उत्सवाच्या ड्रेसमध्ये सजण्यासाठी तयार व्हा

* सुमन वाजपेयी

उत्सव कोणताही असो, परंपरेची छाप आजही त्यांच्यावर दिसून येते. चकाकणाऱ्या आणि सोन्याच्या तारेच्या साड्या आणि जरी-किनारी असलेल्या साड्यादेखील उत्सवाला अभिमानास्पद बनवतात. भरतकाम, कुंदन, सिक्विन, मणी, अर्ध मौल्यवान दगड, नवरत्न दगडांनी भरलेले कपडे वस्त्रांना उत्सवाच्या निमित्ताने पसंती दिली जाते. तुम्ही साडी, लेहंगाचोली किंवा सलवार सूट परिधान करा, चांदीचा धागा, धातूचे सोन्याचे काम किंवा प्राचीन झारी आणि जरदोजीचे काम तुमच्या सौंदर्यात भर घालतील. बॉर्डर, आस्तीन, मान किंवा वर्तुळावर बनवलेला नमुना उत्सवाच्या दिवशी तुम्हाला खास बनवेल.

हल्ली कॉकटेल साड्यांचा ट्रेंडही वाढला आहे. प्लेट्स असण्याऐवजी या साड्यांमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या कळ्या असतात. जेव्हा तुम्ही कोणाच्या घरी जाता तेव्हा जड साडी घालण्याऐवजी कॉकटेल साडी घाला. या साड्यांना अतिशय ट्रेंडी लुक देतात.

नवीन कट मध्ये सलवार

या दिवसात तुम्हाला बाजारात नवीन शैली आणि डिझाईनचे सलवारही मिळतील. बहुरंगी, ब्रोकेड नमुना असलेली सलवार पोशाखाच्या सौंदर्यात भर घालते. सुरकुत्या असलेला दुपट्टा आणि घागरा कुर्ता असलेला स्किन टाइट फिट चुरीदार अतिशय एथनिक लुक देतो. सिक्वेन्स आणि झरी वर्कची कुर्ती फेस्टिव्ह लूकसाठी परफेक्ट आहे. फक्त झरी भरतकाम केलेल्या शूजसह जोडा. सलवार सूटसह, तुम्ही तिचा दुपट्टा साडीच्या पल्लूप्रमाणे नवीन पद्धतीने घेऊ शकता.

आजकाल उत्सवांमध्ये स्कर्ट घालण्याची फॅशनही वाढली आहे. आपण लांब स्कर्टसह टी-शर्ट घालू शकता. शॉर्ट लेन्थ टॉप आणि दुपट्टासह जिप्सी स्टाईल झारी वर्कच्या लॉन्ग स्कर्टमध्ये तुम्ही फ्रेश लुक घेऊ शकता.

वेडिंग ज्वेलरीचे नवे अंदाज

* टी. राठौड

दागिन्यांशिवाय नववधूचा साजशृंगार अपूर्ण असतो. भावी नववधू आतापासूनच ज्वेलरी शॉपिंगचा प्लान बनवू लागल्या असतील. यावेळी ब्रायडल ज्वेलरीची खरेदी करण्याआधी या काही अनोख्या अलंकारांकडेही लक्ष द्या :

निजामी झुमर

नवाबांच्या खानदानात मोठया आवडीने वापरला जाणारा दागिना म्हणजे निजामी झुमर, तो डोक्यावरील झुमरप्रमाणे कोपऱ्यात लावला जातो. तसं तर झुमरच्या अनेक डिझाईन अलीकडे प्रचलित आहेत, पण सगळयात सुंदर असते निजामी डिजाइन. यावरील बारीक नक्षीकाम पाहून कोणती नववधू याकडे आर्कषित होईल. याचा नवाबी लुक तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो.

बीड ज्वेलरी

जर तुम्ही ट्रेडिशनल लुकला कंटाळला आहात आणि विवाहप्रसंगी मार्डन लुकचा अवलंब करू इच्छित असाल, तर तुम्ही बीड ज्वेलरी नक्कीच वापरली पाहिजे. यात सोन्याच्या साखळया एकत्र जोडून मॉडर्न मॉर्डन लुक दिला जातो. ही ज्वेलरी घातल्यानंतर तुम्हाला इंडोवेस्टर्न लुक मिळतो.

गढवाली नथ

भारतात गढवाली स्त्रियांच्या सौंदर्याची चर्चा कायमच असते. त्यांच्या हेच सौंदर्य अधिक खुलवते. परंपरागत नथ, जिच्या सौंदर्यांसमोर सगळं फिकं वाटतं.

आजकाल गढवाली स्त्रियांव्यतिरिक्त ही नथ देशातील अन्य ठिकाणीदेखील महिला वापरू लागल्या आहेत. जर नववधू थोड्या वेगळया पध्दतीचा साज करू इच्छित असेल, तर गढवाली नथ तिच्यासाठी सर्वात सुंदर दागिना आहे.

खमेर ज्वेलरी

खमेर ज्वेलरी कंबोडीयाच्या परंपरागत डिजाइनच्या रूपात ओळखली जाते. खमेर प्रदेशातील स्त्रिया ही ज्वेलरी मोठया प्रेमाने वापरतात. अलीकडे खमेर ज्वेलरी भारतातही प्रचलित आहे. जर नववधूने आपल्या परंपरागत पोशाखासह खमेर ज्वेलरी वापरली तर तिच्या सौंदर्यात अधिकच भर पडेल. खासकरून या ज्वेलरीचे कडे खूप प्रसिध्द आहेत.

घुंगरू असलेलं पैंजण

घुंगरू असलेलं पैंजन एक असा दागिना आहे, जो नववधूच्या पायांचं सौंदर्य तिप्पटीनं वाढवतो. त्यात मोत्याच्या आकाराचे बारीक बारीक घुंगरू लावले जातात, ज्यांची जाडसर पट्टी पायांना भव्यतेबरोबर सुंदर दिसायला मदत करतात. रॉयल लुक मिळवण्यासाठी होणाऱ्या नववधूने हे नक्कीच वापरले पाहिजेत.

उबिका माथापट्टी

माथापट्टीचं नाव घेताच नववधूच्या मनात दक्षिण भारतीय डिझाईन येते. पण याप्रकारची माथापट्टी आजकाल उत्तर भारतीय लग्नातदेखील नववधू घालणं पसंत करतात. याला परंपरागत रूप न देता मीनाकारी आणि कुंदनकारी डिझाईनने सजवलं जातं, ज्याने तिला एक रॉयल लुक मिळतो. ती डोक्यावर एखाद्या मुकूटाप्रमाणे सजते. ज्याने नववधूच्या सौंदर्याला चंद्राचं रूप प्राप्त होतं.

हसली नेकलेस

परंपरागत आणि जुन्या काळातील ज्वेलरीची आठवण देणारे हसली नेकलेस हल्ली मॉडर्न टच देऊन पुन्हा बाजारात आले आहेत. हा राजस्थानी ज्वेलरीचा एक प्रकार आहे, ज्यात हसली किंवा चंद्राच्या आकाराबरोबर नेकलेस बनवले जातात, जे घातल्यावर गळयाचा गोलाकार आकार उठावदार दिसतो. वेस्टर्न ज्वेलरीमध्येही या डिझाईनची चलती आहे, पण भारतीय पोशाखाबरोबर याचं ट्रेडिशनल रूप खूप पसंत केलं जातं.

लग्नानंतर कार्यक्रमासाठी वापरा असे दागिने

 

शक्यतो असं दिसतं की लग्नानंतर नवरीला दागिन्यांनी मढवलं जातं, ज्याकारणाने तिचा लुक बिघडतो. त्यामुळे तिने नेहमी काळजी घेतली पाहिजे की जर ती हेवी वर्कची डिझाईनर साडी नेसत असेल, तर तिने उठावदार ज्वेलरी सेट वापरू नये. जर बनारसी साडी वापरत असेल, तर त्याबरोबर झुमकेदेखील शोभून दिसतील. त्याव्यतिरिक्त खूप बांगडयाऐवजी रत्नजडीत कडयाच्या जोडयाही किंवा नेहमीच्या डिझाईनपेक्षा चोकर किंवा टेंपल ज्वेलरीही वापरू शकते.

कमी बजेट मध्ये अशी खरेदी करा ज्वेलरी

 

हल्ली रत्नजडीत चोकर वापरायचा ट्रेंड आहे, सोबत नववधू लहान गोलाकार इअररिंग्ज घालू शकते. जर बजेट कमी असेल तर सोन्याबरोबर सेमीप्रिशियस स्टोन्सचा वापर करून दागिने खरेदी करा. या स्टोन्समध्ये रूबी आणि पन्ना वापरलेला असतो, जे बीड्सच्या रूपात सोन्याने बनलेल्या पेडंटमध्ये लावतात. या बीड्सचा वापर तुम्ही रंगानुसार करू शकता. तुम्हाला हवं तर मोत्याचा वापरदेखील करू शकता.

ट्रेंडी फिंगर रिंग्स

* पूनम पांडेय

फुल फिंगर रिंग

फुल फिंगर रिंगची ही डिझाइन संपूर्ण बोटाला व्यापते. या प्रकारच्या अंगठीमुळे बोटाला फुलर असा लुक मिळतो. तुम्ही याला इंडियन आणि इंडो-वेस्टर्न पेहरावासोबत टिम अप करू शकता. पण जेव्हा तुम्ही फुल फिंगर रिंग परिधान कराल त्यावेळी दुसरी कोणतीही अंगठी परिधान करू नका. जर बोट आखूड आणि जाड असेल तर ही फुल रिंग शोभून दिसणार नाही.

मिड फिंगर रिंग

नेहमीच्या अंगठीला बोटाच्या शेवटाला घाला आणि नेल आर्ट रिंगला बोटाच्या सुरुवातीला घाला. पण मिड फिंगर रिंगला बरोबर बोटाच्या मधोमध घाला. म्हणूनच त्याला मिड फिंगर रिंग म्हणतात. विशेष समारंभांव्यतिरिक्त तुम्ही रोज जीन्स, टी-शर्ट, सलवारकमीज वगैंरे सोबतही परिधान करू शकता.

चेन फिंगर रिंग

जर तुमचे हात बारीक असतील तर चेन फिंगर रिंग तुमच्या हाताला भरलेला लुक देतात. एकापेक्षा जास्त बोटातही चेन फिंगर रिंग परिधान करतात. अंगठी चेनच्या सहाय्याने एकमेकांना जोडलेली असते. म्हणूनच याला चेन फिंगर रिंग म्हणतात. परंतु या रिंग्स विशेष प्रसगांसाठीच परिधान केल्या जातात.

कॉकटेल फिंगर रिंग

जर तुम्हाला काही मिनिटांतच फॅशनेबल लुक मिळवायचा असेलतर, आपल्या नेहमीच्या सिंपल रिंगऐवजी जागी कॉकटेल फिंगर रिंग परिधान करा. मोठी आणि बोल्ड साईजच्या कॉकटेल रिंगमुळे नेहमीच स्टायलिश लुक मिळतो. यास तुम्ही वेस्टर्न आउटफिटसोबत परिधान करू शकता. अशी रिंग उंच आणि बारीक स्त्रियांवर जास्त शोभून दिसतात.

फोर फिंगर रिंग

जर तुम्हाला चारही बोटांत अंगठी घालायला आवडतं. तसेच चारही बोटांमध्ये वेगवेगळी अंगठी घालण्याऐवजी फोर फिंगर रिंगला तुम्ही आपली पहिली पसंती बनवू शकता. फोर फिंगर चारही बोटांत एकत्र घातली जाते. ही फोर फिंगर रिंग तुम्ही रोज वापरू शकत नाही. ही केवळ काही खास समारंभांमध्येच परिधान करा.

 

नेल आर्ट रिंग

जर तुमच्याकडे नेल आर्ट करून घेण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही नेल आर्ट रिंगचा वापर करू शकता. या अंगठीला बोटाच्या पुढच्या बाजूला नखाच्या इथेच परिधान केले जाते. वेस्टर्न कपडयांवर निऑन, काळ्या-पांढऱ्या शेडस्मधील नेल आर्ट रिंगची निवड करू शकता. भारतीय पारंपरिक कपडयावर ज्येष्ठ नेल आर्ट रिंगची निवड करता येईल.

ट्रिपल फिंगर रिंग

डबल फिंगर रिंगप्रमाणे ट्रिपल फिंगर रिंगलाही अनेकांची पसंती मिळत आहे. ही एकत्र तीन बोटांत परिधान केली जाते. सिंपल डायमंडसह कलरफुल डायमंडमध्येदेखील या रिंग्ज उपलब्ध आहेत. तुमच्या पेहरावांनुसार रिंगची निवड करा.

डबल फिंगर रिंग

अशाप्रकारची अंगठी एकावेळी दोन बोटांत परिधान करता येते. या डबल फिंगर रिंगचा लुक एकदम स्टाइलिश दिसतो. साध्या डबल रिंगपासून अगदी ह्युज डिझाइनवाल्या डबल रिंग बाजारात उपलब्ध आहेत. रोज वापरण्यासाठी सिंपल स्टाइलच्या डबल रिंग वापरा आणि विशेष प्रसंगांकरीता ज्वेल डबल फिंगर रिंगची खरेदी करा. जर तुमची बोटे बारीक असतील तर हेवी आणि जर बोटे जाड असतील तर लाइट फिंगर रिंगची निवड करा.

कफ फिंगर रिंग

बाजारात या कफ फिंगर रिंगची मागणी मोठया प्रमाणात आहे. प्लेन कफसह डिझायनर कफ रिंग देखील बाजारात उपलब्ध आहेत. जर बोटे लांब असतील तर जास्त रुंदीची कफ रिंग निवडा जर बोटे आखुड असतील तर कमी रुंदीची कफ रिंग निवडल्यास बोटे दिसणार नाहीत.

साडी ड्रेपिंगच्या हॉट स्टाइल

* विनीत छज्जर, डायरेक्टर, विनीत साडी

साडी ही एक अशी वेशभूषा आहे, जी पारंपरिक असूनही यात तुमचा लुक हॉटही दिसू शकतो. साडी सर्वांनाच शोभून दिसते. साडी नेसण्याची पद्धत प्रत्येक प्रदेशात वेगवेगळी असते. लहंगा, बटरफ्लॉय, जलपरी इ. प्रसिद्ध स्टाईल आहेत. साडी नेसण्याच्या या काही हॉट स्टाईल खालीलप्रमाणे :

तर मग सणासुदीच्या काळात पारंपरिक भारतीय लुक मिळवण्यासाठी यातील साडी ड्रेपिंगची तुम्हाला आवडेल ती पद्धत निवडा व उत्सवातील मौजमस्तीचा आनंद घ्या.

बटरफ्लाय साडी

बटरफ्लाय पद्धतीने साडी नेसणे थोडेफार निवी स्टाईलसारखेच असते. फक्त पदराचा फरक असतो. या स्टाइलमध्ये साडीचा पदर खूपच अरूंद केला जातो, ज्यामुळे शरीराचा मिडल र्पोर्ट दिसतो.

निवी साडी

निवी साडी नेसणं खूपच सोपे आहे आणि साडी नेसण्याची एक ठराविक पद्धत आहे. या पद्धतीने तुम्ही रोजच्या वापरात किंवा सणासुदीलाही साडी नेसू शकता. आंध्र प्रदेशात या निवी पद्धतीचा उगम झाला आणि आज पूर्ण भारतभरात ही प्रचलित स्टाइल आहे.

पॅन्ट स्टाइल

पॅन्ट आणि जेगिंगसोबत साडीला एक अनोखा लुक मिळू शकेल. ही लेटेस्ट फॅशन मुलींची आणि महिलांचीही आवडती फॅशन बनली आहे. सॉलिड पॅण्टसाठी तुम्ही प्रिंटेड साडी निवडू शकता. हे एक सुंदर कॉम्बिनेशन आहे. यात तुम्ही खूपच सुंदर दिसाल.

मुमताज स्टाइल

पार्टीला जाताना रेट्रो लुकसाठी मुमताज स्टाइलहून सदर पर्याय असूच शकत नाही आणि तुमचा बांधा जर सुडौल असेल तर ही स्टाइल तुमच्यासाठी अगदी   योग्य पर्याय ठरेल.

लहंगा स्टाइल

ही साडी नेसण्याची एक आधुनिक पद्धत आहे, जी साडी आणि लहंग्याच्या रूपात दोन सुंदर भारतीय वेशभूषेचे मिश्रण करते. यात साडी लहंग्याप्रमाणे नेसली जाते आणि यासाठी निऱ्यांची मदत घेतली जाते. या स्टाइलमध्ये बहुंताशी पदर उलटा घेतला जातो. कोणत्याही खास उत्सवाच्या वेळी अशा स्टाइलने साडी नेसणे हा अगदी योग्य पर्याय आहे.

कुर्गी स्टाइल

ही एक खूपच वेगळी स्टाइल आहे. यात साडीच्या निऱ्या मागच्या बाजूला घातल्या जातात म्हणजे तुम्हाला व्यवस्थित चालता येते. यामध्ये पदर फ्रंट चेस्टवरून घेऊन मागे वळवून समोर खांद्यावर टाकला जातो. काखेतील नेकलाईनचा योग्य विचार करून हा पदर सेट केला जातो.

बंगाली स्टाइल

पारंपरिक लुकसाठी साडीच्या बाबतीत बंगाली पद्धतीच्या साडीला काही तोड नाही. यामुळे फक्त ग्रेसफुल लुक मिळतो असे नाही तर ही सांभाळणेसुद्धा जास्त कठिण नसते.

मराठी स्टाइल

नेहमीच्या साड्यांच्या पॅटर्नच्या तुलनेत ही स्टाइल खूपच वेगळी आहे. यासाठी  सहावार साडीऐवजी नऊवार साडी वापरली जाते. हल्ली परकर वापरला जात नाही.

योग्यवेळी योग्य पेहराव

* अनुराधा

भारत देशात वेगवेगळ्या रितीभातींबरोबरच विविध प्रकारचे पेहरावदेखील आपल्याला पाहायला मिळतात. भारत वेगवेगळ्या भाषा, संस्कृती, आहार आणि पेहरावांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. हा एक असा देश आहे जिथे पावलोपावली फॅशनचे अनेक रंग आपल्याला पाहायला मिळतात.

फक्त पेहरावाबद्दल म्हणावं तर भारतात प्रत्येक प्रसंगासाठी वेगवेगळे पेहराव घातले जातात. पण जेव्हा ट्रेण्ड आणि स्टाइल यांचा मेळ होतो, तेव्हा आउटफिटचा म्हणजे पेहरावाचा आराखडा बदलतो आणि पारंपरिक वेशभूषेला फॅशनेबलचं लेबल लागतं.

पेहराव जुना अंदाज नवा

खरंतर भारतात वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या देशांतील राजांनी शासन केलं आहे आणि प्रत्येक शासनात त्या त्या काळचा वेगळा पेहराव भारतात आला आहे. रझिया सुलतानच्या पेहरावापासून प्रभावित होऊन रझिया सूट आणि मोगल काळातील अनारकलीचा सूट आजपर्यंत भारतात स्त्रियांच्या फॅशनचा विस्तार करत आहेत.

म्हणायला तर हे सगळे फार जुने पेहराव आहेत, पण फॅशनने यांना एक वेगळीच चमक दिली आहे आणि त्यांचा पूर्ण कायापालट केला आहे. आपल्या नवीन रूपात अशा प्रकारचे पेहराव लग्न आणि लहानसहान घरगुती समारंभांसाठी ठीक आहेत पण तुम्ही एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीला किंवा एखाद्या ऑफिशियल पार्टीला अशाप्रकारचा सूट घालून जाल तर ही फॅशन मूर्खपणाचीच ठरेल.

पाश्चिमात्य फॅशन

भारतात आलेल्या ब्रिटिशांनीदेखील भारतीयांचा फॅशन सेन्स वाढवला आहे आणि त्यामुळेच आज आपण भारतीय स्त्रियांना पाश्चिमात्य पेहरावांमध्येच जास्त पाहातो.

विनीता सांगतात की आता दर महिन्याला नवीन फॅशन मार्केटमध्ये येत आहे. प्रत्येक नवीन गोष्ट एकदा स्वत:वर जरूर अजमावून पाहावी. कोणत्या प्रसंगी कोणता पेहराव घालावा ही गोष्ट लक्षात घेणंही फार महत्त्वाचं आहे.

अनेक मुली दुपारी होणाऱ्या पार्टीमध्ये इव्हनिंग गाउन घालून जातात. पण खरंतर हे नावानेच स्पष्ट होत असतं की इव्हनिंग गाउन फक्त इव्हनिंग पार्टीसाठी आहेत. अलीकडेच इबे कंपनीने १००० स्त्रियांचं सर्वेक्षण केलं तेव्हा जवळपास १५ टक्के स्त्रिया हीच चूक करत असल्याचं निदर्शनास आलं.

तरुण दर्शवणारी फॅशन

फॅशन अशी जी तुम्हाला अपटुडेट ठेवेल. पण अपटुडेट होण्याच्या नादात अनेकदा स्त्रिया या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत की वयानुसार त्यांच्यावर कोणता पेहराव शोभेल. विशेष म्हणजे घरगुती स्त्रियांसाठी फॅशन म्हणजे रंगीबेरंगी साड्या किंवा एखादा साधासा सलवार कुरताच असतो.

विनीता सांगते की फक्त साड्या नेसणाऱ्या स्त्रियांना आपण असं बोलू शकत नाही की त्या फॅशनेबल नाहीत. अलीकडे बाजारात साड्यांचेही अनेक पॅटर्न मिळतात, त्या तुम्ही वापरू शकता. पण यात पॅटर्ननुसार ड्रेपिंग करणंही फार गरजेचं असतं.

होय, अलीकडे फॅशन वर्ल्डमध्ये साड्यांवरही अनेक प्रयोग होत आहेत. आता साड्यांमध्ये डिझायनर्स क्रिएटिविटी दिसून येते. विशेष म्हणजे ड्रेपिंगचे अर्थात साडी नेसायचे वेगवेगळे प्रकार लक्षात घेऊन साडी डिझाइन केली जाते. मात्र स्त्रिया त्याच जुन्या पद्धतीने साड्या ड्रेप करतात आणि इथेच त्या फॅशनच्या स्पर्धेतून बाहेर पडतात.

फक्त आउटफिट्सच नव्हे, तर अॅक्सेसरीजबाबतही स्त्रिया अनेक वेळा चुका करतात.

फक्त आउटफिट चांगला असणं जरुरी नाही तर अॅक्सेसरीजमुळे आउटफिटचा लुक आणखीन उठून दिसतो. म्हणूनच त्याची निवड योग्य आणि मर्यादित असावी. पण अनेक स्त्रिया आउटफिट आणि अॅक्सेसरीजची निवड करताना योग्य ताळमेळ राखत नाहीत. जसं की जी हेअर अॅक्सेसरिज ट्रेडिशनल आउटफिटसोबत घालायला हवी, त्यांचा कॅज्युअल वेअरसोबत वापर करणं ही फॅशन मिस्टेकच ठरेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें