कोणत्याही वयात दिसा हॉट

* पूनम

प्रत्येक वयात सुंदर दिसण्यासाठी फक्त मेकअप करणे पुरेसे नाही तर वयानुसार तुमच्या ड्रेसिंग सेन्सकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. हे मान्य की, तरुण पिढी त्यांना हवा असलेला कोणताही फॅशन ट्रेंड स्वीकारू शकते, पण ज्या महिलांनी तिशी ओलांडली आहे त्याही कोणापेक्षा कमी नाहीत.

काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यांनाही ट्रेंड सेंटर म्हणता येईल. या वयात तरुणींसारखे सुंदर दिसण्यासाठी महिला कोणत्या प्रकारचे पोशाख घालू शकतात, या संदर्भात काही फॅशन डिझायनर्सशी बोलल्यानंतर काही टीप्स मिळाल्या त्या खालीलप्रमाणे :

कोवळया वयात सुंदर बाई दिसण्यासाठी तुम्हीही कधी आईची साडी नेसली असेल तर कधी मावशीच्या चपला घातल्या असतील, पण आता तुम्ही मोठया झाला आहात, म्हणजे आता तुम्हाला सुंदर दिसण्यासाठी फार काही करण्याची गरज नाही. तुमच्या वॉर्डरोबचा मेकओव्हर करून तुम्ही काही मिनिटांत प्रेझेंटेबल लुक मिळवू शकता.

शेपवेअरला बनवा तुमचा जोडीदार

म्हातारपणी तुमची फिगर ३६-२४-३६ असावी असे नाही, पण याचा अर्थ असाही नाही की, तुम्ही फिटिंगचे कपडे घालणे बंद करावे. परिपूर्ण आकार दिसण्यासाठी शेपवेअर घाला. याच्या मदतीने तुमचे शरीर आकारात दिसेल आणि त्यावर तुम्हाला हवे ते परिधान करता येईल.

जर फक्त तुमचे पोट चिकटत असेल आणि इतर सर्व काही आकारात असेल, तर तुमचे पोट लपविण्यासाठी टमी टकर घाला. जर तुमच्या कमरेची रेषा कमी होत असेल तर सपोर्टिव्ह ब्रा घालून तिला आकार द्या. ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट्सवर तुम्हाला बॉडी शेपर्स, शेपवेअर, सपोर्टिव्ह ब्राचे अनेक प्रकार सहज मिळतील.

काळया शेड्सचा संग्रह ठेवा

तुमच्या वॉर्डरोबमध्ये काळया शेड्सचे ड्रेस, टॉप, कुर्ती, साडी, जीन्स इत्यादी नक्की ठेवा. सदाबहार ब्लॅक शेड्स कधीच कालबाह्य होणार नाहीत. तुम्ही ते कोणत्याही ऋतूमध्ये आणि पार्टीला किंवा औपचारिक बैठकीला घालू शकता. काळया पोशाखांप्रमाणेच काळया रंगाच्या हँडबॅग्ज, घडयाळे, पादत्राणेही नेहमीच फॅशनमध्ये असतात. म्हणूनच त्यांचाही संग्रह ठेवा.

पार्टीला गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घाला

आतापर्यंत तुम्ही पार्टीला फॅशनेबल ड्रेस घालून जात होता, मग आताच तो घालणे का टाळता? तिशी ओलांडल्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही यापुढे फॅशनेबल ड्रेस घालू शकत नाही आणि पार्टीचा आनंद घेऊ शकत नाही. फॅशनसोबतच आरामदायकताही लक्षात घेऊन शॉर्ट्सऐवजी नीलेंथ म्हणजे गुडघ्यापर्यंतचा ड्रेस घाला. विश्वास ठेवा, यात तुम्ही खूप सुंदर दिसाल.

स्ट्रेपी टॉप्स घालणे टाळू नका

हॉट लुकसाठी, तुम्ही २० वर्षांच्या असताना स्ट्रेपी टॉप्स घातले असतील, मग आता ते घालणे का टाळता? आजही तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये स्ट्रेपी टॉप्स ठेवू शकता. होय, पण रुंद पट्टयांचे स्ट्रॅपी टॉप खरेदी करा. यामध्ये तुम्हाला आरामदायक वाटेल आणि ते स्टायलिशही दिसेल.

वन पीसही आहे सर्वोत्तम

वन पीस, गाऊन, मॅक्सी, बीच ड्रेस इत्यादी तुम्ही वयाच्या ३० वर्षांनंतरही घालू  शकता. असे आउटफिट्स खूपच फॅशनेबल दिसतात. तुम्ही पार्टीत वन पीस किंवा गाऊन घालू शकता आणि उत्सवादरम्यान बीच ड्रेसमुळे तुमचे व्यक्तिमत्व खुलून दिसू शकते. त्याचप्रमाणे नियमित वापरासाठी तुम्ही मॅक्सी ड्रेसही ट्राय करू शकता.

जीन्स आहे सदासर्वकाळचा आवडता पोशाख

जीन्स हा असा पोशाख आहे, जो केवळ किशोरवयीन मुलीच नाही तर प्रौढ महिलाही परिधान करू शकतात. होय, ही वेगळी गोष्ट आहे की, या वयात तुम्ही जीन्ससोबत टाईट फिट टी-शर्ट घालू शकत नाही, पण फॉर्मल शर्ट किंवा कुर्ती घालून स्मार्ट दिसू शकता. लक्षात ठेवा, लांब कंबरेऐवजी हार्ट वेस्ट जीन्स तुम्हाला जास्त शोभेल.

साडीही आहे चांगला पर्याय

जर तुम्हाला नेहमीच्या लुकचा कंटाळा आला असेल तर तुम्ही वेगळया लुकसाठी साडी ट्राय करू शकता. शरीरातील दोष लपवण्यासोबतच साडी आकर्षक लुकही देते. साध्या साडीसोबत स्लीव्हलेस, बॅकलेस, हॉल्टर किंवा टी नेक ब्लाऊज घाला. यामुळे तुम्ही स्टायलिश दिसाल. त्याचप्रमाणे कोणत्याही खास प्रसंगी रॉयल लुकसाठी डिझायनर साडयाही नेसता येतात. जरी आजकाल साडी फारच क्वचित परिधान केली जात असली तरी तिच्या अभिजात सौंदर्याला पर्याय नाही.

स्कर्ट वापरून पाहा

खूप लहान किंवा खूप मोठा नाही, पण तुम्ही गुडघ्यापर्यंत लांब स्कर्ट घालू शकता. टी-शर्ट किंवा क्रॉप टॉपऐवजी शॉर्ट कुर्ती घाला. या लुकमध्ये तुम्ही खूप स्मार्ट दिसाल. गडद किंवा फिकट शेडच्या स्कर्टसह साधी आणि फिकट रंगाची कुर्ती तुम्हाला चांगला लुक देईल.

जाकिट किंवा कोट

तुम्ही जीन्स किंवा स्कर्टसोबत टाईट फिटिंग टॉप, टी-शर्ट किंवा शर्ट घातले असाल तर त्यावर जाकिट किंवा कोट घाला, तो तुम्हाला अत्याधुनिक लुक देईल. त्याचप्रमाणे शॉर्ट ड्रेससह कार्डिगन घालून तुम्ही पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. जर तुम्ही फूलस्लीव्हज आउटफिट घातला असाल तर त्यासोबत स्लीव्हलेस जाकिट किंवा कोट शोभून दिसेल.

अॅक्सेसरीजही आहेत महत्त्वाच्या

मिस ब्युटीफुलल म्हणवून घ्यायचे असेल तर परफेक्ट मेकअप, प्रेझेंटेबल आउटफिटसोबत अॅक्सेसरीज घालणे गरजेचे आहे. जास्त नाही, पण आउटफिटशी जुळणाऱ्या २-३ अॅक्सेसरीज घाला किंवा तुमच्या स्टाईल स्टेटमेंटप्रमाणे हँगिंग कानातले, लाँग ड्रेस, ब्राइट कफ किंवा फुलसाईज फिंगर रिंग यापैकी कुठल्याही एकाला तुमचे स्टाईल स्टेटमेंट बनवा आणि तुमच्या आउटफिटशी मॅच करा.

लाईट आउटफिट्स ब्राईट अॅक्सेसरीज

मान्य आहे की, या वयात तुम्ही खूप गडद किंवा चमकदार पोशाख घालू शकत नाही, पण किमान तुमच्या लाइट शेडच्या पोशाखांना चमकदार टच देऊ शकता जसे की –

* लाईट शेड असलेल्या ड्रेससोबत ब्राईट स्कार्फ घाला, जसे की पांढऱ्या टॉपवर गडद केशरी रंगाचा स्कार्फ.

* हलक्या शेडच्या जीन्सला चमकदार किंवा रत्नजडित बेल्ट लावा.

* ठळक शेडच्या हेअर अॅक्सेसरीज जसे की क्लिप, हेअर बँड इत्यादी केसांमध्ये लावा.

* पार्टीसारख्या प्रसंगी सॉफ्ट शेड आउटफिटसह सिल्व्हर किंवा गोल्डन क्लच कॅरी करा.

* निऑन शेडसचे बेली, मोजे, शूजही हलक्या रंगाच्या पोशाखासह आकर्षक दिसतात.

* रंगीबेरंगी फ्रेम्स असलेले सनग्लासेसही तुमचे सौंदर्य वाढवू शकतात.

* चमकदार लुकसाठी सिंगल आउटफिटवर आकर्षक डायमंड सेट घाला.

* डार्क आणि ब्राइट शेडचे नेलपॉलिश लावून तुम्ही तुमच्या लाइट शेडच्या ड्रेसला ट्रेंडी लुक देऊ शकता.

 

बेयर शोल्डर ड्रेस कसा कराल कॅरी

* पारुल भटनागर

उन्हाळयात मुलींना फॅशन करावीशी वाटते कारण या मौसमात अधिक स्टायलिश कपडे घालून स्वत:ला अधिक फॅशनेबल व स्टाइलिश दिसण्याचा त्या प्रयत्न करत असतात.

परंतु अनेकदा त्या अशीदेखील चूक करतात ज्यामुळे त्या फॅशनेबल दिसण्याऐवजी आऊटडेटेड दिसू लागतात वा त्यांनी जे आउटफिट्स घातलेले असतात ते त्यांच्यावर अजिबात शोभून दिसत नाहीत वा त्या कम्फर्टेबल नसल्यामुळे प्रत्येक वेळी त्यांना ते सांभाळावं लागतं, ज्यामुळे त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढण्याऐवजी कमी होण्याचं काम करतं.

अशावेळी जेव्हादेखील तुम्ही स्वत:ला स्टायलिश दिसण्यासाठी बेयर शोल्डर ड्रेस वा ऑफ शोल्डर ड्रेसची निवड करता तेव्हा या गोष्टींकडे खास करून लक्ष द्या म्हणजे तुमचा पेहराव तुमच्या व्यक्तिमत्वाला वाढविण्याचं काम करेल किंवा बिघडविण्याचं नाही.

बेयर शोल्डर ड्रेस

याला ऑफ शोल्डर ड्रेसदेखील म्हणतात, जो सध्या सेलिब्रिटीजमध्ये सर्वसाधारण बनला आहे. म्हणून तर आज प्रत्येक मुलगी अशा प्रकारच्या पेहरावाला आपल्या वॉर्डरोबमध्ये प्राथमिकता देणे पसंत करते, जो हा लुक सौंदर्य वाढविण्याचं काम करतं. मग ते फ्रेंड बर्थडे पार्टीमध्ये वेअर करणं असो वा स्वत:च्या अथवा कुणा दुसऱ्याच्या वा एखाद्या दुसऱ्या ऑकेजनसाठी हे तिला फार सेक्सी दिसण्याबरोबरच कॉन्फिडन्स वाढविण्याचेदेखील काम करते. परंतु या गोष्टीची काळजी घेणं खूपच गरजेचं आहे की जर तुम्ही बेयर शोल्डर ड्रेस वेअर केला किंवा मग एखादा लेटेस्ट डिझाईनचा ड्रेस, जोपर्यंत तुम्ही तुमचं फिजिक, कम्फर्ट, साइज, प्रिंट, कलर लक्षात ठेवून जर घालणार नसाल तर तुम्हाला ना ग्रेस वाढविण्याचं काम करेल आणि ना ही तुम्ही तो घातल्यानंतर स्वत:ला चांगलं फिल कराल म्हणून कोणा दुसऱ्याचं पाहून नाही तर तुमच्यावर काय दिसेल ते पाहूनदेखील विकत घ्या.

प्रिंट कशी असावी

हे गरजेचं नाही की प्रत्येक पेहराव हा खूपच भडक प्रिंटचा असावा तेव्हाच तो छान दिसेल. ऑफ शोल्डर ड्रेस जिथे स्वत: डिझाइन व बांधणीमध्येच हॉट असतो तो जर सिंगल कलर व प्रिंटमध्ये असेल तर अधिक अॅट्रॅक्टिव्ह दिसतो. म्हणजेच सिम्पलमध्ये आकर्षक. अलीकडे डेनिम ऑफ शोल्डर, शिमरी ऑफ शोल्डर ड्रेस, व्हाईट नेक डाउन ड्रेस, वन कलर लॉन्ग स्लीव्हज ऑफ शोल्डर ड्रेस, वन शोल्डर डाउन ड्रेस, पिंक ऑफ शोल्डर ड्रेस, व्हाईट अँड ब्लॅक व व्हाईट अँड ब्ल्यू ड्रेस खूपच डिमांडमध्ये आहेत.

* डेनिम ऑफ शोल्डर टॉप असो वा मग ड्रेस याची फॅशन कायमच इनमध्ये असते. अशावेळी तुम्ही फॅशन सोबतच कम्फर्टसाठी डेनिम ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये रफल स्टाईल स्लिव व बेल्ट कॅरी करू शकता. सोबतच याच्यासोबत पेन्सिल हिल व हातात क्लच व स्लीन्ग बॅग तुमच्या या लुकचा ग्रेस वाढविल.

* तुम्हाला तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राच्या लग्नात जायचं असेल आणि तुम्हाला काही वेस्टर्न वेअर कॅरी करायचं असेल तर ब्लॅक, डार्क ब्राऊन शिमरी ऑफ शोल्डर ड्रेस ज्याची बॉडी फिट फिटिंगसोबत लिटिल लो हेमलाइनसोबत वर ब्रेस्ट लाईनपर्यंत डीप ऑफ ड्रेसला  कम्फर्टसोबत हॉट लुक देईल, सोबतच गोल्डन हाय हिल परफेक्ट स्टाईल आहे.

* ब्लॅक अँड व्हाईट डीप नेक ऑफ शोल्डर शॉर्ट ड्रेस किलिंग ड्रेसचं काम करतो. एक तर रंगसंगती असा आणि दुसरं याला तुम्ही हवं असल्यास डे पार्टीमध्ये घाला वा मग नाईट पार्टीमध्ये सुंदर दिसणारच. तुम्ही हे बेस्ट शेपमध्ये डिझाईन करून त्या हिशोबाने याच स्लीव्हज डिझाईन करू शकता. जर तुम्हाला याचं नेक अधिक डाऊन वाटत असेल तर तुम्ही तुमच्या कम्फर्टनुसार थोडसं वर डिझाईन करू शकता. यासोबतच अँकल स्ट्रेपवलं किटन हिल आणि हातात मॅचिंग क्लच ऑफ तुम्हाला एक असा लुक देईल की तुम्ही  स्वत:चं हा लुक पाहून चकित व्हाल.

* व्हाईट अँड ब्ल्यू ड्रेस जिथे समरसाठी कूल आहे तिथे शॉर्ट ऑफ सोल्डर ड्रेस वापरून तुम्ही डेट वा फ्रेंडससोबत गेट-टु गेदर कराल तर पार्टीची मजा अधिक द्विगुणित होईल. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नेक डाऊन ठेवत यामध्ये लॉग स्लीव्हजची फॅशन स्वीकारू शकता. सोबतच वॅलीची स्टाईल व्हॉट अ लुक.

* केवळ हाच ड्रेस नाही तर तुम्ही तुमच्या कुरत्यालादेखील ऑफ शोल्डर बनवून व विकत घेऊन सेक्सी लुक मिळवू शकता. यासाठी तुम्ही फ्लोरल वन कलरची कुर्ती घेऊन त्याला लॉन्ग स्लीटसोबत प्रिल कॅप स्टाइल नेक बनवून जे तुमच्या एल्बोपर्यंत राहील, जे तुम्हाला टेण्डी दिसण्याबरोबरच कम्फर्टदेखील देईल. याला तुम्ही सिगारेट पॅन्ट व वेलीसोबत वेअर करू शकता.

* शिमरी क्लॉथने बनलेलं ऑफ शोल्डर शर्ट वा मग लॉन्ग ड्रेस. ज्याच्या डीपसोबत सपोर्ट देत नेकपर्यंत मॅचिंग फ्लॉवर्सने डिझाईन बनविली आहे, जो ड्रेसला ट्रेंडी दिसण्याबरोबरच फुल कम्फर्ट देण्याचं काम करेल. याला तुम्ही बर्थडे पार्टीमध्येदेखील घालू शकता वा एखाद्या इवेंटमध्ये. सोबतच सुपर हाय हिलचं टशन ड्रेसला वापरण्याची मजा अधिक वाढवेल.

* तुम्ही ऑफ शोल्डर ब्लाउजदेखील डिझाईन करून घेऊ शकता, ज्याचं डाउन लुक व फ्लेरी स्लीव्ह तुमच्या साडीला अधिक हॉट बनविण्याचं काम करेल. अगदी तुम्ही फ्रीलवाल्या ब्लाऊजमध्येदेखील डिझाईन करून घेऊ शकता. फक्त लक्षात ठेवा फॅशनसोबतच कम्फर्टदेखील महत्त्वाचा आहे.

कोणता फॅब्रिक ऑफ शोल्डर ड्रेस बेस्ट राहील

तसही अलीकडे टाईम फॅशनचा आहे. फक्त विचार न करता काही घातलं मग ते तुमच्यावर सूट करो वा न करो बस आपण हाच विचार करून खुश होतो की आपण स्वत: फॅशनच्या स्पर्धेत मागे नाही आहोत. खरं तर तुम्ही फॅशनसोबतच ड्रेसचा निवडीमध्ये फॅब्रिकदेखील लक्षात ठेवले तर तुम्ही अधिक सेक्सी दिसाल सोबतच तुमच्या ऑकेजनच्या हिशेबाने परफेक्ट दिसण्यात मदत करेल.

तसंही पेहरावासाठी लाइटवेट फॅब्रिकची निवड करा

* वेलवेट फॅब्रिक सुपर सोफ्ट होण्याबरोबरच रॉयल लुक देण्याचं काम करतं. जर तुम्ही नाईट पार्टीमध्ये जाण्याचा प्लान करत असाल तर यासाठी फॅब्रिकने बनलेलं ऑफ शोल्डर ड्रेस तुमच्यासाठी सुपरहिट आहे.

* शिफॉन फॅब्रिक सुपर सोफ्ट होण्याबरोबरच सर्वांवर सूटदेखील करतं आणि समरसाठी ते खूपच कूल चॉईस आहे.

* कॉटन ऑफ शोल्डर पेहराव खूपच अफोर्टेबल होण्याबरोबरच याचे शेड्स व प्रिंट्स खूपच कूल आहेत. ज्यामुळे तुम्ही समरमध्ये कॉलेजदेखील वेअर करू शकता आणि सोबतच आऊंटिंगवरदेखील इझी टू यूज आहे.

* नेट फॅब्रिकने बनलेलं ऑफ शोल्डर पूर्णपणे पार्टी लुक देतो. जेव्हा तुम्हाला अधिक पार्टी वेअर ड्रेसची गरज असेल तेव्हा तुम्ही याच्या फॅब्रिकची निवड करा.

* वाईल फॅब्रिक कॉटन मिळून बनलेलं असल्यामुळे खुपच सॉफ्ट फिल देतं. सोबतच जेव्हा समरमध्ये तुम्ही या फॅब्रिकने बनलेलं स्टायलिश व प्रिंटेड ऑफ शोल्डर घालाल तेव्हा स्वत:कडेच पहात रहाल.

* रेयॉन फॅब्रिक खूपच पातळ असल्यामुळे हे शरीरात घाम चिकटू देत नाहीत. सोबतच यामध्ये ऑफ शोल्डर ड्रेस, टॉपचे एवढे ऑप्शन्स असतात की तुमच्यासाठी निवड करणं कठीण होऊन बसतं. समरसाठी प्रिंट व फॅब्रिक वाईज हे खूपच बेस्ट आहे.

कम्फर्टला दुर्लक्षित करू नका

भलेही आज स्वत:ला फॅशनच्या या स्पर्धेत मागे ठेवायचं नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही मॉडन पेहराव घालून स्वत:ला कायम अनइझ फील करत रहाल म्हणजेच ड्रेस तर घातला आहे परंतु पूर्ण पार्टीत तुमचं लक्ष फक्त आणि फक्त तुमचा ड्रेसवर करण्यातच लागलेलं आहे, हे योग्य नाही आहे. यासाठी गरजेचं आहे की तुम्ही जेव्हादेखील ऑफ शोल्डर ड्रेस, टॉप, ब्लाउजची निवड कराल तेव्हा त्याचा नेक खाली ठेवा, ज्यामुळे फॅशनदेखील हायलाईट होईल आणि स्वत:ला कम्फर्टदेखील मिळेल आणि जर तुम्हाला खूपच डाउन नेक वापरण्याची सवय असेल तर मग तुमचा ऑफ शोल्डर ड्रेसमध्येदेखील डीप ब्रॉड नेकची तुम्ही निवड करू शकता.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें