काय आहे इंटिमेट हायजीन

* गरिमा पंकज

पूर्वी महिला रुढीवादी परंपरेचा प्रभाव असल्यामुळे इंटिमेट हायजीनबाबत बोलायला लाजत. याचे दुष्परिणाम त्यांनाच सहन करावे लागत. त्यांना वेगवेगळया इन्फेक्शनचा अर्थात संसर्गाचा सामना करावा लागत असे. आता मात्र जग बदलले आहे. मुली असो किंवा महिला, त्यांना या विषयावरची सर्व माहिती हवी असते, जेणेकरून त्या निरोगी राहतील.

इंटिमेट हायजीन म्हणजे काय?

इंटिमेट हायजीन म्हणजे अंतर्गत स्वछता. हा पर्सनल अर्थात खासगी हायजीनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. महिलांसाठी अंतर्गत स्वछता राखणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे त्यांना स्वच्छ आणि प्रसन्न वाटते, शिवाय खाज, किटाणूंचा संसर्ग किंवा यूटीआयसारख्या गंभीर आजारांपासूनही रक्षण होते.

मात्र या भागावर साबणाचा जास्त वापर केल्यास तेथील त्वचा रुक्ष होते. जळजळ होऊ लागते. पीएच बॅलन्स (३-५ ते ४.५) बिघडू शकतो. शरीराच्या या भागातील टिश्यूज खूपच संवेदनशील असतात. त्यामुळेच या भागाची जास्त स्वछता किंवा कमी स्वछता, या दोन्हीमुळे समस्या निर्माण होऊ शकते.

इंटिमेट हायजीन राखण्याची योग्य पद्धत

* प्रत्येक महिलेला दिवसातून कमीत कमी दोनदा शरीरातील अंतर्गत भागाची हळूवारपणे स्वच्छता करायला हवी. या भागातील त्वचेवर अति गरम पाणी, रसायनांचा अति वापर केलेला साबण आदींचा वापर करू नका. नेहमी सौम्य साबणाचाच वापर करा.

* ज्या पाण्याचा वापर करणार असाल ते पाणी खूप गरम किंवा थंड असता कामा नये. स्वच्छ, कोमट पाण्याचाच वापर करा.

* अंतर्गत भाग नेहमीच हळूवारपणे धुवा किंवा पुसा. जर तुम्ही टॉवेलने तो भाग जोरात घासून पुसला तर त्या भागातील संवेदनशील टिश्यूजचे नुकसान होऊ शकते.

* या भागातील त्वचा नेहमी सुकी असावी.

* अंतर्गत भागातील स्वच्छतेसाठी सुगंधी रसायनांचा वापर केलेले कुठलेच उत्पादन वापरू नका, कारण ही रसायने योनीच्या आरोग्यासाठी घातक असतात.

* आपल्या अंतर्गत कपडयांच्या स्वछतेकडेही लक्ष द्या. ते चांगल्या साबणाने धुवून उन्हात सुकवा, जेणेकरून यातील किटाणू नष्ट होतील.

* पिरिएड्सवेळी स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्या. प्रत्येक ३-४ तासांनंतर सॅनिटरी पॅड बदला.

* जास्त घट्ट कपडे घालू नका. घट्ट कपडे अंतर्गत भागापर्यंत हवा पोहचू देत नाहीत. यामुळे ओलसरपणा येतो आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो.

* योनी स्त्रावाची समस्या असेल तर तातडीने डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्या.

* जर शरीरातील या भागातून दुर्गंधी येत असेल तर वेळ वाया न घालवता डॉक्टरांकडे जा.

उत्पादनाची खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

आज बाजारात अंतर्गत स्वच्छतेसाठी विविध प्रोडक्ट्स अर्थात उत्पादने उपलब्ध आहेत. ती या भागाची स्वच्छता करण्यासाठी वेगवेगळया प्रकारे मदत करतात. मात्र कुठलेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

उत्पादन हायपोएलर्जेनिक हवे, सोप फ्री, पीएच फ्रेंडली हवे. ते माईल्ड क्लिंजर हवे आणि त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचे नुकसान किंवा जळजळ होता कामा नये. बाजारात अंतर्गत स्वच्छतेसाठीची अशी उत्पादने उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पुरेशा प्रमाणात मॉइश्चरायझर असते, जेणेकरून त्वचा कोरडी होण्याच्या समस्येपासून सुटका होते.

प्युबिक एरियारील भागाची स्वच्छता

आपल्या प्युबिक एरियारील भागाच्या स्वच्छतेकडेही लक्ष द्या. वाटल्यास तुम्ही शेविंग, वॅक्स करू शकता किंवा नियमितपणे ट्रिम करू शकता. प्रत्येक वेळी शेविंग करताना नवीन रेझरचा वापर करा. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होईल.

ज्याप्रमाणे तुम्ही हाता-पायांसाठी साबण किंवा शेविंग क्रीमचा वापर करता त्याचप्रकारे आपल्या प्युबिक एरियाच्या ठिकाणी शेविंग करा. शेविंगपूर्वी साबण किंवा क्रीम वापरून भरपूर फेस काढा.

यामुळे शेविंग करताना कमी घर्षण होईल आणि कापले जाण्याचा धोकाही कमी होईल. सोबतच तुम्ही एखाद्या चांगल्या साबणाने त्या भागाची नियमित स्वछता करा, अन्यथा तेथे किटाणू जमा होतील. अशा प्रकारे स्वच्छता केल्यामुळे तुम्ही विविध प्रकारच्या संसर्गापासून दूर राहू शकाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें