बेक्ड मसाला फ्लॉवर

रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* १ फ्लॉवर

* ४ कांदे

* २ टोमॅटो

* १ छोटा आल्याचा तुकडा

* ६ लसूण पाकळ्या

* १ छोटा चमचा हळद

* २ तमालपत्र

* १ छोटा चमचा लालतिखट

* २ चमचे धणे पूड

* १ छोटा चमचा गरम मसाला

* १ छोटा चमचा जिरे पूड

* २ हिरव्या मिरच्या

* १० ग्रॅम तेल

* १५ ग्रॅम पिझ्झा चीज

* थोडी चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी

* मीठ चवीनुसार.

कृती

फ्लॉवर वा पानांचा पूर्ण भाग काढून टाकून फ्लॉवर ५ मिनिटांसाठी मीठ टाकलेल्या गरम पाण्यात ठेवा. मग पाण्यातून काढून सुकवा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घ्या. या पेस्टमध्ये तमालपत्र, मीठ, धणेपूड, हळद, जिरे पूड, गरम मसाला आणि लाल तिखट घाला. हे मिश्रण फ्लॉवरला लावून ३० मिनिटे वेगळे ठेवा. आता बेकिंग टे्ला तेल लावून घ्या व फ्लॉवर फॉईलमध्ये गुंडाळून बेक करून घ्या. मग पिझ्झा चीज घाला आणि चीज वितळेपर्यंत बेक करा व कोथिंबीरीने सजवा.

आल्याची भाजी

रुचिता जुनेजा कपूर

साहित्य

* १०० ग्रॅम आले
* ५-६ लसूण पाकळ्या

* १ छोटा कांदा
* १ छोटा टोमॅटो
* १० एम.एल. दूध
* १० एम.एल तूप
* अर्धा छोटा चमचा लाल तिखट
* अर्धा छोटा चमचा हळद
* अर्धा छोटा चमचा बडिशेप
* अर्धा छोटा चमचा जिरे

* अर्धा छोटा चमचा ओवा
* कोथिंबीर व आल्याचे ज्युलिअन्स सजावटीसाठी

* मीठ चवीनुसार

कृती

कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घालून परता. मग आलं-लसूण घाला. नंतर कांदा आणि टोमॅटो घालून व्यवस्थित परतून घ्या. यात हळद व लाल तिखट आणि मीठ घाला. थोडं पाणी घालून कांदा व्यवस्थित शिजेल असा परतून घ्या. या मिश्रणात दूध घाला आणि एक उकळी काढा. शिजल्यावर कोथिंबीर आणि आल्याचे ज्युलिअन्स घालून सर्व्ह करा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें