केराटिन ट्रीटमेंटने चमकवा केस

* अनुराधा गुप्ता

हेअर रिबाँडिंग, हेअर स्टे्टनिंग आणि हेअर स्मूदनिंग या तिन्ही ट्रीटमेंट भारतीय महिलांसाठी नवीन नाहीत. देशातील ७० टक्के महिलांनी यातील एखाद्या ट्रीटमेंटचा अनुभव तर नक्कीच घेतला असेल. विशेषत: तरुण महिलांबद्दल बोलायचे झाल्यास रिबाँडिंग, स्ट्रेटनिंग, स्मूदनिंगशिवाय तर त्या पाऊलच उचलत नाहीत. मात्र या तिन्हींबरोबर काही हेअर ट्रीटमेंटही जोडल्या गेल्या आहेत. कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये हेअर केराटिन ट्रीटमेंटच्या नावाने प्रसिद्ध असलेली ही ट्रीटमेंट केसांमधील केराटिनचे प्रमाण वाढविण्यासाठी केली जाते.

काय आहे केराटिन ट्रीटमेंट

‘गृहशोभिका’च्या ‘फेब’ मीटिंगमध्ये ब्युटीशिअन्सना विस्तृत माहिती देण्यासाठी आलेले एक्सपर्ट सॅम या केराटिन ट्रीटमेंटबाबत सांगतात, ‘‘महिलांमध्ये वाढत्या वयामुळे होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे केस आणि नखांवर सर्वात अधिक प्रभाव पडतो. जिथे नखांचे क्युटिकल खराब होण्याची समस्या असते, तिथे केसांनाही प्रोटीन लॉसच्या समस्येचा सामना करावा लागतो. कारण आपले केस केराटिन  नावाच्या प्रोटीनने बनलेले असतात. त्यामुळे ते लॉस झाल्यास केस पातळ व फ्रिजी होतात. अशा केसांवर रिबाँडिंग व स्ट्रेटनिंगचाही काही खास परिणाम होत नाही. कारण कमजोर केसांमध्ये केसगळतीची समस्या आणखी वाढते. अशा केसांसाठी केराटिन ट्रीटमेंट वरदान आहे. या ट्रीटमेंटमध्ये केसांवर प्रोटीनचा थर दिला जातो आणि प्रेसिंगद्वारे प्रोटीनला लॉक केले जाते.’’

केराटिन ट्रीटमेंटची प्रक्रिया

ही ट्रीटमेंट करण्यापूर्वी केसांचा चिकटपणा पूर्णपणे घालविण्यासाठी केसांना दोन वेळा शाम्पू केला जातो. त्यानंतर केसांना १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. याचे कारण म्हणजे केसांमध्ये मॉइश्चराइजर जराही राहू नये आणि केराटिन प्रॉडक्ट चांगल्याप्रकारे केसांमध्ये पेनिट्रेट केले जाऊ शकेल. ब्लो ड्रायनंतर केसांचे चार भाग करून मानेकडील भागाकडून प्रॉडक्ट लावायला सुरुवात केली जाते. प्रॉडक्ट लावल्यानंतर केसांना फॉइल पेपरने २५ ते ३० मिनिटांसाठी कव्हर केले जाते. त्यानंतर केसांना पुन्हा ब्लो ड्राय केले जाते आणि १३० ते २०० डिग्री तापमानात केसांना प्रेसिंग केली जाते, जेणेकरून प्रॉडक्ट केसांमध्ये चांगल्याप्रकारे पेनिट्रेट होईल.

या प्रक्रियेच्या २४ तासांनंतर केस पाण्याने स्वच्छ करून पुन्हा १८० डिग्री तापमानावर प्रेसिंग केले जाते. प्रेसिंगनंतर केसांना चांगल्या केराटिन शाम्पूने स्वच्छ केले जाते आणि केराटिनयुक्त कंडिशनर लावून ७-८ मिनिटे तसेच ठेवले जाते. त्यानंतर केस स्वच्छ करून ब्लो ड्राय केले जाते आणि अशाप्रकारे केराटिनची प्रक्रिया पूर्ण केली जाते.

केराटिन ट्रीटमेंट नव्हे रिबाँडिंग

बहुतेक महिला केराटिन ट्रीटमेंटला रिबाँडिंग समजण्याची चूक करतात आणि त्यानंतर ट्रीटमेंटमध्ये चुका काढायला सुरुवात करतात. सॅम सांगतात, ‘‘केराटिन  ट्रीटमेंट केसांना शायनी आणि स्मूद बनविते. मात्र ही केसांना स्ट्रेट करत नाही. हो, ज्या महिलांचे केस आधीच स्ट्रेट आहेत, त्यांच्या केसांना काही काळ स्ट्रेटनिंगचा इफेक्ट जरूर येईल. परंतु ज्यांचे केस कुरले आहेत, त्यांचे केस शाम्पूनंतर पहिल्यासारखेच होतात. मात्र स्मूदनेस व शायनिंग तशीच टिकून राहते. त्याचबरोबर केस पहिल्यापेक्षा जास्त हेल्दी वाटतात.’’

महिलांमध्ये हाही गैरसमज आहे की, केराटिन ट्रीटमेंट कायमस्वरूपी असते, तर असे काही नाहीए. सॅमच्या मतानुसार, केराटिन ट्रीटमेंटमध्ये खूप माइल्ड प्रॉडक्टचा वापर होतो, याउलट स्मूदनिंग आणि रिबाँडिंगमध्ये हार्ड केमिकल्सचा वापर केला जातो. केराटिन ट्रीटमेंटचा परिणाम केसांवर ४-५ महिन्यांपर्यंत राहतो. त्यानंतर पुन्हा ही ट्रीटमेंट द्यावी लागते.

कॅरेटिन ट्रीटमेंट फायदे आणि नुकसान

* मोनिका गुप्ता

अनेक मुली त्यांच्या फ्रिझ हेयरमुळे कंटाळलेल्या दिसतात. फ्रिझ हेयरमुळे केस सांभाळणं कठिण होऊन बसतं. यामुळे अनेक हेयर स्टायलिस्ट कॅरेटिन करण्याचा सल्ला देतात. खरंतर, कॅरेटिन एक अशी हेयर ट्रीटमेंट आहे ज्यामुळे केस सरळ, मुलायम आणि नॉन फ्रिझ होतात. कॅरेटिन ट्रीटमेंट केसांसाठी फायदेशीर तर आहेच परंतु याच्या साईड इफेक्ट्सकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

चला तर जाणून घेऊया कॅरेटिन ट्रीटमेंटचे फायदे आणि तोटे :

कॅरेटिन ट्रीटमेंट काय आहे?

कॅरेटिन आपल्या केसांच्या वरच्या थरावर असतं, हे एक नैसर्गिक प्रोटीन आहे. यामुळे केसांना चमक येते. प्रदूषण, केमिकल प्रॉडक्ट्सचा वापर आणि कडक उन्हाच्या संपर्कात आल्याने केसांचं नैसर्गिक प्रोटीन निघू लागतं आणि केस कोरडे दिसू लागतात.

केसांच्या नैसर्गिक प्रोटीनची उणीव भरून काढण्यासाठी कॅरेटिन ट्रीटमेंट केली जाते. कॅरेटिन ट्रीटमेंटसाठी केसांमध्ये आर्टिफिशियल कॅरेटिनचा वापर केला जातो. या ट्रीटमेंटनंतर केस मुलायम आणि चमकदार दिसू लागतात. कॅरेटिन केसांमध्ये ६ ते ७ महिने राहतं.

कॅरेटिनचे फायदे

केसांना मिळतं पोषण : कॅरेटिनमुळे केस मॅनेज करणं सोप होऊन जातं. यामुळे केसांना पोषण मिळतं. जेव्हा आपण केसांवर हिटचा अतिरिक्त वापर करतो तेव्हा केसांमधून कॅरेटिन निघून जातं. अशावेळी कॅरेटिन ट्रीटमेंटने केसांना प्रोटीन मिळतं. डॅमेज केस पूर्ववत करण्यासाठी ही छान ट्रीटमेंट आहे.

कोरडया केसांमध्ये सुधारणा : केसांमध्ये केमिकल प्रॉडक्ट्स, ब्लो ड्रायर, आयर्न आणि हॉट रोलरचा वापर केल्याने केस रुक्ष आणि कोरडे होतात. केसांची चमक पूर्ववत होण्यासाठीदेखील कॅरेटिन ट्रीटमेंट केली जाते.

मुक्तता फ्रि हेयरपासून : फ्रिझ हेयरवाल्या अनेक स्त्रिया त्यांच्या केसांमुळे चिंतीत असतात. फ्रिझ हेयरमुळे कोणतीही हेयरस्टाईल करणं थोडं कठिण होऊन बसतं. अशा वेळी केसांसाठी कॅरेटिन उत्तम पर्याय आहे. कॅरेटिन नंतर केस सरळ, मुलायम आणि चमकदार दिसू लागतात आणि हेयरस्टायलिंग सहजपणे करता येते.

कॅरेटिनने केस सुरक्षित : कॅरेटिन ट्रीटमेंटने तुमचे केस सुरक्षित राहतात. कॅरेटिन केल्यानंतर तुमच्या केसांना एक अधिकचा संरक्षक थर मिळतो जो तुमच्या केसांचं बाहेरच्या धुळीपासून संरक्षण करतो.

कॅरेटिन ट्रीटमेंटने होणारे तोटे

कॅरेटिन ट्रीटमेंटने काही तोटे देखील आहेत :

* कॅरेटिन ट्रीटमेंटने केस पूर्णपणे सरळ होतात. ज्यामुळे केसांचा व्हॉल्युम निघून जातो. केसं घनदाट दिसत नाहीत.

* कॅरेटिननंतर केस लवकर तेलकट होतात.

* कॅरेटिननंतर तुम्हाला महागडे शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करावा लागतो.

* जर तुम्ही दुसऱ्या शॅम्पूचा वापर केला तर तुमच्या केसांचं नुकसान होतं.

* केस तेलकट झाले की हेयर वॉश करावे लागतात. जर तुम्ही अधिकाधिक हेयर वॉश केलं तर तुमच्या केसांवरच कॅरेटिन लवकर निघून जाईल.

* कॅरेटिन करण्यासाठी पैसे अधिक खर्च होतात आणि याचा प्रभाव फक्त ६ महिनेच राहतो.

* कॅरेटिनमध्ये फॉर्मलडिहाईड नावाचं केमिकल असतं जे आरोग्याच्या विविध समस्यां निर्माण करतं.

* तुम्हाला त्वचेशी संबंधित एखादा आजार असेल तर कॅरेटिन करण्यापूर्वी त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें