फिट रहा खुश रहा

* पूनम अहमद

जगभरात ‘हेल्दी खाणे आणि वेट कमी करणे’ या दोन गोष्टींसाठी लोक जिममध्ये जाण्याचा अट्टाहास करताना दिसून येतात. मात्र कालांतराने हा उत्साह थंड झालेला दिसून येतो. कोणाकडे वेळ कमी असतो तर कोणाला जेव्हा मनासारखा परिणाम दिसून येत नाही, त्यांचा उत्साह हळूहळू कमी होऊ लागतो.

अशात आपल्या दृष्टिकोन आणि फिटनेस प्लॅनमध्ये काही बदल करून तुम्ही कायम वर्ष फिट आणि फ्रेश राहू शकता.

कसे रहाल फिट

फिटनेस ट्रेनर गौरव गुप्ता सल्ला देतात की वेट उचलायला मागे पुढे पाहू नका. बरेच लोक धावणे आणि ट्रेडमिलवर चालणे यालाच फिटनेस समजतात. असे ब्रिस्क आणि जॉगिंग पुरेसे समजले जाते. वेट ट्रेनिंगमुळे तुमचा मेटाबोलिक रेट वाढतो. ज्यामुळे तुमचे शरीर आराम करूनही फॅट बर्न करते.

झुंबा स्पेशालिस्ट आणि मास्टर सविता पाल म्हणतात, तुमचे शरीर काळानुसार बदलत असते, तुमच्या एक्सरसाइजच्या स्ट्रेस नुसार अॅडजस्ट आणि मजबूत होत असते. कधी कधी बॉडी वेट बूट कॅम्पमध्ये जा. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर छोटे छोटे वर्कआउट करा.

होलिस्टिक लिविंग कॉन्सेप्टच्या डॉक्टर दीपा यांचे म्हणणे आहे की कुठेही १० ते ३० मिनिटांचे हाय इंटेन्सिटी वर्कआउट करा. यामुळे कमी वेळात जास्त कॅलरी बर्न होईल आणि वर्कआउटनंतर काही तासांसाठी तुमचा मेटाबोलिक रेट वाढलेला असेल.

यू ट्यूबवर फिटनेस ब्लॉग आणि फूड चॅनेलचे रणवीर सांगतात आपल्या शेड्युलमध्ये एक्सरसाइजचे रुटीन ठरवून टाका आणि त्यापासून मागे हटू नका. कोणताही वेळ जो तुम्हाला सोयीचा आहे तो निवडा आणि हे आपले जरुरी काम समजा आणि याला इग्नोर करू नका.

सविता पाल सल्ला देतात, ‘‘एक फिटनेस सोबती शोधा. त्याच्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल. जेव्हा तुम्हाला वाटेल तुम्ही खूप एक्सरसाइज केली आहे, तेव्हा तोच सोबती तुम्हाला आणखी एक सेट करण्यासाठी उत्तेजन देऊ शकतो. हे आणखी जरासेच तुम्हाला खूप मोठा फरक जाणवून देईल. तुम्ही स्वत:ला जास्त स्ट्राँग फील कराल.’’

स्वत:ला करा मोटिव्हेट

आदिदासच्या मुंबई कॅप्टन यांच्या अनुसार थोडयाशा प्रेरणेनेही खूप उत्साह वाटतो. खेळाडूंची चरित्रे वाचा.

पालसुद्धा म्हणतात की तुम्ही सोशल मिडियावर फिटनेसचे व्हिडिओ बघून आपल्या फिटनेसच्या उद्देशासाठी प्रेरणा मिळवू शकता.

लेलिस्टिक न्युट्रीशनच्या ल्यूक यांचे म्हणणे असे आहे की जर तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चहा घ्यावा लागत असेल तर तुमच्या स्लीप पॅटर्न आणि रुटीन यांच्याकडे लक्ष देणे जरुरी आहे.

झोपेतही आपले शरीर अनेक अवस्थांतून जात असते जसे की सेल ग्रोथ, डिटॉक्सिफिकेशन, सेल्युलर रिपेअर, हीलिंग आणि रिज्युव्हीनेशन. बहुतांश स्वस्थ प्रौढ व्यक्तिला रात्रीची ७ ते ९ तासांची झोप आवश्यक असते. जर तुम्हाला झोपण्यात काही समस्या असेल तर, फोन आणि लॅपटॉपपासून रात्री दूरच रहा. अल्कोहोल, कॅफिन किंवा गोड पदार्थ झोपण्याआधी २ तास घेऊ नका.

पाणी कमी प्यायल्याने थकवा जाणवू शकतो. त्यामुळे जास्त पाणी प्यावे.

ल्यूक म्हणतात प्रत्येक पोषक तत्त्व हे अनेक मेटाबोलिक प्रोसेसशी जोडलेले असते. १ टक्के जरी कमी झाले तरी एनर्जीवर परिणाम होतो. व्हिटॅमिन डी, बी १२, के, आयर्न, मॅग्नेशिअम, सिलेनियम, पोटॅशिअम आणि क्यू १०कडे नेहमी दुर्लक्ष केले जाते. पण यांच्या कमतरतेमुळे मांसपेशींना थकवा आणि मानसिक तणाव उद्भवू शकतो.

आपल्या आहारातील पोषक तत्त्वे ग्रहण करण्यासाठी मेटाबोलिज्म वाढवण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते. हे आपल्या आहारात अवश्य घ्या.

साखर, मैद्यापासून बनलेल्या पदार्थांमुळे मेटाबोलिक रेट कमी होऊ शकतो. त्यामुळे केक, पेस्ट्री, बिस्किट्स यांच्यापासून दूर रहा.

फिटनेस ट्रेनर सनी पाल यांचे असे म्हणणे आहे की हल्ली लोक शारीरिक दृष्ट्या सोयीसुविधांचे आयुष्य उपभोगत आहेत. त्यामुळे दररोज १०,००० पावले अवश्य चाला. त्यामुळे १५० कॅलरी बर्न होईल, चालण्याची कोणतीही संधी सोडू नका. कार थोडी लांब पार्क करा, ज्यामुळे तुमची थोडी चाल होईल. ऑफिस ब्रेकमध्येही चालण्याचा प्रयत्न करा. जिने चढा, प्रत्येक पाच पावलांना एक कॅलरी बर्न होते. साधारणपणे जिन्याच्या पॅटर्नमध्ये १४ पायऱ्या असतात, त्यामुळे लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. जर रुटीन वर्कआउटने बोअर झाला असाल तर, ज्यांना डान्स करणे आवडते त्यांनी झुंबा जॉइन करावे. ट्रेकिंग किंवा हायकिंग यासारख्या अॅक्टिव्हिटीमुळे वर्कआउटसोबतच सोशल अफेअरही होऊ शकते.

फिट राहण्यासाठी थोडीशी मेहनत करून पहा, तुम्हाला चांगले वाटेल. आणि असे म्हटले जातेच की एका स्वस्थ शरीरातच स्वस्थ मन वास करते, तेव्हा आजपासूनच सुरुवात करा आणि स्वस्थ रहा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें