काय असावं पत्नीचं आडनाव

* नाज खान

आशियातील महाद्वीप असलेल्या जपानमध्ये स्त्री अधिकारांचा पराभव झाला. तांत्रिकदृष्ट्या संपन्न देश असलेल्या जपानमध्ये ५ स्त्रियांनी न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या नावासोबत पतीचं आडनाव न लावण्याबाबत अर्ज दाखल केला होता. परंतु याबाबत न्यायालयाने स्त्रियांच्या विरोधात निर्णय सुनावला. यामुळे आता स्त्रियांना आपल्या नावासोबत पतीचं आडनाव लावणं गरजेचं आहे. हा त्या देशाच्या घटनेचा निर्णय आहे, ज्या देशात शिक्षासंपन्न लोक आहेत, जी तंत्रज्ञानात खूप पुढे आहेत आणि जिथे वृद्धांची संख्या तरुणाईपेक्षा अधिक वेगाने वाढतेय. खरं तर त्या देशात तर स्त्रियांबाबत अधिक उदारतेच्या गोष्टी समोर यायला हव्या होत्या, परंतु त्याच देशात या निर्णयानंतर स्त्रियांसाठी संघर्ष अधिकच वाढलाय.

जपानी न्यायालयाच्या मते हा कायदा संविधानाच्या विरोधात जाऊ शकत नाही. याव्यतिरिक्त अजून एक कायदादेखील आहे जो स्त्रियांना घटस्फोटानंतर ६ महिन्यांच्या आत लग्न करायला सहमती देत नाही. हे दोन्ही कायदे १९व्या शतकातील आहेत जे अजूनही बदलले गेले नाहीएत. त्या देशात स्त्रियांना आजदेखील पतीच्या नावापेक्षा स्वत:चं अस्तिव निर्माण करण्याचा अधिकार नाहीए.

पतीचं आडनावच का?

अशावेळी स्त्रियांच्या मनात प्रश्नांचं काहूर माजणं स्वाभाविक आहे की यासाठी पतीचं आडनाव आपल्या नावापुढे लावणं किती योग्य आहे.

आजच्या नव्या युगात काही नामवंत स्त्रिया आडनावाच्या सोबत पतीचं आडनावदेखील लावतात परंतु तरीदेखील प्रश्न मनात येतोच की आधुनिक समाजातदेखील पत्नीनेच पतीचं आडनाव का लावावं?

जी मुलगी लग्नापूर्वी वडिलांच्या आडनावासोबत आपलं शिक्षण पूर्ण करते आणि स्वत:ची ओळख निर्माण करते, लग्न होताच अचानक तिची ओळख बदलते. तिच्या नावासोबत पतीचं आडनाव जोडलं जातं. आपल्या नावासोबत पतीचं आडनाव लावायचं आहे की नाही हे तिला विचारलंच जात नाही. मात्र हे आडनाव जेव्हा तिच्यावर थोपवलं जातं तेव्हा तिथे स्त्रीच्या होकाराचा प्रश्नच कुठे निर्माण होतो? अर्धांगिनी म्हणत घरी आणल्या जाणाऱ्या स्त्रीला अर्धा अधिकार तरी कुठे दिला गेलाय? माहेराहून सासरी येताच तिचं नाव कधी बदललं जातं, याची तिला जाणीव कुठे होते आणि तिला एका नव्या नावाने हाक मारली जाते, जणू एका रात्रीत एका नात्याने तिची अनेक वर्षांची ओळख हिरावून घेतली.

सर्व देशांची वागणूक एकसारखी

जेव्हा पतीशी पत्नीचं नातं तुटतं तेव्हा यापेक्षादेखील अधिक दु:ख होतं. पती मुलंबाळं, घरदार प्रत्येक गोष्टींबरोबरच पत्नीकडून आपलं नावदेखील हिरावून घेतो आणि पत्नी वर्षानुवर्षं एकाच घरात राहूनदेखील अचानक आपली ओळख शोधू लागते की शेवटी तिचं अस्तित्त्व नेमकं काय आहे? लग्नापूर्वी वडिलांचं नाव तिची ओळख होती, जी रक्ताचं नातं असल्यामुळे आयुष्यभर तुटायला नको होती. जसं तिच्या भावाचं नाव तिच्या वडिलांच्या नावासोबत अतूट आहे, तसंच तिच्यासोबतदेखील व्हायला हवं होतं. परंतु ती मुलगी आहे, म्हणून तिची ओळख तिच्या पतीशी आहे आणि पती जेव्हा तिच्याशी नातं तोडतो तेव्हा तिने आपली ओळख कुठे शोधायची? मग पुन्हा वडिलांचं नाव आपल्या नावाशी जोडायचं वा पतीच्या आडनावालाच नावासोबत राहू द्यायचं का?

जगात प्रत्येक देशात स्त्रियांसाठी एकसारखा कायदा आहे. मग तो जपान असो वा चीन, इस्लामिक देश असो वा ख्रिश्चन देश वा मग सनातन समाज.

धर्ममजहबच्या साच्यात भलेही हे देश एक नसतील, परंतु महिलांवर लादल्या जाणाऱ्या अधिकारांच्या बाबतीत सर्व देशांची वागणूक एकसारखीच राहिलीय. मग ती स्त्री शिक्षित असो वा अशिक्षित, गरीब असो वा श्रीमंत सर्वांवर पुरुष अधिकार लागू होतात.

प्रश्न फक्त अस्तित्वाचा नाही

खरंतर प्रश्न फक्त अस्तित्वाचा नाहीए. जी व्यवस्था लग्नापूर्वी कायम होती, त्यामध्ये अचानक बदल होण्याने अडचणी निर्माण होतात. जसं लग्नापूर्वी सर्व शैक्षणिक कागदपत्रं, ओळखपत्रं, पासपोर्ट, रेशनकार्ड इत्यादींवर वडिलांचं आडनाव असतं, परंतु लग्नानंतर एक तर यामध्ये बदल केला जातो जे खूपच कटकटीचं काम आहे वा मग पत्नीचं व्यावहारिक नाव आणि कागदपत्रांमध्ये नाव दोन्ही वेगवेगळी ओळख असतात.

खरंतर आपण समाधान मानून होतो की स्त्रिया आपल्या या अधिकाराबाबत जागरूक झाल्या आहेत आणि भलंही जपानची घटना त्यांच्या पतीच्या नावापेक्षा वेगळी ओळख देत नसली, तरी तिथे स्त्रियांचा संघर्ष अजूनही सुरूच आहे.

२००७ सालचं कॅलिफोर्नियाचं एक विधेयकदेखील उदाहरण म्हणून देऊ शकतो. या विधेयकामध्ये कोणताही पुरुष आपल्या पत्नीचं आडनाव आपल्या नावासोबत जोडण्यास स्वतंत्र आहे. या विधेयकाचा निर्णय एका जोडप्याने दाखल केलेल्या याचिकेनंतर देण्यात आला होता. या याचिकेत पतीने पत्नीचं आडनाव आपल्या नावासोबत लावण्याची इच्छा प्रकट केली होती.

इतिहासात महिलांना अधिकार मिळाले आहेत, परंतु यासाठी त्यांना बराच त्रास सहन करावा लागला होता. कदाचित याच सामाजिक व्यवस्थेला पाहून ‘द सेकंड सेक्स’ची फ्रेंच लेखिका सीमोन द बसने म्हटलं होतं की स्त्री असत नाही तर ती बनविली जाते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें