आरोग्य परामर्श

* डॉक्टर गाजिंदर कुमार गोयल, संचालक, कार्डीयोलॉजी मेरेंगो क्यूआरजी इस्पितळ फरीदाबाद

प्रश्न : मी ५२ वर्षीय नोकरदार महिला आहे. मला एकदा हार्ट अटॅक येऊन गेलाय. माझ्यासाठी दुसरा हार्ट अटॅकचा धोका वाढला आहे का?

उत्तर : ज्यांना पहिला हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे, त्यांना पुन्हा येण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा अधिक असते. दरवर्षी हा धोका १० ते १५ टक्के वाढू शकतो. पाच वर्षात पन्नास टक्के लोकांना दुसरा अटॅक येतो. पहिल्या हार्ट अटॅकनंतर जीवनशैलीमध्ये बदल करा, तळलेल्या खाद्यपदार्थांचं सेवन करू नका, बाहेरचं खाणं खाऊ नका घरी बनवलेलं साधं खाणं खा.
तुमच्या रक्तामध्ये साखर आणि कोलेस्ट्रॉलचा स्तर आणि रक्तदाब नियंत्रित ठेवा. वेळेवर औषध घ्या. धूम्रपान दुसरा हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढवतो, म्हणून जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते पूर्णपणे बंद करा.

प्रश्न : मला गेल्या चार-पाच वर्षापासून उच्च रक्तदाबाची तक्रार आहे. मला वारंवार चक्कर येऊ लागते. हृदय धडधड करू लागतं मी काय करू?

उत्तर : जर रक्तदाब १४०-९० पेक्षा अधिक असेल तर त्याला उच्च रक्तदाब मानलं जातं. मिठाचे सेवन कमी करा, नियमितपणे व्यायाम करा, तुमचं वजन वाढू देऊ नका, जर वाढलं असेल तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा. धूम्रपान आणि दारूचे सेवन पूर्णपणे बंद करा. जर रक्तदाब नियंत्रणात ठेवला नाही तर हार्ट अटॅक, किडनी डिजिज, स्ट्रोक, पायाच्या धामणीमध्ये ब्लॉकेज येणे, डोळयांच्या पडद्यामध्ये ब्लीडिंग झाल्यामुळे डोळयांचा दृष्टी निघून जाणं सारख्या आरोग्य समस्यांच्या धोका अधिक वाढतो.

प्रश्न : माझ्या पतींना काही दिवसापूर्वी हार्ट अटॅक आला होता. हार्ट अटॅकपासून रिकव्हर होतेवेळी आहार कसा असायला हवा आणि कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं?

उत्तर : पहिले दोन महिने खूपच महत्त्वाचे असतात. हार्ट अटॅकने रिकव्हर व्हायला ७ ते ८ आठवडे लागतात. निरोगी राहण्यासाठी प्रोटीन, कॅलरी, कार्बोहायड्रेट तिन्ही खूपच गरजेचं आहे. परंतु हार्ट अटॅक आलेल्या लोकांनी स्वत:च्या आहारात फॅट्सचं प्रमाण खूपच कमी करायला हवं. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ थोडया प्रमाणात घ्या. देशी तूप, लोणीचं सेवन खूप कमी प्रमाणात करा. तळलेल्या अन्नाचं सेवन करू नका.
सुका मेवामध्ये बदाम, अक्रोड खाऊ शकता. रिफाइंड ऑइलमध्ये ऑलिव्ह आणि कनोला ऑइलचं सेवन करा. तेल वेगवेगळे वापरत राहा कारण सर्वांमध्ये वेगवेगळे गुण असतात. शारीरिक हालचाल हळूहळू वाढवा. ९-१० दिवस तर पूर्णपणे बेडरेस्ट करा. नंतर हळूहळू घरातल्या घरातच थोडं चालायला सुरुवात करा. १ महिनानंतर १ किलोमीटर रोज पायी चाला. २ महिन्यानंतर ३-४ किलोमीटर दररोज पायी चाला. हा हृदय आणि तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी एक उत्तम उपाय आहे.

प्रश्न : माझ्या कुटुंबात हृदयरोगाचा इतिहास आहे. अशावेळी माझ्यासाठी किती धोका वाढतो?

उत्तर : अनुवंशिक हृदयरोग एक प्रमुख रिस्क फॅक्टर आहे. जर तुमच्या कुटुंबातील सदस्यांची वयाच्या ५५ पूर्वीच हृदयरोगाची कौटुंबिक हिस्टरी असेल तर पुढच्या दोन पिढ्यांसाठी हा धोका अधिक असेल. ५५ वयापूर्वी होणाऱ्या हृदयरोगाला प्री मॅच्युअर हार्ड डिसीज म्हणतात. परंतु ५५ नंतर हार्ट अटॅक व हृदयरोग झाला असेल तर तुमच्यासाठी रिस्क कमी असेल. उत्तम आहार, अनुशासित जीवनशैली, शारीरिक हालचाल, निरोगी वजनावर नियंत्रण ठेवणं, तणाव आणि चुकीच्या सवयीपासून दूर राहणं, वेळोवेळी सर्व तपासण्या करून घेणं हृदयरोगापासून वाचण्याचा उत्तम उपाय आहे.

प्रश्न : माझ्या पतींचा कोलेस्ट्रॉलचा स्तर खूपच अधिक आहे. यासाठी काय उपाय आहे? घरगुती उपायांनीदेखील कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित ठेवता येतो का?

उत्तर : कोलेस्ट्रॉलला हृदयरोगाचा सर्वात प्रमुख रिस्क फॅक्टर मानलं जातं. याचा स्तर नियंत्रित ठेवण्यासाठी जीवनशैलीमध्ये परिवर्तन आणा, नियमितपणे व्यायाम करा, हलकं आणि सुपाच्य भोजन सेवन करा ज्यामुळे सॅच्युरेटेड फॅट्स जसे तूप आणि लोणी कमी प्रमाणात असावं, भाज्या, फळं आणि मोड आलेलं धान्य अधिक प्रमाणात घ्या. डिप फ्राय भोजनापासून दूर राहा, बाहेरचं फास्ट फूड खाऊ नका कारण यामध्ये वारंवार एकाच तेलाचा वापर केला जातो. एकूण कोलेस्ट्रॉल २०० पेक्षा अधिक आणि एल डी एल वा वाइट कोलेस्ट्रॉल १३० पेक्षा जास्त असेल आणि तुमचं वय ४० पेक्षा अधिक असेल तर औषध घेणं गरजेचं आहे. औषध कोलेस्ट्रॉलच्या स्तराला एक महिन्यापर्यंत पन्नास टक्के कमी करतं.

प्रश्न : माझ्या वडिलांचे हृदय ६० टक्के काम करत आहे पूर्ण हार्ट फेल्यूअरपासून वाचण्यासाठी काय उपाय करायला हवा?

उत्तर : जर हृदयाची कार्यप्रणाली ५० टक्केपेक्षा अधिक असेल तर ते सामान्य मानलं जातं. तर हृदय ४० टक्केपेक्षा देखील कमी काम करत असेल तर त्याला हार्ट फेल्युअर म्हणतात. याची कारणं श्वास फुलणं, थकवा, हृदयाची धडधड वाढणं, पायात सूज येणं यासारखी लक्षणं दिसून येतात. तुमच्या वडिलांचं हृदय १०० टक्के काम करत नसेल तर त्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांचा रक्तदाब, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलच्या स्तराला नियमित नियंत्रित ठेवा. वेळोवेळी त्यांच्या तपासण्या करत रहा.

हृदयाला बंद होण्यापासून वाचवा

* डॉ. संजीव अग्रवाल, एचओडी आणि वरिष्ठ सल्लागार, हृदय विज्ञान, सरोज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवी दिल्ली

उत्पन्न वाढल्यामुळे लोकांची जीवनशैली बदलली आहे. ते जास्त आरामदायी जीवन जगू लागले आहेत. जीवनाच्या स्पर्धेत पुढे जाण्याच्या इर्षेने तणावाची पातळी वाढत चालली आहे. त्यातच गॅजेट्सच्या अतिवापराने शरीराची हालचाल जवळपास संपवून टाकली आहे. यामुळे भारतात हृदयरोगाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. आपल्या देशात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू हृदयरोगामुळे होतात. सुरुवातीला या आजाराकडे वृद्धांना होणारा आजार म्हणून पाहिले जायचे. आता मात्र हा अतिशय वेगाने तरुणांचीही शिकार करत आहे.

आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवून हृदयरोगापासून स्वत:ला वाचवता येते. जर तुम्ही हृदयरोगाच्या जाळयात अडकला असाल तर घाबरू नका. यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे केलेले उपचार फारच प्रभावी ठरत आहेत.

हृदयरोगाशी संबंधित प्रमुख समस्या

हृदयरोगाचा टका : मानवी हृदय मांसपेशींनी बनले आहे. त्याला सतत अन्न आणि ऑक्सिजनची गरज भासते. हृदयाला रक्त पोहोचवणाऱ्या धमन्या आकुंचन पावल्या असतील तर हृदयाच्या मांसपेशींना अन्न आणि ऑक्सिजन मिळत नाही आणि त्या मृत होऊ लागतात. यामुळे हृदय कमकुवत होते आणि शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह होऊ शकत नाही. त्यामुळे जीव जाण्याचा धोका वाढतो. या संपूर्ण प्रक्रियेला हार्टअटॅक म्हणजेच हृदयरोगाचा झटका येणे असे म्हणतात.

हृदयाचे अनियंत्रित ठोके : हृदयाचे अनियंत्रित ठोके हे हृदय बंद होण्याचे संकेत असू शकतात. सामान्य आणि निरोगी माणसासाठी हृदयाचे ठोके ६० ते ९० बीट प्रती मिनिट असतात, मात्र अनेकदा ते अनियंत्रित होऊ शकतात. हृदयाची धडधड प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास कार्डियक अरेस्ट किंवा हार्टअटॅक येऊ शकतो. अॅनिमिया हेही हृदयाच्या अनियंत्रित ठोक्यांसाठी कारणीभूत ठरू शकते, कारण यामुळे लाल रक्तपेशींची संख्या कमी झाल्यामुळे हृदयाला शरीरातुन रक्त पुरवठा मिळवण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, ज्यामुळे हृदयाची धडधड वाढते आणि लेफ्टवॅट्रिक्युलर हायपरट्रोफी (एलवीएच) हा गंभीर आजार होतो. यात हृदयाच्या मांसपेशींचा आकार वाढतो. यामुळे हृदय बंद पडणे किंवा लाल रक्तपेशी लवकर नष्ट होण्याचा धोका वाढतो. तणाव वाढल्यानेही हृदयाचे ठोके वाढतात.

कार्डियक अरेस्ट : कार्डियक अरेस्टमध्ये हृदय बंद झाल्याने रक्तप्रवाह पूर्णपणे बंद होतो. याला कार्डियकपलमोनरी अरेस्ट किंवा सर्क्युलेटरी अरेस्ट असे म्हणतात. जे लोक हृदयरोगाने त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात हार्टअटॅकची समस्या आनुवंशिक आहे त्यांना कार्डियक अटॅकचा धोका जास्त असतो. अनेकदा सुदृढ माणूसही याच्या जाळयात ओढला जाऊ शकतो. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपानाचा अतिरेक हे या आजारास कारणीभूत ठरू शकतात.

हार्ट फेल्युअर : हार्ट फेल होणे ही एक गंभीर समस्या आहे. अशी समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा हृदयाच्या मांसपेशींचे जास्तीत जास्त नुकसान होते, त्यामुळे त्या शरीरात पुरेशा प्रमाणात रक्तप्रवाह करू शकत नाहीत. वृद्धांमध्ये ही समस्या अधिक जाणवते. श्वास घेण्यास त्रास होणे, थकवा आणि तळव्यांना सूज येणे, ही याची प्रमुख लक्षणे आहेत. हार्ट फेल्युअरचा अर्थ हृदय बंद पडणे किंवा हृदयाने कार्य करणे बंद केले असा होत नाही. याचा अर्थ असा की, हृदय रक्ताला योग्य पद्धतीने आणि जितकी गरज आहे तितके पंप करू शकत नाही. हे कोरोनरी हार्ट डिसिस, हृदयाचा व्हॉल्व म्हणजे झडपा किंवा मांसपेशींचे नुकसान होणे किंवा व्हायरसच्या संक्रमणामुळे होऊ शकते.

एनजाइना : एनजाइना म्हणजे हृदयविकाराचा दाह. छातीत दुखणे हे याचे सर्वात प्रमुख लक्षण आहे. एनजाइना आर्थोस्लोरोसिसद्वारे होतो. यामुळे हृदयात रक्ताचा प्रवाह कमी होतो. यात छाती, डावा हात, खांदा किंवा जबडा दुखू लागतो. शारीरिक श्रम करताना वेदना अधिक वाढतात. थोडासा आराम केल्यावर त्या कमी होतात. एनजाइनाची लक्षणे दिसू लागली असतील तर लगेचच हृदयरोग विशेषज्ञाचा सल्ला घ्या.

या संकेतांकडे गांभीर्याने पाहा

* छातीत अस्वस्थ वाटणे, छाती जड होणे.

* छातीत दुखण्यासह धाप लागणे.

* खूप जास्त घाम येणे.

* सतत चक्कर येणे, थकवा किंवा अशक्तपणा.

* खांदे सुन्न होणे.

* बोलताना जीभ अडखळणे.

हृदयासाठी आवश्यक टीप्स

खालील उपाय करून तुम्ही हृदयाला आजारी होण्यापासून वाचवू शकता :

* सॅच्युरेटेड फॅट्स आणि ट्रान्स फॅट्सचे कमीत कमी सेवन करा. तुमच्या आहारातून लाल मांस कायमचे वगळा, त्याऐवजी फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश करा.

* शारीरिक रूपात सक्रिय राहा, कारण शरीराच्या सततच्या हालचालींमुळे अतिरिक्त चरबी जळून जाते. कोलेस्टेरॉल आणि वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते.

* ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवणे हा हार्टअटॅकपासून वाचण्याचा एक महत्त्वाचा उपाय आहे.

* धुम्रपान, दारू पिणे टाळा.

* हृदयरोग बराचसा अनुवंशिक आहे. ज्यांचे आईवडील, भावंडांना हृदयरोग आहे त्यांनी जास्त काळजी घेणे गरजेचे असते.

उपचाराचे नवीन तंत्रज्ञान

हृदयरोग हा आरोग्याशी निगडित एक गंभीर आजार समजला जातो. म्हणूनच असे उपाय करा ज्यामुळे तुम्ही याच्या जाळयात येण्याची भीती कमी होईल. त्यानंतरही जर हा आजार झालाच तरी घाबरू नका. आजकाल नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे जे जीवन वाचवणारे समजले जाते. म्हणूनच हृदयरोगाची लक्षणे ओळखून लगेचच डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

एंजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी

हृदयाच्या मांसपेशींना वाचवण्यासाठी अन्न आणि ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळणे सर्वाधिक गरजेचे असते. यासाठीच एंजिओप्लास्टी एक प्रभावी उपचार समजला जातो. याद्वारे हार्टअटॅकमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या कमी करता येऊ शकते. सुरुवातीला रक्ताच्या गुठळया विरघळवण्यासाठी औषध दिले जात असे, पण ते त्या विशेष ठिकाणावर पोहोचण्याआधीच संपूर्ण शरीरात पसरत असे. यामुळे कधीकधी ब्लिडिंगची समस्या निर्माण होत असे. प्राथमिक एंजिओप्लास्टीमध्ये रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेल्या गुठळया स्क्रीनवर पाहाता येतात. त्यांना काढून रक्तप्रवाह पुन्हा सुरू केला जातो. गरजेनुसार अत्याधुनिक एंजिओप्लास्टी केली जाते. यात धमन्यांमध्ये रक्ताचा प्रवाह सुधारण्यासाठी एक लवचिक नळी टाकली जाते. याव्यतिरिक्त बायपास सर्जरीही केली जाते.

ऐऑर्टिक व्हॉल्व रिप्लेसमेंट

जर हृदयातील एखादा व्हॉल्व किंवा झडप योग्य प्रकारे काम करत नसेल तर ती बदलण्यासाठी सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया गरजेची असते. ती व्हॉल्व बदलून तिच्या जागी कृत्रिम व्हॉल्व बसवली जाते.

हृदय प्रत्यारोपण

यात आजारी किंवा खराब झालेले हृदय बदलून त्या ठिकाणी निरोगी हृदय बसवले जाते. या प्रक्रियेचा उपयोग हार्ट फेल्युअरमुळे त्रस्त रुग्णांसाठी अंतिम उपचार म्हणून केला जातो. यासाठी त्या लोकांचे हृदय घेतले जाते ज्यांना ब्रेन डेथ म्हणून घोषित केले जाते. दात्याच्या शरीरातून काढल्यानंतर ६ तासांच्या आत हृदय प्रत्यारोपण करणे आवश्यक असते. अशी शस्त्रक्त्रिया यशस्वी होण्याची ३० टक्के शक्यता असते. डॉक्टरांच्या मते जीवनशैलीत बदल करणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण त्याशिवाय कोणताही उपचार किंवा औषध प्रभावी ठरू शकत नाही.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें