३ लेटेस्ट ब्रायडल हेअरस्टाईल

* सोमा घोष

लग्नात सर्वांपेक्षा खास दिसणे प्रत्येकालाच आवडते. अशा प्रसंगी महिला केवळ मेकअप आणि कपडयांच्या निवडीकडेच लक्ष देत नाहीत तर त्यांना हेअरस्टाईलही हटके करायची असते. याबाबत स्ट्रिक्स प्रोफेशनलचे एक्सपर्ट अॅग्नेस चेन यांनी सांगितले की, लग्नाच्या वेगवेगळया विधींना नववधू पारंपरिक पोषाखच परिधान करते. अशावेळी तिची हेअरस्टाईलही तिच्या पेहरावाला शोभेल अशीच हवी.

पहायला गेल्यास मोकळे केस कुठल्याही पेहरावासोबत खुलून दिसतात. पण काही जणांना शुभ प्रसंगी, सेलिब्रेशनवेळी मोकळे केस आवडत नाहीत. त्यामुळे अशा खास प्रसंगी या हेअरस्टाईल ट्राय करा :

१. कोंबर करंट : सर्वात आधी केसांच्या मोठमोठया बटा काढून बोटांवर वळवून पिनअप करा. काही वेळाने सर्व पिन काढून केस सोडून दोन भागात स्थितीत करुन घ्या. दोन्ही बाजूंनी केस घेऊन वेण्या घाला. चेहऱ्यावर केसांच्या काही बटा सोडून द्या. शेवटी, दोन्ही वेण्या एकत्र गुंडाळून घ्या आणि हेअरस्प्रेने सेट करा. वेण्यांमध्ये तुम्ही मणी, खडे किंवा फुले लावून सजवू शकता.

२ पर्शियन वेवलेट हेअरस्टाइल : केसांच्या मुळांवर मूस लावा. सर्व केस एकत्र करा. त्याचे रोल करुन पिनअप करा. थोडया वेळाने केस सोडा. ते कुरळे होतील. यानंतर, मागून कंगवा फिरवून डोक्याच्या वरच्या भागावर मुकुटाप्रमाणे पफ काढा. त्यानंतर केसांचे भाग करुन त्याचे गाठीप्रमाणे रोल करुन पिनअप करा. ते विस्कटू नयेत यासाठी स्प्रे मारा.

३ कारमाईन क्रॉस बन : एका कानापासून दुसऱ्या कानापर्यंत केसांचे दोन भाग घेऊन त्याचा पोनी बांधा. हाच पोनी गुंडाळून आंबाडा तयार करा. आजूबाजूच्या केसांना आंबाडयाच्या जवळ घेऊन पिनअप करा. ते विस्कटू नयेत म्हणून स्प्रे मारा.

मेकअपपासून ते ड्रेसपर्यंत, उत्सवात अशी तयारी करा

* पारुल भटनागर

नवीन नववधू आणि मुलींसाठी पिवळा, हिरवा, लाल रंग तसेच जातीय स्वरूपाचे विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत तुमचा मेकअप कसा आहे, आल्प्स अकॅडमी आणि ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक संचालक डॉ भारती तनेजा यांच्याकडून जाणून घेऊया…

तू कस कपडे घालतेस?

भारतीजींच्या मते, बहुतेक स्त्रियांना सणांमध्ये पारंपारिक लूक मिळवायचा असतो. ती केवळ पारंपारिक पोशाखांना प्राधान्य देते. अशा परिस्थितीत तिचा मेक-अपही तिच्या ड्रेससोबत मॅचिंग असावा जेणेकरून तिला परफेक्ट लुक मिळेल. आपण पारंपारिक पोशाखात जड दागिने घेऊन जात असाल तर तुम्हाला जास्त मेकअप करण्याची गरज नाही. मेकअप खूप हलका ठेवा. आपण परिपूर्ण मेकअपसह सर्वोत्तम देखावा मिळवू शकता.

मेकअप करा लाईव्ह

या हंगामात जलरोधक मेकअप घाला. एवढेच नाही तर मेकअपदेखील लाइव्ह असावा. या हंगामात आर्द्रता आणि आर्द्रता असते, ज्यामुळे तुमचा चेहरा मेकअपनंतर तेलकट दिसू शकतो, त्यामुळे हलका मेकअप करणे चांगले. प्रथम त्वचा पूर्णपणे स्वच्छ करा. मेक-अप लावण्यापूर्वी, आपल्या त्वचेवर बर्फ 5-10 मिनिटे मलमलच्या कपड्यात गुंडाळून चोळा. यामुळे तुमचा मेकअप बराच काळ अबाधित राहील. जर तुमच्याकडे तेलकट त्वचा असेल तर मेकअप करण्यापूर्वी अॅस्ट्रिंगर लावा. जर त्वचा कोरडी असेल तर बर्फानंतर त्वचेवर टोनर लावा.

नेहमी आधी बेस लावा, यामुळे त्वचा गुळगुळीत आणि अगदी टोन दिसेल. बेस लावल्यानंतर फाउंडेशन लावा. लक्षात ठेवा नेहमी तुमच्या स्किन टोननुसार फाउंडेशन घ्या. आता त्वचेवर फेस पावडर लावा, पण जास्त प्रमाणात लागू होणार नाही याची काळजी घ्या, फक्त स्पर्श करा कारण यामुळे मेकअपवर नजर जाईल.

डोळे मेकअपचा एक आवश्यक भाग आहेत. पण दिवसा हलका मेकअप करणे चांगले होईल. इलेक्ट्रिक ब्लर आयलाइनर वापरून तुम्ही एक चांगला लुकदेखील मिळवू शकता. मस्करा केवळ डोळ्यांचा मेकअप पूर्ण करण्यासाठीच नव्हे तर त्याला उत्तम फिनिश देण्यासाठीदेखील काम करते. यामुळे पापण्या जाड, काळ्या दिसतात आणि डोळ्यांचे सौंदर्यही वाढते, पण तुमचा मस्करादेखील वॉटर प्रूफ असावा.

डोळ्यांनंतर, ओठ मेकअपवर येतात. शक्य असल्यास, या हंगामात मॅट लिपस्टिक लावा. लाल, फ्यूशिया, नारंगी आणि बरगंडीसारखे रंग जे ओठांवर लावले जातात ते प्रत्येक त्वचेच्या टोनला अनुकूल असतात.

केसांच्या शैलीकडे लक्ष द्या

ड्रेस नंतर, हेअरस्टाईलची पाळी आहे. तुम्ही कितीही मेकअप केलात किंवा दागिने घातलेत तरीही तुमची केशरचना योग्य होत नाही तोपर्यंत तुमचा लूक परिपूर्ण दिसत नाही. त्यामुळे तुमच्या केसांना छान केशरचना द्या तुमचे केस लहान असतील तर ते उघडे ठेवा. खुल्या केसांमध्येही अनेक स्टाईल देता येतात. उदाहरणार्थ, तुम्ही तुमचे केस समोरून किंवा क्लिपच्या मदतीने पफ करू शकता, तुम्ही समोरचे थोडे केस घेऊ शकता आणि ते परत फिरवून पिन करू शकता. जर तुमचे केस लांब असतील, तर त्यांना पोनीटेल किंवा अंबाडासारखी काही स्टाईल द्या, जी या हंगामात सुंदर दिसते.

संडे ब्रंचसाठी केशभूषा

* स्वेता कुंडलीया, ब्युटी एक्सपर्ट, ओशिया हर्बल्स

संडे ब्रँच अलीकडे लंच आणि डिनरपेक्षासुद्धा जास्त लोकप्रिय होऊ लागला आहे. आता ब्रंचला जायचे असेल आणि तुम्ही स्टायलिश दिसणार नाही असं होऊ शकेल का? मग, माहीत करून घ्या केसांचा लुक परफेक्ट बनवायच्या पद्धती.

ब्रॅडेड बन

स्टेप १ : आपले केस चांगले धुवून नीट सुकवून त्याचे पोनीटेल बनवून एका रबरबँडने बांधून घ्या.

स्टेप २ : केसांचे तीन भाग करून त्याच्या वेण्या घाला.

स्टेप ३ : वेणीच्या शेवटाला एक रबरबॅंड बांधून एकत्र करून घ्या.

स्टेप ४ : आपल्या पोनीटेलच्या बेसच्या आजूबाजूला या वेण्या चांगल्या गुंडाळून घ्या. गरजेनुसार ब्रॅडेड बनला जागोजागी पिन लावा. तुमचा ब्रॅडेड बन तयार आहे.

हाफ अप हेअर रॅप

स्टेप १ : दाट दिसावे म्हणून हेअर स्प्रे मारून केसांना तयार करा.

स्टेप २ : आपल्या केसांच्या फ्रंटलाईनपासून मागच्या बाजूपर्यंत हाफ पोनीटेल बनवा आणि मग हे केस लहान लहान भागांमध्ये विभागून तयार करा, जेणेकरून तुमचे केस दाट वाटतील.

स्टेप ३ :  समोरच्या केसांना अर्ध्या भागापर्यंत नेऊन एक हाफअप पोनी बनवा आणि रबरबँड लावून एकत्र बांधा.

स्टेप ४ : हाफअप पोनीच्या रबरबँडखाली असलेला सरळ केसाचा १ इंच भाग पकडा आणि रबरबँड लपवायला हाफ पोनीच्या चारीबाजूला केसाचा सैल असा १ इंचाचा भाग गुंडाळा. तुमचा हाफ अप हेअर रॅप तयार आहे.

ब्रॅडेड हाफ अप

स्टेप १ : आपल्या चेहऱ्यासमोरील उजवीकडच्या केसांचे २ इंचाचे भाग बनवण्यासाठी बोटांचा वापर करा.

स्टेप २ : केसांच्या लहान क्लिपने ते एकत्र बांधा.

स्टेप ३ :  आपल्या डोक्याच्या डावीकडेसुद्धा या स्टे्रप अंमलात आणा.

स्टेप ४ : मोठया ब्रॅडच्या स्वरूपात हळुहळू बोटांचा वापर करून प्रत्येक ब्रॅड वेगळा करा.

स्टेप ५ : आपल्या केसांचा थोडा भाग वरून बंद करा आणि विस्कटू नये यासाठी हेअर क्लिप लावा.

स्टेप ६ : दोन्ही ब्रॅड आपल्या डोक्यामागे आणा आणि डोक्याच्या मधोमध केसांच्या लहानशा क्लिपने नीट लावा.

स्टेप ७ : वरील केस खाली आणा, जे लहानशा पोनी सहीत एका लहान रबरबँडने बांधा, जणूकाही रबरबँडने सगळया बॅडला पकडले आहे.

स्टेप ८ : वरील रबरबँडमध्ये एक बॉबी पिन घुसवा आणि ती ब्रॅडच्या खाली रबारबँडच्या सहाय्याने थ्रेड करा, मग डोक्यावर दोन्ही इलॅस्टिक ब्रॅड्स एकत्र करायला हे नीट दाबा. तुमचा ब्रॅडेड हाफअप बन तयार आहे.

खुलून दिसतील केस हेअर स्टायलिंग टूल्सने

* गुंजन गौड, कार्यकारी संचालक, एल्पस ब्यूटी क्लिनिक

आजकाल हेअर स्टायलिंग टूल्सचा वापर बराच वाढला आहे. पण त्यांचा वापर
करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेअर ड्रायर : केसांची नवी स्टाईल करताना इलेक्ट्रिक उपकरणांपैकी एक
असलेला हेअर ड्रायर मुख्य आहे. केस व्यवस्थित ठेवण्यासाठी आठवडयातून
एकदा तुम्ही हेअर ड्रायरचा वापर करू शकता. पण रोज किंवा वरचेवर वापर
केल्यास केस रूक्ष होणे, डँड्रफ अशा समस्या वाढू शकतात. हेअर ड्रायरच्या उत्तम
परिणामांसाठी या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या :
* तुमच्यासाठी हेअर ड्रायरचा वापर गरजेचा असल्यास केसांना नियमित तेल
लावा. आठवडयातून जास्तीत जास्त एकदाच याचा वापर करा.
* ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना कंडिशनिंग करायला विसरू नका.
* हेयर ड्रायर वापरण्यापूर्वी केसांना नॅरिशमेंट सीरम लावा. ड्रायरच्या उष्णतेमुळे
केस मऊ होतील.
* केस कुरळे असतील, रुक्ष, मऊ किंवा सिल्की, केसांचा प्रकार आणि
आवश्यकतेनुसार हेयर ड्रायरचा वापर करा.
* ६ ते ९ इंच अंतर ठेवूनच हेयर ड्रायर वापरा, अन्यथा केसांचा कोरडेपणा वाढेल.
* केस रुक्ष असल्यास ड्रायरचा उपयोग कमीत कमी करा. केस तेलकट
असल्यास ड्रायर जास्तीत जास्त वापरा.

हेयर आयर्न
केस स्ट्रेट ठेवण्यासाठी आजकाल हेअर आयर्नचा खूपच वापर केला जात आहे.
परंतु याच्या चांगल्या परिणांमासाठी लक्षात ठेवण्यासारखी महत्त्वाची गोष्ट
म्हणजे नेहमीच चांगल्या प्रतीच्या प्लेट आणि वेगवेगळया तापमानासाठी
सिरॅमिक प्लेट्सची आयर्न घ्यावी, ज्या स्वयंचलितपणे बंद होतात. केस खूपच
पातळ आणि खराब असतील तर सुरुवात कमी सेटिंगपासून करावी. केस कुरळे
आणि जाड असतील तर हाय सेटिंगवर जा.
केसांवर आयर्न वापरण्यापूर्वी त्यांना शाम्पू आणि कंडिशनिंग करा. ओल्या
केसांवर कधीच स्ट्रेटनिंग केले जात नाही. म्हणून आधी ब्लो ड्रायरने केस कोरडे
करा. केसांना अधुनमधुन थंड हवेनेही ब्लो ड्रायर करा. अन्यथा ते जाळण्याची
भीती असते. केसांसाठी चांगल्या हिट प्रोटेक्टरचा वापर करा. जेणेकरून हॉट
आयर्नमुळे ते खराब होणार नाहीत. ते खरेदी करताना लक्षात ठेवा की त्यात तेल
किंवा जास्त प्रमाणात सिलिकॉन नसावे. त्याचा केवळ एक थेंबच पुरेसा असतो.

व्हायब्रेटर मसाजर
व्हायब्रेटर मसाजरने केलेला मसाज हातांनी केलेल्या मसाजपेक्षा वेगळा असतो.
व्हायब्रेटर केसांच्या मांसपेशी आणि टाळूच्या त्वचेमध्ये कंपन निर्माण करून
उत्तेजना वाढवते, यामुळे रक्ताभिसरण चांगले होते आणि नसांवरील ताण कमी
होऊन थकवा दूर होतो. केस निरोगी ठेवण्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.केस
एकमेकांना घासले जाणे हानिकारक असते. हातांनी केलेल्या मालिशमुळे केस
बऱ्याच प्रमाणात एकमेकांवर घासले जातात. व्हायब्रेटरने केलेल्या मालिशमुळे
केस एकमेकांवर घासले जाण्याची शक्यता दूर होते, तसेच रक्ताभिसरण
वाढल्याने केसांची मुळे मजबूत होतात. व्हायब्रेटर मसाजरने मसाज करण्यासाठी
झाकणासारख्या गोल आकाराच्या दातांच्या अॅप्लिकेशनचा वापर केला जातो.

चांगल्या परिणामांसाठी केसांच्या त्वचेची मालिश करण्यासाठी व्हायब्रेटरची
क्षमता प्रति मिनिट २००० कंपनांपेक्षा जास्त नसावी. मसाज करताना हलू नये,
कारण धक्का लागल्यास दुखापत होऊ शकते. कोरडया केसांना तेल
लावल्यानंतरही व्हायब्रेटर मसाजरचा वापर केला जाऊ शकतो.

स्काल्प स्टीमर
हे इलेक्ट्रिक डिव्हाइस थोडयाच वेळात पाण्याची वाफ तयार करतो. कुठल्याही
प्रकारच्या केसांच्या समस्येसाठी स्टीम ट्रीटमेंट विशेष फायदेशीर ठरते. वाफेमुळे
त्वचेची रंध्रे उघडतात आणि त्यात अडकलेली घाण बाहेर येते. रक्ताभिसरण
वेगवान झाल्यामुळे केसांना संपूर्ण पोषण मिळते. याच्या अधिक चांगल्या
परिणामांसाठी, स्काल्प स्टीमरद्वारे नियमितपणे दोन आठवडयांसाठी स्टीम
ट्रीटमेंटचा वापर करावा. केसांना दिल्या जाणाऱ्या सर्व उपचारांमध्ये स्टीम पद्धत
विशेष फायदेशीर आहे. वाफ दिल्यानंतर केस धुवू नयेत.

इन्फ्रारेड रेज लॅम्प
इन्फ्रारेड किरण उष्णता निर्माण करणारे असे किरण आहेत जे दिसत नाहीत.
त्यांना प्रकाशाशी एकरूप केले तरच ते दिसतात. इन्फ्रारेडच्या तापमानाचा वेग
सुरुवातीला कमी असतो, पण काही मिनिटांतच तो उच्च तापमानापर्यंत पोहोचतो.
याद्वारे त्वचेतील मांसपेशी आणि त्वचेवर होणारा प्रभाव दीर्घकाळ राहतो.
शुद्ध रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या दिशेने अशुद्ध रक्त वाहून नेणाऱ्या
रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताभिसरणाचा वेग वाढल्यामुळे त्या ठिकाणी आवश्यक
पोषक तत्त्व आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळू लागते. यामुळे मांसपेशीत
निर्माण होणाऱ्या समस्या जसे की सूज येणे, मांसपेशी आखडणे, थकवा येणे,
नलिकांमधील थकवा आणि वेदना दूर करण्यासाठी याचा विशेष फायदा
होतो.इन्फ्रारेडचा वापर करताना डोळे स्वच्छ ठेवा. कॉन्टॅक्ट लेन्स किंवा चष्मा
लावत असाल तर काढून ठेवा. तुम्ही सोनेचांदी किंवा इतर कोणत्याही धातूचे

दागिने घातले असतील तर तेदेखील काढून ठेवा, अन्यथा ते गरम झाल्यामुळे
त्वचा भाजू शकते. लॅम्पच्या वापरानंतर तसेच त्वचा सामान्य झाल्यानंतर शाम्पू
करा. त्यासाठी कोमट पाणी वापरा. लॅम्प २५ ते ३० इंचाच्या अंतरावर ठेवा.

ओझोन रेंज लॅम्प
या इलेक्ट्रिक उपकरणाद्वारे ओझोन किरणांची निर्मिती केली जाते. ओझोन
किरणे रोग पूर्णपणे बरा करतात. या किरणांचा वापर करीत राहिल्यास केस
आणि टाळूच्या त्वचेत कोणत्याही प्रकारचे संक्रमण होण्याची किंवा कोणत्याही
रोगाची शक्यता उरत नाही. केस पांढरे होण्याची समस्या, टक्कल पडणे, केस
मोठ्या प्रमाणात गळणे अशा सर्व समस्या कायमच्या दूर करण्यासाठी ओझोन
किरणे पूर्णपणे सक्षम असतात. या उपकरणासोबत कंगव्यासारखा एक बल्बही
असतो. याचा उपयोग करून ओझोन किरणांना सहजपणे आणि योग्य प्रकारे
केसांच्या मुळांपर्यंत पोहोचवता येते.
ओझोन किरणे नेहमी कोरडया केसांमध्येच सोडली जातात. ओल्या केसांमध्ये
चुकूनही त्यांचा वापर करू नका. कारण यात विद्युत प्रवाह असल्यामुळे करंट
लागू शकतो.
केसांमध्ये संसर्ग किंवा एखादा रोग बळावल्यास नियमितपणे दीड ते अडीच
मिनिटे ओझोन किरणे दिली जाऊ शकतात. महिने दर आठवडयाला हा उपचार
करावा. उपचारानंतर केसांच्या मुळांवर एखादे हेअर टॉनिक लावावे. हे खूप
फायदेशीर आहे. या उपचारामुळे केसांच्या वाढीसाठी विशेष फायदा होतो.

स्टायलिश केसांद्वारे स्मार्ट लुक

* गरिमा पंकज

सुंदर दिसण्यासाठी आकर्षक वेशभूषा आणि मोहक अदांसोबतच केस स्टायलिश आणि निरोगी दिसणेही गरजेचे आहे. दिल्ली प्रेसमध्ये आयोजित फेबच्या कार्यक्रमात हेअर आणि केमिकल आर्टिस्ट नाजिम अली यांनी अॅडव्हान्स हेअर कटिंग, थ्री डी हायलायटिंग, केरोटिन स्मूथनिंग ट्रीटमेंट, टेंपररी रोलर सेटिंग आदींबाबत सविस्तर माहिती दिली.

दिल्लीस्थित गांधी नगरातील ‘साहिबसाहिबा ब्यूटी सलून’चे मालक नाजिम अली यांनी भारतात पहिल्यांदा फायर हेअरकट लोकप्रिय केला. फायर हेअरकट एक नवीन ट्रेंड आहे जो मुले आणि तरुणाईला आकर्षित करतो. यात वॅक्सशिवाय जेल, स्प्रेद्वारे केसांना फंकी लुक दिला जातो.

अॅडव्हान्स हेअरकट

अॅडव्हान्स हेअरकट अनेक प्रकारचे असतात. जसे की डायमंड कट, लाँग हेअरकट, ग्रॅज्युएशन कट इत्यादी. यात कानापासून कानापर्यंत केसांचे चार भाग करून त्यांना मल्टिलेअर दिले जातात. त्यानंतर टेक्स्चरायजिंग केले जाते. यामुळे पातळ केसही भारदस्त दिसू लागतात आणि बाऊन्सी होतात.

थ्री डी हायलायटिंग

यात सर्वप्रथम केसांना प्रीलाईट करतात. त्यानंतर त्यात थ्री डी (लाल, हिरवा, निळा असे तीन वेगवेगळे रंग) घेऊन हायलायटिंग केले जाते. यामुळे केस स्टायलिश आणि आकर्षक दिसू लागतात.

केरॅटिन स्मूदिंग ट्रीटमेंट

या उपचार पद्धतीत सर्वात आधी केसांना शाम्पू करतात. त्यानंतर केस ८० टक्यांपर्यंत सुकवतात. मग केसांवर सेक्शन टू सेक्शन ट्रीटमेंट अप्लाय करून ४५ मिनिटे केस तसेच ठेवतात. त्यानंतर १०० टक्के ब्लो ड्राय केले जाते. मग फाईनफाईन म्हणजे केसांचे बारीक बारीक सेक्शन घेऊन आयरनिंग केले जाते. त्यानंतर ग्राहकाला दोन दिवसांनी बोलावून शाम्पू करून कंडिशनर आणि मास्क लावले जाते. त्यानंतर कोल्ड ड्रायरने सुकवून सीरम लावतात. हे केसांना ३० टक्क्यांपर्यंत स्ट्रेट करते, तसेच केस रिपेअर करण्याचेही काम करते.

खबरदारी : एखाद्या चांगल्या कंपनीचा शाम्पू आणि कंडिशनरचाच वापर करा, जेणेकरून दीर्घकाळपर्यंत केस सरळ ठेवता येतील.

ओलाफ्लेक्स

यात कलर रिबॉण्डिंग केलेल्या केसांना ट्रीटमेंट देऊन त्यांना मुलायम आणि सिल्की बनवले जाते.

टेंपररी रोलर सेटिंग

सर्वात आधी केसांना हेअर स्प्रे करतात. त्यानंतर त्याचे सेक्शननुसार रोलर लावतात. यामुळे सरळ केस कुरळे आणि जाडसर दिसू लागतात.

थ्री डी बेबी लाँग ब्रँड हेयरडू

या हेअरस्टाइलची सुरुवात पुढे पफ काढून केली जाते. त्यानंतर केसांमधून थ्री डी लेयर काढून काही केस फ्रंट स्टायलिंगसाठी वापरले जातात. मागील उरलेल्या केसांमधून एक एक करून लेयर काढून त्याला कर्व म्हणजे वक्राकार आकार देतात. ते एकावर एक अशाप्रकारे सजवून तुम्ही आकर्षक हेयरडू बनवू शकता.

शेवटी तुमच्या आवडीची हेअर अॅक्सेसरीज किंवा हेअर ज्वेलरी वापरून तुम्ही त्याला अधिकच सुंदर बनवू शकता. कर्वच्या मधोमध रिकाम्या ठिकाणी अॅक्सेसरीज लावून ते अधिक मनमोहक बनवू शकता.

पॅटर्न हाय बन विथ रोजेस

सर्वप्रथम केसांच्या मध्यभागापासून दोन भाग करून पुढचे केस सोडून देतात. नंतर मागील भागातील केस डोक्यावर घेऊन उंच पोनी बांधतात. त्या पोनीचे चार भाग करून एक क्रॉस म्हणजे फुल्लीचा आकार देतात. त्यानंतर त्या पोनीवर एक मोठा डोनट आणि एक छोटा डोनट बनवून पिनअप करतात. त्यानंतर चार भागातील एक भाग घेऊन रोज म्हणजे गुलाबाचा आकार तयार करतात. त्यानंतर त्यात एक कर्व म्हणजे वक्राकार वळण घेऊन यू आकार देतात आणि त्या भागाला रोजखाली घेऊन जातात. हीच पद्धत उर्वरित तीन भागांसाठी वापरतात.

पुढच्या केसांचे काटयाच्या मदतीने तीन भाग घेऊन थ्री डी लेअरिंग काढून क्लिपच्या मदतीने त्याला आकार देतात. अशाप्रकारे तुम्हाला मिळतो मनाजोगता हेअरडू.

अशी करा दमदार हेअरस्टाईल

* आश्मीन मुंजाल

केस सुंदर असतील, चेहऱ्याच्या आकारानुसार कापलेले असतील तर पर्सनॅलिटीचे सौंदर्य दुपट्टीने वाढते. पण केस सुंदर, सुटसुटीत दिसावेत यासाठी कोणत्या टीप्स आजमाव्यात या जाणून घेऊ या :

हेअर सिरम

केसांना सुटसुटीत ठेवण्यासाठी तेलाच्या ऐवजी हेअर सिरम लावावे. हे कमी तेलकट असते, ज्यामुळे केस सुटसुटीत वाटतात. कोरड्या, रूक्ष आणि खराब केसांसाठी हेअर सिरम एका जादूच्या छडीसारखे आहे. हेअर सिरममध्ये सिलिकॉन असते, जे केसांत मिसळून त्यांना चमकदार बनविते. तसेच हे लावल्याने सूर्याची युवी किरणे, प्रदूषण आणि वातावरणातील आद्रता केसांवर कुठलाही वाईट प्रभाव करू शकत नाही.

हेअर सिरम लावल्यामुळे केस मोकळे आणि निरोगी दिसतात. हेअर सिरमला केसांच्या लांबीनुसार कव्हर करून लावले पाहिजे. याला केसांच्या मुळाशी लावले जात नाही नाहीतर केस ऑयली होऊन जातात. चांगला परिणाम मिळण्यासाठी सिरम ओल्या केसांमध्येच लावले पाहिजे.

ड्राय शँपू

जर आपण आपले ब्लो आऊट किंवा आयर्निंग जास्त वेळेपर्यंत चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत आहात तर अशा स्थितीत ड्राय शँपूचा उपयोग करणे फायदेशीर ठरेल. ड्राय शँपू केस आणि स्कॅल्पमधून चिकटपणा आणि ऑईल शोषून घेतो, ज्यामुळे असे वाटते की आपण केस आताच धुतले आहेत. परंतु लक्षात ठेवा की ड्राय शँपू पाण्यावाचून केस धुण्याचा ऑप्शन नाही आहे, तर केस धुण्याचा वेळ वाचवण्यासाठी किंवा जेव्हा आपण घाईत असाल फक्त तेव्हाच याचा उपयोग करा.

ड्राय शँपूचा सगळयात मोठा फायदा हा आहे की पाण्याने केस न धुतासुद्धा आपण स्वच्छ आणि सुगंधित केस प्राप्त करू शकता. याशिवाय ड्राय शँपूचा उपयोग केल्यानंतर केसांना चांगला वॉल्युम मिळतो. ज्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची हेअरस्टाईल कॅरी करू शकता. ड्राय शँपू स्प्रे केल्यानंतर केसांत सफेद पावडर राहून जाते. पण आपल्या बोटांनी विंचरल्यावर तीही निघून जाते आणि आपल्याला मिळतात निरोगी दिसणारे केस तेही केवळ थोडयाच मिनिटांतच.

फ्लफी इफेक्टसाठी केसांना शँपू केल्यानंतर कंडिशनर लावावे. जेव्हा हलकेसे सुकुन जातील तेव्हा मुळापासून डोक्यापर्यंत मूस लावावे. पेडल ब्रशच्या सहाय्याने ब्लो ड्राय करा. आता एक राउंड थर्मो ब्रिसल ब्रशने हळू-हळू केसांना स्ट्रेट करा. स्टाइलिंग स्प्रे टाका. नंतर छोटया-छोटया सेक्शनमध्ये विभागून सेल्फ होल्डिंग थर्मो रोलर्स लावावे. हीट देऊन १० मिनिटापर्यंत सेट करा. रोलर्स हटवून ब्रशने हलक्या हाताने वोल्युम देत केसांना सेट करा. दुरून शाईन स्प्रे करा.

फिनिशिंग टचसाठी

घरातून बाहेर जाताना आपल्या डोक्याला फ्लिप करा आणि केसांना चांगल्याप्रकारे हलवा. यामुळे भरल्या-भरल्यासारखे वाटतात. यानंतर केसांमध्ये हेअर स्प्रे करा. ओल्या ऋतूत हेअर जेलचा वापर करू नका, कारण हे क्रिमी असते. या उत्पादनाचा वापर केल्यावर आपला लूक असा दिसेल जसे आपण नुकतेच केसांमध्ये ऑईल मसाज केला आहे.

हेअर स्टाईल कशी ठेवावी

केसांना मॅनेज करणेसुद्धा एक मॅनेजमेंट आहे. चिकट हवामानात आपले केस मोकळे सुटसुटीत राहावेत म्हणून आपल्या पर्सनॅलिटीत हेअरस्टाइलची मोठी भूमिका आहे. परंतु थोडया महिलाच आहेत, ज्या हेअरस्टाईलची काळजी घेतात. जर हेअरस्टाईलला प्रसंगाच्या हिशोबाने बदलले गेले तर आपण फुलासारख्या टवटवीत आणि नवीन दिसाल.
सर्वप्रथम परफेक्ट हेअरकटच्याद्वारे आपण आपल्या पर्सनॅलिटीमध्ये सहजपणे व्हिजिबल चेंज आणू शकता. यासाठी आपण गरजेपेक्षा जास्त तेल लावून कसून बांधलेल्या अंबाडा किंवा वेणीपासून सुटका मिळवत आपल्या फेसकट आणि प्रोफेशननुसार हेअर कट करवून त्यात ग्रे हेअरला लपवण्यासाठी सिंपल ब्लॅक व ब्राऊन कलरच्या जागी रिच कलर हायलाइटिंगचा उपयोग करा.

केसांना नेहमी मोकळे ठेवल्याने ते खराब होऊ शकतात. यासाठी वेगवेगळी हेअरस्टाईल बनवून केसांना बांधून ठेवण्याचा प्रयत्न करा. आपण पोनीटेल किंवा फ्रेंच वेणी ट्राय करू शकता, जी बघण्यास खूप ट्रेंडी वाटते. याशिवाय केसांना अंशत: बांधून बाकी केसांना मोकळे सोडले जाऊ शकते.

लूप्ड पोनीटेल

आपण केसांमध्ये पोनीटेलचा ऑप्शनही चूज करू शकता. ही स्टाईल पोनीटेलला फोल्ड करून बनवली जाते. ही पाठीमागून एक लो बनसारखी दिसते, मात्र वास्तविक पोनीटेल असते. आपण टंबल्ड टेलही बनवू शकता. ही एक फिश प्लेटवाला लूक देईल. ही बनवण्यासाठी सोपी आहे.

केसांची साइड पार्टींग

जर आपले केस पातळ आहेत, तर साइड पार्टींग करून त्यांना बाउंसी लुक दिला जाऊ शकतो किंवा मग सगळया केसांना एका बाजूला करून घ्या. यामुळे केसांचा वॉल्युमही जास्त वाटू लागतो.

केसांमध्ये चांगल्या वेव्ससाठी

काही वेगळे ट्राय करू पाहताय तर मग स्विमिंग वेव्स बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम केसांवर लाइटली स्टायलिंग क्रीम लावावी. यात साइडने पार्टींग काढून थ्री किंवा फोर फ्लिक्सला कर्ल करा. यांना फेसच्या एका बाजूला सेट करा. इतर शिल्लक केसांचे स्मॉल लो बन बनवा.

केसांना सुंदर लूक देण्याचे जलद उपाय तेव्हा अवलंबा जेव्हा वेळेची कमतरता असेल, कारण केसांची सुंदरता बनवून ठेवण्याचा कोणताही शॉर्टकट नाहीए.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें