आजन्म टिकावं नातं

* ओ. डी. सिंह

पतीपत्नी एकमेकांसोबत गोड क्षणांचं सुख तर अनुभवतातच, पण कडवटपणादेखील एखाद्या आव्हानासारखा त्यांना एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण वातावरणात राहण्याची प्रेरणा देतो. विवाहपद्धतीविना हे जग एक तमाशा बनून राहिलं असतं. मात्र विवाहाने स्त्री पुरुषाच्या संबंधांना समाजात एक स्थायी स्थान दिलं आहे. पाश्चिमात्य देशात आधी ओळख मग प्रेम आणि मग लग्न होत असे, पण आपल्याकडे आधी लग्न आणि मग प्रेम व्हायचं. उत्तर भारतात अजूनही दोन अनोळखी कुटुंबांमध्ये मुलामुलींचं लग्न जुळतं. मात्र अलीकडे होणाऱ्या बुहतांश लग्नांमध्ये मुलंमुली एकमेकांना आधीपासूनच ओळखू लागतात. आपापसांत प्रेम होतं की नाही हे जरूरी नाही, प्रेमविवाहांना प्राधान्यही दिलं जाऊ लागलं आहे.

नातं टिकावं आनंदाने

लग्न कोणाचंही असो, कुठेही असो, एक गोष्ट तर नक्की आहे की मुलामुलीने एकमेकांना ओळखणं फार गरजेचं आहे. कारण आपलं आयुष्य प्रेमाने एकत्र आणि दिर्घ काळ टिकवायचं असतं. आयुष्यात आनंद काही बाहेरून येत नाही. दोघांनी मिळून मिसळून एकमेकांच्या भावनेची कदर करीत सर्व कामं पूर्ण करायची असतात शिवाय हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा ही दोघांची इच्छा असेल. घरातील कोणत्याही कामाची जबाबदारी कोणा एकाची नसते. ही गोष्ट वेगळी आहे की सवलतीसाठी आपण काही कामं वाटून घ्यावीत. काळानुरूप बदल घडू लागला आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे पती ही गोष्ट समजू लागले आहेत.

भांडणाचं कारण

मतभेदाच्या कारणांवर जर नजर टाकली तर असं दिसून येईल की अनेक प्रकरणांमध्ये एक तर एकमेकांच्या कुटुंबांवरून भांडणं होतात किंवा पती पत्नीच्या आयुष्यात कोणी दुसरी वा दुसरा येतं. लग्नानंतर पत्नीला आडनाव तर पतीचंच लावावं लागतं. मात्र आता काही पत्नी माहरेचं आडनावही रिटेन करतात. अनेक कुटुंबांमध्ये असं पाहायला मिळतं की मुलगा आपल्या आईवडिलांशी मोकळेपणाने आपल्या पत्नीच्या आवडी नावडी विषयी सांगू शकत नाही. उलट प्रत्येकवेळी तो पत्नीलाच गप्प करतो. अशावेळी जर दोघांनी एकमेकांना समजून घेतलं तरच पुढे काही होऊ शकेल. कोणत्याही परिस्थित आधी पती पत्नीचं नातं विश्वसनीय असायला हवं, तेव्हाच वातावरण चांगलं बनतं आणि मुलावर चांगले संस्कार होतात.

असंही पाहण्यात येतं की आईवडिल जुन्या युगातील लग्नाशी मुलांच्या लग्नाची तुलना करतात, जे की चांगलं नाही. आधी भांडणं होण्याचे प्रसंगच येत नव्हते. पतीला देव समजलं जायचं, त्याने जो निर्णय घेतला तोच पत्नीला मान्य असायचा. पण आता युग बदललं आहे. मुली शिकून सवरून चांगल्या नोकऱ्या करत आहेत आणि भरपूर पैसा कमवत आहेत. पती पत्नीचं नातं रक्ताचं नातं नसूनही आयुष्यात फार महत्त्वाचं ठरतं. मात्र जे लोक या नात्याचं महत्त्व न समजून घेता, याला खेळ समजतात, एकमेकांच्या भावनेला ठेच पोहोचवतात, त्यांच्याइतका महामूर्ख कोणीच नसेल आणि तिथे कुटुंब उध्वस्त होण्याची वेळ येणं तर स्वाभाविकच आहे.

या उत्सवामध्ये नात्यांना द्या नवे रंग

* शिखा जैन

उत्सव आयुष्य आनंदी आणि नाती मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. ते जगण्यात उत्साह आणि उल्हासाचा रंग भरतात. इतकेच नाही तर नटण्यासजण्याची, नवे नवे पदार्थ चाखण्याचीही संधी देतात.

उत्सव सणांमुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. नात्यांमध्ये आलेला दुरावासुद्धा या सेलिब्रेशनमुळे दूर होतो. चला मग, या उत्सवांमध्ये जुने मित्र आणि नातेवाईकांपासून नात्यांची नवी सुरूवात करू, जेणेकरून जीवनात फक्त आणि फक्त आनंद आणि प्रेम मिळत राहील.

नात्यांचे महत्त्व

नाती सुगंधी फुलांप्रमाणे असतात, जी आपल्या आयुष्यात टवटवी आणि आनंद भरतात. नाती नसतील तर कुठलाही आनंद व्यक्त करण्याला आणि साजरा करण्याला काही अर्थच उरणार नाही. दु:ख असो की आनंद जोपर्यंत ते आपल्या जिवाभावाच्या माणसासोबत शेअर करत नाही तोवर त्याचे महत्त्व कळत नाही. आपल्या भल्याबुऱ्या काळात आपल्याला सांभाळणारी आणि ही जाणीव निर्माण करून देणारी नातीच तर असतात जी सांगततात की आपण एकटे नाहीत आणि आपल्यासोबत प्रत्येक क्षणी आहेत. आणि हेच कारण आहे की सणावारांच्यावेळी त्यांची कमतरता जाणवते. म्हणून नाती इतकी मजबूत बनवा की प्रत्येक सण उत्साहाने सोबत साजरे कराल.

नातेवाईकांशी संबंध वाढवण्यासाठी सण उत्सव हा उत्तम पर्याय : कधी कोणाला कशा प्रकारे मदतीची गरज भासेल सांगता येत नाही. गरज भासल्यास मित्र आणि नातेवाईकांकडूनच मदतीची अपेक्षा करता येऊ शकते. पण असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा त्यांच्याशी आपले संबंध चांगले असतील. मग यावेळी त्यांना आपलेसे करण्यासाठी तुम्हीच पहिले पाऊल उचलावे.

यासाठी सणांच्या दिवशी त्यांच्या घरी मिठाई आणि गिफ्ट घेऊन जा. तुम्ही सणाच्या दिवशी गेलात तर त्यांच्या मनातील कटुता कमी होऊन ते ही झाले गेले विसरून एका नव्या नात्याची सुरूवात करतील.

नात्यांना नवे रूप द्या : आयुष्याच्या गदारोळात अडकल्यामुळे काही नाती मागे राहून जातात. इच्छा असूनही आपण त्यांना जवळ आणू शकत नाही. त्यांच्याशी आपले काही शत्रुत्त्व नसते. उलट संबंध चांगलेच होते, पण तरी ते जवळ नसतात.

आशाचं म्हणणं आहे, ‘‘माझ्या सासरी माझ्या पतीच्या मावशीची मुलगी दिर्घ काळापर्यंत आपल्या शहरात राहिली. तेव्हा प्रत्येक सणाला तिच्या कुटुंबासोबत भेटीगाठी करून एकत्र येऊन सण साजरे करण्याची सवय होती. पण काही वर्षांनंतरच ते दुसऱ्या शहरात राहायला गेले आणि आम्हीही आमच्या व्यापात गुंतलो. अशाप्रकारे सणवार येत जात राहिले. जेणेकरून आम्हा सर्वांनाच जुन्या आठवणींचे स्मरण करता येईल.’’

ही आहे बदल करण्याची संधी : एकत्र कुटुंबात आपल्या माणसांसोबत सण साजरे केल्याने आनंद द्विगुणित होतो. जिथे आजोबा दिवे आणायचे, काका मुलांसाठी फटाके आणायचे, तर आजी, ताई, काकू, आई सर्वजणी मिळून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवत असत. सर्वत्र आनंदाचे मोहमयी वातावरण असे. आपण आपले बालपण अशाच काहीशाप्रकारे जगलो आहे. पण तुम्हाला असे नाही वाटत की आता आपल्या मुलांनीही आपल्या बालपणीसारखी मौज अनुभवावी?

असे करणे ही काही अवघड बाब नाही. तुम्ही तुमच्या गावी एखादा फोन तर करून पाहा. तिथे तुमच्या स्वागताची तयारी तुम्ही फोन ठेवण्याआधीपासून सुरू होईल. जर तुमचे भाऊ दुसऱ्या शहरात राहत असतील तर त्यांनाही बोलवा. जर गावी संपर्क झाला नाही तरी यावेळी सण एकत्र सजरे करा. विश्वास ठेवा यासाठी तुमचे नातेवाईक कधीही नाही म्हणणार नाहीत.

भेटवस्तू असावी काही विशेष : जर आईवडिलांसाठी काही भेटवस्तू घ्यायची असेल तर त्यांचे वय लक्षात घेता एखादे मसाजर, शुगर टेस्ट करण्याचे मशिन, बीपी मशीन, एखादे हेल्थ पॅकेज इ. अशाच प्रकारे भावंडांसाठीही त्याच्या आवडीच्या भेटवस्तू घ्याव्यात. पैसे खर्च होतील हा विचार करू नका, उलट तुमचे बजेट बनवा आणि त्याप्रमाणे खर्च करा. सणांमध्ये सर्वचजण एकमेकांना भेटवस्तू देतात. यामुळे संबंध दृढ होतात.

सोबतीने जत्रा पाहायला जा : हे गरजेचे नाही की सण आहे तर घरीच भेटले पाहिजे. तुम्ही एखाद्या अशा जागेची निवड करू शकता जी सर्वांना जवळ पडेल. तिथे भेटण्याचा कार्यक्रम ठरवा. उत्सवांमध्ये अशा जत्रा, फनफेअर खूप असतात. तिथेही भेटू शकता. मुलंही तिथे छान मजा करतील.

पूल पार्टी करू शकता : जर तुम्हाला असे वाटत असेल की इतक्या लोकांना घरी बोलावून जेवणाची वगैरे व्यवस्था करणे अवघड होईल तर तुम्ही पुल पार्टीही करू शकता. सर्व नातावाईकांनी आपापल्या घरून एक एक पदार्थ बनवून आणावा आणि एकत्र येऊन खूप मजा करावी.

मित्रमैत्रिणींना भेटायला जावे : फोनवर सणांच्या शुभेच्छा देण्यापेक्षा स्वत: जाऊन एखादी भेटवस्तू देणे सर्वात चांगले म्हणून तुमचे जे मित्रमैत्रिणींनी, नातेवाईक दूर असतील त्यांना भेटायला जावे. सणांच्या एक-दोन आठवडे आधीही जाऊ शकता, कारण सणांच्या दिवसात बाहेर पडणे तुम्हाला कठीण जाऊ शकते आणि त्यांनाही सणासुदीच्या दिवसात तुम्हांला वेळ देणे शक्य होणार नाही.

उत्सवांमध्ये नाती दृढ करण्यासाठी काही टीप्स

* जर तुम्ही बऱ्याच कालावधीपासून आपल्या घरी गेला नसाल तर या उत्सवाला जरूर जा आणि आपल्या भावाबहिणींनाही घरी यायला सांगा. सर्व परिवार एकत्रित सण साजरा करेल, तेव्हा जवळीकता वाढेल आणि प्रेमही, सोबतच तुमच्या मुलांनाही नाती समजू शकतील.

* जर खूप दिवस झाले असतील ते मनात काही द्वेष, अढी ठेवू नका. काहींना अशी सवय असते, त्यामुळे लोक त्यांना आमंत्रित करण्यास धजावत नाहीत.

* जर सर्वजण एकत्र जमले असतील तेव्हा नकारात्मक बोलू नका. सणांच्या आनंदात चांगले सकारात्मक बोलावे. एखाद्यावर टिका करून वातावरण खराब करू नका.

* पूर्वी ताटात घरी बनवलेल्या मिठाया सजवून ठेवल्या जायच्या, छानशा विणलेल्या सुंदर रूमालाने झाकल्या जात व ताटे आपल्या शेजारी दिले जायची.

* सर्व नातवाईकांनी एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. जमल्यास तुमच्या नातेवाईकांना काही जुनी छायाचित्रे फोटो फ्रेम करून याप्रसंगी द्या. सर्वजण जुन्या आठवणींमध्ये रमून जातील.

* सरप्राइज पार्टी द्या. ज्यात सर्व बहिणभाऊ आणि मित्रांना सहभागी करा. दिवाळी, नाताळ, न्यू ईअर वगैरे पार्टी करू शकता.

टीप : सण साजरा करण्याच्या विधिंमध्ये ज्या विकृत पद्धती आल्या आहेत, जसे की नशा करणे, जुगार खेळणे, धार्मिक उन्माद निर्माण करणे, ध्वनि प्रदूषण, वायू प्रदूषण अशा बाबी संपुष्टात आणल्या पाहिजेत. सणउत्सव त्यांच्या मूळ भावनेने साजरे करा म्हणजे सुखशांतीमध्ये वृद्धी होईल.

असे बनवा अतूट नाते

* गरिमा पंकज

लग्नाच्या बऱ्याच वर्षांनंतर जेव्हा हनीमूनचा टप्पा आठवणींमध्ये कमी झालेला असतो तेव्हा काही वैवाहिक समस्या डोके वर काढू लागतात. अशा परिस्थितीत हे नाते दृढ करणे आणि वेळेत त्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

जेव्हा आपण जोडीदार कमी व रूममेट अधिक वाटू लागतात : लग्नानंतर बऱ्याच दिवसांनी अशी वेळ येते जेव्हा आपण रोमँटिक जोडीदार कमी आणि रूममेट्ससारखे वागणे जास्त सुरू करता. आपण दीर्घकाळ दृढ नातेसंबंधात रहावे. यासाठी परस्पर आकर्षण राखणे आवश्यक आहे.

यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कधीकधी रोमँटिक ड्राईव्हवर जा. एकमेकांना सरप्राइज द्या. शारीरिक हालचालींद्वारे वेळोवेळी एकमेकांवर प्रेम व्यक्त करा. आवश्यक असल्यास समुपदेशनासाठी जात रहा.

असे प्रयत्न एकमेकांना जोडून ठेवतात. त्याउलट जर आपण आपले सर्व लक्ष एकमेकांऐवजी आयुष्याशी संबंधित इतर गोष्टींकडे केंद्रित केले तर समजून घ्या की तो दिवस फार दूर नाही जेव्हा आपण जोडीदार कमी, रूममेट अधिक वाटू लागाल.

एकमेकांविषयी कंटाळवाणेपणा : विवाहाच्या बऱ्याच वर्षानंतर, प्रत्येक दिवस आपणास परीकथांप्रमाणे सुंदर जाईल असा विचार करणे निरर्थक आहे. जर आपणास आपल्या विवाहित जीवनाचा कंटाळा येऊ लागला तर याचा अर्थ असा आहे की आपण एकमेकांना गृहीत धरले आहे. आपण नित्याचे जीवन जगण्यास सुरुवात केली आहे आणि कोणत्याही प्रकारचे जोखीम घेण्याचे टाळत आहात.

जर आपण लैंगिक संबंध, वृद्धत्व, किंवा अगदी आपला दिनक्रम बदलण्यासंबंधित विषयांवर चर्चा करण्यास संकोच करत असाल तर आपण स्वत:ला बदलणे, प्रत्येक विषयावर बोलणे आणि जीवनात विविधता आणणे महत्त्वाचे आहे.

प्रणय आणि शारिरीक जवळीकतेचा अभाव : बऱ्याचदा लग्नाच्या काही वर्षानंतर दाम्पत्याचे लैंगिक जीवन कमी होते. याची अनेक कारणे असू शकतात. जसे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न, झोपेचे प्रश्न, मुलांचा जन्म, औषधांचे परिणाम, नात्यातील समस्या इ.लग्नाच्या काही वर्षानंतर असे होणे बऱ्याचदा स्वाभाविक मानले जाते. परंतु जर ही परिस्थिती बराच काळ टिकली आणि अंतर वाढत गेले तर नात्यातील दृढतेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत कधीकधी आपल्या जोडीदाराचे चुंबन घेणे आणि त्यास मिठी मारून आपले प्रेम व्यक्त करणे व त्यास शारीरिकरित्या दूर जाऊ न देणे महत्वाचे आहे.

उद्दिष्टयांपासून अंतर : लग्नाच्या १-१५ वर्षानंतर आपल्या मनात असा विचार करून असंतोष उत्पन्न होऊ शकतो की आपण जीवनात कोणतेही विशेष हेतू साध्य करू शकले नाही. जेव्हा आपण लग्न करता तेव्हा जीवनातील प्राधान्यक्रम बदलतात. आपला जीवनसाथी आणि मुले आपल्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण बनतात.

लग्नानंतर प्रत्येकाला लहान-मोठे त्याग आणि तडजोडी कराव्या लागतात, ज्यामुळे बऱ्याचदा विशेषत: महिलांना आपले करियर आणि आयुष्याशी संबंधित इतर उद्दीष्टे जसे स्वत:चा व्यवसाय सुरू करणे, प्रवास, मॉडेलिंग किंवा इतर छंदांना वेळ देणे यासारख्या गोष्टींपासून वंचित रहावे लागते. लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षात जोडपे अनेकदा नातेसंबंध मजबूत करण्यासाठी आणि कुटुंब वाढविण्यादरम्यान आपल्या स्वप्नांच्या उड्डाणावर निर्बंध घालतात जेणेकरुन विवाहित जीवनात स्थिरता राखता येईल. परंतु १०-१५ वर्षे उलटून गेल्यावर त्यांना वाईट वाटू लागते की त्यांनी आपल्या स्वप्नांपासून स्वत:ला का दूर ठेवले? त्यांना असं वाटतं की जणू आयुष्य परत बोलवत आहे.

सत्य हे आहे की जर जोडप्यांना याबद्दल खऱ्या अर्थाने काही करायचे असेल तर त्यांनी एकत्र येऊन पुढे वाटचाल केली पाहिजे, एकमेकांना पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे.

सहनशक्ती कमी होणे : लग्नाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये जेव्हा आपला जोडीदार काही अनियमित किंवा त्रासदायक काम करतो तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. परंतु जसजसा काळ व्यतीत होतो, बहुतेक जोडीदारांमध्ये संयम राखण्याची आणि एकमेकांच्या चुकांना क्षमा करण्याची प्रवृत्ती कमी होते. सुरुवातीला ते ज्या गोष्टीं हसत टाळत असत आणि नंतर त्याच गोष्टींवर एकमेकांवर रागावू लागतात.

हे महत्वाचे आहे की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात जसे आपण एकमेकांबद्दल प्रेम आणि काळजी दाखवतात, चुकांकडे दुर्लक्ष करतात, त्याचप्रकारे ही प्रवृत्ती नंतरही कायम ठेवली पाहिजे.

लहान-मोठे उत्सव : लग्नाच्या सुरुवातीच्या काळात तुम्ही अगदी लहानाहून लहान प्रसंग साजरे करता. सहा महिन्यांची मॅरिज अॅनिव्हर्सरी असेल किंवा फर्स्ट डेट अॅनिव्हर्सरी, व्हॅलेंटाईन डे असेल किंवा वाढदिवस उत्सव प्रत्येक प्रसंगासाठी विशेष करण्याचा प्रयत्न करता. पण लग्नाला १०-१२ वर्षे उलटताच उत्सव कमी होत जातात.

प्रत्येक लहान-मोठया खुषीचा आनंद उठवणे महत्त्वाचे आहे. उत्सवाचे कारण बदला परंतु मूड नाही. जसे की कामाची पदोन्नती, मुलाचा वाढदिवस, पदवी प्राप्त करणाऱ्या मुलाचा उत्सव, लग्नाला १० वर्षे उलटल्याचा उत्सव इ. त्यांना टाळण्याचा कधीही प्रयत्न करु नका. असे प्रसंग आपल्या दोघांनाही जवळ आणतील.

आपण आपल्या मित्रांसह आणि कुटुंबासह गेटटुगेदर करू शकता किंवा मग आपापसातच उत्सव साजरा करू शकता. प्रत्येक प्रसंगाला संस्मरणीय बनवा, हे उत्सव महाग करणारे नाही, तर यात दोघेही आनंद लुटतील हे महत्वाचे आहे. आपले प्रेम साजरे करण्यासाठी कधीकधी लाँग ड्राईव्हवर जा, मैफिलीत भाग घ्या, चित्रपट पहा किंवा घरीच स्पा नाइटचा आनंद घ्या. तारखेला जाणे कधीही थांबवू नका.

मोठ-मोठया इच्छा पूर्ण करण्याचा दबाव : लग्नाला १०-१५ वर्षापर्यंत पोहोचत-पोहोचत जोडपे मोठ-मोठया जबाबदाऱ्यांचे ओझे उचलू लागतात. मोठ-मोठी उद्दिष्टे बनवतात. आपले घर, मुलांचे उच्च शिक्षण अशा अनेक योजना त्यांच्या मनात चालत असतात. ती पूर्ण करण्याच्या धडपडीत आपण आपल्या नात्यावरील आपले लक्ष गमावतो, तथापि अशा परिस्थितीत संतुलन राखणे खूप महत्वाचे आहे. जर आपण एकमेकांनी मिळून आपल्या योजनांवर कार्य केले तर याने नाते आणखी मजबूत होते आणि लक्ष्यदेखील सहजतेने प्राप्त होते.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें