ज्वेलरी बोल्ड घ्यावी की क्लासिक

– सोमा घोष

या वर्षी बोल्ड, क्लासिक, विविध रंगांच्या मिश्रणाने तयार केलेले दागिने, मीनाकारी आणि निरनिराळया स्टोन्सपासून तयार केलेल्या दागिन्यांचा ट्रेंड आहे, जे प्रत्येक स्त्रीला कोणत्याही कार्यक्रमात घालायला आवडतात. याशिवाय क्लासिक डायमंड ज्वेलरी, ज्यात हिऱ्याशिवाय रूबी वगैरेंचे विविध रंगीबेरंगी स्टोन्स वापरून तयार केलेले दागिने खूप ट्रेंडमध्ये आहेत.

रोज गोल्डचाही खूप ट्रेंड आहे. यामुळे क्लासी, एलिगंट लुक दिसतो. भारतीय स्किन टोनवर हा खूप छान दिसतो. भारतीय पोषाखच नाही तर त्याबरोबरच दागिने घालण्याचाही ट्रेंड आजकाल जोर धरू लागला आहे.

महिलांची आवड

याबाबतीत वोईलाचे ज्वेलरी डिझायनर संजय शर्मा सांगतात की आजच्या महिला प्रत्येक दागिन्यात काहीतरी नवीन शोधतात, म्हणून आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागते. ट्रेडिशनल बोल्ड एलिगंट चोकर आणि इअररिंग्स यावेळचे खास आकर्षण आहेत, जे केव्हाही घालता येतात. ट्रॅप्ड आणि प्रोटेक्टेड जेमस्टोनमध्ये पारंपरिक डिझाईनचे रत्न बसवले जातात. रंगीत असल्याने प्रत्येक रंगाच्या ड्रेसबरोबर घालता येऊ शकतात. आजकाल फ्लुइड फॉर्मचे कपडे जास्त परिधान केले जातात. त्यामुळे ते अधिक सुंदर दिसावे यासाठी फ्लुइडवाल्या दागिन्यांचा वापर छान  दिसतो.

फ्रिल्स आणि रफल्सच्या पोशाखात सर्वाधिक दागिन्यांना मागणी आहे. कित्येक रंगांच्या मिश्रणापासून तयार केलेले हे दागिने महिलांना खूप आवडतात. रंगांच्या ट्रेन्डबाबत बोलायचं झालं तर पेस्टल ग्रीन आणि ऑरेंज लग्न किंवा इतर कुठल्याही समारंभात घातले जाऊ शकतात.

कॅज्युअल वेअरबरोबर इंडिगो ब्लु, डार्क ब्लु, इंडिगो टर्क्वाइश ब्लु इत्यादी रंगांचे दागिने लोकप्रिय आहेत. हे दागिने कोणत्याही समारंभात घातले जातात. याशिवाय ऑक्सिडाइज्ड दागिने किट्टी पार्टी किंवा गरबा इत्यादि समारंभात घातले जातात.

नोकरदार महिलांची आवड

दागिन्यांचे डिझाईन तयार करताना ३ गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते ते म्हणजे त्याची अस्थॅटिक व्हॅल्यू, घालायला आरामदायक आणि किंमत कमी असणे, कारण आजकाल स्त्रिया कमी किंमतीत सुंदर डिझाईन शोधतात, जे कोणत्याही समारंभात वापरता येतील.

ब्रायडल ज्वेलरीत तर स्त्रिया सगळया प्रकारचे दागिने घालतात जसे की मांगटिका, नथ, गळयातला चोकर, मध्यम हार, लवंगहार,कानातले झुमके किंवा चंद्रासारखी बाली, बाजूबंद, हातातली फुलं, कंबरपट्टा, पैंजण, बिछिया वगैरे. यातही चोकर नेकलेस सगळयात लोकप्रिय आहे.

याशिवाय ३८ इंचापासून ते ४० इंच लांबीची टे्रडिशनल चेनसुद्धा एखाद्या पार्टीत स्त्रीची शोभा वाढवते. मोठया इअर रिंग्सचीही आजकाल फॅशन आहे. यात नेकपीस न घालतासुद्धा तुम्ही सौंदर्य कायम ठेवू शकता.

ऑफिसला जाणाऱ्या महिलांची आवड सामान्य महिलांपेक्षा वेगळी असते. त्या जास्त करून लहान झुमके, लहान इअररिंग्स सामान्य क्लासिक ड्रेसवर घालण्याला पसंती देतात. त्या सामान्यत: असे दागिने खरेदी करतात, जे त्यांच्या सगळया ड्रेसवर घालता येतील.

चलनातील दागिने

संजय म्हणतात की ट्रेंडपेक्षाही जास्त दागिने चेहऱ्याप्रमाणे घालायला हवे. लंबगोलाकृती, गोल आणि चौकोनी चेहरा असणाऱ्या महिलांनी याकडे लक्ष द्यायची आवश्यकता आहे. लंबगोलाकृती महिलांसाठी मार्कीज आकाराचे कानातले छान दिसतात, याउलट गोल आकार असणाऱ्यांनी झुमके घालणे जास्त छान असते. चोकोनाकृती चेहऱ्यासाठी भौमितिक आकाराचे कानातले चांगले दिसतात.

टीनएजर मुलींमध्ये लहान रंगीत, नाजूक दागिने घालण्याचा अधिक ट्रेंड आहे. आता नोज पिन, नोजक्लिपचा ट्रेंडही यांच्यात जास्त आहे. हे त्या वेस्टर्न ड्रेससोबत अगदी सहज घालू शकतात.

मध्यमवयात ट्रेडिशनल, कलाकुसरीचे काम केलेले क्लासिक, फाईन गोल्डचे दागिने अधिक पसंत केले  जातात. याशिवाय झुमके, चांदबाली, जाळीचे काम, डायमंड लुक अधिकिने ट्रेंडमध्ये आहे. ५० पेक्षा अधिक वयाच्या महिलांसाठी सिंगल लाईन नेकलेस, कुंदन नेकलेस, प्युअर डायमंड किंवा गोल्डचे हातातले कडे वगैरे लोकप्रिय आहेत.

आजकाल रंगीत ज्वेलरीसुद्धा विशेष चलनात आहे, ज्यात नैसर्गिक स्टोन्स लावलेले असतात. यामुळे दागिन्यांचा भाव जास्त वाढल्याने कित्येकदा सेमीप्रेशिअस स्टोनचासुद्धा वापर सोन्याबरोबर केला जातो, जो दिसायला खराच वाटतो आणि बजेटमध्येही असतो.

Monsoon Special : पावसाळ्यात दागिन्यांची विशेष काळजी घ्या

* गृहशोभिका टीम

तुमच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या दागिन्यांची योग्य काळजी घेतली नाही तर त्यांचा रंग फिका पडू लागतो आणि त्यांची चमकही नष्ट होते. काळजी न घेतल्यास दागिन्यांचा रंग निखळू लागतो आणि ते सहज तुटू शकतात. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की तुम्ही तुमच्या दागिन्यांची काळजी कशी घेऊ शकता आणि त्यांची चमक कशी टिकवून ठेवू शकता.

दागिने स्वच्छ ठेवा

दागिन्यांची चमक टिकवून ठेवण्यासाठी, ते व्यवस्थित स्वच्छ आणि वाळवा. नेकलेस, अंगठी, ब्रेसलेट, कानातली अंगठी किंवा दागिन्यांची कोणतीही वस्तू असो, ती कोणत्याही क्रीम, लोशन, परफ्यूम आणि तेल किंवा पाण्याने स्वच्छ ठेवावी. दागिने घालण्यापूर्वी त्यावर क्रीम किंवा परफ्यूम लावायला विसरू नका. सर्व दागिने स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवा जेणेकरून त्यांचा रंग एकमेकांमुळे खराब होणार नाही. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या दागिन्यांचे छोटे बॉक्सही मोठ्या बॉक्समध्ये ठेवू शकता.

काळजी घ्या

तुमचे फॅशनचे दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवा. हार त्याच्या हुकमध्ये ठेवून ठेवा आणि कोणतेही दागिने एकमेकांना चिकटणार नाहीत. कोणत्याही मौल्यवान दागिन्यांना एकमेकांना अजिबात स्पर्श करू नये अन्यथा ते गंजू शकतात.

परिधान केल्यानंतर स्वच्छ करणे सुनिश्चित करा

काही वेळा दागिने घातल्यानंतर अंगठ्या, कानातल्या अंगठ्या, नेकलेस घातल्यानंतर त्यावर साबण, तेल किंवा अत्तर लावले जाते. यामुळे दागिन्यांवर काळेपणा येऊ शकतो किंवा त्यांची चमक जाऊ शकते. हे टाळण्यासाठी दागिने घातल्यानंतर स्वच्छ करायला विसरू नका.

दागिने घालून झोपण्याची चूक करू नका

झोपण्यापूर्वी नेहमी आपले दागिने काढा. जर तुम्ही झोपण्यापूर्वी दागिने काढले नाहीत तर तुमच्या या निष्काळजीपणामुळे दागिने खराब होऊ शकतात. त्यामुळे दागिने तुटण्याचाही धोका असतो. दुसरीकडे, दागिने घातल्याने तुमच्या त्वचेला खरचटले जाऊ शकते.

योग्य ज्वेलरीची करा निवड

* अनुष्का जैन

घर असो किंवा बाहेर किंवा कॉर्पोरेटचे जग, महिलांना आभूषणांपासून दूर ठेवणे कठीण आहे. कार्यालयांमध्ये जाऊन काम करणाऱ्या महिलांना योग्य दागिन्यांची निवड करणे कठीण जाते, कारण त्यांना कार्यालयांच्या नियमांना तसेच वातावरणाला अनुसरून दागिने परिधान करावे लागतात.

तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलेलो आहोत, ज्याच्या सहाय्याने तुम्ही योग्य आभूषणे निवडू शकता.

भडक दागिने नको : कपडयांप्रमाणे दागिनेदेखील भडक नसले पाहिजेत. काही कार्यस्थळांमध्ये जास्त दागिने घालण्याची परवानगी नसते. कार्यस्थळांना जण्यासाठी दागिन्यांची निवड विचारपूर्वक केली पाहिजे. शेवटी तुम्ही काय परिधान करता त्यावरून तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण दिसून येतात.

त्वचेचा रंग लक्षात ठेवून निवडा आभूषणे : दागिने तुमच्या त्वचेच्या रंगानुसार आणि तुम्ही कशासह परिधान करणार यावर अवलंबून असते. मेटल आणि जेमस्टोनमुळे त्वचेवर चमक येते. यांचा रंग स्पेक्ट्रम गोल्ड, सिल्व्हर, रोज गोल्ड, टर्काइज आणि एमेथिस्ट असू शकतो.

आभूषणे शरीराच्या अनुरुप असावीत : आभूषणांचा आकारदेखील महत्त्वाचा असतो. त्याची निवड करण्यापूर्वी आपल्या शरीराकडे लक्ष द्या. उदाहरणार्थ नेकलेस किंवा इयररिंग्सचा आकार असा असावा की सहकर्मचाऱ्यांची नजर त्यावर खिळून नाही राहिली पाहिजे.

जॉमेट्रीक आकार निवडा : आभूषणांची डिझाइन साधी-सरळ असावी. त्यामध्ये सर्कल, आयत अशा जॉमेट्रीक डिझाइन्स परिधान केल्यावर सालस दिसतात. यामुळे सहकर्मचाऱ्यांचे लक्ष अनावश्यकपणे आकर्षित होणार नाही. डिझाइन कपडयांशी मिळत्या-जुळत्या असाव्यात. कॉर्पोरेटमधील महिला ओव्हल डायमंड इयररिंग, छोटे पेंडेंट आणि साधे डायमंड बँड परिधान करू शकतात.

बोल्ड पीस : जर तुम्ही सर्व आभूषणांना सिमीत केले असेल, तर तुम्ही एक मोठा बोल्ड पीस निवडू शकता. तुम्ही क्लासी इयररिंग्स किंवा स्टेटमेंट रिंग परिधान करू शकता. ऑफिस शर्टसोबत नेकपीस मॅच करू शकता. आपल्या शर्टवर कटवर्क नेकलेस किंवा गोल्ड इटालियन चेनसोबत जेमस्टोन पेडेंट परिधान करू शकता.

सर्व परिधानांसाठी पर्ल किंवा मोती : पर्ल म्हणजेच मोती हे कॉर्पोरेट जगतातील सर्वोत्तम आभूषण समजले जाते. कानात मोत्यांचे स्टड्स, हातात मोत्यांचे ब्रेसलेट परिधान करा. जर ब्रेसलेट तुम्हाला सहज वापरता येत नसेल तर मोत्यांची साधी माळ परिधान करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें