रोज कूल ड्रिंक्सने राहा ताजंतवानं

* पारुल भटनागर

उन्हाळयाबद्दल बोलत असू आणि कुल-कुल ड्रिंक्सचा उल्लेख झालाच नाही असं होऊच शकत नाही, कारण कूल ड्रिंक्स शरीराच्या तापमानाला नियंत्रित ठेवण्यासोबतच शरीराला थंडावा देण्याचंदेखील काम करतात. उन्हाळयात घामामुळे शरीराची जी एनर्जी संपून जाते, ती पुन्हा मिळवून आपण स्वत:ला एनर्जेटिक फील करण्यासाठी सरबताचा आधार घेतो, कारण सरबतांमध्ये कूलिंग प्रॉपर्टीज असतात, सोबतच हे आपल्या शरीराला थंडावा देण्याबरोबरच आपली तणावापासूनदेखील सुटका देण्याचं काम करतात.

तर चला जाणून घेऊया रोजा रोज सिरपच्या खूबींबद्दल, ज्यामध्ये विविध हब्स व ज्यूसेसचा ट्विस्ट, जे तुमच्या ड्रिंक्सच्या टेस्टला वाढविण्यासोबतच तुम्हाला आतूनदेखील ताजंतवानं ठेवण्याबरोबरच तुमच्या आरोग्याचीदेखील खास काळजी घेण्याचं काम करतात.

त्वचेला बनवा तरुण

होय, रोजच्या खूबींनी पुरेपूर सरबत तुमच्या त्वचेसाठीदेखील एखाद्या जादूपेक्षा कमी नाही आहे, कारण यामध्ये आहेत अँटिऑक्सिडंट्स प्रॉपर्टीज, जी त्वचेला डार्क स्पोट्स, एजिंग व फाईन लाइन्सना कमी करण्याबरोबरच तुमच्या त्वचेला आनंदी आणि निरोगी ठेवण्याचं काम करतात. अँटिऑक्सिडंट्स त्वचेला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचून स्किन सेल्सना हील करण्यात व हेल्दी सेल्स निर्माण करण्यात मदत करतात. ज्यामुळे त्वचा पुन्हा उजळते.

ठेवते निरोगी

जर आपण पाचन तंत्राबद्दल बोलत असू तर ते दुरुस्त करण्याचं काम करतं. अँटिइन्फलेमेट्री प्रॉपर्टीज आणि विविध हर्ब्स व फ्रुट्सचे गुण, जे आपल्याला हायड्रेट ठेवण्यासोबतच आपल्याला थंडावा पोहोचविण्याचं काम करतात. सोबतच गट हेल्थलादेखील प्रमोट करून ब्लोटिंगसारख्या समस्येपासून आपल्याला दूर ठेवण्यात सक्षम आहेत. यामुळे आपण उन्हाळयातदेखील स्वत:ला निरोगी ठेवून खाण्याची पुरेपूर मजा घेऊ शकतो.

हे आहेत हर्ब्सने पुरेपूर

हर्ब्समध्ये अँटीइन्फ्लेमेटरी व अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात, जे आपल्याला विविध आजारापासून दूर ठेवण्यात मदत करतात. म्हणून तर रोजा सरबत आहे खास, कारण यामध्ये आहे केवडा, पुदिना, कोथिंबीर, स्टार फ्रुट, लवंग, वेलची, बडीशेप, दालचिनी, गुलाब, खसखस व ओव्याच्या खुबी.

जिथे केवडयामध्ये एंटीइनफ्लेमेंटरी व इस्त्रीनजंट प्रॉपर्टीज असतात, जे त्वचा व पोर्स स्वच्छ करून पोर्सना बंद करण्यापासून रोखतात. तर त्वचेला हायड्रेट व रिफ्रेश फील करण्याचेदेखील काम करतात. पुदिना व कोथिंबीर, जे आपल्या शरीराला थंडावा देण्यासोबतच आपल्या इम्युन सिस्टीमला बूस्ट करण्यात मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट वन न्यूट्रीएंड्सचा सोर्स असल्यामुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून वाचविण्याचं काम करतात. यासोबतच यामध्ये स्टार फ्रुटच्या खूबी, ज्याचं इन अँटीइन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीला बूस्ट करण्यासोबतच वजनदेखील नियंत्रित करण्याचं काम करतात. तसंच लवंग, वेलची, बडीशेप, दालचिनी व ओवा जे अँटीऑक्सिडन्सने पुरेपूर असल्यामुळे हे तुमचं मेटाबोलिझम व पाचन तंत्राला बूस्ट करण्यासोबतच ब्लोटिंगपासूनदेखील सुटका देण्याचं काम करतात. तर गुलाब व खसखसच्या खूबी, ज्यामध्ये कुलिंग              प्रॉपर्टीज व सोबतच विविध विटामिन्स, जे रक्ताभिसरण इप्रुव करण्यासोबतच       तुम्हाला स्ट्रेसपासूनदेखील दूर ठेवण्यास मदत करतात.

ब्रेन केअर

रोज अँटिऑक्सिडंटसारखे विटामिन ए, बी, सी व इ ने पुरेपूर असतात, जे फ्री रेडिकल्सपासून शरीराला वाचवून वेगवेगळया आजारापासून दूर ठेवण्याचं काम करतात. सोबतच यामध्ये विटामिन बी कॉम्प्लेक्स असल्यामुळे हे ब्रेन फंक्शनला योग्य प्रकारेदेखील मदत करतात. हे स्ट्रेस व तणावापासून दूर करून शरीर व ब्रेनला रिलॅक्स करून तुम्हाला शांत झोप घेण्यातदेखील मदत करतात.

डीहायड्रेशनपासून वाचवतात

उन्हाळयात लू लागणे व डीहायड्रेशनचे चान्सेस सर्वाधिक असतात म्हणून आपल्या जिवलगांना प्रोटेक्ट करण्यासाठी योग्य आहारासोबतच हेल्दी ड्रिंक्सची खास गरज असते. हे हायड्रेट राहण्याबरोबरच त्यांना पुरेपूर पोषणदेखील मिळतं. अशावेळी रोज व वेगवेगळया हर्ब्सयुक्त सिरप वा रणरणत्या उन्हाळयात ताजंतवानं ठेवण्याचं कामदेखील करेल. सोबतच तुमच्या इम्युनिटीलादेखील बुस्ट करण्यास मदत मिळेल.

झी टू मेक

लहान मूल असो मोठे प्रत्येकजण रोज सिरप उन्हाळयात खूप आवडीने पितात, कारण हे तुम्ही पाण्यामध्ये मिसळूनदेखील पिऊ शकता, तर तुम्ही हे शेक्स, स्मृदिज, आइस्क्रीम, मिल्क शेक इत्यादीमध्येदेखील तुमच्या आवडीनुसार टाकून त्याची टेस्ट वाढवू शकता. सोबतच भरपूर हेल्थ बेनिफिट्सचा फायदादेखील घेऊ शकता. म्हणजेच टेस्टदेखील चांगली आणि इझी टू युजदेखील. तर मग या समर्स कूल व रिफ्रेशिंग ड्रिंक्सने स्वत:ला आणि तुमच्या जिवलगांना ताजंतवानं ठेवा.

उन्हाळ्यात रूक्ष त्वचा आता नाही

* डॉ. साक्षी श्रीवास्तव, कन्सल्टंट डर्मेटोलॉजिस्ट, जेपी हॉस्पिटल

वास्तविक उन्हाळ्याच्या दिवसात काही लोकांची त्वचा तेलकट होते, परंतु ज्या लोकांची त्वचा नैसर्गिकरित्या कोरडी असते, अशांची त्वचा उन्हाळयात जास्तच कोरडी होउ लागते.

कोरडी त्वचा ओळखण्यासाठी तुम्ही प्रथम सामान्य त्वचेबद्दल जाणून घेणं जरूरी आहे. सामान्य त्वचेत पाणी आणि लिपिड याचं प्रमाण संतुलित असतं. परंतु जेव्हा त्वचेत पाणी किंवा मेद वा दोन्हींचं प्रमाण कमी होतं, तेव्हा त्वचा कोरडी म्हणजे रुक्ष होऊ लागते. यामुळे त्वचेला खाज सुटणे, त्यावरील थर निघणं, त्वचा फाटणं अशी लक्षणं दिसू लागतात.

सामान्यत: त्वचेचे खालील भाग कोरडे असतात :

हात आणि पाय : सतत तीव्र साबणाने हात धुतल्याने त्वचा रुक्ष होऊ लागते. असे ऋतुबदलाच्या वेळेसही दिसून येते. कपडयांच्या घर्षणामुळेसुद्धा काख आणि जांघांमधील त्वचा कोरडी होऊ लागते. म्हणून उन्हाळयात टाईट फिटिंगचे कपडे घालू नका.

गुडघे आणि कोपर : टाचांना भेगा पडणं हे या ऋतुत अगदी साहजिक आहे. अनवाणी चालणं किंवा मागून उघडी पादत्राणं वापरल्याने या समस्या वाढतात. म्हणून टाचांवर मॉइश्चरायजर लावून त्या ओलसर ठेवा.

जर तुम्ही रुक्ष त्वचेकडे लक्ष दिलं नाही, तर ही समस्या रॅशेस, एझिमा, बॅक्टेरियल इन्फेक्शन वगैरेवर जाऊ शकतं.

रुक्ष त्वचेची कारणं

उन्हाळयात रुक्ष त्वचेची कारणं काही अशी असतात :

घाम येणं : घामाबरोबर त्वचेचा ओलावा कायम ठेवणारं अत्यावश्यक ऑइलही निघून जातं, ज्यामुळे त्वचा रुक्ष होऊ लागते.

योग्य प्रमाणात पाणी न पिणं : उन्हाळयात कमी पाणी प्यायल्याने डिहायड्रेशन होतं. म्हणून पाण्याचं योग्य प्रमाण कायम ठेवण्यासाठी योग्य प्रमाणात पाणी आणि पातळ पदार्थ खायला हवे.

एअर कंडिशनर : थंड हवेत ओलावा कमी असतो, ज्यामुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. याशिवाय जेव्हा तुम्ही थंड हवेतून गरम हवेत जाता, गरम हवा त्वचेतील उरला सुरला ओलावा शोषून घेते. यामुळे त्वचा कोरडी होऊ लागते.

अनेकदा अंघोळ करणे : अनेक अंघोळ केल्याने त्वचेतील ऑइल निघून जाते. याशिवाय स्विमिंग पूलमध्ये पोहल्याने क्लोरिन त्वचेतील नैसर्गिक सिबम ठरवते आणि त्वचा रुक्ष होते.

रुक्ष त्वचेपासून स्वत:चं रक्षण कसं कराल

* अशा गोष्टींपासुन दूर राहा, ज्या त्वचेचा ओलावा शोषून घेतात. जसे अल्कोहोल, अॅस्ट्रिनेंट किंवा हॅन्ड सॅनिटायझिंग जेल.

* कठोर साबण आणि अँटीबॅक्टेरियल साबणाचा वापर करू नका, कारण हे त्वचेतील नैसर्गिक ऑइल शोषून घेतात.

* रोज स्क्रबिंग करू नका. आठवडयातून एकदा किंवा ३ वेळा स्क्रबिंग करा.

* सनस्क्रीन लोशन लावूनच घराबाहेर पडा. युव्ही किरण त्वचेच्या संपर्कात आल्याने फोटोएजिंगची समस्या उद्भभवू शकते. यामुळे त्वचा रुक्ष होते.

* लीप बाममध्ये मेंथॉल आणि कापूर यासारखे पदार्थ असतात. जे ओठांचा कोरडेपणा वाढवतात.

* ऑइल बेस्ड मेकअपचा वापर करू नका, कारण यामुळे त्वचेचे रोमछिद्र बंद होतात.

* प्रदूषणामुळे त्वचेतील व्हिटॅमिन ए नष्ट होतं, जे त्वचेचे टिशूज दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असतं. अशा वेळी दिवसातून ४-५ वेळा हर्बल फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.

* वाढत्या वयाबरोबर त्वचेची जास्त काळजी घ्यायला हवी. विशेषत: जर तुमची त्वचा ड्राय असेल तर. अँटीएजिंग मॉइश्चरायजर वापरा जेणेकरून त्वचेचा घट्टपणा कायम राहील.

रुक्ष त्वचेची काळजी

पौष्टिक आहार घ्या : असा आहार घ्या, ज्यात अँटीऑक्सिडंटचं योग्य प्रमाण असेल. यामुळे त्वचेत तेल आणि मेद योग्य प्रमाणात कायम राहतं आणि त्वचा मुलायम राहते. बेरीज, संत्री, लाल द्राक्ष, चेरी, पालक आणि ब्रोकोली यात भरपूर अँटीऑक्सिडंट असतात.

सनस्क्रीनचा वापर करा : याचा वापर प्रत्येक ऋतूमध्ये करायला हवा, कारण यूव्ही किरणं त्वचेला नुकसान पोहचवू शकतात.

एक्सफोलिएशन : यामुळे रुक्ष त्वचेचा वरचा थर निघून जातो आणि त्वचेत ओलावा कायम राहतो.

मॉइश्चरायजिंग : चेहरा आणि शरीराच्या त्वचेसाठी वेगवेगळया मॉइस्चरायजरची गरज असते. चेहऱ्याचा मॉइश्चरायजर माईल्ड असावा. या उलट शरीराच्या त्वचेसाठी ऑइल बेस्ड थीक मॉइश्चरायजर असावा.

आपल्या पायांची काळजी घ्या : पायांकडे दुर्लक्ष करू नका. पायांना १० मिनिटं कोमट पाण्यात भिजवल्यावर स्क्रब करा. यानंतर फूट क्रीम किंवा मिल्क क्रीमचा वापर करा. यामुळे पायाची त्वचा मऊ होईल.

घरगुती उपचार

* नारळाच्या तेलात असलेले फॅटी अॅसिड्स त्वचेला नैसर्गिक ओलावा देतात. झोपण्याआधी नारळाचं तेल लावा. अंघोळीनंतरही नारळाचं तेल लावू शकता.

* ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि फॅटी अॅसिड कोरडया त्वचेला ओलसर बनवतात. हे केवळ त्वचाच नव्हे, तर केस आणि नखांसाठीही फायदेशीर असतं.

* दूध मॉइश्चरायजरचं काम करतं. दूध त्वचेची खाज, सूज दूर करतं. गुलाबजल किंवा लिंबाचा रस दुधात एकत्र करून कापसाच्या बोळयाने त्वचेवर लावल्याने त्वचा मऊ मुलायम होते.

* मधात कितीतरी व्हिटॅमिन आणि मिनरल असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे पपई, केळ किंवा एवोकोडोबरोबर मिसळून हातापायांवर १० मिनिट लावा आणि पाण्याने धुवा.

* योगर्ट त्वचेसाठी उत्तम मॉइश्चरायजर आहे. यात असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी घटक त्वचेला मऊ बनवतात. यात असलेलं लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरियापासूनही रक्षण करतं, ज्यामुळे त्वचेची खाज नाहीशी होते. हे चण्याच्या पिठात, मध आणि लिंबाच्या रसात मिसळून त्वचेवर लावा. १० मिनिटांनी धुवा.

* एलोवेरा त्वचेवरील पुरळ नाहीशी करते, शिवाय डेड सेल्सही नष्ट करण्यास सहाय्यक ठरते.

* ओटमील त्वचेचं सुरक्षा कवच कायम ठेवतं. बाथटबमध्ये एक कप प्लेन ओटमील आणि काही थेंब लव्हेंडर ऑइल टाकून अंघोळ केली तर फ्रेशनेस येतो. हे पिकलेल्या केळ्यात मिसळून फेसमास्क तयार करा आणि लावल्यानंतर १५ मिनिटांनी थंड पाण्याने धुवा.

या उपायांचा वापर करून तुमचा उन्हाळा आनंदी उन्हाळा होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें