तो एक बार फिर लहराएंगी जुल्फें

– बीरेंद्र बरियार ज्योती

पूनम लग्नासाठी स्वत:ला सजवत होती. भावी पतीच्या बाबतीत मनामध्ये सुवर्ण स्वप्ने चमकत होती. वरात आल्याची बातमी कळताच तिच्या हृदयाचे ठोके वाढले. हृदय हट्ट करू लागले. काहीशी बेधुंद होऊ लागली. मनात फुगे फुटू लागले. तेवढयात तिच्या मैत्रिणी वरमालेच्या विधीसाठी तिला नेण्यास खोलीत आल्या.

पूनम मदोन्मत्त पावलांनी रुणझुणत्या पैंजणाच्या सुमधुर आवाजात थाटामाटात वरमालेसाठी बनवलेल्या स्टेजवर पोहोचली. वरमालेचा विधी सुरू झाला. जेव्हा वराने आपला मुकुट उतरविला तेव्हा पूनम जणू काही बेहोष होऊन खाली पडली. वराला टक्कल पडले होते. वर आणि वधुच्या कुटुंबीयांत व नातेवाईकांमध्ये गोंधळ उडाला.

पूनमने लग्नास स्पष्ट नकार दिला. खूप समजावल्यानंतर ती लग्नास तयार झाली. लग्नाला १५ वर्ष पालटली तरी पूनमच्या मनात हे शल्य आहे की तिचा नवरा टक्कल पडलेला आहे. ती म्हणते की तिचा नवरा अभियंता आहे आणि त्यांचे चांगले उत्पन्न आहे, तिला कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही, परंतु ती कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलीचे लग्न टक्कल असलेल्या मुलाशी करणार नाही.

आजच्या युगात पूनमसारख्या स्थितीचा आता मुलींना सामना करावा लागणार नाही. आज केस प्रत्यारोपणाच्या तंत्रामुळे आणि त्यातील वाढत्या प्रवृत्तीने टक्कल पडण्याची समस्या आणि त्यातून उद्भवणारी विचित्र परिस्थिती बऱ्याच प्रमाणात दूर केली आहे. त्वचाविज्ञानी डॉ सुधांशु कुमार म्हणतात की केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगातील तरुण टक्कल पडण्याच्या समस्येने त्रस्त झाले आहेत. केस गळल्यानंतर ती व्यक्ती वास्तविक वयापेक्षा १०-१५ वर्षांनी मोठी दिसते. डोक्याचे केस गेल्यानंतर माणसाचे व्यक्तिमत्त्वच बदलते. आत्मविश्वास खालावतो. टक्कल पडलेला माणूस गर्दी, पार्ट्या, मुलाखती इ. मध्ये स्वत: अस्वस्थतेचा अनुभव करू लागतो.

केस उगवण्याच्या नावाखाली फसवणूकदेखील बरीच होते. टक्कल पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावर केस उगवण्याच्या नावाखाली होमिओपॅथ आणि आयुर्वेद डॉक्टरांनी बरीच रक्कम गोळा केली. बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर यांनी एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की जेव्हा-जेव्हा एखाद्या माणसाचे केस उडण्यास सुरवात होते तेव्हा ते वाचविण्यासाठी तो काहीही करण्यास तयार असतो. कोणी एखादा सल्ला दिला नाही की लगेच तो अंमलात आणतो.

ते पुढे म्हणाले की जेव्हा त्यांच्या डोक्यावरचे केस उडण्यास सुरवात झाली तेव्हा त्यांनी देखील बऱ्याच युक्त्या अवलंबल्या, एकदा एका गृहस्थाने सांगितले की उंटचे मूत्र लावल्याने केस उगवू लागतात तेव्हा त्यांनी ते देखील केले. यानंतरही केस आले नाहीत.

केस प्रत्यारोपण

लहान वयात टक्कल पडलेल्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे की केसांच्या प्रत्यारोपणाचा ट्रेंड आणि क्रेझ आजकाल खूप वेगवान वाढत आहे. शस्त्रक्रियेद्वारे टक्कल असलेल्या डोक्यावर केस उगविणे आता फार दूर नाही.

पाटणा एम्सच्या प्लास्टिक सर्जरी विभागाच्या एचओडी डॉक्टर वीणा कुमारी सांगतात की आता केस प्रत्यारोपणाचे तंत्र बरेच विकसित झाले आहे. या शस्त्रक्त्रियेची क्लिष्टता बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. डोक्यावरील शस्त्रक्रिया केली जाणारी जागा इंजेक्शनने बधिर केली जाते. यानंतर डोक्याच्या मागील आणि आजूबाजूच्या भागाचे केस काढून शस्त्रक्रियेद्वारे डोक्याच्या रिक्त झालेल्या जागेवर सेट केले जातात.

जर तुम्हाला जास्त दाट केस लावायचे असतील तर जास्त वेळ लागतो आणि केस कमी लावायचे असतील तर ४ ते ८ छोटया शस्त्रक्त्रिया कराव्या लागतात. डोक्याची ड्रेसिंग 2-3 दिवस करावी लागते आणि औषधेही घ्यावी लागतात. शस्त्रक्रियेनंतर ५-६ दिवसांत जखम बरी होते. प्रत्यारोपण केले गेलेले केस शस्त्रक्रियेनंतर ३ आठवडयांत गळतात आणि त्यानंतर नवीन केस बाहेर येण्यास सुरवात होते. त्यानंतर ६ ते ९ महिन्यांच्या आत पूर्णपणे नवीन केस बाहेर येतात आणि टक्कल पूर्णपणे दूर होते.

महिलांमध्ये टक्कल पडण्याच्या तक्रारी

डॉक्टर राजीव पांडे म्हणतात की महिलांमध्ये टक्कल पडल्याच्या तक्रारी पुरुषांच्या तुलनेत खूपच कमी आहेत, पण आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्रियांमध्येही केस गळण्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. स्त्रियांमध्ये थायरॉईडच्या समस्येमुळेदेखील टक्कल पडण्यास सुरवात होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार टीएसएच, टी ३ आणि टी ४ च्या नियमित तपासणीनंतर औषधे घेतल्यास केस गळणे कमी होऊ शकते.

५० च्या दशकात अमेरिकेत सुरू झालेल्या केस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया आज भारतातदेखील खूप लोकप्रिय झाली आहे आणि अनेक तरुणांना टक्कलपासून मुक्त केले आहे. डॉक्टरांचा असा दावा आहे की केस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया ९५ टक्के यशस्वी होते. संपूर्ण डोक्यात केस उगविण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. जर एखाद्याने डोक्यावरील पूर्ण केस गमावले असतील तर पुन्हा केस उगविण्यासाठी तुम्हाला ५ ते ६ लाख खर्च करावे लागू शकतात.

डोक्याबरोबरच शस्त्रक्रियेद्वारे दाढी, मिशा आणि भुवयांच्या केसांचा उपचार आणि प्रत्यारोपण करण्याचा कलदेखील वाढत आहे.

केस आणि सौंदर्य तज्ज्ञ पल्लवी सिन्हा ५ वर्षांपासून पाटण्यात केसांचा उपचार करत आहेत. त्या म्हणतात, ‘‘आज टक्कल असलेल्या डोक्यावर केस उगविणे शक्य झाले आहे. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे दगडांवर गवत उगवण्यासारखे मानले जात असे. गमावलेले केस योग्य उपचारांसह पुन्हा परत मिळू शकतात. त्यांच्याशी झालेल्या संभाषणातील काही उतारे येथे सादर करत आहोत.

कोणत्या वयोगटातील लोक आपल्याकडे केसांच्या उपचारासाठी येतात?

हल्ली हार्मोनल गडबडी आणि तणाव व खाण्या-पिण्यात जंक फूडचा जास्त वापर इत्यादी कारणांमुळे प्रत्येक वयोगटातील लोक केस गळण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत. जेव्हा कॉलेजमध्ये शिकत असलेल्या तरुणांच्या डोक्यातून केस गळू लागतात तेव्हा नक्कीच त्यांचे टेन्शन वाढते.

असे मानले जाते की एकदा ज्याच्या डोक्यावरून केस अदृष्य झाले की पुन्हा परत येणे कठीण आहे?

६-७ वर्षांपूर्वी ही परिस्थिती होती. केस पुन्हा उगवण्याची कल्पनादेखील विचारात नव्हती. आज केसांचे उपचार आणि त्याही पलीकडे केस प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत टक्कल असलेल्या डोक्यावर केस वाढविणे आता अशक्य नाही.

केस वाढवण्याच्या नावाखाली बरेच फसवे बाजारही झाले आहेत?

प्रत्येक टक्कल असलेल्या माणसाला वाटते की त्याच्या डोक्यावर पुन्हा हिरवळ यावी. जेव्हा केस उडणे, गळणे किंवा खंडित होणे सुरू होते तेव्हा लोक त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या अवलंबण्यास तयार असतात. याच गोष्टीचा फायदा उचलण्यासाठी अनेक प्रकारचे आयुर्वेदिक, होमिओपॅथीक औषधे आणि तेल बाजारात विकली जात आहेत. अशा तेल आणि औषधांचा फायदा कोणालाही झाला असेल असे कोणतेही उदाहरण नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात लोक बोगस डॉक्टर आणि हाकीमांवर अवलंबून राहून आपला वेळ आणि पैसा दोन्ही वाया घालवतात.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें