‘लकडाऊन’ पूर्ण

* प्रतिनिधी

लॉकडाऊननंतर प्रेक्षक पुन्हा चित्रपट गृहांकडे वळत असून हिंदी चित्रपटाच्या सोबतच मराठी चित्रपटसुद्धा प्रेक्षकांच्या मनोरंजनाला तत्पर आहेत. एक एक करून सगळेच आपल्या चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करत असून, इष्णव मीडिया हाऊसचा ‘लकडाऊन बी पॉझिटिव्ह’ या चित्रपटाचीसुद्धा तारीख निश्चित झाली असून, या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन नुकतंच खासदार संजय राऊत यांच्या हस्ते शिवसेना भवनात झाले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने सचिन अहिर, रविंद्र मिर्लेकर यांच्या सोबत अनेक मान्यवर उपस्थित होते.

अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेला लकडाऊन हा चित्रपट येत्या २८ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कथा ही त्याच्या नावातच लपलेली आहे. लॉकडाऊन दरम्यान ठरलेल्या एका लग्नाची ही धमाल गमतीची गोष्ट आहे. लकडाऊन या चित्रपटाच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकाराच्या अभिनयाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

चित्रपटाची कथा ज्या प्रमाणे लॉकडाऊनमध्ये घडली तसाच हा चित्रपट लॉकडाऊन मध्ये चित्रित केला आहे. चित्रपटाचं चित्रीकरण पूर्णतः शिवजन्मभूमी जुन्नर (किल्ले शिवनेरी) येथे झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टर मध्ये अंकुश आणि प्राजक्ता लग्नाच्या बेडीत अडकलेले दिसत असले तरी त्यासाठी त्यांना करायला लागणारी धावपळ म्हणजे या चित्रपटाचं कथानक. चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश आणि प्राजक्ता ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची निर्मिती शरद सोनवणे, दर्शन फुलपगार, अजित सोनपाटकी आणि सागर फुलपगार यांची असून चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष मांजरेकर यांनी केलं आहे. तर चित्रपटाचे लेखक रविंद्र मठाधिकारी यांनी केलं आहे. चित्रपटाला संगीत अविनाश – विश्वजितच आहे तर संकलन परेश मांजरेकर यांनी केले आहे. चित्रपटातील नृत्य फुलवा खामकर यांनी दिग्दर्शित केली असून चित्रपटाचं साउंड रेकॉर्डिग अभिजित देव यांनी केलं आहे.

वैभव तत्ववादी अभिनित ‘Grey’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस!

* सोमा घोष

अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी लवकरचं ‘ग्रे’ नामक एक रहस्यमय थरारक चित्रपट घेऊन आपल्या भेटीस येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर नुकताच व्हायरल झाला असून त्यास प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाददेखील मिळत आहे.

दिग्दर्शक अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘ग्रे’ चित्रपटात वैभव ‘सिद्धांत’ नामक एका युवकाची भूमिका साकारत आहे. ‘ग्रे’ ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बादल्याच्या बदल्याची कथा आहे. या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे.

Red Bulb Movies आणि का का Kindle Entertainment निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘ग्रे’ हा चित्रपट येत्या १ ऑक्टोबरला Zee5 प्रीमियर वर आपल्या भेटीस येणार आहे.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें