रोगप्रतिकारक शक्ति वाढवणारे खाद्यपदार्थ

*  प्रतिनिधी

तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडून हे ऐकले असेल की तुमची इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारक शक्ति कमकुवत आहे. म्हणूनच तुम्ही बऱ्याचदा खोकला, सर्दी किंवा इतर आजारांना लवकर बळी पडता. आजारी पडण्याचा प्रतिकारशक्तिशी काय संबंध आहे हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल? आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की तुमची रोगप्रतिकारक शक्ति शरीराचे विविध रोगांपासून संरक्षण करते. तुमची रोगप्रतिकार शक्ति जितकी अधिक कणखर होईल तितके तुम्ही आजारी पडण्याची शक्यता कमी आहे.

हवामान कोणतेही असो, आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ति योग्य ठेवणे महत्वाचे आहे.

आपण खाल्लेल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तिवर परिणाम होतो. पुढील खाद्यपदार्थ आपली रोगप्रतिकार शक्ति बळकट करतात :

बदाम : दररोज ८-१० भिजवलेले बदाम खाल्ल्याने केवळ शरीराची प्रतिकारशक्तिच वाढते असे नाही तर मेंदूला ताणतणावाशी सामोरे जाण्याची शक्तिदेखील मिळते. व्हिटॅमिन ई शरीरात नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या नैसर्गिक किलर पेशींना वाढविण्यास मदत करते, ज्या विषाणू आणि कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यास मदत करतात. बदामात आढळणारे व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी बनवते तसेच सुरकुत्या पडण्याची प्रक्रिया कमी करते.

लसूण : ही मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट बनवून आपल्या रोगप्रतिकार क्षमतेला आजारांशी लढण्याचे सामर्थ्य देते. यामध्ये एलिसिन नावाचा घटक आढळतो, जो शरीराला संसर्ग आणि बॅक्टेरियांशी लढण्याची शक्ति देतो.

आंबट फळे : संत्री, लिंबू, अननस आणि ईडलिंबूसारख्या आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी पर्याप्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संक्रमणाशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त पेशी तयार होण्यास मदत होते. या फळांच्या सेवनाने तयार झालेल्या अँटीबॉडीज पेशींच्या पृष्ठभागावर एक कोटिंग बनवतात, ज्यामुळे विषाणू शरीरात प्रवेश करू शकत नाही. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे एलडीएल म्हणजेच शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढते, जे कार्डियो व्हॅस्क्युलर रोगांपासून संरक्षण करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. म्हणून आपल्या दैनंदिन आहारामध्ये काही आंबट फळांचा समावेश अवश्य करा.

पालक : पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या या पालेभाजीला सुपर फूड म्हणून ओळखले जाते. यामध्ये फोलेट नावाचा घटक आढळतो, जो शरीरात नवीन पेशी तयार करण्याबरोबरच त्या पेशींमध्ये असलेल्या डीएनएची दुरुस्ती करण्याचेही काम करतो. यामध्ये असलेले फायबर लोह, अँटिऑक्सिडेंट घटक आणि व्हिटॅमिन सी शरीराला सर्व प्रकारे निरोगी ठेवतात. उकडलेल्या पालक भाजीच्या सेवनाने पचनयंत्रणा योग्यरित्या कार्य करते.

मशरूम : यामुळे शरीराची रोग प्रतिकारकशक्ति वाढते. हे पांढऱ्या रक्त पेशी सक्रिय करण्यात मदत करते. यात सेलेनियम नावाचे मिनरल, अँटीऑक्सिडेंट घटक, व्हिटॅमिन बी आणि नाइसिन नावाची खनिजे आढळतात. यांमुळे मशरूममध्ये अँटीव्हायरल, अँटीबॅक्टेरिअल आणि अँटीट्यूमर घटक आढळतात. शिटाके, मिटाके और रेशी नावाच्या मशरूमच्या प्रजातीमध्ये शरीराची रोग प्रतिकारशक्ती बळकट करणारे घटक पुरेशा प्रमाणात आढळतात.

ब्रोकोली : यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी व्यतिरिक्त ग्लूटाथिओन नावाचा एक अँटीऑक्सिडेंट घटकदेखील आढळून येतो. ही एक अशी भाजी आहे जी रोगप्रतिकार शक्ति बळकट करते, ज्याचा वापर तुम्ही दररोजच्या आहारात सहजपणे करू शकता. थोडयाशा पनीरमध्ये वाफवलेल्या ब्रोकोलीचे मिश्रण करून एक चविष्ट कोशिंबीर तयार केली जाऊ शकते, ज्याच्या सेवनामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम देखील मिळते.

लाल शिमला मिरची : ही भोजनाचा स्वाद तर वाढवतेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. यात व्हिटनि सी पुरेशा प्रमाणात असते, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडेंट असते. लाल शिमला मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन बी ६ असते.

कोरोनापासून असे सुरक्षित ठेवा कुटुंब

* गरिमा पंकज

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभरात पसरत चालला आहे. कोरोनाबाधित आणि मृतांच्या दिवसागणिक वाढत जाणाऱ्या आकडयांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ऑफीस बंद होत आहेत. शाळा, महाविद्यालयेही बंद झाली आहेत. संपूर्ण कुटुंब घरात कैद झाले आहे. अशावेळी महिलांची जबाबदारी वाढली आहे. त्यांना कुटुंबाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष द्यावे लागत आहे.

मुलांची काळजी कशी घ्यावी?

मुलांना विश्वास द्या : मुले अनेकदा वस्तूंना हात लावतात. खाण्याचे पदार्थ इतरांशी शेअर करतात. म्हणजे ते संसर्ग पसरवण्याचे मोठे माध्यम आहेत. अशावेळी कोरोना म्हणजे काय आणि त्यापासून दूर राहणे किती गरजेचे आहे, हे तुम्हाला मुलांना सांगावे लागेल. मुलांसोबत या विषयावर मनमोकळेपणाने बोला. त्यांना आवश्यक ती काळजी घ्यायला सांगा.

कोरोना संसर्गासारख्या महामारीबाबत मुलांशी कशाप्रकारे बोलावे, हे त्या मुलांच्या वयानुसार ठरवावे. लहान मुले म्हणजे सर्वसाधारणपणे ६-७ वर्षांच्या मुलांना या विषयावर बोलायला आवडत नाही. याबाबत सांगितलेले ती लक्षपूर्वक ऐकत नाहीत. त्यामुळे त्यांना प्रेमाने जवळ बसवून या आजाराबाबत प्राथमिक माहिती  द्या. कोरेना संसर्गाबाबत सावध करा. मोठया मुलांनाही हात धुणे आणि मास्क लावण्याचे महत्त्व समजावून सांगा. त्यांना सांगा की, काही जणांना कोरोना झाला असेल, पण खबररदारी बाळगल्यास काहीच होणार नाही. असे काय करायला हवे ज्यामुळे कोरोना संसर्ग होणार नाही, याचीही माहिती मुलांना द्या. सोबत कोरोना संसर्गापासून वाचणे आपल्याच हाती आहे, याची जाणीव त्यांना करुन द्या.

तुमच्याकडून मुले शिकतात : लहान मुलांवर आईवडिलांचा मोठा प्रभाव असतो. त्यांच्याकडूनच ती शिकतात. त्यांच्यासारखेच वागायचा प्रयत्न करतात. तुम्ही बाहेर पडताना मास्क घातलात, वेळोवेळी हात धुतले आणि सॅनिटायजरचा वापर केल्यास मुलेही तुमचेच अनुकरण करतील. युवा अवस्थेतील मुलांचे विश्व वेगळे असते. ते जगभरातील माहिती जाणून घेण्यासाठी आईवडिलांवर फारशी अवलंबून नसतात. त्यांना याबाबतची माहिती जास्त करुन मित्रांकडून मिळते. त्यामुळेच सर्वकाही ठीक आहे, असे एखाद्या १४ वर्षांच्या मुलाला सांगितले तर त्याचा त्यावर विश्वास बसणार नाही. कारण तुम्ही जेव्हा असे सांगाल त्यावेळी तुम्हाला काहीच माहिती नाही, असे उत्तर तो तुम्हाला देईल. तुम्ही मुलाशी इतके मनमोकळेपणे वागायला हवे की, मनातील प्रत्येक गोष्ट तो तुमच्याशी शेअर करेल.

सर्वाधिक धोका कोणाला? : पुरुषांच्या तुलनेत महिला आणि मुलांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे पहायला मिळते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचा आकडा कमी आहे. पण म्हणून खबरदारी घेणे गरजेचे नाही, असा याचा अर्थ होत नाही.

वयाचा विचार केल्यास कोरोना संसर्गामुळे ०.२ टक्के लहान मुले आणि युवकांचा, तर ८० वर्षांहून अधिक वय असलेल्या १५ टक्के लोकांना जीवास मुकावे लागले आहे. वाढत्या वयासोबत आजारी पडण्याचे प्रमाणही वाढते कारण, त्यांच्यातील रोगप्रतिकारकशक्ती कमी होते. वय झालेल्या, आधीपासूनच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या तसेच दम्यासारखे गंभीर आजार असलेल्यांमध्ये कोरोनाचा जास्त संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. म्हणूनच वृद्ध आणि आजारी व्यक्तींची जास्त काळजी घ्या. त्यांना घराबाहेर पाठवू नका.

कोरना संसर्गापासून कसे करावे रक्षण

भेटीगाठी घेणे टाळा : आजारी लोकांना भेटणे टाळा. स्वत: आजारी असाल तर डॉक्टरांकडे जाण्याव्यतिरिक्त इतर कुठेही जाणे टाळा. सर्दी, खोकला झाल्यास रुमालाचा वापर करा. कुटुंबाच्या संपर्कात येणे टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा. दरवाजाचे हँडल, स्वीचबोर्ड आदींना सतत हात लावणे टाळा.

घरातील स्वच्छतेकडे लक्ष द्या : घरात ज्या वस्तू दररोज वापरल्या जातात त्या रोज स्वच्छ करा. खुर्ची, जेवणाचे टेबल, विजेची बटणे, दरवाजा इत्यादींचा वापर घरातील सर्वच करतात. म्हणूनच दिवसातून दोनदा त्यांची साफसफाई करा.

हात २० सेकंदांपर्यंत धुवा : पाणी, साबण किंवा हँड वॉशने २० सेकंदांपर्यंत चोळून हात धुवा. जेवणापूर्वी आणि जेवणानंतर, टॉयलेटला जाऊन आल्यानंतर साबणाने हात धुवा. ज्यात ६० टक्के अल्कहोल असेल अशाच सॅनिटायजरचा वापर करा.

मास्कचा वापर : तोंड मास्कने झाकून घ्या. खोकताना किंवा शिंकताना टिश्यू पेपर वापरा व नंतर तो कचऱ्यात फेकून द्या. बाहेर जातानाही मास्कचा वापर करा. जर तुमच्या जवळपास एखादा विषाणू आलाच तरी तोंड आणि नाक झाकलेले असल्यामुळे तो तुम्हाला संक्रमित करू शकणार नाही आणि तुम्ही सुरक्षित रहाल.

डाएट कसा असावा? : कुठलातरी एखादा खाद्यपदार्थ तुम्हाला कोरोनापासून वाचवू शकत नाही. पण पौष्टिक आणि समतोल आहार तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवू शकतो. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी तुमचे शरीर मजबूत होईल. आहारात वैविध्य हवे. विविध प्रकारची फळे, कडधान्ये, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा.

फळे आणि पालेभाज्या : रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संत्री, मोसंबी, आवळा, लाल किंवा पिवळी शिमला मिरची, किवी, पपई, गाजर, लिंबू इत्यादींपासून तुम्हाला अगदी सहजपणे व्हिटॅमिन सी मिळू शकते.

अंडी आणि डाळी : शरीरात झिंक म्हणजे जस्ताची कमतरता असल्यास तुम्ही सहजपणे आजाराचे शिकार होऊ शकता. गहू, बीन्स, मटार, डाळी इत्यादी झिंकचे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत.

आल्याचा चहा : तुम्हाला सर्दी, खोकला असेल तर आहारात आल्याचा नक्की वापर करा. आल्याची चहा पिणे हे सर्वात उत्तम. आल्यात लोह, जस्त, कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते.

खोबरेल तेल : घरात जेवण बनवताना सरसोचे तेल किंवा रिफाईंडऐवजी खोबरेल तेलाचा वापर करणे जास्त उपयुक्त ठरेल. यात लॉरिक अॅसिड, आर कॅप्रिलिक अॅसिड असते, जे तुमच्यातील रोगप्रतिकारकशक्ती वाढवून तुमचे विषाणूंपासून संरक्षण करते.

व्हिटॅमिन ए : तुमचे आरोग्य आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन ए खूपच महत्त्वपूर्ण आहे. मासे, अंड्यातील पिवळा बलक, चीज, डाळी आणि मेथी, पालकासारख्या हिरव्या पानांच्या भाज्यांमधून तुम्हाला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकेल.

लसूण : यात एलिसीन असते, ज्याच्या सेवनामुळे शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते. दररोज लसणाच्या दोन पाकळया गरम पाण्यासोबत खा किंवा तुम्ही याचे सूप बनवूनही पिऊ शकता. लसूण खाल्लयाने सर्व प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन आणि संसर्गापासून स्वत:चे रक्षण करता येते.

व्हिटॅमिन डी : सूर्यकिरणांपासून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी मिळते. सुरमई, मासे, अंडी, चीज, मशरममधूनही व्हिटॅमिन डी मिळते.

पाणी : पुरेशा प्रमाणात पाणी प्या. कोमट पाणी प्या. स्वत:ला हायड्रंट ठेवा.

आराम आणि व्यायाम : पुरेशी झोप घ्या. सोबतच सकाळच्या वेळेस फेरफटका मारा. व्यायाम अवश्य  करा. व्यायामामुळे शरीर आतून मजबूत होते आणि इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें