डेटिंग मेकअप टीप्स

* पारूल भटनागर

डेटिंगवर जायचे असेल पण बिझी शेड्युलमुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही घरबसल्या काही मिनिटांतच स्वत:ला उत्तम लुक देऊन मित्र-मैत्रिणींमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरू शकता.

यासंदर्भात ब्यूटी एक्स्पर्ट बुलबुल साहनी यांनी दिलेल्या काही टीप्स जाणून  घ्या :

मेकअप करण्यापूर्वी काय करावे

तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर झटपट उजळपणा हवा असेल तर मेकअप करण्यापूर्वी १० मिनिटे आधी आपल्या चेहऱ्यावर दही लावा. दही ब्लीचचे काम करते. यामुळे त्वचा उजळण्यासोबतच मेकअपचाही खूप छान रिझल्ट मिळतो.

उजळ त्वचेसाठी तुम्ही आठवडयातून तीन दिवस दह्यात लिंबू किंवा टोमॅटो मिसळून लावू शकता. त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावण्याचीही गरज भासणार नाही. हे प्रायमरचे काम करते.

घरात ठेवा कॉस्मेटिक प्रोडक्ट्स

तुम्ही घरात मेकअप किटमध्ये क्रीम, कन्सिलर, फाउंडेशन, ब्रश, कॉम्पॅक्ट, आयशॅडो, काजळ, लायनर, ब्लशर, लिपस्टिक, लिप पेन्सिल, हेअर अक्सेसरीज, टिकली, नेलपॉलिश इत्यादी नक्की ठेवा. यामुळे तुम्हाला काही मिनिटांतच मेकअप करणे सोपे होईल.

मेकअप कसा करावा

त्वचा जास्त कोरडी दिसत असेल तर मेकअपचा तितकासा इफेक्ट जाणवणार नाही. म्हणून सर्वप्रथम त्वचेचा कोरडेपणा घालविण्यासाठी चेहऱ्यावर कोल्ड क्रीम लावा. हे काळी वर्तुळे लपविण्याचे काम करते.

त्यानंतर चेहऱ्यावर चांगले फाउंडेशन लावा. मानेवरही फाउंडेशन लावायला विसरू नका. यामुळे नॅचरल स्किन टोनसह त्वचा स्वच्छ दिसू लागते. बेस तयार झाल्यावर ब्रशच्या मदतीने कॉम्पॅक्ट लावा. ते तुम्हाला परफेक्ट लुक देण्याचे काम करेल. लक्षात ठेवा की कॉम्पॅक्ट नेहमी अँटीक्लॉकव्हाईस लावा. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो.

त्यानंतर आयशॅडो वापरून डोळयांचा मेकअप करा. आजकाल स्मोकी डोळयांची खूप क्रेझ आहे, त्यामुळे तुम्ही गडद रंगापासून स्मोकी डोळयांसह भुवयाही त्याच पण सौम्य रंगाने रंगवून त्यावर थोडे ग्लिटर लावा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार डोळयांवर पातळ किंवा जाड लायनर लावा. नंतर मस्कराचे ३-४ कोट लावा. मस्करामुळे पापण्या दाट दिसू लागतील. आता काजळ लावा. यामुळे तुमचे डोळे अधिक सुंदर दिसतील.

यानंतर नाकाजवळून ते भुवयांपर्यंत ब्लशर लावा आणि बोटांनी सर्वत्र नीट पसरवा. ब्लशरनंतर हाइलायटर लावा. यामुळे थोडया वेळाने मेकअप चमकू लागतो. आता पेन्सिलने ओठांची रेषा काढा आणि त्यामध्ये लिपस्टिक लावा. यामुळे लिपस्टिक पसरत नाही.

सर्वात शेवटी, केस तुमच्या मनाप्रमाणे बांधा. तुम्ही ते मोकळेदेखील सोडू शकता किंवा केस लहान असतील तर आधी हळू हातांनी मागून विंचरा आणि बन बनवून पिन व डोनटने चांगले झाकून घ्या. पुढील केसांना थोडे प्रेस करून चांगल्याप्रकारे सेट करा. हा लुक तुमच्या मेकअप आणि आउटफिटसाठी खुलून दिसेल. अशाप्रकारे, तुम्ही डेटिंगवर जाण्यासाठी स्वत:ला अगदी काही मिनिटांतच तयार करू शकता.

काय आहे कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर

– मिनी सिंह

सर्व मोसमांत हिवाळयाचे दिवस उत्तम मानले जात असले तरी या मोसमात त्वचा खूपच कोरडी आणि रुक्ष होते. यामुळे ती निर्जीव दिसू लागते. या मोसमात त्वचेला ओलावा अर्थात मॉइश्चरायजिंगची विशेष गरज असते.

हिवाळयात अनेकदा ओलाव्याच्या कमतरतेमुळे ओठ फुटू लागतात. हातापायाच्या त्वचेवर सफेद भेगा पडू लागतात, टाचांनाही भेगा पडू  लागतात. कधीकधी तर त्यातून रक्तही येऊ लागते, यामुळे खूपच वेदना होतात. त्यामुळेच या मोसमात त्वचेची खूपच काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी साधारण मॅनिक्युअर-पॅडिक्युअरमुळे काहीच फायदा होत नाही, उलट विशेष प्रकारच्या मॅनिक्युअर-पॅडिक्युअरची गरज असते. यासाठी तुम्ही कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर थेरपीचा वापर करू शकता.

काय आहे कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर

कॅण्डल मॅनिक्युअर-पॅडिक्युअर ट्रीटमेंट काही वैशिष्टयपूर्ण कॅण्डल्स म्हणजे मेणबत्ती वितळवून दिली जाते. हा मॅनिक्युअर-पॅडिक्युअरचा नवीन प्रकार आहे.

कसा करतात या ट्रीटमेंटचा वापर

या ट्रीटमेंटमध्ये कॅण्डल वितळवून त्याचा वापर स्क्रबिंग आणि मसाजसाठी केला जातो. या ट्रीटमेंटमध्ये मृत त्वचा काढून टाकली जाते. हिवाळयाच्या मोसमात ही ट्रीटमेंट खूपच उपयोगी ठरते.

याला कसे बनवतात

ही कॅण्डल बनवण्यासाठी वॅक्ससोबतच यात जोजोबा ऑईल, कोकोआ बटर, व्हिटॅमिन इ आणि आवश्यक तेलांचा वापर केला जातो. अशा कॅण्डल तुम्हाला बाजारात सहज मिळतील. वाटल्यास तुम्ही त्या घरीही बनवू शकता.

याचे फायदे

कॅण्डल मसाज त्वचेला पोषण देणे, एक्सफॉलिएट करणे आणि त्वचेतील पेशी पुनरुर्जीवित करण्यासाठीचा एक उत्तम उपाय आहे.

कसा कराल याचा उपयोग

कॅण्डल थेरपीदरम्यान मॅनिक्युअर-पॅडिक्युअरची सुरुवात सर्वसामान्य पद्धतीने केली जाते. सर्वात आधी नखे कापून, फॉईल, शेपिंग, क्युटिकल्सवर क्रीम लावून ती स्वच्छ केली जातात. यानंतर स्पेशल कॅण्डल वितळवली जाते. तयार वॅक्सचा वापर स्क्रबप्रमाणे केला जातो. यामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यानंतर गरम टॉवेल गुंडाळून त्वचा स्वच्छ केली जाते.

यानंतर क्रीम बनवण्यासाठी पुन्हा कॅण्डल वितवळली जाते. या वॅक्सपासून बनवलेल्या क्रीमचा वापर चांगल्या प्रकारे मॉइश्चरायजिंग करण्यासाठी केला जातो. त्यानंतर हात आणि पायांसाठी स्क्रिन ब्रायटनिंग पॅकचा वापर केला जातो. याशिवाय पुरेशा प्रमाणात फळे खा, जास्तीत जास्त लिक्विड डाएट घ्या.

मान्सून स्पेशल : २५ मॉन्सून फिटनेस टीप्स

* सोमा घोष

फिटनेस राखणे हे फार गरजेचे आहे. अनेक महिला या मोसमात सुस्त होतात. मग त्या गृहिणी असोत किंवा नोकरदार महिला. मॉन्सूनमध्ये बाहेर पडून वर्कआउट करणं कोणाला फारसे रूचत नाही. अशामुळे पचनशक्ती कमकुवत होते आणि याबरोबरीनेच अनेक आजारही उद्भवतात. अशावेळी जर सोप्या फिटनेस टीप्स मिळाल्या तर घरी वर्कआउट करणेही सोपे होऊन जाईल.

मुंबईतील साईबोल डान्स अॅन्ड फिटनेस सेंटरच्या फिटनेस एक्सपर्ट मनीषा कपूर अनेक वर्षांपासून महिलांना ट्रेनिंग देत आहेत. मनीषाने सुचवलेल्या फिटनेस टीप्स पुढीलप्रमाणे :

  1. या दमट ऋतुत घाम जास्त येतो. त्यामुळे पाणी जास्त प्यावे. दिवसभरात १०-१२ ग्लास पाणी जरूर प्यावे.
  2. या ऋतुत काकडी, मोसमी फळे ज्यात कलिंगड, टरबूज इ. फळे जास्त प्रमाणात खावीत. यामध्ये पाण्याचे प्रमाण सर्वांधिक असते.
  3. वर्कआऊट एंजॉयमेंटच्या रूपाने करावा. फक्त व्यायाम म्हणून करू नये. जर तुम्हाला डान्स आवडत असेल तर तोही करू शकता. कमीत कमी १५ ते २० मिनिटे वर्कआऊट करा.
  4. उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात बाहेर जाणे शक्य नसते. त्यामुळे घरी राहूनच बॉडी वेट एक्सरसाइज, स्टे्रचेस इ. केले जाऊ शकते.
  5. वर्कआऊटच्या आधी प्रॉपर वॉर्मअप करायला विसरू नये अन्यथा पेशींना हानी पोहोचू शकते.
  6. वर्क आऊटनंतर कूल डाऊन पोजीशनमध्ये अवश्य राहा.
  7. तसे तर तुम्ही कधीही वर्कआऊट करू शकता, पण सकाळी आणि संध्याकाळी वर्कआऊट करणे चांगले असते. यावेळी वातावरण थोडे थंड असते.
  8. वर्कआऊटच्या दरम्यान श्वास नेहमी नाकानेच घ्यावा. यामुळे तुमचा वेग थोडा मंदावेल. पण तुमच्या कॅलरीज न थकताच बर्न होतील.
  9. वर्कआऊटच्यावेळी नेहमी फिक्या रंगाचे आरामदायक कपडे घालावेत.
  10. वर्कआऊट करताना जर थकल्यासारखे वाटले तर ताबडतोब थांबा आणि पंख्याखाली निवांत बसा.
  11. व्यायाम करताना मन शांत ठेवण्यासाठी एखादे आवडीचे गाणे ऐकू शकता. यामुळे मनात काही इतर विचारही येणार नाहीत. कारण दिवसभर जरी तुम्ही पळापळ करत असता अणि त्यावेळी एखादे काम उरकण्याचा तुमचा मानस असतो. अशावेळी वर्कआउट करताना तुमचा मेंदू हाच ताण अनुभवतो.
  12. कुटुंबासोबत किंवा मैत्रीणींसोबतही तुम्ही व्यायाम करू शकता. यामुळे आळस येणार नाही व फिटनेस रूटिन निर्माण होईल.
  13. या मोसमात योग्य डाएट जरूरी असतो. मिठाई, तळलेले तेलकट पदार्थ टाळावेत. आहारात फळे, भाज्या यांचा समावेश करावा.
  14. पावसात बाहेर गेलात तर केळी, टरबूज, सफरचंद इ. कापून स्वत:जवळ ठेवावे. याशिवाय लिंबूपाणी, कैरीचे पन्हे, ताक, कोकम सरबत हेही ठेवू शकता.
  15. बाहेर पडताना पाण्याची बाटली अवश्य जवळ बाळगावी. या पाण्यामध्ये पुदिन्याची पाने, काकडी आणि लिंबू लहान आकारात कापून टाकावेत. पाणी प्यायल्यानंतर त्यामध्ये या सर्वांचा स्वाद आणि थंडपणा येतो. त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल.
  16. जंक फूडमध्ये मिठाचे प्रमाण अधिक असते, विशेषत: वेफर, लोणचे आणि चटण्या कमी खाव्यात.
  17. जेवण बनवताना कोथिंबीर, पुदिन्याची पानं, आणि बडिशेपचा वापर अधिक प्रमाणात करावा. कारण यामुळे शरीर थंड राहतं. गरम मसाल्यांचा वापर कमी करावा.
  18. बराच वेळ कापून ठेवलेली फळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यातही खाऊ नयेत. कारण या मोसमात जीवजंतूची उत्पत्ती जास्त प्रमाणात होत असते.
  19. भाज्या शिजवण्याआधी व्यवस्थित धुवून घ्या. गरज पडल्यास कोमट पाण्यात मीठ घालून त्यात भाज्या धुवून घ्याव्यात.
  20. ७-८ तास जरूर झोपा.
  21. या ऋतुत एखादा छंद जोपासण्याचा प्रयत्न करावा.
  22. बाहेरून घरी येताच मेडिकेटेड साबणाने सर्वप्रथम हातपाय धुऊन स्वत:ला फ्रेश ठेवावे. वैयक्तिक स्वच्छतेसाठी हे गरजेचे आहे.
  23. या मोसमात पायांकडे विशेष लक्ष द्यावे लागते, कारण पावसात बाहेरील घाणेरड्या पाण्यामुळे पायाच्या बोटांना इन्फेक्शन होऊ शकते. पाय कोरडे राहू द्या. गरज पडल्यास बोरिक अॅसिड पावडर पायाला लावावी.
  24. विनाकारण पावसात भिजणे आजाराला आमंत्रण ठरू शकते. त्यामुळे याबाबत काळजी घ्या.
  25. वातावरण जरी खराब असले तरी वेळ चांगला जावा म्हणून आवडीचे संगीत ऐकावे. पुस्तके वाचावीत आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. यामुळे मानसिक आरोग्य उत्तम राहते.

आजपासूनच या टीप्स अंमलात आणा आणि पावसाच्या शिडकाव्यासोबत आनंदी आणि सुदृढ राहा.

मान्सून स्पेशल : पावसातही चमकेल केशसंभार

* एस. घोष

पावसाळयात केसांवर सतत पाणी पडल्याने ते चिकट होणे, त्यांचा गुंता होणं व गळणं यांसारख्या समस्या नेहमीच्याच झाल्या आहेत. अर्थात, हा मोसम कुठल्याही प्रकारच्या केसांसाठी त्रासदायकच असतो. मात्र, तेलकट केसांसाठी या समस्या जास्त क्लिष्ट बनतात. तेलकट केसांमध्ये वातावरणातील धूळमाती, प्रदूषण चटकन आकर्षित होत असल्याने, असे केस वेगाने गळू लागतात. याबाबत केशतज्ज्ञ कांता मोटवानी सांगतात की, पावसाळयाच्या दिवसांत केस ओले होतात. पावसाचं प्रदूषणयुक्त व अॅसिडमिश्रित पाणी केसांना नुकसान पोहोचवितं. म्हणून पावसात भिजल्यानंतर लगेच केस स्वच्छ पाण्याने धुऊन कोरडे करा. त्यामुळे केसांना होणारा धोका कमी होईल.

या मोसमात कोणत्याही प्रकारचं हेअर जेल आणि हेअर स्टायलिंग प्रसाधनाचा वापर करू नका. या दिवसांत रसायनविरहित नैसर्गिक प्रसाधनांचा वापर करणं उपयुक्त ठरतं. सतत केसांना कंडिशनर व शाम्पू लावल्याने डोक्याच्या त्वचेतील नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे केस रुक्ष होऊन गळू लागतात.

केशतज्ज्ञ असगर साबू सांगतात की, निरोगी केसांसाठी नेहमीचे तेच-तेच हेअर रूटीन सोडून खालील नवीन रूटीनचा अवलंब करा :

  • तुम्ही जर रोज शाम्पू करत असाल, तर सौम्य शाम्पूचा वापर करा. मात्र, केसांना सतत शाम्पू करण्याने केसांचं नैसर्गिक तेल निघून जातं. त्यामुळे कोंडयाची समस्या निर्माण होऊ शकते. पावसाळयात केस ओले व चिकट होत असल्याने, आठवडयातून केवळ दोन ते तीन वेळा शाम्पू करा. तोही केवळ केसांच्या मुळाशी लावून केस धुवा.
  • सौम्य कॅरॉटिनयुक्त शाम्पू या मोसमात लाभदायक ठरतो. त्यामुळे केस स्वच्छ, चमकदार व निरोगी राहातात. कॅरॉटिन केसांना पोषण देतं. त्यामुळे त्यांचा गुंता होत नाही. याबरोबरच केसांना कंडिशनिंग करून सिरम लावणे फायदेशीर असतं.
  • शाम्पूनंतर केसांना मास्क लावणं आवश्यक आहे. जर तुमचे केस फिजी असतील, तर अँटीफिजी मास्कचा वापर करा. मात्र, मास्क जास्त वेळ केसांवर लावून ठेवू नका, अन्यथा केस अधिक तेलकट होतील. हा मास्क केवळ ५ ते ७ मिनिटं लावून ठेवणं पुरेसं असतो.
  • पावसाळयात केसांना तेल लावणं आवश्यक असतं. खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलामध्ये केसांना पोषण देण्याची क्षमता असते. आठवडयातून एक ते दोन वेळा केसांना शाम्पू करण्यापूर्वी, ही तेलं कोमट करून बोटांनी केसांच्या मुळाशी हलके मालीश करा. आपल्या वेळानुसार, पाच मिनिटांपासून ते अर्धा तास केसांना चांगलं मालीश केल्यानंतर टॉवेलने डोकं झाकून घ्या. शाम्पू केल्यानंतर ड्रायरने केस वरवर सुकवा. त्यामुळे केस चमकदार दिसतील.
  • केस ओले असतील, तर ते मुळीच बांधू नका. मोठया दातांच्या कंगव्याने ते व्यवस्थित विंचरा. निरोगी केस मिळविण्यासाठी जास्त प्रोटीनची आवश्यकता असते. तुम्ही शाकाहारी असाल, तर हिरव्या भाज्या, बिन्स होलग्रेन्स, लो फॅट डेअरी प्रॉडक्ट्स इ. चे सेवन करू शकता. मात्र, तुम्ही जर मांसाहारी असाल, तर मासे, अंडी यांचे सेवन जास्त प्रमाणात करू शकता. तुम्ही जर कामकाजी असाल, तर या दिवसांत आपल्यासोबत एक टॉवेल अवश्य ठेवा. जेणेकरून केस ओले झाल्यास ते टॉवेलने चांगल्याप्रकारे कोरडे करता येतील. काही वेळा छान हेअरकट करून केसांना आकर्षक लुक द्या.
  • पावसाळयात केसांना प्रोटीन ट्रीटमेंट देणं आवश्यक असतं. अंडे, मध व दही यांचा पॅक केसांसाठी लाभदायक प्रोटीन पॅक आहे. कृती जाणून घ्या :
  • दोन अंडयांच्या घोळात दोन मोठे चमचे दही मिसळा. अर्ध्या लिंबाचा रस आणि मधाचे काही थेंब टाकून चांगल्याप्रकारे एकजीव करा व नंतर हे मिश्रण केसांच्या मुळाशी लावा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ पाण्याने केस धुऊन टाका.
  • कोमट पाण्यात दोन मोठे चमचे व्हिनेगर मिसळून केसांना लावल्याने, केसांना चमक येते व केस सुळसुळीत होतात.
  • वसाच्या दिवसांत छत्री घ्यायला विसरू नका, जेणेकरून केसांचे पावसाच्या पाण्यापासून संरक्षण होईल व त्यांचे सौंदर्य अबाधित राहील.

कलर केलेल्या केसांची काळजी

  • केस ओले असल्यास बाहेर जाणं टाळा. कारण त्या वेळी केसांची रंध्रं उघडलेली असतात. बाहेरील वातावरणातील प्रदूषणामुळे अनेक मिनरल्स उदा. सल्फेट, फॉस्फरस, पोटॅशियम व सोडियम ओलाव्यात मिसळतात. त्यामुळे केस कमजोर तर होतातच, पण केसांच्या रंगाला धोका पोहोचू शकतो. केस धुतल्यानंतर केसांना सिरम जरूर लावा. त्यामुळे केसांची उघडलेली रंध्रं बंद होतील. त्याचबरोबर, केस मऊ व चमकदारही होतील. शिवाय सीरमच्या वापराने कलरला शाइनही येईल.
  • आपल्याला गॉर्जिअस लुक मिळविण्यासाठी केसांना कलर करायची इच्छा असेल किंवा केसांचा कलर बदलायचा असेल, तर जरा थांबा; कारण पावसाळी मोसमात कलर लवकर उडून जाण्याची भीती असते. केसांना नरिशमेंट देण्यासाठी आठवडयातून एकदा हेअर मास्कही लावू शकता. यासाठी कडुलिंबाची पानं सुकवून पावडर करा. त्यात मेयोनीज व अंडे मिसळून केसांना लावा आणि काही तासांनंतर धुऊन टाका. या पॅकमधील कडुलिंबाचे अँटिसेप्टिक गुण आपल्या केसांचं कोणत्याही इन्फेक्शनपासून संरक्षण करतील. अंडयातील प्रोटीनमुळे केसांना मजबुती मिळेल. त्याचबरोबर, कलरही जास्त दिवस टिकून राहील, तर मेयोनीजमुळे केसांना कलरफुल चमक मिळेल.
  • तुम्ही केलेला कलर स्टायलिश दिसावा, असं वाटत असेल, तर तुम्ही वेण्याही घालू शकता. स्टायलिश व फॅशनेबल ब्रँड्समधील कलरफुल बटा खूप सुंदर दिसतील. त्याचबरोबर, तुम्ही केसांचा मॅसी साइड लो बनही बनवू शकता. चेहऱ्याला मेकअप लुकपेक्षा, नैसर्गिक लुक मिळविण्यासाठी काही बटा जरूर काढा. त्यामुळे चेहऱ्याला बनावटी लुक न मिळता, खरा लुक मिळेल.

सेल्फीमुळे वाढली सर्जरीची क्रेज

– एनी अंकिता

आजचे तरुण सेल्फीसाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायला तयार असतात. बस्स, सेल्फी चांगली यावी, जेणेकरून सोशल नेटवर्किंग साइट्सवर अपलोड करून त्यांना सर्वांची प्रशंसा मिळवता येईल.

मीडियामध्ये जाहीर झालेल्या एका रिपोर्टनुसार, २०१५ साली ओठांच्या सर्जरीचा एक नवीन रेकॉर्ड समोर आला आहे. अमेरिकेत आकर्षक पाउट घेऊन फोटो काढण्यासाठी लोक ओठांची सर्जरी करून घेत आहेत. इथे दर १९ मिनिटाला ओठांची सर्जरी होत आहे. अमेरिकेन सोसायटी ऑफ प्लास्टिक सर्जंसच्या एका सर्वेक्षणातून असं कळलं आहे की, २०१५ मध्ये पुरुष आणि स्त्रियांमध्ये २७, ४९९ लिप इम्प्लांट्स झाले आहेत, जे २०००च्या तुलनेत ४८ टक्के जास्त आहेत. अमेरिकेत प्लास्टिक सर्जरी करून घेणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे. दुसऱ्या स्थानी ब्राझिल, तिसऱ्या स्थानी चीन आणि चौथ्या स्थानी भारताचा क्रमांक येतो.

का वाढतंय याचं प्रस्थ

अलीकडे सोशल मीडियामुळे लोक आपल्या सौंदर्याच्या बाबतीत काही जास्तच जागरूक झाले आहेत. यामुळे त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण झाली आहे. होय, आता ते जेव्हा सोशल साइट्सवर इतरांचे फोटो बघतात, तेव्हा ते स्वत:लाही तसंच दाखवण्याचा प्रयत्न करू लागतात. अलीकडे भुवया वर करून पाउट बनवून फोटो काढण्याच्या ट्रेण्डचं प्रस्थ सुरू आहे आणि यासाठीच स्त्रिया आकर्षक पाउट लिप्स मिळवण्यासाठी सर्जरी करून घेत आहेत.

खरंतर ओठ खूपच पातळ असतील तर हसताना ते दिसत नाहीत. बऱ्याचदा ओठांचा आकार बरोबर नसतो. वरचा ओठ खूपच पातळ तर खालचा ओठ जाड असतो. कधीकधी एखाद्याच्या ओठांवर एक छोटासा उभार असतो, जो पूर्ण सौंदर्य बिघडवून टाकतो. वाढत्या वयाबरोबर ओठांचे कोपरेही लोंबकळू लागतात, तेदेखील सर्जरी करून सुधारले जाऊ शकतात.

वेगवेगळे उपचार

इंजेक्शनमध्ये आर्टिफिशियल किंवा नैसर्गिक फिलर भरून ओठांमध्ये इंजेक्ट केलं जातं, ज्यामुळे ओठ भरलेले दिसू लागतात. पण हे फक्त काही महिन्यांसाठीच असतं. ही एक अस्थायी पद्धत आहे. स्थायी परिणामासाठी इंम्प्लांट आणि सर्जरीसारखे पर्याय आहेत, ज्यामध्ये वारंवार इंजेक्शनच्या प्रोसेसमधून जावं लागत नाही.

लिप इन्हांसमेंट, फॅट ट्रान्सफर  इंजेक्शन : यामध्ये तुमच्या शरीरातील ज्या भागात जास्त फॅट असतं, तिथून फॅट घेऊन ओठांमध्ये इंजेक्ट केलं जातं, ज्यामुळे ओठ भरलेले आणि जाड दिसू लागतात.

डर्मल ग्राफ्ट सर्जरी : त्वचेच्या खोल थरात जाऊन तिथून वसा काढली जाते आणि ती ओठांच्या कडेला म्हणजे मोस्कोसाच्या आत भरली जाते, ज्यामुळे ओठ भरलेले दिसू लागतात.

लिप इम्प्लांट : ही तोंडाच्या आतमधून केली जाणारी सर्जरी आहे. याचे अनेक नैसर्गिक आणि सिंथेटिक इम्प्लांट पर्याय उपलब्ध आहेत.

बॉलीवूड अभिनेत्रीही मागे नाहीत

चेहऱ्याचं सौंदर्य वाढवण्यासाठी बॉलीवूडच्या या अभिनेत्रींनीही लिप सर्जरी केली आहे :

अनुष्का शर्मा : अनुष्का शर्माने जेव्हा शाहरुख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ चित्रपटातून आपल्या चित्रपट करिअरची सुरूवात केली तेव्हा तिचा चेहरा नॅचरल होता. पण २०१२ साली जेव्हा ‘जब तक है जान’ चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्या चित्रपटात अनुष्काचं एक वेगळंच व्यक्तिमत्त्व दिसून आलं. तिचे ओठ पूर्वीसारखे पातळ नव्हते, त्यामध्ये भरीवपणा आलेला.

राखी सावंत : कायम चर्चेत राहाणाऱ्या राखी सावंतला सर्जरी क्वीन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. स्वत:ला जास्त ग्लॅमरस दाखवण्यासाठी राखीने अनेक प्रकारच्या सर्जरी केल्या आहेत. त्यापैकी एक लिप सर्जरीही आहे.

प्रियंका चोप्रा : प्रियंका ही गोष्ट स्वीकारत नाही की तिने सर्जरी केली आहे, पण तिचे ओठ खोटं बोलत नाहीत. त्यावरून स्पष्ट कळतं की तिने सर्जरी करून घेतली आहे.

कतरीना कैफ : बॉलीवूडची बार्बी डॉल कतरीना कैफ आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. तिनेही सर्जरी करूनच आपल्या ओठांना भरीवपणा आणला आहे. मात्र ही गोष्ट तिने सर्वांसमोर स्वीकार केली नाहीए. मात्र पातळ लिप्सपासून पाउट लिप्सचा झालेला बदल सर्वांनाच सांगत आहे की तिने लिप सर्जरी केली आहे.

स्त्रियांना हवीय सेल्फी स्माइल

सेल्फी म्हणजे चेहऱ्याचा फोटो, ज्यामध्ये शरीराचा इतर भाग कमीच दिसतो, चेहऱ्यावर जास्त फोकस केला जातो. यामुळेच स्त्रिया आपल्यातील कमतरता लपवण्यासाठी सर्जरीचा आधार घेत आहेत. त्या ओठांना आणि नाकाला योग्य शेप देण्यासाठी सर्जरी करत आहेत. चेहऱ्यावरील डाग लपवण्यासाठी सर्जरी करत आहेत. इतकंच नव्हे तर, त्या आपले वाकडेतिकडे दातही चांगले करत आहेत.

समर-स्पेशल : सनबर्नपासून करा बचाव

* मोनिका

लॉकडाऊनमुळे आपण सगळे घरी आहोत. पण अत्यावश्यक वा जरूरीच्या कामांसाठी आपल्याला घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी उन्हाळयाच्या या मोसमात उन्हात जास्त वेळ घालवल्याने त्वचा भाजली किंवा होरपळली जाते, ज्याला सनबर्न म्हटले जाते. शरीरावर लाल डाग पडणे, त्वचा काळवंडणे ही सनबर्नची लक्षणे आहेत.

नुकसानदायक प्रभाव

सूर्यातून निघणारी अल्ट्राव्हॉयलेट किरणे जशी आपल्या त्वचेला फायदा पोहोचवतात तशीच त्यांच्यापासून त्वचेला हानीसुद्धा पोहोचते. यांपासून शरीराला व्हिटॅमिन डी तर मिळतेच, परंतु जेव्हा ही किरणे जास्त प्रमाणात शरीरावर पडतात, तेव्हा त्वचेला जळजळ जाणवते. सकाळी १० वाजेपर्यंतचे आणि संध्याकाळी ५ वाजल्यानंतरची किरणे शरीरासाठी फायद्याची असतात.

त्वचारोग विशेषज्ज्ञ डॉक्टर मलिक यांचे म्हणणे आहे, ‘‘सावळ्या वा गडद रंगाच्या त्वचेमध्ये मैलानिन जास्त प्रमाणात पाहिले जाते, ज्यामुळे त्यांच्या त्वचेवर या किरणांचा प्रभाव कमी पडतो. मैलानिनचे प्रमाण कमी असल्याने गोऱ्या त्वचेवर यांचा प्रभाव लवकर पडतो. जेव्हा ही किरणे त्वचेवर पडतात, तेव्हा मैलानिनला बर्न करतात, ज्यामुळे त्वचेवर लाल पुटकळया दिसून येतात.

त्वचेची रक्षा

* जर आपण जास्त वेळपर्यंत उन्हाच्या संपर्कात राहात असाल तर सनस्क्रिनचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा सनस्क्रिन ३० एसपीएफ पेक्षा कमी असू नये.

* डॉक्टर मलिकच्या मते सनस्क्रिन बाहेर पडण्यापूर्वी २० मिनिट अगोदर लावावे.

* जर तुम्ही सनस्क्रिन लावल्यानंतर लगेच घरातून बाहेर निघालात तर हे आपल्या त्वचेसाठी नुकसान पोहोचवते. दिवसा बाहेर न पडण्याचा प्रयत्न करा.

* त्वचेला कोरडे राहू देऊ नका. अंघोळीनंतर मॉइश्चराइजर अवश्य लावावे. जर तुम्हाला वाटले की आपली त्वचा भाजते आहे तर लगेच त्या जागेवर थंड पाणी किंवा बर्फ लावावे.

सनबर्न कसे हटवावे

सनबर्नला हटवण्यासाठी बरेच घरगुती उपाय आहेत. जर तुम्हाला सनबर्न कमी प्रमाणात झाले असेल तर ते थोडयाच दिवसांत बरे होईल. यासाठी तुम्ही पुढील घरगुती उपायांचा जरूर अवलंब करा :

बटाटयाचा ज्यूस : कच्च्या बटाटयाचा ज्यूस सनबर्नसाठी खूप लाभदायक ठरतो. यामुळे त्वचेवर हरवलेली चमक पुन्हा परत येते. याशिवाय बटाटयाचा ज्यूस त्वचेची सूज, जळजळ आणि लाल डाग यामध्येही खूप आराम पोहोचवतो. याचा उपयोग करण्यासाठी बटाटयाला सोलून घ्या. नंतर त्याला पिळून घ्या.

पुदीन्याची पाने : पुदिन्याची पानेही सनबर्न घालवण्यासाठी फायद्याची असतात. यामध्ये अँटीबॅक्टेरिअल गुण आढळतात, जे त्वचेचे पोषण करून पिगमेंटेशनची समस्या सोडवतात. पुदिन्याच्या पानांच्या उपयोगाने त्वचेला गारवा मिळतो. ही पाने त्वचेला मॉइश्चराइझर देण्याचेही काम करतात.

अॅप्पल साइडर विनेगर : अॅप्पल साइडर विनेगर आरोग्यासाठी फायद्याचे असते. याचा उपयोग सनबर्नचे डाग घालवण्यासाठीही केला जातो. हे त्वचेवर पडलेल्या डागांना दूर करून त्वचेला स्वच्छ करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावते. याचा उपयोग करण्यासाठी तुम्ही एक चमचा व्हिनेगर पाण्यात मिसळून सनबर्नवर लावावे. ५ ते १० मिनिटांपर्यंत लावून ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्या.

दही : दह्याचे सेवन उन्हाळयाच्या मोसमात जास्त प्रमाणात करायला हवे. कारण यामुळे शरीर व त्वचा दोहोंना गारवा मिळतो. दही एका औषधाप्रमाणे काम करते. यात आढळून येणारे प्रोबायोटिक्स आणि एंजाइम चेहऱ्याची लाली कमी करून त्वचेला स्वच्छ करतात. एका वाटीत दही घेऊन सनबर्नच्या जागी लावून घ्यावे. जवळ-जवळ १० ते १५ मिनिटानंतर धुऊन घ्यावे. असे केल्याने त्वचेची रोमछिद्रे उघडतात आणि त्वचा स्वच्छ होऊन उजळते आणि सनबर्नमध्येही बराच आराम मिळतो.

मुलतानी माती : सनबर्नमुळे त्वचा काळी पडते. अशा स्थितीत मुलतानी मातीचा उपयोग केल्यास त्वचेत उजळपणा येतो. मुलतानी मातीत नारळाचे पाणी आणि साखर मिसळून पेस्ट तयार करून घ्या. आता या पेस्टला त्वचेवर लावून तोपर्यंत लावून ठेवा जोपर्यंत ती पूर्णपणे सुकून जात नाही. नंतर थंड पाण्याने धुऊन घ्या.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें