सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता हाच मूलमंत्र

* मोनिका गुप्ता

बुहानच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना नामक रोगाने आता भारतासोबाबत इतर अनेक देशांमध्ये पाय पसरले आहे. हे इतके भयानक संक्रमण आहे कि हे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिपर्यंत सहज पोहोचते. कोरोना संक्रमणापासून दूर राहायचे असेल तर सर्वात आवश्यक आहे ते हात चांगले धुणे. तसे पाहता लोक हात धुण्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. अनेक लोक तर हात धुणे याचा अर्थ  पाणी आणि साबण वाहू देणे असाच घेतात. म्हणजे बहुतांश लोकांना हात धुण्याची योग्य पद्धतच माहीत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये संक्रमण आणि निरनिराळे आजार पसरत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ति वर्षानुवर्षे हे मानत आले आहेत की आजारांपासून दूर राहायचे असेल तर हात धुण्याची प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. एका शोधानुसार आपल्या देशातील ४० टक्के लोक जेवणाआधी हात धूत नाहीत. जर आपण हात धुण्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे पाळली तर आपण अशा अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. कोणत्याही आजाराशी लढण्याचे हात धुणे हे पहिले हत्यार आहे.

का आवश्यक असते हात धुणे

आपण दिवसभर जे काही काम करतो, त्यात आपल्या हातांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे हातांवर किटाणू असणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. जेव्हा केव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, आपण लिफ्टचा वापर करतो. बटणांना स्पर्श करतो, मेट्रोमध्ये हॅण्डल, ऑफिसमध्ये दरवाजाला स्पर्श करणे, नळाची तोटी, रेलिंग इत्यादींना स्पर्श करत जातो. जर आपण आपले संक्रमित हात न धुता जेवण घेतले, कोणाशी हस्तांदोलन केले, घरात लहान मुलांसोबत खेळलो वा त्यांना काही खाऊ घातले तर हातावर असलेले किटाणू रोगजंतू बनून आपल्या लोकांपर्यंत सहज पोहोचतात.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेतील डॉक्टर्सनी ‘डोन्ट टच युअर फेस’ ही  मोहीम चालवली होती. या मोहिमेद्वारे डॉक्टरांना सांगायचे होते की कोविड -१९ पासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या चेहऱ्याला कमीतकमी हात लावा. जर आपण सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय सोडून दिली तर कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरण्याची शक्यता कमी होते. एका संशोधनातून हे लक्षात आले की माणूस एका तासात जवळपास २३ वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो.

यासाठी जागतिक आरोग्य संघटना व रोग नियंत्रण व निवारण केंद्र सीडीसीने अनेक उपाय जाहीर करत लोकांना कोरोनापासून वाचण्याबाबत जरुरी सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यात हात धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे प्रमुख आहेत. याशिवाय चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना हात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यावर आयुस्पाईन हॉस्पिटलमधील सिनियर फिजिओथेरपिस्ट डॉ. सत्यम भास्कर यांच्याशी बोलत असता त्यांनी संगितले की हात कसे धुतले पाहिजे आणि किती वेळ धुतले पाहिजेत.

सॅनिटायझरपेक्षा जास्त चांगले आहे की तुम्ही साबणाने हात धुवा. कारण बाजारात जरुरी नाही की अल्कोहोल बेस्डच सॅनिटायझर असतील. लहान मुलं असो वा वयस्कर लोक सर्वानी कमीतकमी २० सेकंद हात धुवायला हवेत, वास्तविक तुम्ही हात धुण्याची योग्य पद्धत अवलंबली तर हात नीट स्वच्छ होतील आणि तुम्हाला २० सेकंड मोजावे लागणार नाहीत.

हात धुण्याच्या योग्य स्टेप्स

हातांना किटाणूंपासून दूर ठेवण्याच्या या ७ स्टेप्सचे अवश्य पालन करा.

स्टेप्स १ : हात धुण्यासाठी जंतूनाशक साबण वापरा. सर्वात आधी हात ओले करा आणि योग्य प्रमाणात साबण वापरा.

स्टेप्स २ : दोन्ही हातांचे तळवे चांगले चोळा.

स्टेप्स ३ : आता हातांना उलटया बाजूने स्वच्छ करा.

स्टेप्स ४ : आपली बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांना जोडून स्वच्छ करा.

स्टेप्स ५ : आपली नखे चांगली स्वच्छ करा.

स्टेप्स ६ : आपला अंगठा आणि मनगटे चांगली चोळा.

स्टेप्स ७ : आता पाण्याने हात स्वच्छ धुवा.

जर तुम्ही बाहेर असाल जिथे हात धुण्यासाठी तुम्ही साबण अथवा पाणी वापरू शकत नसाल, अशावेळी तुम्ही अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरू शकता. हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करताना तुम्ही हे निश्चित करायला हवे की त्यात ६० टक्के अल्कोहोल असावे तरच हे तुम्हाला लाभदायक ठरेल.

मुलांना असे शिकवा हात धुणे

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ति कमी असते, ज्यामुळे त्यांच्यावर संक्रमण लवकर पसरते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मुलं लवकर लवकर आजारी का पडतात? वास्तविक मुलांचे अस्वच्छ हात त्यांच्या शरीरावर संक्रमण पसरवण्यास जबाबदार असतात. जर मुलाचे हात स्वच्छ नसतील तर त्याच हाताने तो जेवण घेईल, तेच हात डोळे आणि चेहऱ्याला लावेल. मुलाने हात धुणे केव्हा आवश्यक असते याबाबत पालकांना माहिती असायला हवी. हात धुणे किती महत्वाचे आहे हे मुलांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. जर मुलाला वेळेत हे शिकवले की कोणती वस्तू खराब आहे आणि अशा वस्तूला हात लावल्यास हात धुणे अत्यावश्यक असते तर मुलं व्हायरल इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून वाचू शकतात.

सीडीसी च्या रिपोर्टनुसार ५ वर्षापेक्षा कमी वयाची मुलं दरवर्षी डायरिया आणि न्यूमोनियाचे भक्ष्य बनतात. डायरिया हा घाणीमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे अशावेळी घर स्वच्छ ठेवणे व स्वत:ला स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

केव्हा मुलांनी हात धुवायला हवे

* वॉशरुम वापरल्यावर.

* शिंकताना, खोकताना व नाकात बोट

घातल्यास.

* खाण्याआधी व नंतर हात धुणे आवश्यक

आहे.

*  खेळल्यावर.

* द्य दुसऱ्याशी हात मिळवल्यास.

* पैशांना हात लावल्यास.

* बूट, चपलांना हात लावल्यास.

* वर्गात इतर कोणाचे साहित्य वापरल्यास.

* कोणत्याही जखमेला हात लावल्यास.

असे शिकवा आपल्या मुलाला हात धुणे

मुलांना हात धुणे शिकवायला आधी तर त्यांना इंग्रजीतील ही ६ अक्षरं एस, यु, एम, ए, एन, के हे पाठ करायला सांगा. आता याचा अर्थ त्यांना सांगा :

एस : एस चा अर्थ अगदी सोपा आहे – आधी हात सरळ बाजूने स्वच्छ करा.

यु : यु चा अर्थ आहे उलटा, आता हात उलटा करून धुवा.

एम : एम चा अर्थ मूठ. दोन्ही हात जोडा आणि त्याची मूठ  तयार करा आणि रगडा.

ए : ए म्हणजे अंगठा. अंगठा स्वच्छ करा.

एन : एन म्हणजे नखं. आता दोन्ही हाताची नखं साफ करा.

के : के म्हणजे कलाइ (मनगट) नखांनंतर मनगट चोळा.

इंग्रजीतील ही सहा अक्षरं तुमच्या मुलाला अगदी सहज हात धुवायला शिकवतील जे ते कधीच विसरणार नाहीत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें