गर्भावस्थेतदेखील त्वचा राहील नितळ

* शैलेंद्र सिंह

गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरात विविध प्रकारचे हार्मोनल बदल होत असतात, ज्याचा परिणाम शरीरावर वेगवेगळया प्रकारे होतो. या बदलांमध्ये सर्वाधिक प्रभाव त्वचेवर होतो. ज्यामुळे सुरकुत्या, डाग आणि पिंपल्सदेखील येतात. परंतु त्यासाठी अधिक चिंता करण्याची गरज नाही आहे. बाळाच्या जन्मानंतर काही काळातच हा त्रास आपोआप दूर होतो.

अनेकदा त्वचेवर होणारे काही बदल जसं की सुरकुत्या आणि स्ट्रेच मार्क्सचा प्रभाव त्वचेवर राहतो. यासाठी गर्भावस्थेच्यादरम्यान काही काळजी घेणे गरजेचे आहे.

या संदर्भात लखनौच्या अमरावती इस्पितळाच्या त्वचा आणि केस तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका सिंह सांगतात, ‘‘गर्भावस्था आयुष्याची  खूपच छान अनुभूती आहे. यामध्ये त्वचेशी संबंधित काही त्रास होतो. परंतु याबाबत कोणताही तणाव घेण्याची गरज नसते. थोडीशी काळजी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने या त्रासापासून मुक्ती मिळवू शकता.’’

पिंपल्सना घाबरू नका

गर्भावस्थेचा त्वचेवर उत्तम प्रभावदेखील पडतो. यादरम्यान त्वचेत चमक येते. मुरूमं, पुटकुळया आल्यामुळे त्वचेवर डाग पडतात. किशोरावस्थेप्रमाणे अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या काळातदेखील मुरूमं पुटकुळया येऊ लागतात. हे सर्व हार्मोन्स स्तराच्या चढ उतारामुळे होतं. गर्भावस्थेच्या सुरुवातीचे महिने असं होण्याची शक्यता अधिक वाढते.

जर पिरिएडच्या पूर्वी वा दरम्यान मुरूमं, पुटकुळया येत असतील तर खूप शक्यता आहे की गर्भावस्थेच्या दरम्यानदेखील त्या येतात. आता  यापासून वाचण्यासाठी लॅक्टिक अॅसिड आणि ट्री ऑइलचा वापर करा.

गर्भावस्थेच्या दरम्यान चेहऱ्यावर सुरकुत्या आणि डागदेखील पडतात. हार्मोन वाढल्यामुळे त्वचेवर तीळ, निप्पल इत्यादीदेखील गडद रंगाचे दिसून येतात. उन्हात जाण्याने ही समस्या अधिक वाढू शकते. तसंही काही स्त्रियांमध्ये डिलिव्हरीनंतर हे डाग हलके होतात, परंतू काहीं बाबत असं काही होत नाही.  जेव्हादेखील तुम्ही बाहेर पडाल तेव्हा कमीत कमी ३० एसपीएफ सनस्क्रीन लावायला विसरू नका.

गर्भावस्थेमध्ये त्वचेचा कोरडेपणासाठी व ती ओलसर आणि सुंदर दिसण्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करा. यामुळे त्वचेवर सुरकुत्या येणार नाही आणि ती अधिक तरुण दिसेल.

मॉइश्चरायझर गर्भावस्थेमध्ये त्वचेचा ओलसरपणा वाढवत नाही. परंतु त्याचा नैसर्गिक ओलसरपणा कायम ठेवून देतो. तुमच्या त्वचेच्या अनुरुप सौंदर्य उत्पादनं निवडा आणि जरुरी असेल तर गर्भावस्थेच्या दरम्यान तुमच्या त्वचेच्या अनुसार त्यामध्ये बदल करा.

गर्भावस्थेच्या दरम्यान पूर्ण नऊ महिने त्वचा एकसारखी राहत नाही. म्हणून यामध्ये आलेल्या बदलानुसार क्रीमचादेखील वापर करा. या बाबतीत डॉक्टरांचा सल्लादेखील घेत राहा.

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या दरम्यान शरीरात वेदना होण्याची तक्रार असते. ज्यामुळे त्यांना झोप घेण्यामध्ये त्रास होतो. पूर्ण झोप न झाल्यामुळे त्वचेवरदेखील याचा प्रभाव पडतो. उत्तम झोपेसाठी झोपण्यापूर्वी डोकं व पूर्ण शरीराला मालिश करणं फायदेशीर ठरतं.

गर्भावस्थेच्या दरम्यान पडणाऱ्या सुरकुत्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाएटकडे देखील लक्ष द्या. सुरकुत्या पूर्णपणे ठीक करण्यासाठी लेझर ट्रीटमेंटदेखील एक पर्याय आहे. कोणत्या चांगल्या डीप पिगमेंटेशन क्रीमचा नियमित प्रयोग करण्यानेदेखील फायदा होऊ शकतो.

स्ट्रेच मार्क्स पडणं

सुरकुत्याप्रमाणे स्त्रियांच्या पोटावर आणि स्तनांवर गर्भावस्थेच्या दरम्यान स्ट्रेच मार्क्स पडतात. काही स्त्रियांच्या काख, नितंब आणि हातांवरदेखील स्ट्रेच मार्क्स होतात. हे कधीच जात नाहीत. हा काळानुसार हलके नक्कीच होतात. गर्भावस्थेत पडणाऱ्या स्ट्रेच मार्क्सपासून वाचण्यासाठी गर्भाच्या चौथ्या महिन्यापासून विटामिन ई ऑईल नियमित व हलक्या हाताने लावा. स्ट्रेच मार्क्स नक्कीच कमी होतील.

नसांचे उभारणं

अनेक स्त्रियांना गर्भावस्थेच्या दरम्यान नस उभारण्याची समस्या निर्माण होते. पाय, चेहरा, मान आणि हातांवर साधारणपणे ही समस्या निर्माण होते. काही स्त्रियांना शिरांमध्ये सूज आणि चेहरा लाल होण्याची समस्यादेखील उद्भवते. काही स्त्रियांची त्वचा गर्भावस्थेत कोरडी आणि संवेदनशील होते. यासाठी घरच्या घरी उपचार केले जाऊ शकतात. काही स्त्रियांना खासकरून ज्या थंड जागी राहतात त्यांना मध्ये गर्भावस्थेत अधिक हार्मोन बनल्यामुळे पायांवर तात्पुरते डाग पडतात.

मेकअपनेदेखील लपवू शकता डाग

गर्भावस्थेच्या दरम्यान अशा प्रकारचे डाग पडल्यामुळे सौंदर्य बिघडू नये म्हणून यापासून वाचण्यासाठी मेकअपचा आधार घेता येतो. मेकअप आर्टिस्ट पायल श्रीवास्तव सांगतात, ‘‘गर्भावस्थेमध्ये स्किन केअर सोबतच मेकअप  करण्यात सावधानता बाळगायला हवी म्हणजे कोणत्याही सौंदर्य उत्पादनाचा त्वचेवर वाईट परिणाम होणार नाही. नारळाच्या तेलाने त्वचेची नियमित मालिश करा.

असं न केल्यामुळे त्वचेची रोमछिद्रे बंद होतात, त्यामुळे त्यावर डाग पडू शकतात. दररोज रात्री चेहरा व्यवस्थित स्वच्छ करावा म्हणजे त्यावर मेकअपचं कोणतंही निशाण, मळ, धूळ इत्यादी राहणार नाही.

सकाळी मेकअप करण्यापूर्वी क्लींजिंग करा म्हणजे त्वचा ताजीतवानी, स्वच्छ आणि चिपचिपीत रहित राहील. क्लींजिंगनंतर हलकासा टोनरचा वापर करा. म्हणजे त्वचेची रोमछिद्रे बंद होतील आणि क्लिंजरचं निशान राहणार नाही. त्यामुळे तुमची त्वचा स्वच्छ राहील.

गर्भावस्थेत त्वचेसंबंधित समस्यांचे कारण चुकीचा आहार घेणं आणि योग्य देखभाल न करणे देखील असतं गर्भावस्थेच्या दरम्यान आहारात पुरेशी ताजी फळं, भाज्या, कडधान्य, वनस्पती तेल, डाळी, अंडी, दूध, पनीर, मासे इत्यादींचा समावेश करा. दिवसातून कमीत कमी आठ ते दहा ग्लास पाणी नक्की प्या. यामुळेदेखील त्वचेचा रंग नितळ होतो. गर्भावस्थेमध्ये जो आहार घेता त्यांचा सरळ परिणाम त्वचेवर होतो.’’

विटामिनने त्वचेची देखभाल

गर्भावस्थेत निरोगी आणि सुंदर त्वचेसाठी विटामिन घेणं खूपच गरजेचा आहे. विटामिन ‘ए’च्या कमीपणामुळे त्वचा कोरडी होते. यामुळे सुरकुत्या पडतात आणि त्वचेची छिद्रे मोठी होतात. फळं, भाज्या, गाजर, हिरव्या पालेभाज्या, माशाचे तेल, अंड आणि कलेजीमध्ये विटामिन ‘ए’चे उत्तम स्त्रोत असतात. विटामिन ‘बी’ ने रक्तप्रवाह वाढतो. हे अतिरिक्त तेल कटपणा कमी करतात. त्वचेच्या अधिकांश समस्यांचे मूळ हे विटामिन ‘बी’ ची कमतरता आहे. कडधान्य, कलेजी, हिरव्या पालेभाज्या, मासे इत्यादी विटामिन ‘बी’ चे उत्तम स्त्रोत आहेत.

निरोगी, चमकदार व सुंदर त्वचेसाठी विटामिन ‘सी’ गरजेचं असतं. याच्या वापराने त्वचा सैलसर पडत नाही, तर ती तरुण राहते. आंबट फळं, स्ट्रॉबेरी, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो आणि भाजलेले बटाटे विटामिन ‘सी’ चे उत्तम स्त्रोत आहेत. विटामिन ‘ई’ च्या कमतरतेमुळे त्वचेला सुरकुत्या पडतात. हिरव्या पालेभाज्या, कडधान्य आणि वनस्पती तेलांमध्ये विटामिन ‘ई’ पर्याप्त प्रमाणात आढळतं. विटामिन सोबतच काही खनिज पदार्थदेखील त्वचेचे सौंदर्य वाढविण्यात मदतनीस ठरतात.

३० + आरोग्याची रहस्ये

* अनुराधा

आधुनिकतेच्या या युगात सर्वच गोष्टींना नाविन्याचा नवा साज चढला आहे. हेच नावीन्य तरुणींच्या विचारातही आले आहे. आता मुली जास्त वय वाढेपर्यंत एकटे राहाणे पसंत करतात आणि स्वत:च्या मर्जीनुसार जीवनाची गाडी पुढे नेतात, पण ३०व्या वर्षाच्या टप्प्यात आल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक बदल होतात,  विशेषत: ज्या मुली अविवाहित असतात, त्यांच्यात काही बदल विवाहित मुलींपेक्षा वेगळे असतात.

या संदर्भात वंध्यत्व आणि दंत आरोग्य केंद्रातील महिला आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, महिला विवाहित असो किंवा अविवाहित, त्यांनी वयाची तिशी ओलांडल्यानंतर शरीरात बदल होऊ लागतात आणि वयाच्या ४० व्या वर्षी या बदलाची प्रक्रिया वेगवान होते. अविवाहित मुलींना काही आजार होण्याची शक्यता असते, कारण त्या लैंगिकदृष्टया सक्रिय नसतात.

शरीर सुदृढ ठेवण्यासाठी विवाहित मुलींमध्ये जे बदल होतात, ते सर्व बदल अविवाहित मुलींच्या शरीरात होत नाहीत, पण या वयात सर्व मुलींच्या आरोग्याशी संबंधित समस्या जवळपाससारख्याच असतात आणि स्वत:ला सुदृढ ठेवण्याच्या पद्धतींमध्ये फारसा फरक नसतो.

कुटुंबाच्या आरोग्य इतिहासाकडे लक्ष द्या

या वयात स्वत:ला सुदृढ ठेवण्यासाठी अनेक मार्ग असतात, विशेषत: व्यायाम, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आणि पौष्टिक आहार इत्यादींचा या वयातील विशेष गरजांमध्ये समावेश असतो. तरुणींनी या तिघांमध्ये योग्य समतोल राखणे अत्यंत आवश्यक असते. पोषणतज्ज्ञ सांगतात की, वैद्यकीय कमतरतेच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास या वयातील महिला पुरुषांपेक्षा किंचित कमकुवत होतात.

हे असे वय असते जेव्हा महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. वाढते वजन हे यामागचे कारण असते. या वयात जर त्यांचा बॉडी मास्क इंडेक्स ३०पेक्षा जास्त असेल तर कॅन्सरसारख्या घातक आजाराची शक्यता अधिक वाढते. आता स्तनाच्या कर्करोगावर यशस्वी उपचार होऊ शकतात. म्हणूनच महिलांनी वयाची पस्तिशी सुरू होताच त्यांचा कौटुंबिक आरोग्य इतिहास तपासणे आवश्यक असते. जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर दर २ वर्षांनी निश्चितपणे मॅमोग्राम करावा आणि जर असा कोणताही इतिहास नसेल तर दर ३ वर्षांनी एकदा मॅमोग्राम नक्कीच करून घ्यावा.

कॅल्शियमची पातळी कमी होऊ देऊ नका

या वयात केवळ कर्करोगाचीच शक्यता नसते तर कॅल्शियमची पातळीही खाली जाते, ज्यामध्ये ऑस्टियोपेनिया आणि ऑस्टियोपोरोसिससारख्या हाडांशी संबंधित आजारांची भीती असते. ही स्थिती गंभीर असते, कारण दोन्हीमध्ये हाडे लचकण्याचा आणि तुटण्याचा धोका असतो. या दोन्ही समस्यांमुळे मुली स्वत:हून सहजपणे उठू किंवा बसू शकत नाहीत. दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागते. कॅल्शियमची पातळी कमी होण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता असणे.

केवळ ड जीवनसत्त्वाने परिपूर्ण असलेला आहार घेऊन ही कमतरता भरून काढता येत नाही तर त्या सोबतच यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत आवश्यक असतो, जो आधुनिक महिलांना त्रासदायक वाटतो. त्यांना त्यांचे सौंदर्य बिघडण्याची भीती वाटते. त्वचेवर सुरकुत्या पडू नयेत म्हणून महिला उन्हातून बाहेर पडण्यापूर्वी संपूर्ण शरीर झाकून ठेवतात. प्रत्यक्षात अतिनील किरण त्वचेत जाणे आवश्यक असते, कारण ते ड जीवनसत्त्वाचा उत्तम स्रोत आहे.

जीवनसत्त्व ब १२ ने युक्त आहार गरजेचा

३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींच्या शरीरात ब १२ या जीवनसत्त्वाची कमतरता आढळून येते, ज्यामुळे त्यांना केस गळणे, अशक्तपणा, चिंता, नैराश्य आणि स्मरणशक्ती कमी होणे यासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. यासोबतच त्वचेशी संबंधित आजारही होतात. त्वचारोग तज्ज्ञ सांगतात की, ९० टक्के महिलांमध्ये वयाच्या ३५ ते ४० व्या वर्षी जीवनसत्त्व ब १२ ची कमतरता निर्माण होते. खरंतर हे असे वय असते जेव्हा आहार थोडा कमी होतो आणि आहारात इष्टतम प्रथिने किंवा जीवनसत्त्व ब १२ चा समावेश नसल्यास त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

ही समस्या बहुतांश करून त्यांना होते ज्या शाकाहारी असतात, कारण ब १२ हे जीवनसत्त्व फक्त अंडी, मांस आणि मासे यामध्ये आढळते. दुग्धजन्य पदार्थांमध्येही जीवनसत्त्व ब १२ असते. यासोबतच बाजरी, नाचणी, ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या भाकऱ्यांमधूनही जीवनसत्त्व ब १२ ची कमतरता काही प्रमाणात भरून निघते.

व्यायामही करा

प्रत्येक वयात व्यायाम आवश्यक असला तरी वयाच्या ३० व्या वर्षी व्यायाम ही शारीरिक स्वास्थ्यासाठीची गरज बनतो. या वयातील महिलांची चयापचय क्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढू लागते, पण या वयात वजन नियंत्रित ठेवणेही खूप गरजेचे असते, अन्यथा थायरॉईड, हृदय तसेच श्वसनाचे आजार होण्याची भीती असते.

वास्तविक, एक काळ असा होता की, महिला हाताने सर्व कामे करायच्या, त्यामुळे त्यांच्या स्नायूंमध्ये द्रव राहत असे. सध्या नोकरदार महिलाही भरपूर शारीरिक हालचाली करतात आणि त्यातून त्यांच्या शरीराला फायदाही होतो, पण आता घरातील कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जातात आणि यात शारीरिक श्रम कमी लागतात.

वयाच्या ३०-४० व्या वर्षी शरीर सक्रिय ठेवण्यासाठी महिलांनी ४५ मिनिटे ते १ तास मॉर्निंग वॉक म्हणजे सकाळी फेरफटका मारणे आणि कार्डिओ व्यायाम करणे खूप महत्त्वाचे असते. यामुळे चयापचय क्रिया योग्य राहाते, जॉगिंग म्हणजेच धावणे हाही या वयातील महिलांसाठी चांगला व्यायाम आहे, पण हे सर्व व्यायाम सकाळीच करावेत, कारण त्यावेळी शरीर अधिक गतिमान असते.

एकाकीपणाशी लढण्याचे अनेक मार्ग

३०-४० या वयात अविवाहित राहणाऱ्या बहुतांश मुलींना एकाकीपणाचा सामना करावा लागतो. हा एकटेपणा त्यांना नैराश्यासारख्या गंभीर आजाराकडे घेऊन जातो. हे असे वय असते जेव्हा त्यांच्या वयाचे जवळपास सर्व मित्र आपापल्या कुटुंबात व्यस्त झालेले असतात आणि भावंडांचाही संसार सुरू झालेला असतो.

आई-वडिलांकडे बोलायला फारसे काही नसते

अशा परिस्थितीत अविवाहित मुलीला जोडीदाराची उणीव भासते. एकटेपणा केवळ एखादी व्यक्ती वाटून घेऊ शकत नाही. याव्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी असतात ज्या एकटेपणा दूर करतात. यात पुस्तकांचा मोठा वाटा आहे.

आरोग्याकडे दुर्लक्ष केले नाही आणि जीवनशैलीत काही बदल स्वीकारले तर महिला वयाच्या ३०-४० व्या वर्षीही एकटेपणाचा आनंद घेऊ शकतात आणि हो, जर मुलगा किंवा मुलगी यापैकी कोणीही एखादा तात्पुरता जोडीदार मिळाला तर त्याला सोडू नका. जसे प्रत्येक पती-पत्नी एकमेकांना पाहिल्यानंतर स्वत:ला बदलतात त्याप्रमाणे त्याच्यासोबत कशाप्रकारचे जीवन जगायचे, हे ठरवा.

एकटया महिलेनेही जोडीदारानुसार स्वत:ला बदलण्याची सवय लावली पाहिजे. सेम सेक्स किंवा हॅट्री सेक्स या दोन्ही गोष्टी निषिद्ध मानू नका आणि द्वेष वाटल्यास सांगायला संकोच करू नका, परंतु यात खूप सावधगिरी बाळगावी लागेल.

कशी मिळवाल सुंदर त्वचा

* सोमा घोष

वयाच्या प्रत्येक वळणावर स्त्रीची इच्छा असते की तिची त्वचा छान असावी. ती कुठेही गेली तरी सगळयांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या असाव्यात. पण ऊन, धूळ, प्रदूषण यामुळे त्वचेचे सौंदर्य हरवते. अशावेळी त्वचेची नीट काळजी घेणे आवश्यक असते. त्वचेला सुरकुत्या, पिगमेंटेशन आणि डाग यापासून दूर ठेवणे गरजेचे असते.

याबाबत ‘क्यूटिस स्किन स्टुडिओ’च्या त्वचा रोगतज्ज्ञ डॉ. अप्रतिम गोयल सांगतात की त्वचा सुंदर ठेवण्यासाठी योग्य आहार व जीवनशैली, हार्मोन लेव्हल, स्ट्रेस लेव्हल वगैरे सर्व कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सहाय्यक ठरत असतात. म्हणूनच त्वचेचे वय वाढू नये यासाठी योग्य प्रमाणात संतुलित आहार घेणे, भरपूर पाणी पिणे, नियमित व्यायाम करणे, ताण कमी घेणे, शरीराची रोग प्रतिकारशक्ती कायम ठेवणे इत्यादींची गरज असते. यासोबतच गुड स्किन केअर रिजिम आणि स्किन ट्रीटमेंटसुद्धा आवश्यकतेनुसार करत राहायला हवी.

जर अँटीएजिंग ट्रीटमेन्ट घ्यावी लागली तर अनुभवी डॉक्टरकडे जावे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार आपल्या त्वचेत बदल करता येतील व चमकदार व सतेज त्चचा मिळेल. आजकालच्या आधुनिक तंत्रामुळे बहुतांश महिला व पुरुष मनाजोगते रूप मिळवण्यास समर्थ होत आहेत.

या गोष्टींकडे लक्ष द्या

त्वचा सुंदर राखण्याकरिता या गोष्टींकडे लक्ष द्या :

* तुम्ही नोकरदार असाल वा गृहिणी सूर्यकिरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण करा, कारण यामुळे त्वचा खराब होऊ लागते, ज्यामुळे लवकर सुरकुत्या पडू लागतात. यासाठी सनस्क्रीन एसपीएफ २५ वापरा. जर तुम्ही मेकअप करत असाल तर सनस्क्रीन लावल्यावरच मेकअप करा. याशिवाय उन्हापासून रक्षण करण्यासाठी स्कार्फ वा ओढणी यांचा वापर करा.

* पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज बहुतांश मध्यम वयीन महिलांना आपले भक्ष्य बनवतो. यामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते, ज्यामुळे अनियमित मासिक पाळी, चेहऱ्यावर केस उगवणे, अॅक्नेची समस्या, वजन वाढणे असे त्रास सुरु होतात, अशावेळी हार्मोन तज्ज्ञाकडून तपासणी करून घ्या. जर चेहऱ्यावर केस उगवू लागले तर लेझरने नाहीसे करणे हा चांगला पर्याय आहे.

* व्हिटॅमिन्स आणि मिनरलच्या कमतरतेनेसुद्धा त्वचा निर्जीव दिसू लागते. तेव्हा अशावेळी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या.

* त्वचेवर सूक्ष्म रेषा दिसू लागणे हे तुमची त्वचा कोरडी पडण्याचे लक्षण आहे. अशावेळी मॉइश्चरायझरचा वापर कमी करणे सहाय्यक ठरते.

* अँटीएजिंग क्रीम लावण्याची योग्य वेळ निश्चित करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, कारण तुमच्या त्वचेनुसार अँटीएजिंग क्रीम लावायला हवे. काही क्रीम्स त्वचेवरील बारीक रेषा नाहीशा करण्याकरिता सहाय्यक असतात तर काही मॉइश्चराइझ करण्यासोबतच नाहीसे झालेले पोषक घटक परत आणण्यात सक्षम असतात.

* त्वचेचे फेशियल करून ती स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमची त्वचा ऑयली असेल तर तिशी पार करताच मुरूम येऊ लागतात, अशावेळी फेशियल अजिबात करू नका. त्वचा केवळ स्वच्छ ठेवण्याचा प्रत्यन करा.

डॉ. अप्रतिम संगततात की तिशी पार केल्यावर तुम्ही कितीही व्यस्त का असेना त्वचेच्या निगेसाठी अवश्य वेळ काढायला हवा नाहीतर दुर्लक्ष केल्याने मुरूम, ब्लॅकहेड्स, सुरकुत्या वगैरे दिसू लागतात. असे झाल्यास डॉक्टरच्या सल्ल्याने आधी सौंदर्य प्रसाधनांचा वापर बंद करा.

असे थांबवा त्वचेचे एजिंग

अँटी एजिंग कमी करण्याच्या काही प्रक्रिया खालीलप्रमाणे आहेत :

* स्किन पॉलिशिंगने त्वचेतील हरवलेली आर्द्रता परत मिळते, कारण यामुळे मृत पेशी नाहीशा होतात आणि त्वचा पुन्हा चमकू लागते.

* मसल रिलॅक्सिंग बोटुलिनम इंजेक्शनने कपाळावर आलेल्या सूक्ष्म रेषा आणि सुरकुत्या कमी करता येतात.

* लेझर आणि लाईट बेस्ड टेक्नोलॉजीने त्वचेवरील बारीक सुरकुत्या कमी करण्यास मदत मिळते.

* रिंकल फिलर्ससुद्धा सुरकुत्यांना कमी करण्यासोबत प्लम्पिंग लिप्स, चिक लिफ्ट, चीन लिफ्ट वगैरे करण्यात सहाय्यक ठरते.

* केमिकल पील त्वचेचा वरचा थर काढून चेहऱ्यावरच्या बारीक सुरकत्या नाहीशा करते. मिल्क पील आणि स्टेम सेल पीलच्या वापराने त्वचा त्वरित चमकदार दिसू लागते.

* स्किन टायटनिंग आणि कंटुरिंगमुळे त्वचेत बारीक रेषा व कोलोजन दिसून येत नाही, ज्यामुळे त्वचेचे सौंदर्य टिकून राहते.

या चुका करू नका

त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे त्वचेला काहीही लावल्यास ती छान दिसण्याऐवजी खराब होते. या चूका महिला अनेकदा करत असतात.

* बहुतांश महिला घरगुती उपायांवर जास्त विश्वास ठेवतात. कोणच्याही सांगण्यावर विचार न करता त्वचेला काहीही लावतात. ज्यामुळे नंतर समस्या उत्पन्न होतात. म्हणून घरगुती उपाय जरी करायचे असतील तरी एखाद्या तज्ज्ञांचा सल्ल घेऊनच करा.

* असा समज आहे की ऑयली त्वचेवर मॉइश्चराझरची गरज नसते, जे चुकीचे आहे. त्वचेला हायडे्रट करण्यासाठी आर्द्रता असणं आवश्यक असते, जी मॉइश्चराइझारमधून मिळते.

* घरात राहणाऱ्या महिलांना सनस्क्रिन लावायचे नसते. जेव्हा की त्यांची त्वचा टॅन होते. म्हणून त्यांनी सनस्क्रिनचा वापर करायला हवा.

* मुरूम आल्यास बहुतांश महिला विचार करतात की थोड्या दिवसात हे आपोआप बरे होतील, पण असे होत नाही. मुरूम गेल्यावर डाग मागे राहतात, जे सहजासहजी जात नाहीत.

* महागडी प्रसाधने जास्त प्रभाशाली असतील असे जरुरी नाही. डॉक्टरांनी दिलेले औषधच चांगले असते.

भेगा पडलेल्या टाचांना असे बनवा मुलायम

* पारुल भटनागर

जशी आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो तशी आपल्या हाता-पायांची घेत नाही. त्यामुळेच ऋतुचक्र बदलताच म्हणजे हिवाळयाला सुरुवात होताच पायांना भेगा पडायला सुरुवात होते. यामागचे कारण म्हणजे पुरेशी काळजी न घेणे आणि दुसरे म्हणजे जास्त गरम पाण्याने आंघोळ करणे. कोरडया हवेमुळे हळूहळू शरीरातील ओलावा कमी होऊ लागतो.

शरीरात पोषक तत्त्वांची कमतरता असल्यामुळेही टाचांना भेगा पडण्याची समस्या निर्माण होऊ शकते. अशा वेळी या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी उपाय करणेही गरजेचे असते, जेणेकरून टाचांना पडलेल्या भेगा बऱ्या होतील आणि भेगांमुळे कोणासमोरही तुम्हाला लाजल्यासारखे वाटणार नाही.

यासंदर्भात कॉस्मेटोलॉजिस्ट पूजा नागदेव सांगतात की, बाजारात तुम्हाला शेकडो अशा क्रीम मिळतात ज्या टाचांच्या भेगा बऱ्या करण्याचा दावा करतात, पण प्रत्येक महागडी क्रीम आणि केलेला दावा खरा असेलच असे सांगता येत नाही.

त्यामुळेच तुम्ही जेव्हा बाजारातून भेगा पडलेल्या टाचांना बरे करणारे क्रीम खरेदी कराल तेव्हा लक्षात ठेवा की, त्यात कडुलिंबाचा वापर केलेला असेल. यामुळे तुमच्या टाचा लवकर बऱ्या होऊन तेथील त्वचेला आवश्यक ओलावा मिळेल :

* कापराचे तेल शतकानुशतके त्याच्यातील नैसर्गिक गुणांसाठी ओळखले जाते, कारण ते भेगा पडलेल्या टाचांमुळे होणारी जळजळ थांबवण्यासाठी प्रभावी असते. सोबतच ते रक्ताभिसरण वाढवून वेदनेपासून सुटका करते.

* काळया मिरीचे तेल जेवणाची चव वाढवते, सोबतच शतकानुशतके याचा वापर औषधे बनवण्यासाठीही केला जातो. यात मोठया प्रमाणावर फॉलिक अॅसिड, कॉपर, कॅल्शिअम, व्हिटॅमिन्स, पोटॅशियम असते. ते टाचांच्या जखमा बऱ्या करून वेदनेपासून आराम मिळवून देतात.

* पुदिन्याच्या तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधनांच्या उत्पादनात केला जातो, कारण ते त्वचेला तरुण आणि सुंदर ठेवण्याचे काम करते. तणाव दूर करणारे हे सुगंधित तेल भेगा पडलेल्या टाचांची जळजळ दूर करण्यास मदत करते. यातील मिथॉलसारखे घटक टाचांना बरे करण्यासाठी प्रभावी ठरतात.

* लॅव्हेंडर तेलात अँटीसेफ्टिक आणि अँटीइन्फलमेंट्री म्हणजे जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुण असल्यामुळे ते टाचांची भेगा पडलेली त्वचा आणि टाचांनाही बरे करते. ते मृत त्वचा काढून टाकून त्वचेतील निरोगी पेशी वाढवण्याचे काम करते. सोबतच टाचांचा कोरडेपणा दूर करून पायांचे सौंदर्यही परत मिळवून देते.

हेही आहेत प्रभावी उपाय

बादलीत गरम पाणी घेऊन त्यात तीन मोठे चमचे एप्सम मीठ टाका. त्यानंतर त्यात सुमारे अर्धा कप डेटॉल टाका. एप्सम मीठ त्वचेला मुलायम बनवण्याचे काम करते, तर डेटॉल जंतुनाशक असून ते फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य संसर्ग होऊ देत नाही. टाचांना जास्त भेगा पडल्यामुळे बऱ्याचदा संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही या पाण्यात १५ मिनिटे पाय बुडवून बसा. त्यानंतर शॉवर जेलने पाय अलगद पुसून घ्या.

त्यानंतर त्याच बादलीत पुन्हा पाय टाकून धुवा व नंतर टॉवेलने पुसा. नंतर चांगल्या दर्जाचे लोणी पायांना लावून ५ मिनिटे मालिश करा. संशोधनात असे सिद्ध झाले आहे की, लोण्यात दाह कमी करणारे घटक असतात. त्यामुळे ते टाचा लाल होणे, भेगा पडल्यामुळे टाचांची होणारी जळजळ दूर करण्यास मदत करतात. असे तुम्ही आठवडयातून दोनदा रात्री झोपताना करा. टाचांना पडलेल्या भेगा निश्चिंतच बऱ्या होतील.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें