विंटर बॅगेचे ७ नवीन प्रकार

* भव्या चावला, चीफ स्टायलिस्ट, युनिक

  1. क्लीयर हँडबॅग : जेव्हापासून टीव्ही चॅनेल्सव्दारे पीव्हीसी बॅग दाखवले जाऊ लागले आहेत, तेव्हापासून ब्रँड त्यांच्यावर काम करू लागले आहेत. आता हा ट्रेंड फॅशन क्राउडपर्यंत पोहोचला आहे. लुकपेक्षा जास्त जे याला आकर्षक बनवतं, ते असं की आपण याच्या आत काय ठेवता.clear-handbags
  2. फ्रींज बॅग : ही विस्तृत शृंखला आहे. उदा. टॉप हँडल बॅग, क्रॉसबॉडी बॅग, मिनी बॅग, बकेट बॅग इ.Fringe-Bag
  3. मायक्रो बॅग : बहुतेक सेलिब्रिटी ही बॅग कॅरी करताना दिसतील. अर्थात, ही खूप जास्त प्रॅक्टिकल नाही, पण हा या सीझनचा सर्वात स्टायलिश ट्रेंड आहे. ही फॉर्मल ड्रेससह छान दिसते. कामानंतरच्या काळासाठी परफेक्ट आहे. या मिनी बॅग ट्रेंडने मल्टीपल बॅग ट्रेंडलाही मोशन दिले आहे.mini-bag-blonde
  4. एक्सएक्सएल टोट्स आणि ओव्हरसाइज होबोस : खूप मोठ्या बॅगची फॅशन पुन्हा परतली आहे. फॅशन जमातीद्वारे मान्यता मिळालेली ही एक मोठी आणि फंक्शनल बॅग जणू प्रत्येक महिलेचे स्वप्न सत्यात उतरवते. आपल्या कामासाठी टोट्स आणि बाकी सर्वांसाठी होबोसची योग्य रंगात निवड करा.bag
  5. बीडेड बॅग : सर्व ट्रेंडपैकी एक जी खरेदी करण्यालायक आहे. ही आपल्याला आपल्या तारुण्याच्या काळात घेऊन जाते. श्रिप्सच्या संस्थापिका हन्ना वीलँडला या बॅग पुन्हा आणण्यासाठी बरंच श्रेय दिलं जातं. त्या सांगतात की बॅग आपल्या हातावर आभूषण घालण्याच्या विचाराने प्रेरित असून आपल्याला विशेष असल्याची जाणीव करून देतात.beaded-bag
  6. मॉक क्रॉक : मॉक क्रॉक बॅग या मोसमातील ट्रेंड आहे. यात जे रंगीत पॅलेट दिसतात, ते खूप उत्तम आणि स्त्रीतत्त्व आहेत आणि याला एक आदर्श वर्क वॉर्डरोब स्टॅपल बनवतात.creak-bag
  7. बकेट बॅग : बकेट बॅगला आपण काम, लंच डेट किंवा वीकेंड सहलीलाही नेऊ शकता.bag

स्टायलिश दिसण्यासाठी स्मार्ट ट्रिक्स

– रितू वर्मा

मिना काहीशी त्रासून कपाट उघडून उभी होती. उत्सव पार्टीसाठी उद्या तिला मैत्रिणीच्या घरी जायचे होते पण काय घालावे हेच तिला समजत नव्हते. खूप भारी साडी तिला नेसायची नव्हती. थंडीचा मोसम होता. काय करावे तिला काहीच सुचत नव्हते. त्यातच रोहनने आगीत तेल ओतले की पूर्ण कपाट कपडयांनी भरले आहे, पण हा तर तुझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे.

रोहिणीचेही काहीसे असेच आहे. तिच्या कुटुंबात तर असे विनोदाने म्हटले जाते की तिचे सर्व कुटुंब रोहिणीच्या कपडयांवरच झोपते, कारण घरातील सर्व पलंगांच्या कप्प्यात तिचेच कपडे भरलेले आहेत.

सीमाला उत्सव पार्टीमध्ये हटके कपडे घालायचे होते. त्यासाठी तिने वनपीस निवडले, पण ते घातल्यानंतर ती सर्वांच्या थट्टेचा विषय ठरली. दुसरीकडे ऋतुने मात्र उत्सव पार्टीमध्ये आपल्या जुन्या बनारसी साडीचा स्वत:साठी एक सुंदर प्लाझा कुर्ता शिवला, यामुळे पूर्ण साडीचा नव्याने वापर झाला. शिवाय केवळ ड्रेसच्या शिलाईत नवीन पोशाख तयार झाला.

महिलांना कपडे खरेदीचे वेड असते. यामुळे त्यांच्याकडे भरपूर कपडे होतात. यातील ६० टक्के कपडे त्या कधीतरीच वापरतात. त्यामुळे कपडे खरेदी करताना दोनदा विचार का नाही केला याचे नंतर त्यांच्या मनाला वाईटही वाटते.

विचारपूर्वक करा खरेदी

अशा वेळी जर महिलांनी काही गोष्टींकडे लक्ष दिले तर त्यांची ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते :
* तुम्ही गृहिणी असाल किंवा नोकरदार महिला आणि जर तुम्हाला वेस्टर्न ड्रेस आवडत असतील तर एक निळी जीन्स, सफेद शर्ट आणि काळया टीशर्टला आपल्या वॉर्डरोबमध्ये जागा अवश्य द्या. जीन्स खरेदी करताना तुम्ही फॅशनऐवजी तुमचे वय आणि शरीराची ठेवण नक्की लक्षात ठेवा.
* तुम्हाला शर्ट किंवा टीशर्ट आवडत नसेल तर एक सफेद आणि एक काळया रंगाचा कुर्ता तुमच्याकडे असायलाच हवा. हे तुम्ही कुठल्याही छोटेखानी कार्यक्रमात बिनदिक्कत घालू शकता. हे दोन्ही रंग वापरताना तुम्हाला खूप विचार करावा लागत नाही आणि ९८ टक्के महिलांवर हे दोन्ही रंग खुलून दिसतात.
* जीन्सला पारंपरिक लुक द्यायचा असेल तर एक सुंदर स्टोल अवश्य घ्या. हे तुम्ही कुर्ता आणि स्कर्टसोबतही वापरू शकता.
* आपल्या कपाटात डझनभर स्वस्त स्टोल आणि दुपट्टे ठेवण्याऐवजी काही महागडे आणि कुठल्याही कार्यक्रमासाठी योग्य ठरतील असेच स्टोल आणि दुपट्टे खरेदी करा आणि मनसोक्त वापरा.
* वनपीस सर्वच महिलांना शोभून दिसेलच असे नाही. तुमचे पोट सपाट असेल तर कुठल्याही एका रंगाचे लांब वनपीस तुमच्या वॉर्डरोबमध्ये नक्की ठेवा. यासोबतच एक लाँग ड्रॅगलर्स तुम्हाला सेक्सी तसेच क्लासिक लुकही देईल. यात पोटाचा भाग जास्त दिसतोय असे वाटत असेल तर ते कधीच खरेदी करू नका कारण ते घातल्यानंतर तुमच्यासह सर्वांचे लक्ष तुमच्या पोटाकडेच जाईल.
* कधीतरी घालायला काय हरकत आहे असा विचार करून सेलच्या नादात कुठलाही ड्रेस खरेदी करू नका, कारण तुम्ही तो कधीच घालणार नाही आणि उगाचच तो तुमच्या कपाटातली जागा अडवून ठेवेल.
* आजकाल शॉर्ट्स आणि मिनी स्कर्टचीही चलती आहे. पण तुमच्या मांडया जास्त जाड असतील तर हे घालून इतरांसमोर स्वत:चे हसे करून घेऊ नका.
* कॉटनचा ड्रेस खरेदी करण्यापूर्वी आपले वय आणि शरीराची ठेवण लक्षात घ्या.

भारतीय ड्रेससंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी

* तुम्ही कुठल्याही वयोगटातील असलात तरी कुठल्याही रंगाची शिफॉनची प्लेन कोणत्याही रंगाची साडी अवश्य ठेवा जी तुम्ही उन्हाळयात कधीही नेसू शकता.

* आर्टिफिशिअल सिल्कऐवजी प्युअर सिल्कच्या साडीसाठी पैसे खर्च करण्यातच खरी हुशारी आहे, कारण ही सदाबहार असण्यासोबतच प्रत्येक महिलेला क्लासिक लुकही मिळवून देते.

* कांथा वर्क, मणिपुरी सिल्क, पोचमपल्ली, चंदेरी सिल्क, बनारसी सिल्क, मैसूर सिल्क, कांचीपूरम सिल्क, पैठणी सिल्क, जयपुरी चुनर, कलमकारी या साडया तुमच्याकडे नक्कीच असायला हव्यात. या सर्व नेहमीच गोड आठवणींसह तुमच्यासोबत राहतील.

* एक गोल्डन, एक सिल्वर, काळया आणि लाल रंगाचे ब्रोकेडचं कलमकारी प्रिंट आणि गुजराती काचांचे वर्क केलेला पंचरंगी ब्लाऊज अवश्य कपाटात ठेवा. तो तुम्ही कुठल्याही साडीवर घालू शकता.

* चला आता जाणून घेऊया सूटबाबत. आजकाल सलवार कमीजसह प्लाझा सूट, पाजामीकुर्ता, अनारकली, पेंट केलेल्या सूटचीही खूप क्रेझ आहे.

* प्लाझा घालायची इच्छा असेल तर त्यावर खूप खर्च करण्याऐवजी एक सफेद, एक काळा आणि एक तपकिरी रंगाचा प्लाझा खरेदी करा. जर तुमचा पार्श्वभाग वजनदार नसेल तर प्लाझा उन्हाळयासाठी चांगला पर्याय आहे. तो तुम्हाला फ्युजन लुक मिळवून देईल.

* १ किंवा २ प्लेन सिल्कचे पेंट सूट किंवा पाजामीकुर्ता आपल्या कलेक्शनमध्ये अवश्य ठेवा.

* अनारकली सूट सर्व प्रकारच्या शारीरिक ठेवणीवर चांगला दिसतो. काळा अनारकली सूट सर्वांनाच स्लिम लुक मिळवून देतो.

* दंड मांसल असतील तर स्लीव्हलेस ब्लाऊज किंवा कुर्ता घालणे टाळा, कारण यामुळे गरज नसतानाही दुसऱ्यांचे लक्ष तुमच्यावर केंद्रित होईल.

* कुर्ती आणि स्कर्ट जयपुरी दुपट्टयासह प्रत्येक छोटेखानी कार्यक्रमासाठी चांगला पर्याय आहे.

वापर करण्यासंबंधी माहिती

* जर तुम्ही एखादा डे्स वर्षभरापासून वापरत नसाल तर तो गरजवंताला द्या किंवा रिसायकल करून नव्याने त्याचा वापर करा.

* शक्यता आहे की एखादा डे्रसशी तुमच्या काही आठवणी जोडल्या गेल्या असतील, त्यामुळे तुम्ही तो कोणाला देऊ इच्छित नसाल तर त्याचे उशी किंवा ब्लँकेटसाठी कव्हर शिवा.

* एखादी साडी नेसून तुमचे मन तृप्त झाले असेल तर तुम्ही त्यापासून सुंदर पडदे बनवू शकता.

* जुन्या मजबूत कपडयांपासून पिशव्या बनवता येतील.

* जुने स्वेटर किंवा ऊबदार शालीला आपल्या कपाटात नाहक जागा अडवू देऊ नका तर ते एखाद्या गरजवंताला द्या. त्यामुळे तुमच्या कपाटाला अपार शांती मिळेल.

* जुन्या आकर्षक रंगांच्या मजबूत कपडयांचे रात्री अंगावर ओढण्याचे पांघरून बनवू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें