ब्रेकअपपासून मुक्ती मिळविण्याचे ५ उपाय

* रितू वर्मा

जेव्हा अंशूला समजले की तिची भाची आरवीचे ५ वर्षं जुने नाते तुटले आहे, तेव्हा ती खूप घाबरली. आरवी आणि कबीरची जोडी किती छान होती. दोघेही मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिकत होते. दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले होते, फक्त सामाजिक मान्यता मिळणे बाकी होते. अंशु अतिशय दु:खी मनाने तिच्या बहिणीच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की आरवी अगदी सामान्य दिसत होती आणि खदखदा हसत होती.

अंशूला मनाशी वाटले की आजकालच्या मुलांचे प्रेम पण काय प्रेम आहे. हवं तेव्हा नात्यात पडायचे आणि हवं तेव्हा ब्रेकअप करायचे. ही आजकालची नाती पण काय नाती आहेत? सर्व   केवळ शारीरिक पातळीवरच आधारित आहेत.

अंशूला तिचा तो काळ आठवला जेव्हा तिचे प्रवेशसोबतचे नाते तुटले होते. पूर्ण दोन वर्षे ती या गर्तेतून बाहेर पडू शकली नव्हती. तिने आपले नवीन नाते मोठया अवघडपणे स्वीकारले होते? कधी-कधी अंशूला वाटतं की आजपर्यंत ती आपल्या पतीला स्वीकारू शकली नाही. प्रवेशसोबतच्या त्या तुटलेल्या नात्याची सल अजूनही कायम आहे.

रात्री आरवीने अंशूला मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘मावशी, तू आलीस हे खूप चांगले झाले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे आहे, म्हणूनच तर मी हा निर्णय घेऊ शकले.’’

पण अंशूला वाटले की खरंतर आरवीला कधीच कबीरशी प्रेम जडले नव्हते. पण आरवीच्या म्हणण्यानुसार गुदमरल्यासारखे जगण्याऐवजी जर तुमचे जमत नसेल तर ब्रेकअप करून आगेकूच का करू नये.

दुसरीकडे जेव्हा मानसीचे ऋषीसोबतचे २ वर्षे जुने नाते तुटले तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली. आपल्या बरोबर तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे जगणेही कठीण केले होते, कोणतेही नाते जबरदस्तीने टिकत नसते. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नसेल तर गयावया करण्याऐवजी जर तुम्ही सन्मानाने पुढे वाटचाल केलीत तर ते केवळ तुमच्या जोडीदारासाठीच नाही तर तुमच्यासाठीही चांगले होईल.

जर आपण वैयक्तिक जीवनात या छोटया-छोटया व्यावहारिक टिप्स अवलंबल्या तर खूप लवकर आपण परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू शकता :

हुतात्मा भावनेने फिरू नका : ब्रेकअप झाला म्हणजे तुम्ही २४ तास मुळूमुळू रडक्या तोंडाने फिरत राहावे असे नव्हे. हा जीवनाचा शेवट नाही. आयुष्य तुम्हाला पुन्हा आनंद मिळवण्याची संधी देत आहे. तुमची ओळख ही तुमच्या स्वत:मुळे आहे. अनेकवेळा आपण नात्यांमध्येच आपले अस्तित्व शोधू लागतो. म्हणूनच आपल्याला कोणत्याही किंमतीत ब्रेकअप करायचे नसते. १-२ दिवस मूड खराब होणे स्वाभाविक आहे, परंतु त्या वाईट नातेसंबंधाच्या आठवणी च्युइंगमप्रमाणे दीर्घकाळ ओढत बसू नये.

हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा : एका अपघाताचा अर्थ तुम्ही आयुष्य जगणे थांबवणे असा होत नाही. हृदयाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा. प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ नक्कीच असते. एखादा अनुभव वाईट असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आशेच्या किरणापासून तोंड फिरवावे.

कामात मन लावा : काम हे प्रत्येक आजारावरचे औषध असते, म्हणून स्वत:ला कामात बुडवून घ्या, अर्ध्याहून अधिक दु:ख तर असेच गायब होईल आणि जितके जास्त काम तुम्ही मन लावून कराल तितकी तुमची प्रतिभा अधिक सुधारेल आणि प्रगतीचे मार्ग उघडतील.

आशा सोडू नका : ब्रेकअप झाल्यानंतर लोक निराशेच्या गर्तेत गेल्याचे अनेकदा पाहायला मिळते. एका गुदमरणाऱ्या नात्यात सर्व आयुष्य निराशेत घालवण्यापेक्षा ब्रेकअप करून नव्याने सुरुवात करणे चांगले आहे, आशेचा पदर धरून ठेवा आणि ब्रेकअपनंतर नवीन सुरुवात करा.

आयुष्य सुंदर आहे : आयुष्य सुंदर आहे आणि ब्रेकअपमुळे त्याच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या ब्रेकअपमधून काहीतरी शिका आणि त्याच चुका पुन्हा करू नका.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्रेकअप म्हणजे पूर्णविराम नव्हे, तर नात्याची नवी सुरुवात असते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें