Diwali Special: झटपट मेकअप टीप्सनी उजळा रूप

* अमित सारदा, मॅनेजिंग डायरेक्टर, सोलफ्लॉवर

सणांच्या काळात काम वाढत असल्याने आपल्या त्वचेची देखभाल करण्यासाठी वेळ मिळत नाही. खरं तर या काळात आपल्या त्वचेला जास्त देखभालीची आवश्यकता असते. वेळ न मिळाल्यामुळे आपण त्वचेकडे लक्ष देऊ शकत नाही आणि त्वचेतील कमतरता भरून काढण्यासाठी कॉस्मॅटिक पर्यायांचा वापर करतो. परंतु हे पर्याय चांगले नाहीत, कारण पारंपरिक कॉस्मॅटिक उत्पादने त्वचेला फायदा पोहोचविण्याऐवजी जास्त नुकसान पोहोचवू शकतात.

इथे स्किन केअर रूटीन टीप्स देत आहोत, ज्याद्वारे आपण आपल्या त्वचेसाठी काही मिनिटे खर्च करून संपूर्ण दिवसभर ताजेतवाने राहाल.

* मिंट साबणाने अंघोळ केल्यास आपल्याला ताजेतवाने वाटेल. तुम्ही जर रोज मिंट साबणाचा वापर कराल, तुम्हाला रोजच ताजेपणाचा अनुभव येईल.

* आपला चेहरा आणि गालांना ग्रेप सीड ऑइलने मॉइश्चराइज करा. त्याचप्रमाणे, आपल्या डोळयांखाली व वर काकडी व गुलाबपाण्याचे मिश्रण लावून हलक्या हातांनी मालीश करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून मालीश केल्याने आपल्याला केवळ फ्रेशच वाटणार नाही, तर यामुळे रूक्ष त्वचेला ओलावा मिळेल आणि त्वचा उजळेल.

* साबणाऐवजी लिक्विड क्लींजरचा वापर करा, त्याला फेस येत नाही. फोमयुक्त क्लींजरचा वापर करून त्वचेला नुकसान पोहोचविण्याऐवजी आरोग्यदायी उजळपणा मिळविण्यासाठी त्वचेचे पोषण आवश्यक आहे. आपण ऑलिव्ह ऑइलचा वापर करून त्वचेला नैसर्गिक ओलावा प्रदान करू शकता.

* आपल्या आहारात आंबट फळांचा समावेश करा. कारण त्यात व्हिटॅमिन सी असते. त्यामुळे उत्साह वाढतो. अंघोळीसाठी संत्रे किंवा गाजराच्या गुणांचा साबण वापरल्यास आपल्याला टवटवी येईल व जास्त ऊर्जावान वाटेल.

* अनेक एक्सफोलिएंट अशा तत्त्वांनी बनलेले असतात, जे आपल्या त्वचेला सोलवटून क्षतिग्रस्त करतात. त्यामुळे त्वचेचे वय वेगाने वाढू लागते. म्हणून आपण एंजाइमॅटिक एक्सफोलिएंटचा वापर करा. पपईमध्ये नैसर्गिक एंजाइम पपाईन आढळून येते, जे त्वचेला अपेक्षेपेक्षा जास्त उजळपणा प्रदान करते.

* सिंथेटिक सुगंधाचा वापर करू नका. यामध्ये हानिकारक केमिकल असू शकतात. त्याऐवजी आपण शुद्ध एसेंशिअल ऑइलच्या रूपात असणाऱ्या नैसर्गिक सुगंधाचा वापर करा. यात मधुर सुगंध असतोच, परंतु त्याचबरोबर ते रूक्ष किंवा तेलकट त्वचेमध्ये सिबमच्या स्तराचे संतुलन करते.

* टीट्रीमध्ये अँटिबॅक्टेरिअल व अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात, जे मुरमांना अटकाव करतात. आपण अलोविरामध्ये या तेलाचे १-२ थेंब मिसळून लावा.

* केसांसाठी अँटिफ्रीज सीरम, उदा. एवोकॅडो कॅरियर ऑइल केसांना लावून त्यांना बांधून ठेवा. मग आपले दैनंदिन काम सुरू ठेवा. आपले केस पूर्ण सुकल्यानंतर मखमली होतील, जे आपण मोकळे किंवा अंबाडा बांधून ठेवू शकता.

* आपल्या चेहऱ्याचा मेकअप सुरू करण्यापूर्वी त्यावर प्राइमरचा एक थर लावा. त्यामुळे आपली त्वचा मुलायम होईल आणि आपणासाठी मेकअप करणेही सोपे होऊन जाईल. आपण प्राइमर दीर्घकाळ लावून ठेवा.

* केसांना ऑलिव्ह ऑइल लावा. त्यानंतर गरम पाण्यात टॉवेल भिजवा आणि पाणी पिळून टाका. हे गरम टॉवेल आपल्या केसांना बांधा आणि पाच मिनिटे तसेच राहू द्या. गरम टॉवेल तीन ते चार वेळा केसांना बांधा. त्यामुळे आपले केस व डोके जास्त तेल शोषून घेतील.

हे उपाय केल्याने दिवाळीच्या झगमगत्या संध्येला तुमचं रूप अधिक खुलून दिसेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें