असे हवे एअरपोर्ट लुक

* पूनम अहमद

विमान प्रवास करायचा असतो तेव्हा चांगले दिसता येईल व आरामदायक असेल असाच पेहराव असावा असे तुम्हाला वाटत असते. तशी तर ही गोष्ट अगदी क्षल्लक वाटते, पण हव्या असलेल्या या दोन्ही गोष्टी एकाच पोषाखात मिळाव्यात यासाठी बराच विचार करावा लागतो. विमान उड्डाण आणि ते नियोजित ठिकाणी पोहोचण्याची वेळ, विमानातील थंड वातावरण हे सर्व लक्षात घ्यावे लागते. तुम्ही देशाबाहेर जाणार असाल तर विमानातून इमिग्रेशन काऊंटरपर्यंत जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेचाही विचार करावा लागतो. तुमचा एअरपोर्ट लुक फॅशनेबल असावा, सुरुवातीपसून शेवटपर्यंत तुम्हाला ताजेतवाने वाटावे यासाठी या काही टीप्स :

* तुम्ही थंड वातावरणातून उष्ण वातावरणात किंवा उष्ण वातावरणातून थंड वातावरणात जाणार असाल तर लेअरिंग करणे तुमच्यासाठी खूप चांगले ठरेल. एअरपोर्टवर जाण्यापूर्वी दोन्ही वातावरणासाठीचे कपडे तयार ठेवा.

* थंड वातावरणातून उष्ण वातावरणात जाताना आरामदायक आणि हलकेफुलके कपडे घाला, जेणेकरुन पोहोचल्यावर अतिरिक्त कपडे आरामात काढता येतील. महिलांनी कॉटन टँक टॉप किंवा ओपन वूल कार्डिगन सोबत छोटया बाह्यांचा एखादा टॉप घालावा. असा पेहराव एअरपोर्ट आणि विमानात त्यांच्यासाठी ऊबदार ठरेल. व्हीनेक असेल तर उत्तम. गरजेनुसार तुम्ही एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी स्कार्फचाही वापर करू शकता. लेगिंग्सही चांगली, पण ती वापरण्यापूर्वी तिचा रंग फिकट तर झाला नाही ना, हे पाहून घ्या. अन्यथा तुमचा पोषाख खराब दिसेल.

* जेव्हा तुम्ही लॅण्ड कराल तेव्हा वुड कार्डिगन बॅगेत ठेवू शकता. चांगला लुक मिळवण्यासाठी पुरुष बटण असलेले ओपन वुड कार्डिगन घालू शकतात.

* कॅज्युअल दिसायचे असेल तर तुम्ही हुडी किंवा स्वेटर शर्ट घालू शकता. आरामदायक आणि स्मार्ट लुकसाठी तुम्ही ते जीन्ससोबत ट्राय करा. लक्षात ठेवा, गरमीच्या ठिकाणी जात असाल तर वजनदार जाकीट किंवा कोट घालू नका. कारण ते वजनदार असल्यामुळे एअरपोर्टवर सहजपणे वावरता येणार नाही.

* थंड वातावरणातून उष्ण वातावरणात जाताना कपडयांचा क्रम उलटा करा. म्हणजे थोडे जास्त ऊबदार कार्डिगन किंवा स्वेटर शर्ट घालून बाहेर पडा. त्यानंतर मात्र गारव्याचा सामना करण्यासाठी तयार रहा.

* प्रवासाला जाताना स्वत:सोबत जास्त शूज घेऊन जाऊ नका. आरामदायक व स्टायलिश शूजची निवड करा. महिलांनी बॅले फ्लॅट्स किंवा सपोर्टवाले लोफर्स ट्राय करावेत. मोजे घालण्याची गरज नाही. ते दोन्ही वातावरणात फॅशनेबल आणि चांगले दिसतात. पुरुष लेस नसलेले लोफर्स घालू शकतात. यामुळे सिक्युरिटी चेकिंगदरम्यान वेळ लागणार नाही. लेस काढणे, बांधण्याची कटकट राहणार नाही.

* एअरपोर्ट ही बोल्ड प्रिंट आणि ब्राईट कलर्स वापरण्याची जागा नाही. ब्लॅक नेव्ही किंवा बेंज कलर वापरा. सफेद कपडे लवकर खराब होतात. त्यामुळे ते घालू नका.

* फ्लाईट्ससाठी तयार होताना फेब्रिकवर लक्ष द्या. कपडयाचे फेब्रिक चांगले असायला हवे. इकडे तिकडे जावे लागत आल्यामुले तुम्ही थकून जाता. गरम होऊ लागते. विमानात गारवा असतो. त्यामुळे तुमचे कपडे असे हवे जे घातल्याने दोन्हीही वातावरणात तुम्हाला आराम मिळेल. नॅचरल फेब्रिक वापरा. जे मऊ, हवेशीर असतात. सुती आणि तागाचे कपडे चांगले असतात. ते उबदार, हलकेफुलके  असतात. सिंथेटिक फेब्रिकमुळे घाम येतो, शिवाय कम्फर्टेबल वाटत नाही.

* तुम्हाला थेट मीटिंग किंवा इव्हेंटला जायचे असेल तर तुमच्याकडे ड्रेस चेंज करायला वेळ नसतो. अशावेळी रिंकल फ्री फेब्रिक घाला. सिल्कही घालू शकता. हे रिंकल फ्री असतात शिवाय प्रोफेशनल लुकही मिळतो. नेहमी फ्लाईट्समध्ये स्वत:सोबत एक्स्ट्रा कपडे ठेवा. हलक्या वजनाचा कॉटन स्कार्फ तुम्हाला ऊब मिळवून देईल, शिवाय तुम्ही तो तुमच्या बॅगमध्ये सहज ठेवू शकता.

* फ्लाईटमध्ये आराम आणि स्टाईलसाठी कपडयांसोबत तुमच्याकडे काही असे ब्युटी प्रोडक्ट्सही हवे ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण ट्रीपवेळी फ्रेश वाटेल.

* नेहमी चांगले डिओड्रंट सोबत ठेवा. कधीकधी एअरपोर्टवर खूप चालावे लागते, तेव्हा घाम आल्यावर तो वापरा. अराइवलपूर्वी हँड वाईप्स आणि फेशियल वाईप्स वापरल्यास ते तुम्हाला फ्रेश लुक देईल. तुम्ही फेशियल वॉटर, स्प्रेही वापरू शकता. जर कनेक्शन असलेली लांबची फ्लाइट असेल तर अंडर गारमेंटची एक्स्ट्रा जोडी नेहमी सोबत ठेवा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें