काय आहे हेअर ग्लॉस ट्रीटमेंट

* आभा यादव

नवीन वर्ष येताच आपल्या सगळ्यांच्या मनात काही ना काही बदलण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी फॅशनच्या क्षेत्रात जेव्हा सौंदर्य निखारण्याची गोष्ट येते, तेव्हा आपण काहीही कसर सोडत नाही. मग ते स्किन ट्रीटमेंट असो वा हेअर ट्रीटमेंट. जर आपण हेअर ट्रीटमेंटचा विचार करत असाल, तर अलीकडे नवनवीन हेअर केमिकल ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, ज्यामुळे केस अधिक ड्राय व डॅमेज होतात. खराब केसांना हेल्दी आणि शाईन बनवण्यासाठी तुम्ही हेअर ग्लॉस ट्रीटमेंट करू शकता. ही ट्रीटमेंट काय आहे आणि ती कधी करावी, हे सांगत आहेत नाइस अँड सलोनचे हेअर एक्स्पर्ट् सलीम:

काय आहे हेअर ग्लॉस ट्रीटमेंट

ही एक तात्पुरती ग्लॉसी ट्रीटमेंट आहे, जी कलर केलेल्या केसांच्या क्युटिकल्सना ग्लॉसी बनवण्याचे काम करते आणि केसांचा कोरडेपणा कमी करते. यामध्ये पेरॉक्साइड किंवा अमोनियाचा वापर केला जातो. हे केमिकल तुमच्या केसांच्या क्युटिकल्समध्ये मिसळले जाते, ज्यामुळे केसांमध्ये चमक येते. ज्या महिलांना केसांमध्ये शाइन आणायची आहे, त्यांच्यासाठी हेअर ग्लॉस हा एक उत्तम पर्याय आहे.

देई सॉफ्ट आणि शायनी हेअर

हेअर एक्स्पर्ट सलीम यांचे म्हणणे आहे की, अनेकदा असे दिसून येते की मुली फॅशनच्या नादात आपल्या केसांमध्ये वेगवेगळ्या स्टायलिंगसाठी हॉट स्टायलिंग टूल्सचा अधिक वापर करतात आणि हेअर ट्रीटमेंट घेत राहतात, परंतु हेअर ट्रीटमेंटनंतर योग्य काळजी घेत नाहीत. त्यामुळे केसांची चमक कमी होते आणि केस बारीक व निस्तेज दिसू लागतात. अशा परिस्थितीत आपण हेअर ग्लॉस ट्रीटमेंट करून घेऊ शकता. या ट्रीटमेंटमुळे केसांना सरळ आणि नैसर्गिक लुक मिळतो. तसेच केसांची हरवलेली चमक पुन्हा परत येते.

याव्यतिरिक्त, डाय केलेल्या केसांमध्ये एक्स्ट्रा शाईनला बॅलन्स करण्यासाठीही ही ट्रीटमेंट उपयुक्त ठरते. या ट्रीटमेंटमुळे स्प्लिट एंड्स, प्रीझि हेअर ना स्मूथ केल्यामुळे देखील दिलासा मिळतो.

किती प्रकारचे

हेअर ग्लॉसचे २ प्रकार असतात – एक  टिंटेड आणि दुसरा क्लीयर टिंटेड हेअर ग्लॉस ट्रीटमेंट. ही ट्रीटमेंट केसांना सूक्ष्म रंगद्रव्य (कलर पिगमेंट) देते, ज्यामुळे केसांना नैसर्गिक ग्लॉसी लूक मिळतो. नैसर्गिक चमक देण्यासाठी हे इनग्रीडीएन्ट्सने समृद्ध  क्लीयर ग्लॉसही आहे. बेहेनट्रीमोनियम क्लोराईड आणि एमोडिमेथिकोन हेअर ग्लॉसमध्ये दोन मुख्य घटक आहेत, जे केसांमध्ये चमक टिकवून ठेवतात.

फायदे

हेअर ग्लॉस ट्रीटमेंट केसांना मऊ बनवते आणि त्यांना नैसर्गिक लूक देते. यासोबतच, रंग केलेल्या केसांमधील हाय कॉपर टोन किंवा अॅडेड शाइनला बॅलन्स करते. ही ट्रीटमेंट हाय -शाइन फिनिशसाठी स्प्लिट एन्ड्स, फ्लायवेज आणि फ्रिझना स्मुद करते. हेअर ग्लॉस ट्रीटमेंट कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी उत्तम आहे. ही केसांची दुरुस्ती करते, केसांचा व्हॉल्युम वाढवते आणि चमक वाढवण्यास मदत करते. तसेच, यूव्ही किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठीही उपयुक्त ठरते.

हेअर व्हॉल्युम आणि स्ट्राँग टेक्स्चर

हेअर ग्लॉस ट्रीटमेंट, मग ती टिंटेड असो किंवा क्लिअर, केसांच्या प्रत्येक स्ट्रँडवर कोटिंग करते. त्यामुळे केसांच्या क्युटिकल्सना लिफ्ट मिळते, ज्यामुळे केसांमध्ये व्हॉल्युम दिसून येतो. यासोबतच ही ट्रीटमेंट केसांना मजबूत टेक्स्चरही देते.

काय आहे प्रोसेस

हेअर ग्लॉस लावण्यापूर्वी सर्वप्रथम केसांना एखाद्या माइल्ड शॅम्पूने स्वच्छ धुतले जाते. त्यानंतर हेअर ग्लॉस केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत लावले जाते. हेअर ग्लॉस लावल्यानंतर, कोम्बच्या मदतीने प्रॉडक्ट संपूर्ण केसांमध्ये समान रीतीने पसरवले जाते. हे साधारण २० ते २५ मिनिटे केसांवर ठेवले जाते. त्यानंतर शॅम्पूने केस धुऊन कंडिशनर लावला जातो. यानंतर ब्लो-ड्रायने केस सेट केले जातात. हेअर ग्लॉसचा परिणाम केसांवर साधारणपणे ६ आठवडे टिकतो.

खुलून दिसतील केस हेअर स्टायलिंग टूल्सने

* गुंजन गौड, कार्यकारी संचालक, एल्पस ब्यूटी क्लिनिक

आजकाल हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर बराच वाढला आहे. पण त्यांचा वापर
करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेअर ड्रायर : केसांची नवी स्टाईल करताना इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक
असलेला हेअर ड्रायर मुख्य आहे. केस व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवडयातून
एकदा तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पण रोज किंवा वरचेवर वापर
केल्यास केस रूक्ष होणे, डँड्रफ अशा समस्या वाढू शकतात. हेअर ड्रायरच्या उत्तम
परिणामांसाठी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या :
* तुमच्यासाठी हेअर ड्रायरचा वापर गरजेचा असल्यास केसांना नियमित तेल
लावा. आठवडयातून जास्तीत जास्त एकदाच याचा वापर करा.
* ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडिशनिंग करायला विसरू नका.
* हेयर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना नॅरिशमेंट सीरम लावा. ड्रायरच्या उष्णतेमुळे
केस मऊ होतील.
* केस कुरळे असतील, रुक्ष, मऊ किंवा सिल्की, केसांचा प्रकार आणि
आवश्यकतेनुसार हेयर ड्रायरचा वापर करा.
* ६ ते ९ इंच अंतर ठेवूनच हेयर ड्रायर वापरा, अन्यथा केसांचा कोरडेपणा वाढेल.
* केस रुक्ष असल्यास ड्रायरचा उपयोग कमीत कमी करा. केस तेलकट
असल्यास ड्रायर जास्तीत जास्त वापरा.

हेयर आयर्न
केस स्ट्रेट ठेवण्यासाठी आजकाल हेअर आयर्नचा खूपच वापर केला जात आहे.
परंतु याच्या चांगल्या परिणांमासाठी लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट
म्हणजे नेहमीच चांगल्या प्रतीच्या प्लेट आणि वेगवेगळया तापमानासाठी
सिरॅमिक प्लेट्सची आयर्न घ्यावी, ज्या स्वयंचलितपणे बंद होतात. केस खूपच
पातळ आणि खराब असतील तर सुरुवात कमी सेटिंगपासून करावी. केस कुरळे
आणि जाड असतील तर हाय सेटिंगवर जा.
केसांवर आयर्न वापरण्यापूर्वी त्यांना शाम्पू आणि कंडिशनिंग करा. ओल्या
केसांवर कधीच स्ट्रेटनिंग केले जात नाही. म्हणून आधी ब्लो ड्रायरने केस कोरडे
करा. केसांना अधुनमधुन थंड हवेनेही ब्लो ड्रायर करा. अन्यथा ते जाळण्याची
भीती असते. केसांसाठी चांगल्या हिट प्रोटेक्टरचा वापर करा. जेणेकरून हॉट
आयर्नमुळे ते खराब होणार नाहीत. ते खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात तेल
किंवा जास्त प्रमाणात सिलिकॉन नसावे. त्याचा केवळ एक थेंबच पुरेसा असतो.

व्हायब्रेटर मसाजर
व्हायब्रेटर मसाजरने केलेला मसाज हातांनी केलेल्या मसाजपेक्षा वेगळा असतो.
व्हायब्रेटर केसांच्या मांसपेशी आणि टाळूच्या त्वचेमध्ये कंपन निर्माण करून
उत्तेजना वाढवते, यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि नसांवरील ताण कमी
होऊन थकवा दूर होतो. केस निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.केस
एकमेकांना घासले जाणे हानिकारक असते. हातांनी केलेल्या मालिशमुळे केस
बऱ्याच प्रमाणात एकमेकांवर घासले जातात. व्हायब्रेटरने केलेल्या मालिशमुळे
केस एकमेकांवर घासले जाण्याची शक्यता दूर होते, तसेच रक्ताभिसरण
वाढल्याने केसांची मुळे मजबूत होतात. व्हायब्रेटर मसाजरने मसाज करण्यासाठी
झाकणासारख्या गोल आकाराच्या दातांच्या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो.

चांगल्या परिणामांसाठी केसांच्या त्वचेची मालिश करण्यासाठी व्हायब्रेटरची
क्षमता प्रति मिनिट २००० कंपनांपेक्षा जास्त नसावी. मसाज करताना हलू नये,
कारण धक्का लागल्यास दुखापत होऊ शकते. कोरडया केसांना तेल
लावल्यानंतरही व्हायब्रेटर मसाजरचा वापर केला जाऊ शकतो.

स्काल्प स्टीमर
हे इलेक्ट्रिक डिव्हाइस थोडयाच वेळात पाण्याची वाफ तयार करतो. कुठल्याही
प्रकारच्या केसांच्या समस्येसाठी स्टीम ट्रीटमेंट विशेष फायदेशीर ठरते. वाफेमुळे
त्वचेची रंध्रे उघडतात आणि त्यात अडकलेली घाण बाहेर येते. रक्ताभिसरण
वेगवान झाल्यामुळे केसांना संपूर्ण पोषण मिळते. याच्या अधिक चांगल्या
परिणामांसाठी, स्काल्प स्टीमरद्वारे नियमितपणे दोन आठवडयांसाठी स्टीम
ट्रीटमेंटचा वापर करावा. केसांना दिल्या जाणाऱ्या सर्व उपचारांमध्ये स्टीम पद्धत
विशेष फायदेशीर आहे. वाफ दिल्यानंतर केस धुवू नयेत.

इन्फ्रारेड रेज लॅम्प
इन्फ्रारेड किरण उष्णता निर्माण करणारे असे किरण आहेत जे दिसत नाहीत.
त्यांना प्रकाशाशी एकरूप केले तरच ते दिसतात. इन्फ्रारेडच्या तापमानाचा वेग
सुरुवातीला कमी असतो, पण काही मिनिटांतच तो उच्च तापमानापर्यंत पोहोचतो.
याद्वारे त्वचेतील मांसपेशी आणि त्वचेवर होणारा प्रभाव दीर्घकाळ राहतो.
शुद्ध रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या दिशेने अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या
रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यामुळे त्या ठिकाणी आवश्यक
पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळू लागते. यामुळे मांसपेशीत
निर्माण होणाऱ्या समस्या जसे की सूज येणे, मांसपेशी आखडणे, थकवा येणे,
नलिकांमधील थकवा आणि वेदना दूर करण्यासाठी याचा विशेष फायदा
होतो.इन्फ्रारेडचा वापर करताना डोळे स्वच्छ ठेवा. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा
लावत असाल तर काढून ठेवा. तुम्ही सोनेचांदी किंवा इतर कोणत्याही धातूचे

दागिने घातले असतील तर तेदेखील काढून ठेवा, अन्यथा ते गरम झाल्यामुळे
त्वचा भाजू शकते. लॅम्पच्या वापरानंतर तसेच त्वचा सामान्य झाल्यानंतर शाम्पू
करा. त्यासाठी कोमट पाणी वापरा. लॅम्प २५ ते ३० इंचाच्या अंतरावर ठेवा.

ओझोन रेंज लॅम्प
या इलेक्ट्रिक उपकरणाद्वारे ओझोन किरणांची निर्मिती केली जाते. ओझोन
किरणे रोग पूर्णपणे बरा करतात. या किरणांचा वापर करीत राहिल्यास केस
आणि टाळूच्या त्वचेत कोणत्याही प्रकारचे संक्रमण होण्याची किंवा कोणत्याही
रोगाची शक्यता उरत नाही. केस पांढरे होण्याची समस्या, टक्कल पडणे, केस
मोठ्या प्रमाणात गळणे अशा सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी ओझोन
किरणे पूर्णपणे सक्षम असतात. या उपकरणासोबत कंगव्यासारखा एक बल्बही
असतो. याचा उपयोग करून ओझोन किरणांना सहजपणे आणि योग्य प्रकारे
केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवता येते.
ओझोन किरणे नेहमी कोरडया केसांमध्येच सोडली जातात. ओल्या केसांमध्ये
चुकूनही त्यांचा वापर करू नका. कारण यात विद्युत प्रवाह असल्यामुळे करंट
लागू शकतो.
केसांमध्ये संसर्ग किंवा एखादा रोग बळावल्यास नियमितपणे दीड ते अडीच
मिनिटे ओझोन किरणे दिली जाऊ शकतात. महिने दर आठवडयाला हा उपचार
करावा. उपचारानंतर केसांच्या मुळांवर एखादे हेअर टॉनिक लावावे. हे खूप
फायदेशीर आहे. या उपचारामुळे केसांच्या वाढीसाठी विशेष फायदा होतो.

स्टायलिश केसांद्वारे स्मार्ट लुक

* गरिमा पंकज

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक वेशभूषा आणि मोहक अदांसोबतच केस स्टायलिश आणि निरोगी दिसणेही गरजेचे आहे. दिल्ली प्रेसमध्ये आयोजित फेबच्या कार्यक्रमात हेअर आणि केमिकल आर्टिस्ट नाजिम अली यांनी अॅडव्हान्स हेअर कटिंग, थ्री डी हायलायटिंग, केरोटिन स्मूथनिंग ट्रीटमेंट, टेंपररी रोलर सेटिंग आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

दिल्लीस्थित गांधी नगरातील ‘साहिबसाहिबा ब्यूटी सलून’चे मालक नाजिम अली यांनी भारतात पहिल्यांदा फायर हेअरकट लोकप्रिय केला. फायर हेअरकट एक नवीन ट्रेंड आहे जो मुले आणि तरुणाईला आकर्षित करतो. यात वॅक्सशिवाय जेल, स्प्रेद्वारे केसांना फंकी लुक दिला जातो.

अॅडव्हान्स हेअरकट

अॅडव्हान्स हेअरकट अनेक प्रकारचे असतात. जसे की डायमंड कट, लाँग हेअरकट, ग्रॅज्युएशन कट इत्यादी. यात कानापासून कानापर्यंत केसांचे चार भाग करून त्यांना मल्टिलेअर दिले जातात. त्यानंतर टेक्स्चरायजिंग केले जाते. यामुळे पातळ केसही भारदस्त दिसू लागतात आणि बाऊन्सी होतात.

थ्री डी हायलायटिंग

यात सर्वप्रथम केसांना प्रीलाईट करतात. त्यानंतर त्यात थ्री डी (लाल, हिरवा, निळा असे तीन वेगवेगळे रंग) घेऊन हायलायटिंग केले जाते. यामुळे केस स्टायलिश आणि आकर्षक दिसू लागतात.

केरॅटिन स्मूदिंग ट्रीटमेंट

या उपचार पद्धतीत सर्वात आधी केसांना शाम्पू करतात. त्यानंतर केस ८० टक्यांपर्यंत सुकवतात. मग केसांवर सेक्शन टू सेक्शन ट्रीटमेंट अप्लाय करून ४५ मिनिटे केस तसेच ठेवतात. त्यानंतर १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. मग फाईनफाईन म्हणजे केसांचे बारीक बारीक सेक्शन घेऊन आयरनिंग केले जाते. त्यानंतर ग्राहकाला दोन दिवसांनी बोलावून शाम्पू करून कंडिशनर आणि मास्क लावले जाते. त्यानंतर कोल्ड ड्रायरने सुकवून सीरम लावतात. हे केसांना ३० टक्क्यांपर्यंत स्ट्रेट करते, तसेच केस रिपेअर करण्याचेही काम करते.

खबरदारी : एखाद्या चांगल्या कंपनीचा शाम्पू आणि कंडिशनरचाच वापर करा, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत केस सरळ ठेवता येतील.

ओलाफ्लेक्स

यात कलर रिबॉण्डिंग केलेल्या केसांना ट्रीटमेंट देऊन त्यांना मुलायम आणि सिल्की बनवले जाते.

टेंपररी रोलर सेटिंग

सर्वात आधी केसांना हेअर स्प्रे करतात. त्यानंतर त्याचे सेक्शननुसार रोलर लावतात. यामुळे सरळ केस कुरळे आणि जाडसर दिसू लागतात.

थ्री डी बेबी लाँग ब्रँड हेयरडू

या हेअरस्टाइलची सुरुवात पुढे पफ काढून केली जाते. त्यानंतर केसांमधून थ्री डी लेयर काढून काही केस फ्रंट स्टायलिंगसाठी वापरले जातात. मागील उरलेल्या केसांमधून एक एक करून लेयर काढून त्याला कर्व म्हणजे वक्राकार आकार देतात. ते एकावर एक अशाप्रकारे सजवून तुम्ही आकर्षक हेयरडू बनवू शकता.

शेवटी तुमच्या आवडीची हेअर अॅक्सेसरीज किंवा हेअर ज्वेलरी वापरून तुम्ही त्याला अधिकच सुंदर बनवू शकता. कर्वच्या मधोमध रिकाम्या ठिकाणी अॅक्सेसरीज लावून ते अधिक मनमोहक बनवू शकता.

पॅटर्न हाय बन विथ रोजेस

सर्वप्रथम केसांच्या मध्यभागापासून दोन भाग करून पुढचे केस सोडून देतात. नंतर मागील भागातील केस डोक्यावर घेऊन उंच पोनी बांधतात. त्या पोनीचे चार भाग करून एक क्रॉस म्हणजे फुल्लीचा आकार देतात. त्यानंतर त्या पोनीवर एक मोठा डोनट आणि एक छोटा डोनट बनवून पिनअप करतात. त्यानंतर चार भागातील एक भाग घेऊन रोज म्हणजे गुलाबाचा आकार तयार करतात. त्यानंतर त्यात एक कर्व म्हणजे वक्राकार वळण घेऊन यू आकार देतात आणि त्या भागाला रोजखाली घेऊन जातात. हीच पद्धत उर्वरित तीन भागांसाठी वापरतात.

पुढच्या केसांचे काटयाच्या मदतीने तीन भाग घेऊन थ्री डी लेअरिंग काढून क्लिपच्या मदतीने त्याला आकार देतात. अशाप्रकारे तुम्हाला मिळतो मनाजोगता हेअरडू.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें