निर्जीव कोरड्या केसांसाठी ९ उपाय

* गरिमा पंकज

वातावरणात वाढती आर्द्रता केस गळण्याचे मुख्य कारण आहे. या मोसमात केस हायड्रोजन शोषून घेतात, ज्यामुळे ते कोरडे व निर्जीव बनतात. अशा परिस्थितीत त्वचाविज्ञान क्लिनिकच्या चेयरमॅन व संस्थापक डॉ. निवेदिता दादू म्हणतात की काही सोप्या उपायांद्वारे केसांची उत्तम देखभाल करता येईल :

डीप कंडिशनिंग करा : सूर्यप्रकाशाशी दीर्घकाळ संपर्क राहिल्यास केस वारंवार कोरडे आणि निस्तेज बनतात. केसांना पुर्नजीवित करण्यासाठी टाळूपर्यंत डिप कंडिशनिंग आवश्यक आहे, जेणेकरून या मोसमातही केसांना आणि टाळूला अतिरिक्त पोषण मिळू शकेल.

केसांना हिटपासून दूर ठेवा : पावसाळयातील आर्द्रतेमुळे जेव्हा आपण आपल्या ओल्या केसांवर हिट जनरेटिंग उत्पादने वापरता, तेव्हा त्याचा केसांवर वाईट परिणाम होतो. म्हणूनच ब्लोड्रायर, स्ट्रेटनर, कर्लिंग रॉड यासारख्या हिट जनरेटिंग उत्पादनांपासून केस दूर ठेवावेत. ते केस निर्जीव करतात, म्हणून केसांचं नैसर्गिकरित्या स्टायलिंग करा.

केसांच्या मुळांपर्यंत तेल पोहोचू द्या : वर्षभर केसांना तेल लावणे चांगले असले तरी या मोसमात तेल लावणे फार महत्वाचे आहे. आठवडयातून कमीतकमी एकदा खोबरेल किंवा ऑल्हिच्या तेलाने मालिश करणे फायदेशीर ठरते.

भरपूर आहार घ्या : इतर सर्व घटकांव्यतिरिक्त एक गोष्ट जी केसांचे सौंदर्य आणि निरोगी केस टिकवून ठेवण्यात प्रमुख भूमिका निभावते ती म्हणजे आपला आहार. आपल्या आहारात अंडी, मासे आणि स्प्राउट्ससारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करा. ते प्रथिने आणि लोहाने समृद्ध असतात. केस निरोगी ठेवण्यासाठी अक्रोडदेखील चांगले असतात, कारण त्यात भरपूर प्रमाणात ओमेगा -३, फॅटी असिड्स आणि व्हिटॅमिन ई असतात.

आपले केस ट्रिम करा : कोरडे किंवा द्विमुखी केसांपासून मुक्त होण्यासाठी त्यांना ट्रिम करणे खूप महत्वाचे आहे.

आपले केस घट्ट बांधू नका : सैल बन्स, नॉट्स आणि मेसी ब्रेड्स बरेच ट्रेंडी आणि फॅशनेबल दिसतात. पावसाळयातील वातावरणात जास्त आर्द्रता असल्यामुळे घट्ट केस खूप त्रासदायक ठरू शकतात, सोबतच त्यांची मुळेदेखील कमकुवत होतात, ज्यामुळे केस गळतात आणि तुटतात.

केसांना हेअर मास्क लावा : घरगुती हेअर मास्क लावण्याहून उत्तम काही नाही. हे केसांना भरपूर पोषण प्रदान करते. घरगुती हेअर मास्क तयार करणे कठीण नाही. १ केळे, मध आणि बदाम तेल यांचे मिश्रण बनवून ते केसांना लावा आणि अर्धा तास तसेच राहू द्या. नंतर केसांवर गरम टॉवेल थोडावेळ लपेटून घ्या. मग केस चांगल्या सौम्य शॅम्पूने धुवा व कंडिशनर करा.

द्रव पदार्थांचे सेवन अधिक करा : पाणी, ज्यूस, स्मूदीज, शेक, लिंबू पाणी आणि नारळ पाण्यासारख्या द्रव पदार्थांचे सेवन शरीरासाठी खूप महत्वाचे आहे. पावसाळयात हायड्रेटेड राहिल्याने शरीराचे तापमान टिकून राहते.

सोबत छत्री बाळगा : पावसाळयात घराबाहेर पडण्यापूर्वी छत्री अवश्य घ्या. पावसामुळे तयार होणारे असिडिक घटक आणि धुळीच कण केसांना कमकुवत करू शकतात. आर्द्रता टाळण्यासाठी पावसात केस ओले होणे टाळा. जर केस ओले झालेच तर घरी जाऊन त्यांना अवश्य धुवा आणि नंतर चांगल्या प्रकारे पुसून ते कोरडे करा.

कोंड्यापासून बचाव : पावसाळयात कोंडयाची समस्याही वाढते, म्हणून या मोसमात याकडे लक्ष देणे फार महत्वाचे आहे. यासाठी विशेष प्रकारचे हेअर मास्क लावा जसे की मेथीची पेस्ट बनवून व्हिटॅमिन ई असलेल्या तेलात ती एक तास भिजवून घ्या आणि नंतर ती आपल्या केसांमध्ये लावा. यामुळे केसात कोंडा होत नाही.

रिवर्स एज मेकअप टैक्निक

* प्रीति जैन

अभिनेत्री रेखाचं रहस्यपूर्ण सौंदर्य, श्रीदेवीचा निरागसपणा, माधुरीची मादकता, बिपाशाची जादू आणि करिश्मा व मलायकाचा ग्लॅमरस लुक पाहून हीच जाणीव होते की वय वाढूनही यांचं सौंदर्य अधिक खुलून गेलं आहे. ‘हुंह, ही तर सर्जरीची कमाल आहे,’ ही गोष्ट खरी असूनही पूर्णपणे खरी नाही; कारण चित्राचा एक पैलू सर्जरी आहे तर दुसरा योग्य मेकअप, हेअरस्टाइल आणि ड्रेस सेन्स.

तुम्ही सर्जरीशिवाय योग्य मेकअप तंत्र यांचा अवलंब करून फ्रेश, यंग आणि सुंदर दिसू शकता. यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे हे जाणून घेऊ या.

चुकीची मेकअप हॅबिट

मेकअप चेहऱ्याची सुंदरता वाढण्यासाठीच केला जातो. परंतु हेवी मेकअप आणि चुकीचा हेअर कट व हेअरस्टाइलद्वारे तुम्ही आपल्या वयाहून अधिक वयाच्या दिसता. याउलट हाच हेअर कट व हेअरस्टइल आणि हलक्या व योग्य मेकअपने तुम्ही वयाने लहान, फ्रेश, यंग आणि गॉर्जिअस दिसता.

टिंटेड मॉश्चरायरचा वापर करा

मेकअप करण्यापूर्वी साधारणपणे आपला चेहरा आपण स्वच्छ करून घेतो. परंतु चेहरा मॉश्चराइज करण्याकडे मात्र दुर्लक्ष करतो. खरं तर क्लिजिंग व टोनिंगनंतर मॉश्चरायझिंग अतिशय जरूरी असतं जेणेकरून मेकअप पैची दिसू नये. यासाठी थोडंसं टिंटेड मॉश्चरायझर हलक्या हाताने चेहऱ्यावर खालून वरच्या बाजूला ब्लेण्ड करा.

कन्सील डार्क सर्कल्स विथ राइट शेड

वयासोबत मानसिक तणाव, झोपेचा अभाव, जेवण्याच्या अयोग्य सवयी म्हणजेच फास्ट फूड वगैरेची आवड आणि कामाचा तणाव यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळं तयार होतात, जी तुम्हाला आपल्या वयाहून मोठं दाखवण्यात महत्त्वाची भूमिका साकारतात.

खूप गहिऱ्या ब्लू टोन डार्क सर्कल्सना यलो आणि पीच टींटेड कन्सिलद्वारे आणि लाइट सर्कल्सना स्किन टोनद्वारे लाइट शेडने ब्रश वा बोटांच्या मदतीने कन्सील करा आणि जास्त कव्हेरजसाठी आणि दीर्घकाळापर्यंत याचा प्रभाव कायम राखण्यासाठी ते पावडरने लॉक करा.

प्लंपिंग लिप्स

पातळ ओठ आणि त्याच्या आसपासची लूज स्किन तुमच्या वाढत्या वयाकडे इशारा करतात. बऱ्याचदा स्त्रिया डार्क कलरच्या लिपस्टिक वा डार्क लिप पेन्सिलने आपल्या ओठांना शेप देऊन तरुण दाखवण्याचा प्रयत्न करतात. याउलट डार्क कलरच्या वापराने तुम्ही अधिक मोठ्या वयाच्या दिसता; कारण त्या शेडच्या वापराने पातळ ओठ अधिक पातळ दिसतात आणि पार्टी वगैरेमध्ये खाल्ल्याप्यायल्यानंतर लिपस्टिक स्मज झाल्यामुळे भोवतालची स्किन वाईट दिसू लागते.

ओठांना प्लंपिंग इफेक्ट देण्यासाठी आउटर लायनिंगने भरून सुंदर आकार द्यावा आणि ओठांमध्ये लिपग्लॉसचा डॉट लावावा.

क्रिमी ब्लशर

वाढतं वय कैद करण्यासाठी क्रिमी ब्लशरचा वापरा करा; कारण पावडर ब्लशरच्या वापराने फाइन लाइन्स आणि स्किन टोनही डल वाटतो. त्यामुळे आपल्या स्किन टोन (लाइट, मीडियम आणि डार्क)नुसार क्रिमी ब्लशरचा वापर करा. हा तुम्हाला अधिक नॅचरल ग्लोइंग चीक्स इफैक्ट देण्यास मदत करेल, तेसुद्धा हेवी लुकशिवाय.

एंटीएजिंग आय मेकअप

वाढत्या वयाचा सर्वाधिक परिणाम डोळे आणि त्या भोवतालच्या त्वचेवर दिसतो. जसं की हार्मोन्सच्या असमतोलामुळे लॅशेज हलके होणं, रिंकल्समुळे आयब्रो नीट न दिसणं आणि डार्क सर्कल्स व डोळे संकुचन वगैरे. यासाठी तुम्ही हे करा.

आयब्रोज शेप : आय मेकअपपूर्वी आयब्रोज पॉइंट आर्च शेपमध्ये बनवा आणि लक्षात ठेवा की जितकं शक्य असेल आयब्रोजचा शेप जाडसर ठेवा जेणेकरून तुम्ही कमी वयाच्या दिसाल.

आयब्रोज मेकअप : यासाठी ब्राउन कलरच्या आयशेड वा पेन्सिलने आयब्रोजना शेप देत ट्रान्सपरण्ट मसकाराद्वारे आयब्रोज सेट जरूर करा.

लॅशेज कर्ल : डोळे उठावदार व तरुण दिसण्यासाठी आयलॅशेज कर्ल करणं अतिशय जरूरी आहे; कारण एका अंतराळानंतर आयलिड ढळलेले व लॅशेज फ्लॅट दिसू लागतात. त्यामुळे सुंदर व तरुण दिसण्यासाठी मसकाऱ्याचे २ कोट (एक सुकल्यावर दुसरा लावा) लावून लॅशेज कर्ल करायला विसरू नका. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये वॉल्यूमायजिंग मसकारा उपलब्ध आहे. उत्तम रिझल्टसाठी हा लावून पाहा.

लाइट आयशेड : आयलिडच्या इनर कॉर्नरमध्ये लाइट शिमर आयशेडचा वापर करून तुम्ही डोळे मोठे व उठावदार दर्शवू शकता. आउटर कॉर्नरमध्ये तुम्ही मिडियम डार्क शेडचा वापर करा आणि ब्रो बोन लाईटशिमरद्वारे हायलाइट करा. लक्षात ठेवा की, हेवी ग्लिटर तुमच्यासाठी उपयुक्त नाही, त्यामुळे हा टाळा. लोअरलिडवर लाइट ब्राउन शेड वा पेन्सिलचा वापर करा.

परफेक्ट हेअर कट व कलर

तुमचा हेअर कटही तुम्हाला तरुण वा वृद्धांच्या श्रेणीमध्ये उभं करू शकतो. त्यामुळे नेहमीची वेणी वा अंबाडा याऐवजी काहीतरी नवीन ट्राय करा. उदाहरणार्थ, रूटीन हेअरस्टाइलपेक्षा एक चांगला हेअर कट करून घ्या. हा तुमचं सौंदर्य अधिक खुलवण्यास मदत करेल.

पण हेअर कटपायी तुमच्या घनदाट लांबलचक केसांना तिलांजली देऊ नका. लांबलचक केसांसोबतही तुम्ही सुंदर हेअर कट करू शकता. उदाहरणार्थ पिरॅमिड लेयर, फ्यूजन मल्ट्रिपल, इनोवेटिव्ह फैदर्स टच वगैरे.

याशिवाय ग्रे हेअर मेंदी लावल्याने तुमचं वय लपण्याऐवजी उघड होऊ शकतं. तेव्हा मेंदीऐवजी हेअर कलर व हायलायटरचा वापर करा जेणेकरून तुम्हाला गॉर्जिअस ब्युटी लुक मिळू शकेल.

मान्सून स्पेशल : रिमझिम पावसाळ्यातील मेकअप रूल्स

– शैलेंद्र सिंह

वॉटरप्रूफ मेकअपची सगळयात विशेष गोष्ट म्हणजे पाणीही याचे काही बिघडवू शकत नाही. लग्नात आणि पार्टीमध्ये कॅमेऱ्यासमोर किंवा प्रखर लाइट्ससमोर उष्णतेमुळे मेकअप विस्कटू लागतो.

अशावेळीही वॉटरप्रूफ मेकअप खूप चांगला असतो. रेनडान्स, स्विमिंग पूल आणि समुद्र किनाऱ्यावर उन्हाळयाच्या सुट्टीची मजा घेतानाही वॉटरप्रूफ मेकअपची कमाल दिसून येते.

आहे तरी काय वॉटरप्रूफ मेकअप

बॉबी सलूनच्या स्किन, हेयर आणि ब्युटी एक्सपर्ट बॉबी श्रीवास्तवचे म्हणणे आहे, ‘‘घाम आल्यावर मेकअप ओला होऊन त्वचेच्या रोमछिद्रामध्ये जातो, ज्यामुळे मेकअप बेरंग दिसू लागतो. मेकअप रोमछिद्रांच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करू नये हीच काळजी वॉटरप्रूफ मेकअपमध्ये घेतली जाते. त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करून केला गेलेला मेकअपच वॉटरप्रूफ मेकअप म्हणून ओळखला जातो. रोमछिद्रांना २ प्रकारे बंद केले जाते. पहिला नैसर्गिक वॉटरप्रूफ आणि दुसरा प्रकार प्रॉडक्ट वॉटरप्रूफचा असतो. नैसर्गिक वॉटरप्रूफ पद्धतीत त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करण्यासाठी थंड टॉवेलचा उपयोग केला जातो. ज्याप्रकारे वाफ घेतल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडली जातात, त्याचप्रकारे थंड टॉवेल ठेवल्याने रोमछिद्र बंद होऊन जातात. यासाठी बर्फाचा उपयोग केला जाऊ शकतो. यानंतर केलेला मेकअप घामाने पुसत नाही.’’

वॉटरप्रूफ मेकअपची वाढती मागणीला बघून मेकअप प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपन्यांनी वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्ट बनवणे सुरु केले. या प्रॉडक्टमध्ये अशा काही घटकांचा समावेश केलेला असतो, जे मेकअप करताना त्वचेच्या रोमछिद्रांना बंद करतात. वॉटरप्रूफ प्रॉडक्ट्समध्ये क्रीम, लिपस्टिक, फेसबेस, रुब, मस्कारा, काजळ यासारख्या अनेक वस्तू आता बाजारात मिळू लागल्या आहेत.

वॉटरप्रूफ मेकअप प्रॉडक्टस सिलिकॉनचा उपयोग करून बनवले जातात. यात वापरलेले डायनोथिकॉन ऑइल त्वचेला चमकदार बनवते. हे वाटरप्रूफ मेकअपला सहजपणे पसरण्यास मदत करते. जेथे वॉटरप्रूफ मेकअपचे एवढे सगळे फायदे आहेत तेथे काही दोषही आहेत. ज्यांना जाणून घेणे आवश्यक आहे. वॉटरप्रूफ मेकअप हटवण्यासाठी पाण्याचा उपयोग पर्याप्त नाही तर बेबी ऑइल किंवा सिलिकॉन ऑइलचाही उपयोग करावा लागतो. याचा वापर त्वचेवर वाईट प्रभाव टाकतो. यासाठी वॉटरप्रूफ मेकअपचा उपयोग विशेष प्रसंगीच करावा. रोज याचा वापर करू नये.

मेकअप टीप्स

ब्युटी एक्सपर्ट बॉबी श्रीवास्तव सांगत आहेत काही विशेष टीप्स :

* या मोसमात मेकअप करताना डार्क शेडचा वापर कधीच करू नये. फाउंडेशनही लाईटच लावावे. मुरुमे किंवा डागांना लपवण्यासाठी वॉटरबेस्ड फाऊंडेशनचा वापर करावा. जर याने चमक जास्त येत असल्यास पावडरच्या ऐवजी ब्लॉटिंग पेपरचा वापर करावा.

* आपल्या गालांना गुलाबी दाखवण्यासाठी लाईट ब्लशरचा वापर करा. थोडीशी शिमर पावडर डोळयांच्या अवती-भोवती लावून त्यांना आकर्षक बनवू शकता. ओठांवर लिपकलर लावल्यानंतर चमकवण्यासाठी हलका लिपग्लॉस लावावे. लॅक्मे मेकअप प्रॉडक्ट्समध्ये अशाप्रकारचे सगळे सामान मिळते.

* मस्कारा दिवसभर टिकून राहण्यासाठी पापण्यांच्या केसांवर मस्कारा लावावा. असं केल्याने तो पसरत नाही.

* संध्याकाळच्या पार्टीचे मेकअप करतांना नैसर्गिक मेकअपच करावा. संध्याकाळी ऊन नसते. त्यामुळे चेहऱ्यावर शिमरचा वापर करू शकता. जर तुम्ही उन्हात निघत असाल तर एसपीएफ-१५ युक्त सनक्रीम किंवा लोशनचा वापर जरूर करावा. यामुळे त्वचेवर सनबर्नचा प्रभाव कमी होतो.

* स्विमिंग पूलमध्ये जाण्याअगोदर आणि नंतर किटाणूनाशक साबणाने अंघोळ अवश्य करावी.

* या ऋतूत पूर्ण शरीराची डीप क्लिंजिंग करावी. आठवड्यात १ वेळा बॉडी मसाज करावा, आणि एकदा स्टीमबाथ घ्यावी. स्टीम घेतांना पाण्यात हलके बॉडी ऑइल मिसळून घ्यावे.

* बाथटबमध्ये पाणी भरून त्याच्यात मिनरल सॉल्ट मिसळावे. १०-१५ मिनिटे त्यात राहावे. मग बघा, त्वचेत चमक अवश्य येईल.

* जेव्हा पण कडक उन्हातून परताल, थंड पाण्यात पातळ सुती कपडा बुडवून, पिळून घ्यावा आणि मग त्याला उन्हाने प्रभावित जागेवर थोडया-थोडया वेळेसाठी ठेवावे.

* एका टबमध्ये पाणी भरून मीठ सिळून हात आणि पायांना १० मिनिटांपर्यंत बुडवून ठेवा. यामुळे मृत त्वचा कोमल होईल. यानंतर रगडून सहजपणे सोडवले जाऊ शकते. यानंतर मॉइश्चराइजर लावावे. पायांना दोन मिनिटे गरम पाण्यात आणि दोन मिनिटे थंड पाण्यात आळीपाळीने बुडवावे.

हेयर केयर टिप्स

* जर केस छोटे असतील तर हलके कर्ल करू शकता. केस मिडिअम साईजचे असतील किंवा मोठे असतील तर त्यांना बांधलेली हेयर स्टाईल देण्याचा प्रयत्न करा. केस मोकळे ठेवायचे असतील तर त्या हिशोबाने कापलेले असावेत. आजकाल केसांना कलर करण्याचा ट्रेंडही चालू आहे. जर कलर करायचे असतील तर ब्लौन्ड हेयर किंवा नॅच्युरल ब्राऊन कलर करावा.

* केसांमध्ये नियमितपणे चांगल्या प्रकारच्या कंडिशनरचा उपयोग अवश्य करा. यामुळे केस चमकदार आणि कोमल होतात. कंडिशनर लावायची सगळयात चांगली पद्धती ही असते की केसांच्या वरच्या भागापासून खालपर्यंत लावावे.

* केसांना चमकदार बनवण्यासाठी नैसर्गिक मेंदीचा वापर करावा. यामुळे केसांना कमकुवत होण्यापासून वाचवले जाऊ शकते.

हेअरस्टाइल खास उन्हाळ्याकरता…

* भारती तनेजा

उहाळ्याच्या मोसमात हेअर कट आणि हेअर डू असा असला पाहिजे की सातत्याने केस नीट करावे लागणार नाहीत आणि स्टाइलही अबाधित राहील. या, आपण जाणून घेऊ अशाच काही हेअरस्टाइल्स…

लॉब कट

खूप लहानही नाहीत आणि खूप मोठेही नाहीत. अशा केसांच्या स्टाइलला लॉब कट म्हणतात. ही स्टाइल त्या स्त्रियांकरता खूप खास आहे, ज्या उकाड्यापासून बचावही करू इच्छितात परंतु त्यांना केस अधिक आखूड नको आहेत. अशा स्टाइलला तुम्ही बँग्स वा रोलर्ससह फ्लोट करू शकतात.

एसिमिट्रिक बॉब कट

या कटमुळे तुमचा चेहरा अधिक उठून दिसतो. यात मागचे केस लहान आणि पुढचे केस मोठे असतात. अलीकडे या कटमध्ये डाव्या बाजूच्या तुलनेत उजव्या बाजूस मोठे केस ठेवण्याचा ट्रेण्ड आहे. तसं बघता या कटसोबत साइडला एक मोठी फ्रिंजही ठेवू शकता.

बॉब वेव्स

शॉर्ट हेअर्सची ही आधुनिक स्टाइल अलीकडच्या काळात पसंत केली जाते. रोमॅण्टिक लुक निर्माण करणाऱ्या वेव्स आता लहान केस ठेवूनही कॅरी करता येतात. या स्टाइलद्वारे तुम्हाला सॉफ्ट लुक आणि कुल फिलिंग मिळेल.

क्रॉप स्टाइल

उकाड्यापासून बचाव करण्यासाठी केस छोटे ठेवू इच्छिता, सोबतच एखादी स्टाइलही कॅरी करायची असेल तर क्रॉप स्टाइल करून पाहा. यात केसांची टोकं ब्रोकन एम स्टाइलमध्ये कापलेली असतात आणि हे मेंटेन करण्यासाठी खूप जास्त मेहनत करावी लागत नाही.

३ डी मॅजिक

केस मोठे ठेवून कोणतीही स्टाइल कॅरी करू इच्छित असाल तर तुम्हाला ३ डी मॅजिक हेअर कट नक्कीच पसंत पडेल. यामध्ये वरचे केस लहान, खालचे केस मोठे आणि मधले केस सामान्य लेन्थचे कापलेले असतात.

या कटमुळे केस मोठे आणि घनदाट दिसतात. ही स्टाइल तुम्हाला स्मार्ट लुक देते. ३ डी मॅजिक कटची जादू मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही पेहरावांसोबत शोभून दिसते.

साइडलेअर कट

स्वत:ला वेगळ्या लुकमध्ये पाहू इच्छित असाल तर केसांना साइड लेअरिंग स्टाइल देऊ शकता. हा तर एसिमिट्रिकल ढंगात दिसतो. यासाठी कटला वेट ड्रायरद्वारे हलकेच सेट करण्याची गरज असते. परंतु लक्षात घ्या, केस शोभून दिसतील त्याच साइडला सेट करा. साइड लेयरिंग तुम्हाला मॉडर्न आणि चेहऱ्याला यंग लुक देतं. जर केस कलर केले तर हे लेयरिंग खूप स्टायलिश दिसतात.

सॉक बन

मोठे केस कुणाला बरं आवडत नाहीत? परंतु कडकडीत उन्हामुळे व घामामुळे ते सांभाळणं खूप कठीण होऊन बसतं. त्यामुळे या सीझनमध्ये सॉक बन बनवणं क्विक व ईझि आहे. सोबतच ट्रेण्डीसुद्धा आहे. फॅशनबद्दल बोलायचं झाल्यास अलीकडच्या काळात बाहेरच्या रॅम्प शोजमध्ये ही स्टाइल खूप हिट आहे. ही स्टाइल बनवण्यासाठी तुम्हाला बाहेरून कोणतीही अॅक्सेसरी खरेदी करण्याची गरज नाही. केवळ घरी असणाऱ्या जुन्या मोज्यांद्वारे ही स्टाइल बनवता येते. ही स्टाइल खूप रीजनेबल असते, सोबतच केसांमध्ये व्हॉल्यूमही दिसून येतो.

फिशटेल

फिशटेल पाहायला थोडी कठीण वाटते, परंतु ही तुम्ही ५ मिनिटात सहजी बनवू शकता. ही बनवण्यासाठी केस दोन भागांमध्ये विभाजित करा. आता एका साइडचे थोडे केस घ्या, त्यानंतर दुसऱ्या साइडचे घ्या आणि वेणी घाला. अशाप्रकारे खालपर्यंत वेणी बनवा. ही वेणी वेस्टर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही प्रकारच्या ड्रेसवर शोभून दिसेल.

स्लीक्ड बॅक पोनी

पोनीटेल बनवण्याचा हा लेटेस्ट पॅटर्न केवळ तुमच्या फॉर्मल आउटफिटवरच नव्हे, तर कॅज्युअलवरही छान शोभून दिसेल. केसांना प्रेसिंग मशिनद्वारे स्ट्रेट लुक द्या आणि त्यानंतर त्यात हलकेच जेल लावा. असं केल्याने लुक स्लीक्ड दिसेल आणि स्टाइलही बराच काळ टिकून राहील. यानंतर क्राउन एरियापासून केस विंचरत केस उचला आणि खालच्या बाजूस कानांपर्यंत टाइट पोनीटेल बांधा.

कॉर्पोरेट बन

आपल्या लुकला कॉर्पोरेट स्टाइल देण्यासाठी हे जरूर आहे की केस एकदम व्यवस्थित बांधलेले असतील, जेणेकरून ते सतत चेहऱ्यावरही येणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम कंगव्याने केसाचा गुंता सोडवून जेल लावून ते सेट करून घ्या, जेणेकरून ते सहज चिकटतील. यानंतर साइड पार्टीशन करून पुढून फिंगर कोंब करा आणि सर्व केस मागे घेऊन जात बन बनवा आणि बॉब पिनने व्यवस्थित बांधा.

बनला हलकेच फॅशनेबल टच देण्यासाठी ते स्टायलिश अॅक्सेसरीजद्वारे सजवा वा मग कलरफुल पिनने सेट करा. या स्टाइलमुळे सगळे केस बांधलेले राहातील आणि तुम्ही उकाड्याने त्रासणारही नाही.

पन

हाफ बन हाफ पोनीची ही लेटेस्ट स्टाइल उन्हाळ्यामध्ये सर्वांच्या पसंतीस उतरेल. ही स्टाइल ऐकायला जितकी मजेदार आहे, तितकीच करण्यासाठी सोपी आहे, तर मग वाट कसली पाहाता, क्यूट व कूल स्टायलिंगसाठी या उन्हाळ्याच्या मोसमात पन स्टाइल करून पाहा.

रीवर्स वेज

गायिका रिहानासारखे या हेअरस्टाइलमध्ये मागचे केस लहान आणि पुढचे मोठे असतात. ही हेअरस्टाइल करून तुम्ही सडपातळ व तरुण दिसाल.

कशी घ्याल डॅमेज केसांची काळजी

– शैलेंद्र सिंह

केसांमुळे आपले सौंदर्य सर्वाधिक खुलून येते. काळानुसार आणि बदलत्या फॅशननुसार केसांचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आणि हेच कारण आहे, ज्यामुळे त्यांची केअर घेणारी तमाम प्रकारची उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत, पण गरज आहे की या उत्पादनांचा योग्य वापर केला गेला पाहिजे. डॅमेज केसांची काळजी घेणे अत्यावश्यक असते.

केसांना डॅमेज करणाऱ्या प्रमुख कारणांपैकी म्हणजे केस गळणे, वेळे आधीच सफेद होणे, त्यात कोंडा म्हणजेच डँड्रफ होणे, द्विमुखी केस मुख्यत्वे सामील आहेत.

लखनौच्या नॅचरल्स सलोनच्या ब्युटी एक्स्पर्ट प्रीती शर्मा सांगतात, ‘‘केस डॅमेज होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आहार योग्य आणि पौष्टिक नसणे हे आहे. हल्ली लोक अशा प्रकारचा आहार कमीच घेतात, ज्यात प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनरल्स असतात. बहुतांश लोक असा आहार घेतात, ज्यामुळे पोटसुद्धा खराब होते. याचा प्रभाव आपल्या केसांवर होतो तसेच अनेक आजार आपल्या पाठी लागतात. केसांची योग्य काळजी न घेतल्याने ते डॅमेज होऊ लागतात. झोप पूर्ण न झाल्यानेसुद्धा हा त्रास उद्भवतो. अशावेळी सर्वप्रथम केस डॅमेज होण्याचे कारण शोधून काढणे महत्वाचे आहे आणि त्यानंतर त्यांचा योग्य इलाज केला गेला पाहिजे.’’

डँड्रफ

डँड्रफ केसांच्या उद्भवणाऱ्या समस्यांपैकी खूप सामान्य समस्या आहे. डँड्रफ म्हणजे कोंडा रंगाने सफेद किंवा भुऱ्या रंगाचा असतो. या त्वचेच्या मृत पेशी असतात, ज्या त्वचेच्या बाह्य स्तरावर जमतात. कोंडा हा २ प्रकारचा असतो. पहिला हा तैलीय असतो आणि दुसरा कोरडा. तैलीय कोंडयात मृत पेशी त्वचेच्या पृष्ठभागावर चिकटून राहतात. दिसायला त्वचेच्या रंगाशी साधर्म्य साधणाऱ्या असतात. कोरडा कोंडा हा त्वचेतील आर्द्रता कमी झाल्याने निर्माण होतो. जेव्हा आपण केसांवरून कंगवा फिरवतो, तेव्हा हा कोंडा कपडयांवरही पडू लागतो. हा सफेद रंगाचा असतो.

कोंडा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पोट खराब असणे हे आहे. केसांना पर्मिंग, स्ट्रेटनिंग आणि कलर केल्यामुळे त्यांच्यावर वाईट परिणाम होत असतो, ज्यामुळे त्वचा मृत होते आणि कोंडा उत्पन्न होतो. केसांना योग्य प्रकारे शॅम्पू न केल्यामुळेही कोंडा होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळेही कोंडा होतो.

कोंडा दूर करण्यासाठी सर्वप्रथम स्वच्छता ठेवणे आवश्यक असते. कोंडा झालेल्या व्यक्तिचा कंगवा आणि टॉवेल कधीही वापरू नका. आपला आहार पौष्टिक असेल याची काळजी घ्या. जेवणात मोड आलेली कडधान्ये, दूध, सॅलड आणि हिरव्या भाज्यांचे सेवन करा.

कोंडा दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या थेरपी केल्या जातात. टोमॅटो थेरपीनेही कोंडयाचा इलाज केला जातो. यासाठी टोमॅटोचा गर एका प्लास्टिकच्या भांडयात काढून घ्या. मग त्याची चांगली पेस्ट बनवून घ्या. यात लिंबाचा रस मिसळा. आणि हे मिश्रण संपूर्ण स्कॅल्पला लावा. हे सुकल्यावर केस धुवून टाका. कोंडा दूर करण्यासाठी अॅप्पल थेरपीचाही वापर केला जातो. यात २ अॅपल्सना किसून पेस्ट करून स्कॅल्पवर लावले जाते. ४० ते ४५ मिनिटे ठेवून मग धुतले जाते. असे आठवडयातून दोनदा अवश्य करावे.

वेळेआधी केस पिकणे

केसांची दुसरी मोठी समस्या म्हणजे अकाली केस पांढरे होणे. काळया, दाट केसांची प्रत्येकालाच आठवण येते. काळानुसार केस पांढरे होणे हा काही आजार नाही. पण हल्ली वेळेआधीच केस पांढरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढताना दिसत आहे. कधी कधी तर ऐन तारुण्यातच केस पिकताना दिसत आहेत.

कमी वयात मधुमेह म्हणजेच डायबिटीज केसांना वेळेआधी सफेद करतो. जर कुणाला सतत सर्दी होत असेल तरीही केस लवकर पांढरे होतात. केसांवर सतत केलेल्या केमिकल प्रॉडक्ट्सच्या माऱ्यानेही केस लवकर पिकतात. सायनस असेल तरीही केस पिकतात. पोषणा अभावीही केस कमी वयातच सफेद होऊ लागतात. याच बरोबर वातावरणातील धूळ, ऊन, प्रदूषण यामुळेही केस पांढरे होऊ लागतात.

केस वेळेआधी पिकणे रोखण्यासाठी नियमित कडिपत्त्याचे सेवन करा. यामुळे केस पांढरे होणे थांबवता येते. आवळा आणि शिकेकाई पावडर लोखंडाच्या कढईत भिजवून ठेवा. रात्रभर ठेवून सकाळी मेंदीमध्ये मिसळून केसांना लावा, असे आठवडयातून २ वेळा केल्याने केस सफेद होणे रोखता येते. योग्य डाएट घेऊनही केस हेल्दी करता येतात.

द्विमुखी केस

खराब शॅम्पू आणि साबण यांच्या वापराने केस द्विमुखी होतात. कधी कधी ब्लो ड्रायरच्या अतिवापरानेही ही समस्या उद्भवते.

केसांना या आजारापासून वाचवण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन केस ट्रिम करून घ्या. आठवडयातून दोन वेळा केसांना चांगला तेलाने मसाज करा. ते धुण्याआधी केसांना अर्धा तास दही लावून ठेवा. त्यानंतर शॅम्पू करा. १-१ चमचा मध, ऑलिव्ह ऑइल आणि बदाम तेल हे अंडयात किंवा दह्यात मिसळून पूर्ण डोक्यावर व्यवस्थित लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. गरम पाण्यात टॉवेल बुडवून केसांना स्टीम द्या.

केस गळणे

केस गळणे हीसुद्धा खूप कॉमन समस्या आहे. प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये ही समस्या पाहायला मिळते. केस गळल्यामुळे सौंदर्यात बाधा येते. वेळेआधीच वृद्धत्व येते. चिंता, तणाव, हार्ट किंवा लिव्हरची समस्या, जास्त पोहोणे, केमिकलचा अति वापर आणि आहारातील पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळेही केस गळू लागतात. कधी कधी दीर्घ आजारासाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांच्या दुष्परिणांमुळेही केस गळू लागतात. पोट खराब असेल किंवा कोंडा झाला असेल तरीही केस गळू लागतात.

साधारणपणे केस गळणे थांबवण्याचा काही असा हमखास उपाय नाही. काही घरगुती उपाय करून त्यांना गळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. पहिला उपाय आहे, एक ग्लास रम एखाद्या बाटलीत ओतून घ्या. यात कांद्याचे ४ तुकडे करून घाला. बाटलीचे झाकण बंद करा. बाटली उन्हात ठेवा. ४८ तास ही बाटली उन्हात राहू द्या. त्यानंतर कांद्याचे तुकडे काढून फेकून द्या. उरलेले मिश्रण डोक्याला लावा आणि काही वेळाने केस धुवून टाका.

केस गळण्यापासून रोखण्याचा दुसरा घरगुती उपाय म्हणजे २ चमचे मेथीदाणे, ३ चमचे दह्यात घालून भिजवत ठेवा. दुसऱ्या दिवशी संपूर्ण केसांना लावून २० मिनिटे ठेवून द्या. मग कोमट पाण्याने केस धुवू

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें