हलकेफुलके पदार्थ

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

चणा चाट

साहित्य

* १ वाटी उकडलेले काबुली चणे

* १ उकडलेला बटाटा

* अर्धा वाटी घट्ट दही

* १ लहान चमचा गोड चटणी

* १ लहान चमचा हिरवी चटणी

* पाव चमचा भाजलेले जिरे

* पाव चमचा चाट मसाला

* पाव लहान चमचा लाल मिरची पूड

* १ कचोरी

* थोडी बारीक शेव सजवण्यासाठी

* थोडी कोथिंबीर सजवण्यासाठी

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि बटाटयाचे चौकोनी तुकडे कापून सोनेरी होईस्तोवर तळून घ्या. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तेल गरम करून जिरे घाला. जिरे तडमडले की सगळे मसाले यात घाला. नंतर यात उकडलेले चणे घालून व्यवस्थित मिसळा. प्लेटमध्ये कचोरीचा चुरा ठेवा. त्यावर चणे ठेवा नंतर बटाटे सजवून ठेवा. दही घाला. दोन्ही चटण्या टाका वरून चाट मसाला भुरकवा. शेव आणि कोथिंबीरीने सजवा आणि सर्व्ह करा.

कोबी रोल

साहित्य

* १ कोबी मध्यम आकाराचा

* २५० ग्राम पनीर

* १ लहान चमचा तंदूरी मसाला

* १ मोठा चमचा मोझरेला चीज

* थोडे आल्याचे उभे काप

* पाव वाटी मटारचे दाणे

* १ मोठा चमचा तेल

* १ मोठा चमचा तांदळाचे पीठ

* १ मोठा चमचा लिंबू रस

* १ वाटी ब्रेडक्रंब्स

* तळण्यासाठी तेल

* मीठ चवीनुसार.

 

कृती

कोबीची अख्खी पानं वेगळी करून गरम पाण्यात घालून २ मिनिट झाकून मऊ होईपर्यत शिजवा. पाणी काढून ते थंड होऊ द्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून सगळे मसाले घाला. त्यानंतर मटर व बारीक चिरलेले पनीर टाकून चांगले एकत्र मिसळा. आच बंद करून त्यात लिंबाचा रस आणि चीज मिसळा. हे सारण तयार झालं. तांदळाचे पीठ भिजवून चांगले मिश्रण तयार करा. एका एका कोबीच्या पानात मिश्रण भरून चारही बाजूनी ते दुमडून रोल तयार करा. तांदळाच्या भिजवलेल्या पिठात हा रोल बुडवून ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून गरम तेलात सोनेरी होईस्तोवर तळा.

हलकेफुलके पदार्थ

* पाककृती सहकार्य : लतिका बत्रा

झटपट गाजर हलवा

साहित्य

* १ किलोग्रॅम गाजर

* १ वाटी साखर

* २ चमचे देशी घी

* २ लहान वेलदोडे

* बदाम, काजू व मगज आवडीनुसार

* २५० ग्रॅम खवा.

कृती

गाजर किसून घ्या. मग साखर आणि गाजराचा किस एकत्र काढीत कढईच्या आचेवर शिजायला ठेवा. ५-७ मिनिटात जेव्हा साखरेचे पाणी आटेल तेव्हा त्यात देशी घी टाकून परतून घ्या. सुका मेवा तळून मिसळा. शेवटी खवा मिसळून काही वेळ परतत राहा. तुमचा गाजर हलवा तयार आहे.

मंचाव सूप

साहित्य

* ४ कप भाज्यांचा स्टॉक

* १ कप बारीक कापलेले कोबी, गाजर, मशरूम, पातीचा कांदा,
पनीर, बीन्स

* ४ टोमॅटो

* १ मोठा चमचा बटर

* १ लहान चमचा चिली सॉस

* एक मोठा चमचा व्हिनेगर

* मीठ चवीनुसार.

कृती

एका पॅनमध्ये बटर गरम करून त्यात सगळया भाज्या थोडा वेळ परतून घ्या. आता भाज्यांचा स्टॉक टाका. टोमॅटो उकळून किसून घ्या. त्या उकळलेल्या स्टोकमध्ये टोमॅटोचा गर टाकून थोडा वेळ शिजवा. दोन्ही सॉस आणि मीठ मिसळा. गॅस बंद करून त्यात पातीच्या कांद्याची पात मिसळा. तळलेल्या न्युडल्ससोबत गरमगरम सर्व्ह करा.

आरोग्यपूर्ण स्वाद

पाकृकती सहकार्य * अनुपमा गुप्ता

ऑलिव्हचे लोणचे

साहित्य

* १०० ग्रॅम ऑलिव्ह

* अर्धा लहान चमचा मोहरी

* अर्धा लहान चमचा मेथी

* अर्धा लहान चमचा बडीशेप

* पाव चमचा तिखट

* पाव चमचा कलौंजी

* ३-४ कापलेल्या हिरव्या मिरच्या

* १ लहान चमचा हळद

* ३ मोठे चमचे मोहरीचे तेल

* मीठ चवीनुसार.

कृती

ऑलिव्ह धुवून, सुकवून कापून घ्या. मोहरी, बडीशेप व मेथी जाडसर कुटून घ्या. एका बाऊलमध्ये ऑलिव्ह व मोहरी, बडीशेप व मेथी याची पावडर, कलौंजी, तिखट, हळद, मीठ, हिरव्या मिरच्या व तेल चांगले एकत्र करा, मग काचेच्या बरणीत भरून २-३ दिवस उन्हात ठेवा. लोणचे तयार आहे.

बेसनाची चटपटीत भुर्जी

साहित्य

* १ कप बेसन

* २ कापलेला पातीचा कांदा

* १ टोमॅटो कापलेला

* २ कापलेल्या हिरव्या मिरच्या

* १-१ मोठा चमचा कापलेल्या लाल, पिवळया, हिरव्या, सिमला मिरच्या

* पाव कप मटार

* १ लहान चमचा आले

* १ मोठा चमचा तेल

* पाव लहान चमचा हळद

* अर्धा चमचा धणे पूड

* थोडे तिखट

* अर्धा चमचा छोले मसाला

* १ मोठा चमचा कापलेली कोथिंबीर

* मीठ चवीनुसार.

कृती

कढईत तेल गरम करून त्यात आले, पातीचा कांदा व सिमला मिरची परतून घ्या. त्यानंतर त्यात हिरवी मिरची, टोमॅटो आणि मटारचे दाणे टाका. नंतर त्यात हळद, धणे, तिखट व छोले मसाला मिसळा. बेसनात पाणी व मीठ मिसळून मिश्रण तयार करा. हे सर्व त्या गरम कढईत टाका व ढवळत रहा. ३-४ मिनिटे शिजवा. नंतर कोथिंबीरने सजवून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें