मुलांसाठी कशी बनवाल गुंतवणूक योजना

* रायसा काजी

ज्या क्षणाला एखादी स्त्री आई बनते, तेव्हा त्याच क्षणापासून तिचे मूल तिच्या संसारातील मुख्य घटक बनते. रोज आपल्या मुलाच्या लहानसहान गरजांपासून ते त्याच्या सुरक्षित भवितव्यापर्यंत, ती त्याला सगळे उत्तम देऊ इच्छिते. तसेही आता मुलांना उत्तम शिक्षण आणि उत्तम भवितव्य देण्याची जबाबदारी केवळ वडिलांची राहिली नाही, आईसुद्धा यात आपले संपूर्ण सहकार्य देऊ लागली आहे.

या संदर्भात अनिता सहगल नामक एका महिलेचे उदाहरण घेऊ या. तिचे वय ३५ वर्ष आहे आणि ती आपल्या पती आणि २ मुलांसोबत पुण्यात राहते. तिचा मोठा मुलगा १२ व लहान ६ वर्षांचा आहे. सध्या एका मुलाचे पालनपोषण करण्यात होणाऱ्या खर्चाची यादी भयभीत करते, मग अशावेळी अनितालासुद्धा आपल्या मुलांच्या शिक्षणाची योजना आत्तापासून तयार करण्याची गरज आहे.

भारतात शिक्षणावरील खर्च अतिशय वेगाने वाढत चालला आहे. उच्च शिक्षणाच्या खर्चाचा महागाई दर खूप जास्त आहे. हा दर आर्थिक वर्ष २०१२ पासून २०१८ दरम्यान सरासरी ६.४२ असा होता, पण आता वार्षिक १० टक्के आहे. आपण पुढील २० वर्षात ७ टक्क्यांच्या अपरिवर्तित दराबाबतसुद्धा विचार केला तर ४ वर्षांचा बी. टेक. अभियांत्रिकी पाठयक्रम ज्याचा सध्याचा खर्च साधारण ८ लाख आहे, तोही ३० लाखात बदलू शकतो. अशाचप्रकारे सध्या एमबीए कोर्सवर एकूण जवळपास १२ लाख खर्च होतो, पण भविष्यातील २० वर्षात हा खर्च अंदाजे ४६ लाख होईल. हे लक्षात घेता अनितासारख्या प्रत्येक महिलेने लवकरात लवकर आपल्या मुलाच्या शिक्षणाची एखादी योजना बनवणे अनिवार्य आहे.

गुंतवणुकीची योजना बनवा

सर्वात आवश्यक हे आहे की अनिताने आपले लक्ष्य लिहून काढावे, जेणेकरून या गोष्टीची जाणीव होईल की केव्हा, कोणत्या कारणांसाठी आणि किती खर्च करावा लागेल. उदाहरणार्थ प्री प्रायमरी एज्युकेशनच्या खर्चासाठी उच्च शिक्षणाच्या तुलनेत कमी गुंतवणूकीची गरज आहे. अशाच प्रकारे पदवीच्या तुलनेत पदव्यूत्तर अध्ययनासाठी जास्त पैसे लागतील. केवळ ट्युशन फीजसुद्धा लक्षात ठेवण्याऐवजी एका आईने होस्टेल फी, स्टेशनरी व प्रिंटिंग वगैरे यासंबंधित खर्चाचासुद्धा विचार करण्याची गरज आहे. तिला हेसुद्धा ठरवावे लागेल की मुलाचे शिक्षण भारतात होईल की परदेशात.

या सर्व बाबी चार्टमध्ये लिहिल्याने आवश्यक रकमेचा अंदाज घेऊन आणि त्याप्रमाणे गुंतवणूक केल्यास मदत होईल. तिला बजेटची एक अशी पायाभूत योजना बनवायची गरज आहे जी, वायफळ खर्च कमी करणे आणि अतिरिक्त पैसे वाचवण्यास सहाय्यक ठरेल. हे जास्तीचे पैसे मुलाच्या ध्येयासाठी गुंतवले जाऊ शकतात.

मुलाचा वाढदिवस आणि उत्सवांमध्ये नातेवाईकांकडून  भेटवस्तूरूपात जे पैसे मिळतात, त्याची एकरकमी  गुंतवणूक करायला हवी. जेव्हा मुलाला पैसे मिळतील, त्याचा उपयोग व्यवस्थित विचार करून गुंतवणुकीला प्राधान्य देत करा.

गुंतवणूक करण्याचा प्रभावी मार्ग

मुलाशी संबंधित ध्येयासाठी गुंतवणूक करण्याचे अनेक मार्ग आहेत. ८.५ टक्के व्याज दराने (आर्थिक वर्ष २०१९ची तिसरी तिमाही) देणारी सुकन्या समृद्धी योजना अथवा एकाच वेळी ९-१० टक्के परतावा देणारे युनिट लिक्ड इन्व्हेस्टमेंट प्लॅन (यूलिप) आदर्श गुंतवणूक ठरू शकतात.

तसे पाहता एक डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड गुंतवणूकीचा सगळयात प्रभावी मार्ग आहे. एका ठराविक वेळेत हा लहान बचत योजनांच्या तुलनेत जास्त मोठी रक्कम देण्यात सहायक ठरतो.

एखाद्या मुलाचे उच्च शिक्षण घेण्याचे दीर्घकालीन ध्येय असेल तर यासाठी नातेवाईकांकडून दर २० वर्षांपर्यंत वार्षिक १०,००० रुपये जरी मिळाले तरी ते एकंदरीत १७ लाख रुपयांची रक्कम बनू शकते. म्युच्युअल फंडात गुंतवलेला पैसा १८ टक्के दिला तरी शक्य आहे. म्हणून अनितासारख्या अधिकांश महिलांनी असा दीर्घकालीन फायदा लक्षात ठेवून चांगल्याप्रकारे डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करावी आणि खूप पैसे जमा करावे.

दीर्घकाळासाठी केली जाणारी गुंतवणूक

कुटुंबाकडून कधीकधी जो पैसा मिळतो, त्याशिवायसुद्धा त्यांनी एसआयपीसारख्या इक्विटी योजनांमध्ये आपल्या बचतीतील गुंतवणूक करायला हवी. नियमितपणे दीर्घकाळापर्यंत केली जाणारी ही गुंतवणूकसुद्धा भरपूर रक्कम देऊ शकते.

उदाहरणार्थ १५ वर्षांसाठी एसआयपीमध्ये दरमहिन्याला १५ हजार रुपये गुंतवल्यास तर वार्षिक १८ टक्के परतावा गृहीत धरल्यास शेवटी साधारण ४० लाख गोळा होतील.

शेवटची बाब, नियम कायद्याशी आणि संचलनाशी निगडीत अनावश्यक चिंतांपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक महिलेने आपल्या नावाने गुंतवणूक करावी. मुलांना नॉमिनी बनवले जाऊ शकते.

एक चांगली आई बनण्यासाठी आपल्या मुलाला उज्ज्वल भवितव्य देणारी प्रत्येक जूबाबदारी पूर्ण करणं जरूरी आहे. तुमच्या आयुष्यापेक्षा चांगले आयुष्य मुलांना देण्याची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागेल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें