रामवर एक सन्मानजनक स्थान प्राप्त केले.

हस्तमैथून, कामवासना, लैंगिक इच्छा आणि लैंगिक आनंद या अशा गोष्टी आहेत ज्या तारुण्यावस्था सुरू होताच आपले हार्मोन्स आपल्याला देतात, पण या विषयावर आपण, विशेषत: मुली कधीच मनमोकळेपणाने बोलत नाहीत, असे ओह माय ऋतिक डॉट कॉमच्या ५ संस्थापकांपैकी २ असलेल्या कृती कुलश्रेष्ठ आणि मानसी जैन यांचे म्हणणे आहे.

कामवासनेच्या कथा

२०१८ मधील हिवाळयाच्या ऋतूत मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थिनी कृती, मानसी, वैशाली मानेक, सुपर्णा दत्ता आणि केविका सिंगला यांनी निर्णय घेतला की, त्या महिलांची इच्छा आणि त्यांच्या आंतरिक आनंदाबद्दल जाहीरपणे बोलायला सुरुवात करतील. त्यांना त्यांच्या ‘बॅचलर्स ऑफ मास मीडिया’च्या (बीएमएमच्या) अभ्यासक्रमासाठी हाच विषय घ्यायचा होता. त्यांच्या काही मैत्रिणींना मात्र हा विषय आवडला नाही आणि त्या त्यांच्या गटातून वेगळया झाल्या. तरीही त्या मुलीही मानिसकदृष्ट्या या विषयाशी सखोलपणे आणि प्रामाणिकपणे जोडल्या गेल्या.

या विषयावर खूप जास्त चर्चा झाली, कारण काही लोकांना माहीत होते की, या विषयावर खूप काही करणे बाकी आहे. कृतीने सांगितले की, जेव्हा आम्ही या विषयावर संशोधन केले तेव्हा लक्षात आले की, फक्त अशा प्रकारच्या भावना आणि विचार व्यक्त केले तरी मानसिक तणाव संपतो.

निनावी मंच

अशा प्रकारे ओह माय ऋतिक डॉट कॉम तरुणींसाठी त्यांच्या कल्पना, इच्छांना निनावीपणे किंवा ओळखीसह व्यक्त करण्याचे व्यासपीठ बनले. त्याला ऋतिक हे नाव यासाठी देण्यात आले, कारण हे सर्वाधिक महिलांच्या आवडीचे नाव आहे. काही तरुणींचे असे म्हणणे होते की, ‘लस्ट स्टोरी’ चित्रपटात सुमुखी सुरेशचे चरित्र महिला हस्तमैथून संदर्भातले आहे आणि त्यात ऋतिक रोशन एका सत्यनिष्ठ ग्रीक गॉडच्या रूपात आहे आणि आम्हाला असे वाटले की, यातून ओएमसीऐवजी एखाद्याच्या भावना व्यक्त करून त्या समजावून सांगण्यात आल्या आहेत.

एका मुलीची गोष्ट

कृती सांगते की, सुरुवातीला वेबसाईट आणि सोशल मीडिया हँडलने बऱ्याच मुलांना आकर्षित केले, कारण त्यांना वाटले की, ही एखादी सेक्स साईट आहे. वास्तव समजताच बरीच मुले अलिप्त झाली, मात्र आता मोठया संख्येने मुली याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.

मानसी सांगते की, आम्ही फक्त प्रसिद्धी झोतात राहणाऱ्या आणि नक्कल करणाऱ्या आहोत असा लोकांना संशय होता, पण असे काहीच नसल्याचे आता त्यांच्या लक्षात आले आहे. आमच्या अनेक पुरुष मित्रांनी आम्हाला सांगितले की, यामुळे त्यांना महिलांना चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होत आहे तसेच मुलींच्या अपेक्षांबद्दलही त्यांना जास्त माहिती मिळत आहे.

वाईट गोष्ट नाही

कृती सांगते की, वयात आल्यानंतर मुली त्यांच्या महिला मैत्रिणींशी या विषयवार कधीच बोलत नाहीत. मी सीबीएसई शाळेत शिकले. तिथे लैंगिक शिक्षणाच्या वर्गात मुलांना सर्व माहिती असायची मात्र मुली त्याकडे दुर्लक्ष करायच्या. शिक्षकही हा विषय शिकवायचा सोडून स्वत:च शिका असे सांगायचे.

मानसी सांगते की, या व्यासपीठावर आपले विचार मांडताना मुलींनी आपली ओळख लपवू नये, असे बहुतांश मुलींचे मत आहे. त्यांच्या मते आपल्या इच्छांचे मालक आपण स्वत: असायला हवे. ही वाईट गोष्ट नाही. त्यासाठी स्वत:ला दोष देऊ नये. हे खूपच सामान्य आहे. तुम्ही तुमचे विचार, इच्छा आणि भावना दाबून ठेवत असाल तर तुमच्यासाठी ते चांगले नाही. काही लोक, मुले आणि मुलींनी आम्हाला सांगितले की, एका मुलीला जे हवे असते ते तिचे वैयक्तिक आयुष्य असते. म्हणूनच आम्ही कोणावर जबरदस्ती करत नाही. आमच्याकडे बऱ्याच निनावी पोस्ट आहेत आणि आम्ही त्यांची दखल घेतो.

स्वत:हून याबद्दल बोला : कृती सांगते की, मुली फक्त ऑनलाइनपर्यंत मर्यादित राहू इच्छित नाहीत. आम्ही या विषयावर दिल्लीतील मिरांडा हाऊस, जयपूरमधील एक कॅफे आणि मुंबईतील एका महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये चर्चा केली. जयपूरमध्ये आमच्या २० महिला सदस्य आहेत. अनेक मुलींनी सांगितले की, कामवासना आणि त्यासंदर्भातील इच्छेबाबतच्या आपल्या भावनांचे काय करायचे, हे यापूर्वी त्यांना माहीत नव्हते. या माध्यमामुळे आपले लैंगिक वर्तन सामान्य ठेवण्यासाठी अनेकांना मदत मिळत आहे.

आकार महत्त्वाचा असतो : आम्हाला या साईटमधून कुठलाही नफा मिळत नाही, मात्र महाविद्यालयीन परिसरात आमचे अनेक संचालक आणि कार्यकर्ते आहेत. आम्हाला असे लेखक, कलाकार, कवी आणि लोकांचे सहकार्य हवे आहे जे या विषयाच्या अभिव्यक्तीसाठी, त्याला आणखी वाचा फोडण्यासाठी आम्हाला मदत करू शकतील. आम्हाला सातत्याने या विषयात पुढे जायचे आहे. या साईटसाठी सध्या स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागत असल्याचे या मुलींचे म्हणणे आहे, मात्र या साईटचा विस्तार आवश्यक आहे, कारण कुठल्याही विषयाच्या आकाराला महत्त्व असते.

अज्ञान : या मुलींचे म्हणणे आहे की, बहुतांश मुली प्रतिमा बेदी आणि शोभा डे यांना ओळखत नाहीत, ज्या महिलांची इच्छा आणि त्यांच्या आंतरिक आनंदाला आवाज मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहिल्या आहेत. म्हणूनच त्यांना या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठीचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.

कृतीचे म्हणणे आहे की, आमच्या अशा मनमोकळेपणे वागण्यामुळे लोकांना पुढे धोका असल्यासारखे किंवा आम्ही बऱ्याच स्वतंत्र झालो आहोत असे वाटू शकते. जर ते आम्हाला समजू शकत नसतील तर आमच्यावर टीका-टिपण्णी करण्याचा त्यांना अधिकार नाही. आम्ही नकारात्मकता, असभ्य टिपण्णी आणि असभ्य संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करून सकारात्मक बाजूकडे लक्ष केंद्रित करतो.

निषिद्ध विषय नाही

प्रसिद्ध कलाकार राधिका आपटेने तिच्या ओएमएच प्लॅटफॉर्मवर या मुलींचे बरेच कौतुक केले आहे, सोबतच एक व्हिडीओ प्रसिद्ध करून स्वत:च्या कल्पनांबद्दलही माहिती दिली आहे.

ऋतिकला हे माहीत आहे का की तुम्ही त्याला इच्छापूर्तीचे प्रतीक बनवले आहे, असे जेव्हा या मुलींना विचारले तेव्हा त्या म्हणाल्या की, त्याला याबाबत माहिती आहे किंवा नाही, हे आम्हाला माहीत नाही, पण मुख्यत्वे हे त्याच्यासंदर्भात नाही.

या विषयावर सागरी मानसशास्त्रज्ञ अशिता महेंद्र यांचे म्हणणे आहे की, लैंगिक अत्याचार महिलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. ऐतिहासिक रुपात महिलांना कामुकतेसाठी लाजिरवाणी वागणूक देण्यात आली. त्यामुळेच महिला त्यांच्या लैंगिक गरजेच्या पूर्ततेसाठी आवश्यक शारीरिक संबंध ठेवण्याकरता पुढाकार घेत नाहीत. त्यांना यासाठी प्रशिक्षणही देण्यात येत आहे.

भारतीय समाजात सेक्स आणि लैंगिक शिक्षण हा पूर्वापारपासूनच निषिद्ध विषय राहिला आहे, मात्र सिगमंड फ्राईड यांच्या मते लैंगिक आवेश आणि लैंगिक इच्छा दाबून टाकल्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते. त्यासोबतच अनेक विकृती जसे की, लाज, चिंता, नैराश्य इत्यादी समस्या निर्माण होतात. तसेच लैंगिक उत्तेजना आणि इच्छा कमी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वत:वर संशय घेण्याची वृत्ती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते. याचा परिणाम त्यांच्या वैवाहिक संबंधांवरही होतो.

महिलांचे ऑर्गेज्म निषिद्ध नाही

* मदन कोथुनिया

नुकताच अन्य देशांत ‘वर्ल्ड ऑर्गेज्म डे’ साजरा करण्यात आला आणि यासंदर्भातील गोष्टी तेथे लोक मोकळेपणाने करतातही. मात्र भारतीय सेक्स आणि ऑर्गेज्मवर बोलताना तोंड लपवतात. बहुसंख्य लोक तर या विषयावर आपलाच साथीदार किंवा पार्टनरसोबतही बोलू शकत नाहीत. एक मजेशीर गोष्ट अशी की हिंदीत ऑर्गेज्मचा अर्थ लैंगिक पूर्ती सांगितला जातो, जो या शब्दाचा योग्य अर्थ नाही.

महिला आणि पुरुष दोघं एकमेकांपेक्षा शारीरिक रचनेत खूपच वेगळे आहेत. धर्मानुसार दोघांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन आणखीनच वेगळा आहे. जिथे पुरुषांना सर्व प्रकारची सवलत लहानपणापासूनच भेट म्हणून मिळते, तिथे महिलांना मात्र लहानपणापासूनच वेगळया प्रकारे वाढवले जाते. त्यांच्यासाठी कितीतरी प्रकारचे नियम तयार केले जातात. लहानपणापासून ते वयात येईपर्यंत त्यांना अशा प्रकारची शिकवण दिली जाते की त्या आपल्या शरीराशी संबंधित गोष्टी इच्छा असूनही सांगू शकत नाहीत.

जे पुरुषांसाठी योग्य ते महिलांसाठी चुकीचे का : जर एक महिला पुरुषाशिवाय संबंध ठेवून शारीरिक सुख प्राप्त करण्यास सक्षम असेल तर ही गोष्ट समाजाच्या पचनी पडत नाही. आम्ही येथे थेट मास्टरबेशन म्हणजे हस्तमैथूनाबाबत बोलत आहोत, ज्याच्याबद्दल जास्तकरून मुलांना वयाच्या १० ते १२ वर्षींच माहिती होते. पण मुलींना वयात आल्यानंतरही याबाबत जास्त माहिती नसते. पुरुषाशी शारीरिक संबंध न ठेवताही शरीरसुख प्राप्त करू शकतात. ही गोष्ट त्या मैत्रिणींकडेही मान्य करत नाहीत. कारण समाजाने असे गृहित धरले आहे की पुरुषांसाठी मास्टरबेशन ठीक आहे पण महिलांसाठी चुकीचे आहे.

अशाच प्रकारे मास्टरबेशनवर बोलणे पुरुषांसाठी साधारण गोष्ट आहे, पण महिलांसाठी ती अशी गोष्ट आहे, जी तिची असूनही तिची नाही. खरंतर अशा मुद्यावर बोलणे खूपच गरजेचे आहे. हे जितक्या सहजपणे पुरुषांसाठी स्वीकारले गेले तेवढेच महिलांसाठी स्वीकारायला हवे.

मुली पीरियड्स, ब्रा या त्यांच्या सामान्य गोष्टींबाबत साहसाने बोलल्या तरी त्यांना पब्लिकली ट्रोल केले जाते. हे लज्जास्पद असल्याचे बोलले जाते. अशावेळी ऑर्गेज्म आणि तेही मुलींच्या ऑर्गेज्मवर बोलणे कल्पनेपलीकडचे आहे.

‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘लस्ट स्टोरीज’ अशा फिल्म आहेत, ज्यात महिलांशी संबंधित शारीरिक सुखाचा मुद्दा काहीसा उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारतीय पुरुषांनी यावर खुलेपणाने चर्चा करायचे सोडून या फिल्म आणि त्यातील अभिनेत्रींनाच ट्रोल केले आहे.

पुरुषांना हे माहीतच नाही : बहुसंख्य भारतीय पुरुषांना हे माहीतच नसते की महिलांचे ऑर्गेज्मदेखील तेवढेच मॅटर करते, जेवढे त्यांचे. प्रत्यक्षात इंटरकोर्स म्हणजे शारीरिक संबंधांच्यावेळी त्यांना याचा विचारही न येणे हे एकप्रकारे पितृसत्तेचे वर्चस्वच सांगते.

यावर जयपुरिया हॉस्पिटल, जयपूरच्या अधीक्षक विमला जैन यांचे म्हणणे आहे, ‘‘भारतीय पुरुषांना मुलींचे मास्टरबेशन यासाठीही पचनी पडत नाही, कारण त्यांना ते आपली सत्ता, पुरुषार्थावर आक्रमण वाटते. जेव्हा की अनेक संशोधनाअंती ६२ टक्के महिलांना ऑर्गेज्म मास्टरबेशनवेळीच होते. हादेखील अन्य सामान्य आणि नैसर्गिक प्रक्रियांचाच एक भाग आहे. आरोग्यावर याचा थेट परिणाम होतो, पण भारतीय पुरूष हे कदाचितच समजू शकतील. त्यांना वाटते की ऑर्गेज्म ही पुरुषांच्या आधिकार क्षेत्रातीलच बाब आहे. महिलांसाठी सामाजिकदृष्टया निषिद्ध आहे.’’

या मुद्यांवर, लैंगिक शिक्षकाशी संबंधित पैलूंवर खुलेपणाने चर्चा व्हायला हवी, जेणेकरून एका निरोगी आणि समानतेच्या समाजाची निर्मिती करता येईल. घरामध्ये महिला नेहमीच अस्वस्थ आणि तणावात राहू नयेत किंवा त्यांना अस्पृश्य असल्यासारखे वाटू नये तसेच त्यांनी अन्य रिस्क घेऊ नये यासाठी गरजेचे आहे की या गोष्टींवर कमीत कमी मुलींनी तरी आपसात खुलेपणाने बोलायला हवे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें