मेड नव्हे तर लाईफलाईन म्हणा

* रोचिका शर्मा

जिममध्ये संध्याबरोबर ट्रेडमिलवर चालत असताना मी शॉपिंगची योजना बनविली. घरी जाऊन आंघोळ करून न्याहारी केली आणि त्यानंतर संध्याचा फोन आला. म्हणू लागली की एक तास उशीराने निघूया. आज कामवाली बाई आलेली नाही. मी जरा स्वयंपाकघर आणि घर स्वच्छ करून घेते किंवा मग उद्या जाऊया. हे सांगत असताना ती खूप दु:खी होती आणि म्हणत होती की जेव्हा मेड रजा घेते तेव्हा ती अगोदर सांगतही नाही.

मीसुद्धा काय करणार होते, एक तास उशीरा चालण्याचे मान्य केले. कारण दुसऱ्या दिवशी माझी डॉक्टरांशी अपॉइंटमेंट होती. पण आता आमच्याकडे खरेदीसाठी कमी वेळ होता कारण मुले शाळेतून येण्यापूर्वी आम्हाला घरी परत यायचे होते.

अनेक समस्या

दुसऱ्या दिवशी माझी कामवाली बाई उशीराने आली, पण मला डॉक्टरकडे जावे लागणार होते, मग मी बेडरूमला कुलूप लावले आणि घराची चावी शेजारच्या घरात देऊन निघाली जेणेकरून कामवाली बाई आल्यावर ती स्वयंपाकघर आणि बाकीचे घर स्वच्छ करेल. मला तिला घरात एकटं सोडण योग्य वाटत नव्हतं पण विवश होते कारण आम्ही विभक्त कुटुंबात राहतो.

ही समस्या आज जवळजवळ प्रत्येक घरात आहे. नोकरी व बदल्यांमुळे संयुक्त कुटुंबे कोसळत आहेत, तर कार्यरत महिलांची संख्या वाढत आहे. मुले, म्हातारे आणि तरूण सगळे घरातील नोकरांवर अवलंबून आहेत.

साफसफाईपासून ते स्वयंपाक बनवण्यापर्यंत, मुलाचे संगोपन करण्यापासून वृद्धांची काळजी घेण्यापर्यंत सर्व कामे कामवाल्या बाया घरा-घरांत करत आहेत.

मेड आणि मॅडम एकमेकांना पूरक आहेत

मुंबईत राहणारी रिया सांगते, ‘‘मी जेव्हा गर्भवती होते. तेव्हा माझ्या घरात काम करणाऱ्या मुलीने माझी खूप काळजी घेतली. मी तिला न दिलेली कामेदेखील ती करायची आणि एवढेच नाही तर माझ्या मुलीच्या जन्मानंतर जेव्हा मी कामामध्ये व्यस्त होते तेव्हा ती तिच्याबरोबर खेळत असे आणि जेव्हा-जेव्हा मी कामासाठी बाहेर जात असे तेव्हा ती माझ्याबरोबर जात असे. जेणेकरून ती माझ्या मुलीची काळजी घेऊ शकेल.

तिची वागणूक पाहून आम्ही तिला घरातील सदस्याचा दर्जा दिला. आमच्या घरी नातेवाईकदेखील आले तरी तिला कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आदर द्यायचे.

‘‘मी स्वत: ही तिच्या कुटुंबाच्या गरजा भागवत असे. आम्ही दोघी एकमेकांच्या पूरक झाल्या. काही वर्षांनी तिचे लग्न झाले तेव्हा आम्ही तिची मुलीप्रमाणे पाठवणी केली आणि तिच्या कुटुंबियांना आर्थिक मदतदेखील केली.’’

परिस्थितीने विवश केले

हैदराबादची रहिवासी असलेली कोमल म्हणते, ‘‘मी माझ्या कामवालीला घराच्या सदस्याप्रमाणे ठेवले होते. परंतु दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर जेव्हा तिला रात्रंदिवस घरीच राहण्याचे काम देण्यात आले. तेव्हा तिने घरात चोरी सुरू केली. स्वयंपाकघरातील खाण्याच्या वस्तूंपासून सुरुवात केली. आणि हळू- हळू तिचे धाडस वाढू लागले.

‘‘एक दिवस तिने संधी बघून माझ्या कपाटातून सोन्याच्या बांगडया चोरल्या. मी पोलिसांकडे तक्रार केली, तेव्हापासून माझ्या घरात कुठलीही कामवाली बाई काम करण्यास तयार नाही.’’

बदलीमुळे चेन्नईला गेलेल्या मोहिनी म्हणतात, ‘‘भाषा ही पहिली समस्या आहे. येथे हिंदीभाषी कामवाल्या फारच कमी आहेत, म्हणून त्यांची मागणी आहे. म्हणून, मी थोडी तमिळ शिकले आहे.

‘‘परदेशात हातांनी काम करून येणाऱ्यांसाठी कामवाल्या बाया या लक्झरीसमान आहेत. म्हणूनच ते त्यांना केवळ मागतील ती किंमतच देत नाहीत तर त्यांचे खूप नखरेदेखील पुरे करतात. त्यांची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्याचा त्या खूप फायदाही घेत आहेत. वेळेवर कामावर न जाणे जणू ही त्यांची सवयच झाली आहे.’’

मेड शिक्षित असावी

आजकाल ही समस्या सामान्य स्त्रियांना आहे. प्रत्येकीला घरी एक चांगली, स्वच्छ, प्रामाणिक आणि वेळेवर येणारी कामवाली हवी आहे. परंतु एकाच स्त्रीमध्ये हे सर्व गुण असणे फार कठीण आहे.

आजच्या घडीला त्या प्रत्येक घराची जीवनरेखा आहे, म्हणून अशा परिस्थितीत हा प्रयत्न केला गेला पाहिजे की भले जास्त पगार द्यावा लागेल, परंतु थोडी सुशिक्षित आणि चांगल्या दर्जाची मेड्स ठेवली जावी.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें