सौंदर्य समस्या

* समस्यांच्या समाधानासाठी एल्पस ब्युटी क्लीनिकच्या फाउंडर,
डायरेक्टर डॉ. भारती तनेजा द्वारा

माझ्या आयब्रोज खूपच दाट आहेत. मला थ्रेडिंग करतेवेळी खूप वेदना होतात. सांगा मी काय करू?

तुम्ही जिथेदेखील आयब्रोज करायला जाता त्यांना सांगा की त्या आयब्रोज करण्यापूर्वी आयब्रोज वरती थोडासा बर्फ लावा. यामुळे आयब्रोज थोडया सुन्न होतील आणि वेदना होणार नाहीत. त्या हवं असल्यास थ्रेडदेखील ओला करू शकता. ज्यामुळे ट्रेडिंग करतेवेळी वेदना होणार नाहीत. थ्रेडिंग करतेवेळी तुम्ही तुमच्या त्वचेला व्यवस्थित स्ट्रेच करून ठेवलंत तर वेदनादेखील कमी होतील. आयब्रोज करण्यासाठी कोणा दुसऱ्याची मदत घेऊ शकता. ज्यामुळे आयब्रो जास्त स्ट्रेच होतील आणि वेदना कमी होतील. हवं असल्यास लेजरनेदेखील आयब्रोज नेहमीसाठी शेप देऊ शकता.

अलीकडे अॅडमध्ये बीबी ग्लोबद्दल सांगितलं जातं. हे खरोखरच त्वचेसाठी आहे का?

बीबी ग्लो एक अशी ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या त्वचेमध्ये एका मशीनद्वारे अकॉर्डिंग टू योर स्किन न्यूट्रीएन्ट्स टाकते जातात. हे स्किनमध्ये जाऊन त्वचेला स्ट्रेच करतात. रिंकल फ्री करतात आणि ग्लो देतात. यासोबत बीबी ग्लोमध्ये तुमच्या त्वचेनुसार एक फाउंडेशन त्वचेच्या आतमध्ये टाकलं जातं. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या वरती एक हलकासा मेकअप येतो. जो साधारणपणे २० ते ३० दिवस राहतो. सोबतच तुमच्या फेसला शेप देण्यासाठी कंटूरिंग आणि ब्लशरदेखील टाकलं जातं. ज्यामुळे त्वचेला सुंदरसा शेप येतो. ही एक खूपच चांगली ट्रीटमेंट आहे, ज्यामुळे तुमची त्वचा ग्लोदेखील करते आणि सोबत शेपदेखील येतो आणि २० ते ३० दिवसासाठी मेकअप देखील येतो.

हिवाळयात माझ्या टाचा फाटू लागतात आणि रक्तदेखील वाहू लागतं. सांगा मी काय करू?

हिवाळयात त्वचा खूपच ड्राय होते. हिल्सची त्वचा खूप जाड होते आणि कोरडीदेखील होते. अशावेळी जर त्यांची स्वच्छता व्यवस्थित केली नाही आणि सोबतच एखाद्या चांगल्या क्रीमने मसाज केला नाही तर त्या फाटू लागतात. सर्वात जास्त गरजेचं आहे की तुम्ही अंघोळ करतेवेळी एखाद्या स्क्रबरने हलकसं रगडा आणि त्याच्यावरती ऑइल लावून मसाज करा. यामुळे टाचा फोटो फुटणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल की सकाळी कमी वेळ असेल तर रात्री रोज हलक्या गरम पाण्यामध्ये पाणी टाकून थोडा वेळ स्क्रबरने हलकं रगडा. त्यानंतर एखादा क्रीम वा हलक्या गरम तेलाने मसाज करा. शक्य असल्यास सुती मोजे घालून झोपा. यामुळे तुमचे तुमच्या टाचा फाटणार नाहीत आणि जर त्या फाटल्या तर घरच्या घरी यावर उपाय करू शकता. पाय स्वच्छ करून तुम्ही एका वाटीत थोडसं मोहरीचं(सरसो)तेल आणि मेणबत्ती टाकू शकता. याला  हलकं गरम करा आणि फाटलेल्या टाचांमध्ये भरा. वरून मोजे घालून झोपी जा. टाचा लवकर व्यवस्थित होतील.

उन्हाळयात घराबाहेर पडण्यापूर्वी आम्ही लोक नेहमी सनस्क्रीन लावून बाहेर पडतो. हिवाळयातदेखील असं करणं गरजेचं आहे  का?

उन्हाळयाप्रमाणे हिवाळयातदेखील बाहेरून कडक ऊन असतं, परंतु आपल्याला ते जाणवत नाही. कारण हवा थंड असते. सूर्यकिरणं तशीच काम करतात जशी उन्हाळयात देखील. म्हणून उन्हाळयाप्रमाणेच हिवाळयातदेखील सनस्क्रीन लावणं गरजेच आहे. हिवाळयात सनस्क्रीन जेदेखील लावाल ते जास्त मॉईश्चरायझिंग व नरिशिंग असायला हवं. घरातून बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन नक्की लावा आणि त्याच्यावरती हलकी पावडर वा मेकअप करा.

माझं वय ३० वर्ष आहे आणि माझे केस खूप गळतात. गळलेले केस मला पुन्हा कसे मिळतील?

३०शीनंतर हेअर लॉसची अनेक कारणं आहेत ज्यामध्ये मेन फॅक्टर तुमच्या डायटशी संबंधित आहे. तुमच्या डायटमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करायला हवा यावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केसांसाठी सर्वात जास्त गरजेचं आहे प्रोटीन. जर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता असेल तर त्याचा परिणाम केसांवरती देखील पाहायला मिळतो. म्हणून तुमच्या डायटमध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी डेरी प्रॉडक्ट्स आणि डाळींचा समावेश करा. हेल्दी केसांसाठी बदाम, फ्लॉवर, मशरूम, अंडयापासून मिळणारं बायोटीन एक गरजेच विटामिन आहे. केस गळती रोखण्यासाठी विटामिन्सचा डायटमध्ये समावेश करणं फायद्याचं असू शकतं. या गोष्टींचा तुमच्या डायटमध्ये समावेश करून तुम्ही विटामिन्सची उणीव पूर्ण करू शकता. भाजलेले चणे, मटर, राजमा, छोले आणि काजूचा डाएटमध्ये समावेश करून तुमच्या केसांसाठीदेखील गरजेचं आयरन मिळवू शकता.

या आयरनच्या कमतरतेमुळे केस गळती व निस्तेज होण्याची समस्या वाढू शकते. विटामिन ए आणि सी असे विटामिन आहेत, जे केसांची वाढ आणि शायनिंगसाठी खूपच परिणामकारक असतात. म्हणूनच तुम्ही विटामिन ए साठी गाजर, रताळं, काजू, पालक, दूध व दह्याचा डाएटमध्ये समावेश करण्याची गरज आहे. तर विटामिन सीसाठी आवळा, लिंबू, पेरू व स्ट्रॉबेरीचा समावेश करा.

केस गळण्याच्या दुसऱ्या फॅक्टर्समध्ये टेन्शनदेखील एक फॅक्टर आहे. ज्यामुळे तुमचे केस गळू लागतात म्हणून टेन्शन कमी करण्यासाठी नियमित मेडिटेशन करा. या वयात तुम्ही स्टायलिश हेअर स्टाईल करण्यासाठी अनेक प्रयोग करता. जे केसांना कमजोर बनवू शकतात. म्हणून केसांवर जास्त एक्सपेरिमेंट करू नका. जर तुम्हाला काही वेगळं करायचं असेल तर त्यासाठी एक्स्पर्टचा सल्ला घ्या.

या कॉलस रिमूव्हर्ससह आपल्या टाचांची काळजी घ्या

* दीपिका शर्मा

आपला चमकणारा चेहरा जसा आपली ओळख बनतो, त्याचप्रमाणे आपली चमकणारी टाचही आपल्या व्यक्तिमत्त्वात मोहिनी घालतात. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की अनेक लोक इतरांपासून पाय लपवतात किंवा बंद शूजमध्ये त्यांची भेगा टाच लपवण्याचा प्रयत्न करतात. अनेक स्त्रिया घरगुती उपाय करून कंटाळतात पण पाय मऊ आणि गुळगुळीत करण्याची त्यांची इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, तुम्ही अशी साधने वापरणे महत्त्वाचे आहे, ज्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला तुमची टाच लपवण्याची गरज नाही आणि तुम्हाला कमी वेळात मऊ पाय मिळू शकतात. तर, आज आम्ही तुम्हाला काही कॉलस रिमूव्हर्सबद्दल सांगणार आहोत ज्याचा वापर करून तुमचे पाय चमकतील.

कॉलस रिमूव्हर्स काय आहेत?

हे एक छोटेसे रिचार्जेबल, कॉम्पॅक्ट आणि पोर्टेबल डिव्हाईस आहे जे तुम्ही सहजपणे कुठेही नेऊ शकता. याचा वापर करून तुम्ही मृत त्वचा, जाड त्वचा आणि तुमच्या पायांच्या खडबडीत समस्यांपासून मुक्त होऊ शकता. ज्या महिलांना पेडीक्योर करण्यासाठी पार्लरमध्ये जाणे कठीण जाते त्यांच्यासाठी ही सर्वोत्तम वस्तू आहे. यात काही रोलर्सदेखील आहेत जे तुम्ही तुमच्या गरजेनुसार वापरू शकता. चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला काही सर्वोत्‍तम कॉलस रिमूव्‍हरबद्दल सांगतो जे तुम्ही ऑनलाइन आणि बाजारातून खरेदी करू शकता.

  1. आजीवन LLPCW04

त्याची खासियत म्हणजे हे रिमूव्हर फक्त 30 मिनिटांसाठी चार्ज करून तुम्ही 2 तास वापरू शकता. हे पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे. यात तीन अटॅचमेंट आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही कमी, मध्यम किंवा खूप जास्त डेड स्किन काढू शकता. त्याची किंमत आहे रूपये 1300.

  1. AGARO CR3001

हे 45 मिनिटांत चार्ज होऊ शकते आणि 2 तास वापरले जाऊ शकते. हे एक रिचार्ज करण्यायोग्य डिव्हाइस आहे ज्यामध्ये 2 संलग्नक आहेत. तुम्ही ते शॉवर किंवा ड्राय मोडमध्ये वापरू शकता. त्याची किंमत रूपये 1100 पर्यंत आहे.

  1. iGRiD

हे LED लाईटसह हलके वजनाचे रिमूव्हर आहे. हे 3 रोलर्ससह येते जे तुम्ही वापरल्यानंतर सहजपणे स्वच्छ करू शकता आणि पुन्हा वापरू शकता. त्याची किंमत अंदाजे रूपये 900-1100 पर्यंत आहे.

  1. Vandelay (UK) CQR-FC800

या रिमूव्हरची बॅटरी 12000mAh आहे आणि ती पॉकेट साइजमध्ये येते. याच्या मदतीने तुम्ही बारीक ग्राइंडिंग, मिडीयम ग्राइंडिंग आणि रफ ग्राइंडिंग करू शकता. हे 2 स्पीड व्हेरिएशनसह येते. यात डिजिटल डिस्प्ले देखील आहे. हे रूपये 1200 पर्यंतच्या किमतीत सहज उपलब्ध आहे.

  1. Amope Pedi परफेक्ट इलेक्ट्रॉनिक पेडीक्योर फूट फाइलर

हे इलेक्ट्रिक फूट फाइलर आहे जे बॅटरीवर ऑपरेट केले जाऊ शकते. हे     रूपये 400 पर्यंतच्या किमतीत सहज उपलब्ध आहे. जर तुम्हाला कमी खर्चात तुमच्या पायाची मृत त्वचा काढायची असेल, तर हा एक उत्तम पर्याय आहे.

टीप : सर्वोत्तम परिणामांसाठी, कॉलस रिमूव्हर वापरल्यानंतर आपल्या पायावर चांगले मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तसेच, झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ करणे सुनिश्चित करा जेणेकरून ते रात्रभर बरे होतील. आणि तुमचे रिमूव्हर रोलर्सदेखील स्वच्छ ठेवा.

भेगा पडलेल्या टाचांचे निराकरण करण्यासाठी उपाय

* सोनिया राणा

बदलत्या ऋतूमध्ये आपण आपल्या चेहऱ्याच्या आणि हातांच्या त्वचेची खूप काळजी तर घेतो, पण अनेकदा हे विसरतो की आपल्या व्यक्तिमत्त्वात आपल्या चेहऱ्याचे आणि हातांचे सौंदर्य जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपले पायही महत्त्वाचे आहेत, ज्यांवर हवामानाचा परिणाम सर्वात आधी होतो. पण आम्ही त्यांना आमच्या टेक केअर लिस्टमध्ये सर्वात शेवटी ठेवतो. याचा परिणाम असा होतो की आपल्या टाचांना भेगा पडतात आणि पाय निर्जीव दिसतात.

आम्ही हा लेख तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत की तुम्ही तुमच्या पायांची काळजी कशी घेऊ शकता आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचे पाय पुन्हा सुंदर होतील.

टाचांना भेगा पडण्याचे कारण

टाचांना भेगा पडण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे हवामानातील बदल, तसेच ऋतूनुसार पायांना योग्य प्रकारे मॉइश्चरायझ न करणे आणि जेव्हा हवामान कोरडे होते तेव्हा ही समस्या अजून वाढते.

पाहिल्यास बहुतेक स्त्रियांना पायाला भेगा पडल्यामुळे त्रास होतो, कारण काम करताना नेहमी त्यांच्या पायांना धूळ-मातीला जास्त सामोरे जावे लागते, तसेच या कारणांमुळेदेखील टाचांना भेगा पडतात :

* बराच वेळ उभे राहणे.

* अनवाणी चालणे.

* खुल्या टाचांचे सँडल घालणे.

* गरम पाण्यात बराच वेळ आंघोळ करणे.

* केमिकलयक्त साबण वापरणे.

* योग्य मापाचे शूज न घालणे.

बदलत्या हवामानामुळे वातावरणातील कमी आर्द्रता हे टाचांना भेगा पडण्याचे एक सामान्य कारण आहे. यासोबतच वाढत्या वयातदेखील टाचांना भेगा पडणे सामान्य गोष्ट आहे. अशा परिस्थितीत अनेकवेळा टाचा भेगा पडण्यासह कोरडया होतात. बऱ्याच प्रकरणांमध्ये त्या भेगांमधून रक्तदेखील येऊ लागते, जे खूप वेदनादायक असते.

पायांची काळजी कशी घ्यावी

तुमच्या पायांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे की जसे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील डेड स्किन काढून त्यास मॉइश्चरायझ ठेवता त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या पायाच्या घोटयांवरील मृत त्वचा प्लुमिक स्टोनने घासून काढून टाकावी. त्यानंतर पायांना चांगला जाडसर लेप बाम किंवा नारळ तेलाने चांगल्या प्रकारे मॉइस्चराइज करावे.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या घोटयाला तडे जाण्यापासून वाचवू शकता, पण तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील आणि त्यात वेदना किंवा रक्तस्त्राव सुरू झाला असेल, तर तुम्ही त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि त्यावर उपचार करावा, कारण मधुमेह, हायपोथायरॉईडीझम, एटोपिक डर्माटायटीससह असे अनेक रोग आहेत, ज्यामुळे टाचांना भेगा पडतात.

पेट्रोलियम जेली, ग्लिसरीन आणि लॅनोलिन असलेली क्रीम आराम देईल. जर तुम्हाला टाचांना भेगा पडल्याने त्रास होत असेल तर पेट्रोलियम जेली, ग्लिसरीन आणि लॅनोलिन, कॅलेंडुला, चमेलीची फुले आणि कोकम बटर असलेली फूट क्रीम वापरा. यामुळे टाचांना भेगा पडण्यापासून आराम मिळेल आणि याच्या नियमित वापराने भविष्यातही या समस्येपासून तुमचा बचाव होईल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें