वंध्यत्त्वावर उपचार शक्य आहे

* पारुल भटनागर

जगभरात इन्फर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्वामुळे त्रस्त असलेल्या लोकांची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात १० ते १५ टक्के विवाहित जोडप्यांना वंध्यत्वाची समस्या भेडसावत आहे. भारतातील ३० लाख वंध्य जोडप्यांपैकी ३ लाख जोडपी दरवर्षी वंध्यत्वाचे उपचार घेतात. शहरी भागात ही संख्या खूप मोठी आहे. तेथे, प्रत्येक ६ जोडप्यांपैकी १ जोडपे वंध्यत्वाच्या समस्येने त्रस्त आहे आणि त्याच्या उपचारांबद्दल खूप जागरूक आहे. मुळात प्रत्येक समस्येवर उपचार केला जाऊ शकतो. म्हणूनच तर आशा सोडून दिलेली जोडपीही आई-वडील बनू शकतात.

वंध्यत्व म्हणजे काय?

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, वंध्यत्व हा प्रजनन प्रणालीशी संबंधित आजार आहे. वंध्यत्व हा शब्द तेव्हा वापरला जातो जेव्हा एखादे जोडपे वर्षभरापेक्षा जास्त काळ मुलासाठी प्रयत्न करत असते, पण तरीही गर्भधारणा होण्यास त्रास होतो. वंध्यत्वाचा दोष केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही असतो.

बऱ्याचदा स्त्रियांमध्ये ही समस्या निर्माण होण्याचे कारण म्हणजे फेलोपियन ट्यूब ब्लॉक होणे, अंड्यांचे उत्पादन न होणे, अंड्यांचा दर्जा खराब असणे, थायरॉईड, गर्भधारणेच्या हार्मोन्सचे असंतुलन, पीसीओडी म्हणजेच पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम इत्यादी. त्यामुळे आई बनण्यात अडचणी येतात.

दुसरीकडे, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असणे, त्यांची गुणवत्ता चांगली नसणे आणि त्यांची गतिशीलता कमी असणे म्हणजे ते सक्रियपणे काम करू न शकणे अशा समस्या असतात. यामुळे जोडीदाराला गर्भधारणेत समस्या येते, पण निराश होऊन नाही तर वंध्यत्वावर उपचार करून तुमची समस्या दूर होईल.

यावर उपचार काय?

मासिक पाळी वेळेवर येण्यासाठी प्रयत्न : सर्वसामान्यपणे किंवा उपचाराने वंध्यत्व दूर करायचे असेल तर त्यासाठी सर्वात आधी डॉक्टर तुमचे मासिक पाळी चक्र सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून तुमचे हार्मोन्स नीट होतील आणि तुम्हाला गर्भधारणेत कोणतीही अडचण येणार नाही. सोबतच तुमचा ओवुल्येशन पिरेड शोधून काढणे सोपे होईल. पौष्टिक खाणे आणि औषधोपचाराने ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो.

हार्मोन्सचे संतुलन नीट करणे : गर्भधारणेसाठी आवश्यक असलेले हार्मोन्स जसे की, एफएसएच, जे अंडाशयात अंड्यांना मोठे होण्यास मदत करते, ज्यामुळे एस्ट्रोजेनचे उत्पादन वाढते आणि ते शरिरातील एफएसएचच्या वाढीचे संकेत देते. यामुळे ओव्युलेशन नीट होण्यासह गर्भधारणा होणे सोपे होते. अशावेळी आययूआय म्हणजे इंट्रायूटरिन इन्सेमिनेशन किंवा इनविट्रो फर्टिलायझेशन आणि औषधांच्या माध्यमातून याला नीट केले जाते. यात पौष्टिक खाण्याची सवय उपयुक्त ठरते.

अंडी परिपक्व होण्यासाठी मदत : काही प्रकरणांमध्ये असे दिसून येते की, अंडी तयार होतात, पण त्यांना संपूर्ण पोषण मिळून ती फुटत नाहीत. त्यामुळे गर्भ राहण्यास अडचण येते. अशावेळी औषधोपचाराने ओव्युलेशन पिरेड चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, जेणेकरून योग्य उपचाराअंती आईवडील होण्याचे स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकाल.

बंद ट्यूब उघडणे : जर तुमच्या दोन्ही किंवा एखादी ट्यूब बंद असेल तर डॉक्टर लेप्रोस्कॉपी, हिस्ट्रोस्कॉपी करून ट्यूब उघडतात. तुम्हाला गर्भधारणेत बाधा आणणाऱ्या सिस्टची समस्या असेल तर डॉक्टर शस्त्रक्रियेद्वारे ही समस्या दूर करतात, जेणेकरून गर्भधारणा होणे शक्य होते.

इनविट्रो फर्टिलायझेशन : इनविट्रो फर्टिलायझेशनमध्ये महिलेचे अंडे आणि पुरुषाचे स्पर्म घेऊन प्रयोगशाळेत फर्टिलाईज करून महिलेच्या यूटरसमध्ये टाकले जाते. या प्रक्रियेदरम्यान संपूर्ण चाचणी, औषधे आणि इंजेक्शनचा वापर केला जातो, जेणेकरुन कुठलीही समस्या राहणार नाही आणि पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल, पण यासाठी अनुभवी डॉक्टर्स आणि औषधे गरजेची असतात.

या सर्वांव्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही बदल करण्याची गरज आहे.

आरोग्य परामर्श

डॉ. अनुजा सिंह, शांता आयव्हीएफ सेंटर, नवी दिल्ली

प्रश्न : माझं वय २७ वर्षं आहे आणि पतीचं ३० वर्षं आहे. आमच्या लग्नाला ५ वर्षं झाली आहेत. आमच्या सर्व तपासण्या नॉर्मल आल्या आहेत. पतीच्या शुक्राणूंची संख्याही जवळजवळ ९० दशलक्ष आहे. पण तरीही आम्हाला मूल होत नाही. आम्ही आयव्हीएफ तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे का?

उत्तर : काळजीचं काहीच कारण नाही. तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या चांगली आहे. त्यामुळे तुम्हाला आययूआय तंत्रज्ञानाच्या मदतीची गरज नाही. आयव्हीएफचा पर्याय तुमच्यासाठी योग्य आहे. याच्या मदतीने तुम्हाला संतती प्राप्त करून घेता येईल. पण त्यासाठी एखाद्या चांगल्या डॉक्टरची मदत घ्या.

प्रश्न : माझ्या लग्नाला २ वर्षं झाली आहेत. पण अजूनही मी गर्भवती राहू शकत नाही. तपासणीमध्ये माझा रिपोर्ट चांगला आहे. पतीच्या शुक्राणूंची संख्याही ३२ दशलक्ष आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ही संख्या समाधानकारक आहे. पण तरीही मी गर्भवती राहू शकत नाही आहे. याचं कारण काय असू शकेल?

उत्तर : हो, तुमच्या पतीच्या शुक्राणूंची संख्या समाधानकारक आहे. तुमचे रिपोर्ट्सही नॉर्मल आहेत. त्यामुळे कोणत्याही निर्णयावर पोहोचण्याआधी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही निराश न होता प्रयत्न करत राहा. गर्भवती होण्यासाठी अनुकूल स्थिती असणाऱ्या दिवसांत पतीशी संबंध नक्की बनवा. उदाहरणार्थ तुमची मासिक पाळी महिन्याच्या पहिल्या तारखेला आली असेल तर तुम्ही ८ ते २० तारखे दरम्यान संबंध ठेवा. त्यानंतरही गर्भधारणा न झाल्यास आययूआय तंत्रज्ञानाची मदत घ्या.

प्रश्न : मी २६ वर्षीय अविवाहिता आहे. माझी उंची ५ फूट ३ इंच आहे आणि वजन ७० किलो. ५ महिन्यांपूर्वी माझी पाळी आली नव्हती. पण पुढच्या महिन्यात पाळी आली. त्यानंतर १० दिवसांनी मी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवले. त्या महिन्यात माझी पाळी वेळेवर आली. पण आता पाळी उशिराने येत आहे. याचं कारण काय असू शकते? काहींनी मला सांगितलं की मी थायरॉइडची तपासणी करून घेतली पाहिजे. कृपया सांगा मी काय करू?

उत्तर :  अनियमित किंवा उशिराने पाळी येण्यामागे बरीच कारणं असू शकतात. तुम्ही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असाल तर तुम्ही गर्भावस्थेबाबत तपासणी करून खात्री करून घेतली पाहिजे. याशिवाय अंडाशयातील सिस्ट किंवा पौलिसिस्टिक ओवरीजची तपासणी होण्यासाठी पॅलविक अल्ट्रासाउंड तपासणी होणं आवश्यक आहे. हे मासिक पाळी उशिराने येण्यामागचं कारण असू शकतं. अतिवजनाचाही परिणाम पाळीवर होऊ शकतो. तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन ६० किलो असलं पाहिजं. तुम्ही तुमचा आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य बदल करून वजन कमी केलं पाहिजे. यामुळे पाळी नियमित होण्यास मदत मिळेल.

प्रश्न : माझं वय ३८ वर्षं आहे. लग्नाला दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. पण अजूनही आई बनण्याचे सुख मला अनुभवता आलेलं नाही. डॉक्टरने मला सांगितलं की, माझं अंडाशय कमकुवत आहे. यामुळेच एकदा माझा ३ महिन्यांनतर गर्भपात झाला आहे. मी का करू?

उत्तर : या वयात गर्भधारणा करणं थोडं कठिण असते. तुमचा ३ महिन्यांचा गर्भपात झाला आहे. यावरून हेच सिद्ध होतं की तुमचं अंडाशय कशाचीही कमकुवत आहे. पण तुम्ही निराश होऊ नका. तुमच्य पतीमध्ये कशाचीही कमतरता नसेल तर तुम्ही एग डोनेशन तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकता. दुसरी एखादी महिला म्हणजे तुमची बहिण किंवा वहिनी यांचे अंडाशय तुमच्या गर्भाशयात ट्रान्सप्लांट करता येऊ शकते. पण ती महिला विवाहित असावी आणि तिने बाळाला जन्म दिलेला असावा.

प्रश्न : माझं वय २८ वर्षं आहे. मी एका खाजगी कंपनीत काम करते. माझ्या पतीच्या वीर्यांमध्ये शुक्राणू नाहीत आहेत. कृपया सांगा मुलाला जन्म देण्यासाठी आम्ही काय करू?

उत्तर : तुमच्या पतीच्या शारीरिक रचनेची तपासणी करून घ्या. स्पर्म बँकमधून स्पर्म विकत घेऊन डोनर आयईयूचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. कदाचित तुमच्या पतीचे स्पर्म कुठेतरी थांबत असतील. असं असेल तर यावरही उपचार शक्य आहे.

प्रश्न : मी मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करते. मी आणि माझे पती मुलाला जन्म देण्यासाठी तयार नाही. मी गर्भनिरोधक गोळ्या घेतो. मग आम्ही कंडोम वापरण्याची गरज आहे का?

उत्तर : गर्भनिरोधक गोळ्या किंवा इंजेक्शन नको असलेली गर्भधारणा टाळतात. पण यामुळे लैंगिक रोगांपासून संरक्षण मिळत नाही. कंडोमच्या वापराने नको असलेली गर्भधारणा तर टळतेच पण तुम्ही आणि तुमचा जोडिदार लैंगिक रोगांपासून सुरक्षित राहता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें