प्रियकर अडचण बनू नये

* नसीम अन्सारी कोचर

प्रत्येक प्रेमकहाणी यशस्वी होईलच असे नाही. नाती तुटतात ही आणि इथूनच ‘द्वेष’ निर्माण होतो. प्रत्येक प्रकरणात असे घडेलच असे नाही, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे घडते. ब्रेकअप झाल्यावर जिथे काही लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी होतात किंवा दुसरा जोडीदार शोधतात. तर काही लोक बदला घेण्याचे ठरवतात. विचार करतात की ती माझी झाली नाही तर ती दुसऱ्याची कशी होऊ शकते.

अशा परिस्थितीत काय करावे, चला जाणून घेऊया :

सावधगिरी बाळगा : एका गाण्याचे बोल आहेत, ‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा…’

एखाद्याशी नात्यात असणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु जेव्हा हे सुंदर स्वप्न तुटते, तेव्हा खूप जोराचा आघात पोहोचतो. प्रेमसंबंध तुटण्याची काही कारणे असतात, जसे की दोघांपैकी कोणा एकाचे लग्नाला तयार नसणे, घरातील सदस्यांचा दबाव असणे, धर्म-जाती वेगळया असणे, मुलाकडे नोकरी नसणे, कुठले भविष्यातील नियोजन नसणे, इ. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे नाते कोणत्याही गंतव्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा योग्य कारणे समोर ठेवून वेगवेगळया मार्गांची निवड करण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. जर तुमचा प्रियकर तुमच्याशी कुठल्या स्वार्थामुळे संलग्न असेल तर तो तुम्हाला धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करेल. कदाचित तो तुम्हाला ब्लॅकमेलदेखील करू शकतो.

हळूहूळू अंतर वाढवा : जर तुमचे लग्न ठरले असेल, तर तुम्ही तुमचे नाते क्षणार्धात तोडावे हे आवश्यक नाही. जेव्हा नातं तयार व्हायला वेळ लागतो, तेव्हा ते संपवायलाही वेळ लागतो. म्हणून हळूहळू अंतर वाढवा, त्याला त्या गोष्टींची जाणीव करून द्या की त्या कोणत्या विवशता आहेत, ज्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहात. एका क्षणात सर्वकाही संपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण समोरची व्यक्ती अचानक निर्माण झालेली पोकळी सहन करू शकणार नाही. त्याला वेळ द्या आणि हळूहळू सर्व संपर्क संपवा.

भेटवस्तू नष्ट करा : तुमच्या प्रियकराने तुम्हाला गिफ्ट, कार्ड किंवा कपडे इत्यादी दिले असतील. जितक्या लवकर तुम्ही त्यांना स्वत:पासून दूर कराल तितक्या लवकर तुम्ही त्याच्या आठवणींपासून मुक्त व्हाल. तसेच आपण त्याला दिलेल्या सर्व भेटवस्तू किंवा कार्ड वगैरे त्याच्याकडून परत मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यांचादेखील नाश करा. जुन्या गोष्टींची सावली नव्या आयुष्यात पडू नये.

ब्रेकअपनंतर स्वत:ला वेळ द्या : ब्रेकअपनंतर अनेकदा असं वाटतं की, हे काही काळाचं अंतर आहे, आम्ही पुन्हा एकत्र येऊ. या भावनेतून बाहेर पडणे सोपे नसते. ब्रेकअपनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बहुतेक लोक लगेच दुसरा मित्र शोधतात किंवा लग्नासाठी तयार होतात, हे योग्य नाही. प्रियकरासोबत घालवलेले क्षण विसरण्यासाठी आणि सत्याचा पूर्णपणे स्वीकार करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. चिंतन करा आणि तुम्ही उचललेले पाऊल अगदी योग्य आहे हे स्वत:ला समझवून घ्या. नवीन मित्र किंवा जीवनसाथी निवडण्यात घाई करू नका.

नवऱ्याला सर्व काही सांगू नका : तुमच्या जोडीदारापासून तुमचे भूतकाळातील नाते लपवणे चुकीचे असेल, पण तुमच्या भूतकाळातील सर्व काही सांगणे आवश्यक नाही, आजकाल शाळा-कॉलेजेसमध्ये बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनणे सामान्य गोष्ट आहे. अनेकदा पती पत्नीला याबाबत विचारत नाहीत. तरूणाईमध्ये विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण असणे स्वाभाविक आहे. हा सामान्य कल आहे. म्हणूनच तुमच्या पतीला हे सांगणे की होय, तुमचा प्रियकर होता, ही काही आकाश कोसळणारी गोष्ट नाही. होय, पण जर तुम्ही त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवला असेल किंवा तुम्ही कधी त्यापासून गरोदर राहिला असलात किंवा तुमचा गर्भपात झाला असेल, तर तुम्ही हे सर्व पतीला सांगण्याची गरज नाही. कारण असे केल्याने तुमच्या नात्यात कटुता येईल.

नवऱ्याची तुलना प्रियकराशी करू  नका : तुमच्या प्रियकराच्या अनेक गोष्टी कदाचित तुमच्याशी मेळ खात असाव्यात, तेव्हाच तुमची मैत्री झाली आणि कदाचित तुम्ही ज्याच्याशी लग्न केले आहे त्याच्या सवयी तुमच्याशी अजिबात जुळत नसतील. अशावेळी तुम्हाला तुमच्या प्रियकराची आठवण येऊ शकते.

लक्षात ठेवा तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न केले आहे ती खूप चांगली आहे, कारण त्याने तुम्हाला स्थिरता दिली आहे, तुम्हाला आर्थिक सुरक्षा दिली आहे. कधी तुमचा प्रियकर तुम्हाला इतके सर्व देऊ शकला असता का? कदाचित नाही, म्हणूनच आपल्या पतीची तुलना त्या व्यक्तीशी कधीही करू नका.

सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर जर अशा कोणत्याही अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागले तर आत्मविश्वासाने सामोरे जा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें