* गरिमा पंकज
अंकुशची आई सून दीपाच्या वागण्यावर खूप नाराज होती. दीपा तिला नातवाला भेटू देत नसे. आधी तिने वेगळे घर घेतले आणि आता एकाच शहरात राहूनही ती मुलाला त्यांच्यापासून दूर ठेवत होती. जेव्हा अंकुशने आईची बाजू घेत पत्नीला जाब विचारला तेव्हा तिने आजीला महिन्यातून एकदा नातवाला भेटण्याची परवानगी दिली. मात्र फोनवर संभाषण किंवा भेटवस्तूंची देवाणघेवाण यासाठी परवानगी नव्हती.
सासू न कळवता मुलाला भेटायला आल्यास तिला राग यायचा. दीपाच्या अशा वागण्याचा अंकुशच्या आईला खूप त्रास होत असे. दरम्यान अंकितचे आजीबद्दलचे प्रेम आणि जिव्हाळाही कमी होत होता. महिन्यातून एक-दोनदाही आजीला भेटायला जायला तो कंटाळत असे.
कालांतराने अंकुशच्या आईने हे सर्व मान्य केले, पण एक दिवस परिस्थिती बदलली. त्यादिवशी दीपाची तब्येत बिघडली होती. मोलकरीणही सुट्टीवर होती. दीपाने बहिणीला फोन केला असता तिने परीक्षा असल्याने मदतीसाठी येण्यास नकार दिला. दीपाच्या आईच्याही पायाला जखमा झाल्या होत्या, त्यामुळे ती येऊ शकली नाही.
दीपाने जेव्हा तिची समस्या अंकुशला सांगितली तेव्हा अंकुशने सुचवले, ‘‘मी अंकितला आईकडे सोडेन जेणेकरून ती त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेईल. मी स्वत: तिथेच जेवेन आणि तुझ्यासाठी जेवण घेऊन येईन.’’
दीपाला थोडी लाज वाटली. सासू मदत करणार नाही, असे तिला वाटले, पण अंकुशला विश्वास होता की आई सगळं सांभाळेल. तसेच झाले. सासूने अंकित आणि अंकुशची काळजी तर घेतलीच, पण दुपारी वेळ मिळेल तेव्हा येऊन दीपाचे घर साफ केले. तिने फळे कापून दीपाला खायला दिली. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली, ‘‘जेव्हा कधी तुला माझी गरज असेल तेव्हा मला बोलव.’’
दीपाचे डोळे पाणावले. सासूचा हात प्रेमाने धरून ती म्हणाली, ‘‘मी तुमच्यासारख्या प्रेमळ आईवर अत्याचार केले. तुम्हाला अंकितपासून दूर ठेवले, जेव्हा की तुमच्यापेक्षा जास्त प्रेम त्याच्यावर कोणीच करू शकणार नाही. आपल्या माणसांचे महत्त्व दु:खातच लक्षात येते.’’
या घटनेनंतर दीपा पूर्णपणे बदलली. सासू किती उपयोगी आहे, हे तिला समजले होते. एकत्र राहत नसतानाही सासूने तिला साथ दिली त्यामुळेच दीपाने अंकितवरील आजीला भेटण्याची बंदी उठवली. ती स्वत: अंकुशला आजीशी बोलायला सांगू लागली. तिचे प्रेम त्याला समजावे, यासाठी प्रयत्न करू लागली. आजीचे प्रेम त्याची सदैव सोबत करेल, हे तिला समजले होते.
सासूचे वास्तव समजून घ्या
अनेकदा सूनांना सासूचे महत्त्व कळत नाही आणि त्या त्यांना घर तसेच मुलांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू करतात. कालांतराने, जेव्हा त्यांना त्यांच्या चुका लक्षात येतात तेव्हा मात्र स्वत:च्या कृतीचा खूप पश्चाताप होतो.
आणखी एक घटना पाहा
राजदेवने मला बोलावले आणि म्हणाला, ‘‘माझा मुलगा राहुलचे लग्न आहे. तुला माहीत आहे का, सर्वात चांगली गोष्ट काय आहे?’’
‘‘काय?’’ मी कुतूहलाने विचारले.
‘‘मुलीचे तिच्या आईशी चांगले संबंध नाहीत.’’
त्याचं उत्तर ऐकून मला धक्काच बसला, ‘‘पण तू यात आनंदी का आहेस?’’
‘‘कारण त्या मुलीला आमच्या कुटुंबाचा एक भाग व्हायचे आहे. तिच्या आईशी चांगले संबंध नसणे म्हणजे ती सुट्टीत आईकडे जाण्याचा हट्ट करणार नाही,’’ राजदेव हसत म्हणाला.
मी विचारात हरवून गेले आणि हळूच म्हणाले, ‘‘कदाचित तू बरोबर आहेस. मुलगी अनेकदा तिच्या माहेरी जाण्याचा आग्रह धरते, जेणेकरून तिला तिचे सुख-दु:ख आईसोबत वाटून घेता येईल. काही काळ ती आईच्या प्रेमळ हाताने बनवलेले पदार्थ खाऊ शकेल. अनेकदा आईच तिला सासूपासून वेगळे होण्याचा सल्ला देते आणि त्यामुळेच सून सासूशी उद्धट वागू लागते, कारण तिला अडचणीच्या वेळी आईची साथ मिळते.
‘‘माझ्या सुनेनेही असेच काहीसे केले आणि मला माझा मुलगा, नातवापासून दूर केले. तिने आईच्या घराजवळ भाडयाने घर घेतले आणि मला माझ्या पतीसोबत वडिलोपार्जित घरात एकटीला सोडून गेली, पण जेव्हा मुलीचे तिच्या आईशी संबंध चांगले नसतात तेव्हा ती तिथे का जाईल?’’
‘‘होय, हेमा, तुझे काय झाले ते आठवून मला माझ्या मुलाचे आणि या मुलीचे नाते जुळवताना बरे वाटत आहे,’’ राजदेव म्हणाला.
जीवन होते सोपे
जेव्हा एखादी मुलगी नववधू म्हणून नवीन घरात प्रवेश करते, तेव्हा तिला तिच्या आईची खूप साथ मिळते हे खरे आहे. ती आईला सगळं सांगते आणि तिचा सल्ला घेत राहते, पण सुनेने हे लक्षात घेतले पाहिजे की, आईसोबतच सासू-सासऱ्यांचा पाठिंबाही खूप फायदेशीर ठरू शकतो. ती जर आईची काळजी करत असेल तर पतीच्या आईचाही आदर करणे हे तिचे कर्तव्य आहे.
तसेही लग्नानंतर मुलगी जशी पत्नी होते तशी सूनही होते, हे लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत पतीचे प्रेम मिळण्यासोबतच सुनेने सासू-सासऱ्यांशी चांगले संबंध ठेवले पाहिजेत. सासूशी भांडून पतीसोबत सुखी राहाता येत नाही. थोडीशी तडजोड करून तुम्ही सासू-सासऱ्यांसोबत चांगले संबंध राखू शकलात तर तुमचे आयुष्य खूप सोपे होईल. सासू तुमच्यासाठी खूप उपयुक्त असते. जरी ती तुमच्या सोबत राहात नसेल, पण त्याच शहरात जवळपास राहात असेल तर तुम्हाला अनेक प्रकारे आराम मिळू शकतो. विशेषत: सासू-सासरे मुलाची काळजी घेण्यात आणि त्याचे व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खूप मदत करतात.
सासूचा सल्ला ऐका
जर तुमची सासू तुमच्यासोबत असेल तर काही अंतर्गत कलह होण्याची शक्यता आहे, पण जर ती त्याच शहरात काही अंतरावर राहात असेल तर तुमच्या दोघांमधील मतभेद कमी करण्यासाठी हे अंतर उपयुक्त ठरेल. हे अंतर आजी-आजोबांमध्ये निर्माण होऊ देऊ नका. सासू-सासऱ्यांशी तुमचं बरं जमत नसलं तरी याचा परिणाम तुमच्या मुलाला भोगू देऊ नका. मुलाच्या जन्मानंतर काही वर्षांमध्ये तुम्हाला तुमच्या सासू-सासऱ्यांच्या पाठिंब्याची खूप गरज असते.
कार्यालयातून लवकर घरी परतण्याची सक्ती नाही
नोकरदार महिलांचे अर्धे लक्ष त्यांच्या मुलांवर असते. त्यांना कार्यालयातून लवकरात लवकर निघून मुलाकडे जायचे असते, कारण तो काय करतोय, त्याने काही खाल्ले असेल का? याची त्यांना काळजी वाटते. पण जर मुलाला सासूकडे सोडले असेल तर कार्यालयातून पटकन निघण्याची चिंता नसते. महत्त्वाच्या कामासाठी काही दिवस बाहेर जाणेही शक्य होते.
तुमची सासू तुमच्यासोबत राहात नसली तरी तुम्ही तुमच्या मुलाचे तिच्याबद्दलचे प्रेम वाढवू शकता. छोट्या छोट्या प्रयत्नांनी तुम्ही दोघांना एकमेकांच्या जवळ येण्यास मदत करू शकता. यासाठी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात :
* दर रविवारी, तुमच्या मुलाला त्याच्या आजीशी व्हिडीओ कॉलवर बोलू द्या. मूल आजीशी बोलत असताना, तुम्ही तिथे बसून मुलाला सूचना देत राहाणे गरजेचे नाही. तुमच्या कामात गुंतून जा आणि मग बघा मूल आजीशी कसे मोकळेपणाने बोलते.
* नातवंडांच्या मागण्या पूर्ण करण्यात आजीला वेगळाच आनंद मिळतो. पैसे खर्च होतील किंवा म्हातारपणात त्यांना बाजारात जावे लागेल याची काळजी करू नका. उलट यामुळे आजीची तब्येत आणखी सुधारेल.